आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ३ :- मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
यांना भाई या नावानेही ओळखतात
_ ल _ _ _ डे
खेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:11
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला त्यांचं पूर्ण नाव माहीत
मला त्यांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं.>> हो भरत, म्हणूनच तो प्रश्न दिला. पूर्ण नाव फार पाहण्यात येत नाही.
** *ध* *ग* इतिहासकार
** *ध* *ग*
इतिहासकार
सेतुमाधवराव पगडी
सेतुमाधवराव पगडी
नाथ माधव?
नाथ माधव?
अरे हो की ! मला माधव वरून
अरे हो की ! मला माधव वरून दुसरे कोणी आठवत नव्हते
भरत, बरोबर
भरत, बरोबर
पुढचं नाव मी विचारत नाही.
पुढचं नाव मी विचारत नाही. मनस्विता यांनी विचारलेलं ओळखा
जुन्या काळातील स्त्री लेखिकेचे आत्मवृत्त
चार अक्षरी
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
स्मृतिचित्रे?
स्मृतिचित्रे?
मॅगी तुम्ही द्या कोडं
मॅगी तुम्ही द्या कोडं
हो देते थांबा
हो देते थांबा
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी मराठी साहित्यविश्वात खळबळ माजवणारे त्या काळातील बोल्ड पुस्तक
--चे -श्वा-
कळ्यांचे निःश्वास?
कळ्यांचे निःश्वास?
बरोबर!
बरोबर!
मॅगी जरा डिटेल्स सांगा ना या
मॅगी जरा डिटेल्स सांगा ना या पुस्तकाचे. मला फक्त नाव आठवतंय.
पुढचं कोडं
-----ट ६ अक्षरी शब्द. कथासंग्रह, पण एका सुप्रसिद्ध कवीचा.
मालती बेडेकर यांनी विभावरी
मालती बेडेकर यांनी विभावरी शिरूरकर नाव घेऊन कळ्यांचे निःश्वास हा कथासंग्रह साधारण 1930 च्या सुमारास लिहिला. त्यातील कथांचे विषय विवाहबाह्य/लिव्ह इन संबंध, एकल पालकत्व, बाईने लग्न न करता आपले घर चालवणे इ. त्या काळाच्या खूप पुढचे होते. ज्यामुळे पारंपरिक लोक हादरले.
वावे, मधलं एखादं अक्षर द्या
वावे, मधलं एखादं अक्षर द्या ना.
हं, बरोबर. आता आठवलं.
हं, बरोबर. आता आठवलं.
___ट_ट
___ट_ट
चौथं आणि सहावं अक्षर ट.
ओह, ग्रेट माहिती मॅगी. मिळेल
ओह, ग्रेट माहिती मॅगी. मिळेल का आता पुस्तक बघायला हवे.
अजून एक क्ल्यू
अजून एक क्ल्यू
शब्द इंग्रजी आहे.
बरं झालं सांगितलं, मी
बरं झालं सांगितलं, मी कुठलीतरी वाट आठवत होते
(No subject)
क्ल्यू हवाय का अजून?
क्ल्यू हवाय का अजून?
हो कवीबद्दल क्लू द्या
हो कवीबद्दल क्लू द्या
हे फक्त कवी नाही, तर नाटककार,
हे फक्त कवी नाही, तर नाटककार, कादंबरीकारही होते.
वि वा शिरवाडकर
वि वा शिरवाडकर
अपॉइंटमेंट
( कथासंग्रह गुगल केला हां.)
बरोबर
बरोबर
शिरवाडकर कथालेखक म्हणून फारसे परिचित नसले, तरी त्यांच्या कथा या त्यांच्या कवितांच्या तोडीच्या आहेत.
शांता शेळके यांनी ' शिरवाडकरांच्या निवडक कथा' या नावाने संपादन केलेले एक पुस्तक आहे. त्यांच्या कथांमध्ये भरपूर वैविध्य आहे. आश्चर्य वाटेल, पण विनोदी कथाही आहेत. जरूर वाचा.
बरं केलं सांगितलंत.
बरं केलं सांगितलंत. मभादिनिमित्त त्यांची पुस्तकं शोधलेली तेव्हा हे दिसलं नव्हतं.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयत्रीचा महत्त्वाचा कवितासंग्रह.
कवितेइतकीच साहित्याच्या अनेक क्षेत्रांत त्यांची मुशाफिरी होती.
तीन अक्षरी. - - ण .
सध्या that thing is fashionable with english name.
गोंदण
गोंदण - शांताबाई
)
( ईंग्रजी मद्धे टॅटु
Pages