चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राकेश बापट चांगला होता पण त्याला फार संधी मिळाली नाही.
हिरॉईन सिनेमात पण होता तो. मध्यंतरी वसिष्ठ नाव लावत होता आणि राकेश चे स्पेलिंग पण आर ए क्यु यु एस एच असे लिहित होता.
आता परत बापट लावत असेल तर नाही माहिती. अशी नावं बदलून यशावर चांगला परिणाम होतो का? Uhoh

काय माहीती.

सात फेरे हिंदी सिरीयल मी बघायचे, त्यात बरेच मराठी होते. शरद केळकर आणि राजश्री ठाकूर जोडी आवडायची मला. त्यात तो आधी होता, मग बरेच दिवस नव्हता मग एक track व्हिलन होऊन आलेला पण तोपर्यंत मी सिरीयल सोडलेली.

ओह आठवलं. सात फेरे मी पण बघायचे, त्यात तो गायक आणि सलोनी चा प्रियकर आणि मग शुभ्रा चा नवरा होता ना?तो तो आहे असं क्लिक नाही झालं.
सदापरांजपे मध्ये खूप हँडसम दिसतो.तरुण आणि काळे केस वाला निनिमु दिसतो.(असं नवरा म्हणाला)
मी अडिक्ट होते त्या सिरीयल ला.कधी मिस झाली तर त्याचे फोरम वाचायचे.

परवाच्या वीकान्ताला ३ सिनेमे बघितले
रेस ३, बेफिक्रे , अप इन द एयर
रेस ३ तद्दन फालतू आहे. केवळ बेगडी माणसे त्याहून बेगडी संवाद अशी भेळ आहे. सलमान खान ने acting चे acting करणे ही सोडून दिले आहे. हंडिया मधल्या बंदूक वगैरेंच्या दुकानदाराने दुबई सारख्या ठिकाणी एक बेट विकत घेतले आहे. ऍक्शान पट नसून फँटसि असावी असे वाटले.
बेफिक्रे चे पहिला भाग चक्क बरा वाटला . आई बापाशी उद्धटपणे वागणारी मुले हा आता नॉर्म झाला आहे बहुतेक. दुसरा भाग पुन्हा फालतू निघाला. वाणी कपूर दिसायला चांगली आहे पण तिचा कपडेपट अगदीच गबाळा आहे.
अप इन द एयर - सिनेमा चांगला आहे. एकटेपणा, स्वातंत्र्य, निर्वाहाची चिंता अशा बऱ्याच बाबींना स्पर्श करून जाणारा सिनेमा आहे. पण ऑस्कर नामांकन मिळावे एवढा काही विशेष वाटला नाही.

मग शुभ्रा चा नवरा होता ना? >>> त्यात शुभ्रा नावाचं charactor होतं का. आठवत नाहीये. मराठी शुभ्रा सगळ्या आठवतायेत. सलोनीच्या बहिणीचे नाव असतं का शुभ्रा.

त्यात ती एक नणंद होतीना मग ती change झाली कारण तेव्हा तिचे लग्न विलासराव देशमुख यांच्या मुलाशी अमित शी झालं.

अप इन द एअर - खूप आवडता पिक्चर आहे. जॉर्ज क्लूनी चे "घर पाण्यावरी, बंदराला करतोय ये-जा" ची आवृत्ती असलेले फ्लाइट लाइफ, त्यावरच्या कॉमेन्ट्स जबरी आहेत. त्याच्या कामात त्याला भेटणारे लोक वगैरे पाहताना ते सॅड आहेच. पण त्या सतत फिरण्याच्या लाइफ मधे सुद्धा एक फॅण्टसी वाटण्यासारखे काहीतरी आहे. हॉटेल्स, एअर लाइन्स मधे त्याला मिळणारी वागणूक वगैरे Happy तो पहिला भाग अनेकदा पाहतो मी.

अप इन द एअर बद्दल त्या हाबच्या धाग्यावर लिहायला हवे. ते पुस्तक ठीक ठाक आहे, सिनेमा मला तरी अधिक आवडला

ऐक या नावाचा मराठी भयपट युट्यूबवर पाहिला. प्रसाद ओक आणि आदिती शारंगधर चांगलेच तरूण द्दिसताहेत. जुना असावा.
एका हॉरर रिअ‍ॅलिटी शो च्या निमित्ताने त्या शो चा प्रोड्युसर स्वतःच ऐन वेळी पार्टिसिपंट बनतो. त्याचे आणि बायकोचे वेळ नसणे या कारणावरून खटके उडणे, एकीकडे त्याच्या कामाचे टेन्शन दुसरीकडे सो चे हा भाग चांगला जमून आला आहे. ती घटस्फोट मागण्यासाठी शूटच्या लोकेशनला येऊन थडकते हे जरा अती झाले. आणि प्रतिभागी नसल्याने नव-याच्या विनंतीवरून ती प्रतिभागी व्हायला तयार होते याचेही लॉजिकल जस्टीफिकेशन तोकडे पडते.

पुढे काय घडते हे सांगण्यात अर्थ नाही.
मात्र अशा भयकथांमधे रिअल लाईफमधल्या घटनांतील नकारात्मकता आणि अमानवीय घटना यांची सांगड धारपकथांमधे उत्तम घातली जाते. त्या दृष्टीने कथा, पटकथा अगदीच ठिसूळ आहेत. वेळ जात नसेल तर पहायला हरकत नाही.

मामी, SEARCHING बघितला!

जबरी आहे! याप्रकारचा मी पाहिलेला हा पहिलाच सिनेमा; त्यामुळे खूप आवडला.
त्याच्या प्रेझेंटेशनची आयडीयाच लई आवडली.

फक्त, एकच वाटलं, एखादा नेट-सॅव्ही नसलेला मनुष्य हा सिनेमा पाहायला गेला तर त्याला अर्धाअधिक झेपणारच नाही...

पण इथे सगळे नेट-सॅव्ही आहेतच; तस्मात हा सिनेमा मुळीच चुकवू नका.

काल स्त्री बघितला.
मस्त आहे. धमाल हॉरर कॉमेडी.
राज्कुमार राव मला आवडतोच. श्रद्धा कपुर हे बरीच बरी वाटली.
बाकी सपोर्टिंग काटिंगमधेही सगळे फिट आहेत.

काल स्त्री बघितला.
मस्त आहे. धमाल हॉरर कॉमेडी.
राज्कुमार राव मला आवडतोच. श्रद्धा कपुर हे बरीच बरी वाटली.
बाकी सपोर्टिंग काटिंगमधेही सगळे फिट आहेत. +१११
हो छाने चित्रपट.. मी थोडी घाबरले पण काही सीन्स बघताना.. चित्रपटात दाखवलेल चन्देरी गाव आहे ना, मस्तय ते..घर, किल्ला आवडला विशेष्करुन Happy

ठील ठीक Proud

राकेश बापट सारखा उमदा माणूस इतकी वर्षे काय करत होता तुम बिन मध्ये एक तासात मेल्यावर माहीत नाही. <<<
सदा परांजपे. <<< अनु Lol

काल स्त्री बघितला.
मस्त आहे. धमाल हॉरर कॉमेडी. >>>+++१११
छान आहे ......पण मला एक जाणुन घ्यायचे आहेकी -शेवटी श्रध्दा स्वतः ती वेणी का लावते ? ?आणि काय बोलते बसमध्ये बसुन ??

शेवटी श्रध्दा स्वतः ती वेणी का लावते ? ?आणि काय बोलते बसमध्ये बसुन ????
स्पॉयलर अलर्टः

ती दुष्ट असते म्हणून.. असे कर्ण्याने तिची शक्ती वाढेल

शेवटी श्रध्दा स्वतः ती वेणी का लावते ? ? >>>> या प्रश्नांची उत्तरे लवकरच आपल्याला मिळतील स्त्री पार्ट २ किंवा स्त्री फिर से मधे.

एक च संधी असेल तर कोणता चित्रपट बघावा? स्त्री/ सविता दामोदर परांजपे..?
Submitted by बी.एस. on 10 September, 2018 - 12:54
>>>>
दोन शेजारशेजारच्या स्क्रीन असतील तर पूर्वार्ध एकीकडे आणी उत्तरार्ध दुसरीकडे
हाकानाका.

स्त्री पाहिला. मस्ट वाॅच हाॅरर-काॅमेडी.
अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. स्पाॅयलर ठरतील, म्हणून त्यावर नंतर कधीतरी..

सदा परांजपे हे स्त्री चे च नाव आहे.>>> अहो नाही हो. चित्रपटाचे मूळ नाव सविता दामोदर परांजपे आहे. पण काही माबोकरान्नी त्याच सदा परांजपे अस नामकरण केल आहे. मूळ नावाचा शॉर्ट फॉर्म Lol

स्त्री पाहिला. मस्ट वाॅच हाॅरर-काॅमेडी.
अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. स्पाॅयलर ठरतील, म्हणून त्यावर नंतर कधीतरी.. >>>+१

1945 हा हंगेरीयन सिनेमा काल पाहिला.
दुसऱ्या महायुद्धात हंगेरीयन लोकांनी ज्यूंना सापडवून, पकडून जर्मनांच्या ताब्यात देण्यात उत्साहाने भाग घेतला होता. या काळात हंगेरीतून जवळ जवळ सर्व ज्यू 'नष्ट' झाले. या संपवलेल्या ज्यूंची संपत्ती, मालमत्ता, धंदे गावातल्या लोकांनी हडपले.

1944मध्ये युध्द संपल्यावर हंगेरी सोविएत सैन्याच्या अधिपत्याखाली गेला. अजून आयर्न कर्तन, बर्लिन वॉल वगैरे उभे राहायचे होते, हंगेरीत व इतर सेंट्रल/ ईस्टर्न युरोपिअन देशात अजून कम्युनिस्ट सरकारे बनायची होते, वारे वाहू लागले होते.

1945मधल्या एका सामान्य दिवशी एका खेड्यात टाऊन क्लार्कच्या (सरपंच/तलाठी) मुलाचे लग्न आहे. सरपंचाच्या बायकोला हे लग्न पसंत नाहीये, ती कशापासून तरी दूर जाण्यासाठी ड्रग्ज (नार्कोटिक औषध?) घेतेय. तीन रशियन सैनिक गावात तैनात आहेत. आपल्यापेक्षा जरा खालचे असले तरी टाऊन क्लार्कने व्याह्यांना accept केले आहे. नवऱ्या मुलीचा आधी ज्याच्याबरोबर लग्न ठरले होते तो handsome मुलगा युद्धवरून परतला आहे आणि कॉम्रेड झालेला दिसतो आहे. होणारा नवरा सरळ मार्गी, एक औषध/किराणा दुकान चालवणारा आहे.

अश्या या दिवशी सकाळच्या ट्रेनने दोन सनातनी ज्यू - कदाचित काका पुतण्या, एक साठीचा आणि एक विशीतला उतरतात. त्यांनी बरोबर दोन मोठ्या ट्रांक आणल्या आहेत ज्या ते एकच घोडागाडीवाला असतो त्याला ट्रेनमधून उतरवून घोडागाडीवर चढवायला सांगतात.
स्टेशनमास्तर या ज्यूंना पाहून चपापतो, गाडीवाल्याला एकदम हळू हळू जा असे सांगतो आणि स्वतः सायकलवरुन या आगंतुकांची खबर द्यायला गावात जातो. बातमी ऐकून गावातले लोक हे नेमके काय आले असतील याचा विचार करत उपाययोजना करु लागतात.

संपूर्ण सिनेमात हे दोन ज्यू घोडागाडीमागे चालत गावाकडे येतात, गावातून जातात. त्या पार्श्वभूमीवर सरपंचाच्या घरातले, त्याच्या पित्त्यांच्या घरात, नवऱ्या मुलीच्या व तिच्या घरात होणारी गडबड, द्वंद्व, भांडणे पडद्यावर सुरू राहते. एक लघुकथा पाहिल्याचा अनुभव येतो. आणि हा सिनेमा एका लघुकथेवरच बेतलेला आहे (homecoming). सामान्य माणसे, असामान्य परिस्थिती, स्वभावातले वैविध्य, निगरगट्ट ते अपराधी भावनांचे स्पेक्ट्रम आणि या सगळ्यांच्या प्रभावाखाली घेतले जाणारे निर्णय या सिनेमात दिसते. आणि एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा अनुभव मिळतो.

Pages