आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चक्रधर व हॅर्टाच्या असफल
चक्रधर व हॅर्टाच्या असफल प्रेमाची कहाणी असलेली कादंबरी ?
रणांगण - विश्राम बेडेकर
रणांगण - विश्राम बेडेकर
बरोबर
बरोबर
साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिकेचे (वेगळे) पुस्तक *
शास्त्रीय संगीतातला एक राग
तीन अक्षरी
* हे पुस्तक कादंबरी नाहीये तर कथासंग्रह आहे (पहिल्यांदा मला कादंबरी वाटल्याने तसा उल्लेख केला होता)
चला, द्या लवकर !
चला, द्या लवकर !
पूरिया ?
पूरिया ?
'पूरिया' गदिमांचा कवितासंग्रह
'पूरिया' गदिमांचा कवितासंग्रह आहे.
मारवा -आशा बगे
मारवा -आशा बगे
मॅगी बरोबर
मॅगी बरोबर
साहित्य अकादमी पुरस्कार
पुरस्कार विजेता एक कवितासंग्रह ज्याची पुपुवर नेहमी चर्चा होते (एका विशिष्ट आय्डी बद्दल)
__ज_ व_
भिजकी वही - कोलटकर
भिजकी वही - कोलटकर
करेक्ट!
करेक्ट!
ही वही कोरडी नकोस ठेवू
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फोटो
ही अक्षरें विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणार्या म्हशींच्या दुधात माझ्या कवितांचा अंश सापडो
अशी 'कातील' आळवणी या संग्रहाच्या मलपॄष्ठावर आहे.
बेस्ट आहे ते
बेस्ट आहे ते
बाकीबाबांचा एक गाजलेला
बाकीबाबांचा एक गाजलेला कवितासंग्रह
- द - -ल
चांदणवेल
चांदणवेल
बरोबर
बरोबर
वेगळ्या वाटेची एक काल्पनीक
वेगळ्या वाटेची एक काल्पनीक ऐतिहासिक कादंबरी
_ता_ _ _ _र
संताजीची बखर ?
संताजीची बखर ?
अंताजीची बखर.
अंताजीची बखर.
बरोबर असेल, तर पुढचा प्रश्न साद यांनी द्यावा.
भरत बरोबर.
भरत बरोबर.
साद, द्या पुढचा प्रश्न
साद, द्या पुढचा प्रश्न
वपु यांच्या ५२ व्यक्तीचित्रे
वपु यांच्या ५२ व्यक्तीचित्रे असलेल्या पुस्तकाचे नाव
माणसं?
माणसं?
बरोबर
बरोबर
_ _ _ _ चा _ _ ड
_ _ _ _ चा _ _ ड
पायाखालचा दगड
पायाखालचा दगड
नाही.
नाही.
माथ्यावर चा उजेड
माथ्यावर चा उजेड
नाही.
नाही.
इतिहासप्रसिद्ध पुस्तक आहे.
Pages