चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाईम मॅनेजमेंट एक महत्वाचे टेक्निक आहे, जे मला कधी जमले नाही. भरपूर प्रवासामूळे विमानात, रेल्वेत वाचन भरपूर झाले, पण चित्रपट, टीव्ही बघणे जमलेच नाही, म्हणजे तेवढा वेळ मिळालाच नाही. थेटरात जाऊन चित्रपट बघणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटायची. Titanic आला तेव्हा मी तो थेटरात बघितला होता, त्यांनतर थेटरात पाऊल ठेवले ते कट्यार काळजात घुसली बघायला.

पण माझे इतर कलीग्ज मात्र, चित्रपट, सिरियल्स, क्रिकेट मॅचेस बघून त्यावर लंच ब्रेक, टी ब्रेक ला चर्चा करायचे. कामात, घरात ते ही माझ्या एव्हढेच व्यग्र असायचे.>>>>>>
मानव, तुम्ही काही दिवसापुर्वी एका धाग्यावर मला आजकाल आयुष्यात बराच वेळ मिळत आहे असं लिहिलं होतंत.
हा बदल कसा झाला? काय बदल केलेत स्वतःमधे किंवा इतर आयुष्यात ते लिहिलंत तर वाचायला आवडेल. Happy

ओह! मी काहीच केलं नाही सस्मित Lol
छोट्याशा अपघाताने पावलाचे टेंडन रप्चर झालेले मी घरी आराम करतोय. आठवड्याभरात वहिवाट सुरू होइल.

ओके Happy
kaaLaji ghyaa

ब्लू ऑरेंजेस मुव्ही तुनळीवर पाहिला . जुन्या व्योमकेश बक्षी ची आठवण येते. >>>> पाहिला. कथा बरी होती. पण पाणी घातलं . रजत कपूर आवडला नेहमीप्रमाणे

इतर विधायक कामे पडली असताना मोबाईल व टीव्ही पाहण्यात वेळ का घालवावा? पण हाही आयुष्याचा भाग आहे ना? मग पुस्तके तरी का वाचावीत? चित्रे का बघावी? गाणी का ऐकावी हा ही प्रश्न उभा राहतो. व्यायाम, मित्र, नातेवाईक हवेत तसेच थोडे मनोरंजन हवे, नवे विचार हवेत. हे सगळे हवंय त्यालाच माणूस म्हणतात ना? नाहीतर बाकी सजीव एकच चाकोरीबद्ध आयुष्य जगताहेत.

>>> खूप छान समजावले आहे. मला हा प्रतिसाद खूप आवडला.

बरोबर आहे माझं.. तिचं नाव केकलाह असच आहे कोचलीन नाही. >>>> ओ, अस आहे काय. धन्स टिना, मामी. Happy

शिरीष कणेकरांनी लिहीलं होतं की ती कल्की, कालची का आजची याच्याशी आम्हाला काय करायचंय. >>>>> कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार होता हे कणेकरान्ना माहित नाही का? Uhoh

लोक कणेकर का वाचतात अजून? लतानी रिटायर व्हायला लावला त्यापेक्षा जास्त वेळ ते लावताहेत.
>>>
Biggrin यातला अजून शब्द काढून टाकला तरी चालेल.

अमेरिकन पॉप स्टार मॅडोना जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हा एका इंग्रजी पेपरात तिच्या गाणे व इतर आयुष्यसंदर्भात एक लेख आलेला मी वाचलेला. दोन चार दिवसांनी कुणा वाचकाचे 'ख्रिस्ताची आई मॅडोनाबद्दल तुम्ही असे कसे लिहू शकता' म्हणत लिहिलेले खरमरीत पत्र त्याच पेपरात वाचले होते.

सुलु यांची कमेंट वाचून मेंदूच्या स्मरणकेंद्रात कुठेतरी धूळ खात पडलेली स्मृती अचानक वर आली. Happy Happy

कल्की हा भगवान विष्णूचा दहावा अवतार होता हे कणेकरान्ना माहित नाही का? >>>>>>>> सुलु, कालची का आजची हा जोक तिच्या नावारुन केलाय. कल्की - कलकी - कल की. कळलं का? Happy

लोक कणेकर का वाचतात अजून? लतानी रिटायर व्हायला लावला त्यापेक्षा जास्त वेळ ते लावताहेत.
>>>:हाहा:

धन्स सस्मित, माझा गैरसमज दुर केल्याबद्दल. Happy

सुलु यांची कमेंट वाचून मेंदूच्या स्मरणकेंद्रात कुठेतरी धूळ खात पडलेली स्मृती अचानक वर आली >>>>>> हे भावना-बिवना दुखावल्या जाण हे मला पटत नाही. इतकी काही कर्मठ विचारान्ची नाहिये मी. Happy फक्त कणेकरान्च्या जोकबद्दल गैरसमज झाला होता बस्स. त्याबद्दल सॉरी.

आज 'सुई धागा' बघितला.
खूप प्रेडिक्टेबल आणि खूप सिनेमॅटिक लिबर्टी.
अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पण स्पॉयलर होईल म्हणून लिहीत नाही. कोणी धागा काढला तर लिंक द्या नक्की.
गाणी अजिबात लक्षात राहण्यासारखी किंवा मनात घर करणारी खास वगैरे नाहीत.
(खरं तर सकाळी सिनेमा पाहिला होता हे मला रात्री आठवलं इतका विस्मरणीय सिनेमा).

(खरं तर सकाळी सिनेमा पाहिला होता हे मला रात्री आठवलं इतका विस्मरणीय सिनेमा).
Submitted by पियू on 1 October, 2018 - 01:01
>>
खरयं म्हणूनच कदाचित अनुष्काचे डोक्याला हात लावून बसल्याचे फोटो प्रमोशन ला आले असावेत.

कोणीतरी चांगला म्हणा सुई-धागा ला,मला trailer आवडलाय म्हणून परीक्षा झाली की चिल्लर बरोबर जायचा प्लॅन आहे. रेटिंग पण U आहे. मला दम लगा के हैशा आवडला होता, हा पण तसाच वाटतोय. नाहीतर hotel transylvania ला जावं लागेल, मला इंग्लिश picture bore होतात (first love - हिंदी) पण हिंदी चिल्लरयोग्य नसतात.

स्मॉल फूट हा लहान मुलांचा मुव्ही बघायचा आहे..
उद्या मोस्टली बघणार आहे.. कोणी बघितला असल्यास कसा वाटला सांगा

अंधाधुन फार मस्त आहे.

जॉनी गद्दार वाला श्रीराम राघवन इस बॅक.
ट्रेलर पाहून लावलेले अंदाज सुरुवातीच्या २०-२५ मिनिटात संपतात आणि सुरू होतो एक मस्त थ्रिलर.
अनपेक्षित वळणं घेऊन सिनेमा एका धमाल पॉईंटवर संपतो.
सुंदर अ‍ॅक्टिंग, दिग्दर्शन आणि अडथळा न होणारं संगीत.

पुण्यातल्या काही भागांचं दर्शनही सुखद.
(फक्त मिडनाईट चेझ मधे आयुषमान प्रभात रोड च्या घरातल्या गॅलरी वरून उडी मारून चितळ्यांच्या चौकात कसा काय पोचतो हे तवढं ऑड वाटलं. गुडलक चौक घ्यायचा ना , तसाही आधीही एकदा दिसतोच तो सिनेमात. पण जागेचा रेफेरेन्स पुणेरी नजरेला कळला, दिग्दर्शकानी दिला नव्हता म्हणून माफ)

काही दिवसांपूर्वी `व्हिक्टोरिया अँड अब्दुल' हा सिनेमा पाहिला. व्हिक्टोरिया राणी आणि तिचा एक भारतीय नोकर अब्दुल यांची गोष्ट आहे. राणीचं काम ज्युडी डेन्चने केलं आहे. फारच मस्त अ‍ॅक्टिंग. अब्दुल म्हणजे `थ्री इडियट्स'मधला आत्महत्या करणारा विद्यार्थी.
एकदम वेगळंच कथानक आणि वातावरण आहे. नक्की बघा. सत्यकथा आहे हे मला माहिती नव्हतं. सेट्स मात्र जरा गंडलेले वाटले.

लले,

अली फजल तो
बरेचदा एकच एक्स्प्रेशन घेऊन असतो तो

व्हिक्टोरिया अँड अब्दुलचा काही मिनिटांचा भाग पाहिला, बूट चाटणे वगैरे चालू होतं, तिथेही अब्दुलची सेमच एक्स्प्रेशन्स होती म्हणून चॅनेल बदललं

बरेचदा एकच एक्स्प्रेशन घेऊन असतो तो >>> अगदी!

काल त्याचं नाव आठवत नव्हतं.

हा सिनेमा फक्त आणि फक्त जुडी डेन्चसाठी आवडला मला.

काल अचानक झी-कॅफेवर 'बर्टन अँड टेलर' सिनेमा बघायला मिळाला.

रिचर्ड बर्टन आणि एलिझाबेथ टेलरचा घटस्फोट (दोनवेळा) झाल्यानंतर ८०च्या दशकात त्यांनी ब्रॉडवेवर एका नाटकात (प्रायव्हेट लाईव्ह्ज) काम केलं होतं. ते नाटक तेव्हा तुफान चाललं (असं सिनेमात पाहताना तरी वाटलं.) त्या काळावर आधारित सिनेमा आहे.
नाटकाच्या तालमी, प्रयोग, बॅक्स्टेज गोंधळ या पार्श्वभूमीवर दोघांच्यातलं वादळी नातं दाखवलं आहे. स्टार अभिनेत्यांचे टॅन्ट्रम्स, तरी दोघांना एकमेकांच्या अभिनयक्षमतेबद्दल असलेला नितांत आदर, त्यांचा आपापला वैयक्तिक माज (त्यातही एलिझाबेथ टेलरचा जास्त) यावर फोकस आहे.

एलिझाबेथ टेलरचं काम करणारीने (हेलेना बॉनहॅम कार्टर) जबरी अभिनय केला आहे. मी टीव्ही लावला तेव्हा सिनेमा जस्ट सुरू झालेला होता. मी नावही वाचलेलं नव्हतं. स्क्रीनवर तिचा क्लोज-अप दिसला आणि पटकन वाटलं, अरे, ही ए.टेलरसारखी वाटतेय. आणि तीच निघाली. तिचा स्नॉबी अ‍ॅटिट्यूड, मूड-स्विंग्ज, रिहॅबची गरज दिसत असताना ती धुडकावणे, तरी फारशा तालमी न करताही नाटक गाजवणे, हे सगळं खूप छान घेतलंय.

त्या नाटकाच्या वेळी बर्टनची लोकप्रियता उतरणीला लागलेली होती; टेलरबद्दल मात्र अजूनही तेवढीच क्रेझ होती. (असं सिनेमा पाहताना वाटतं) ती त्याला त्यावरून टोकते देखील. पण त्याची त्याला कधी असूया वाटत नाही. नाटकाचे प्रयोग सुरू असतानाच टेलर आजारी पडते. एक प्रयोग बदली कलाकार घेऊन केला जातो. त्याला प्रेक्षकांचा थंडा प्रतिसाद मिळतो. मग तिची तब्ब्येत बरी होईपर्यंत थांबायचं ठरतं. त्या ब्रेकदरम्यान बर्टन दुसर्‍या देशात जाऊन त्याच्या गर्ल्फ्रेन्डशी लग्न करतो. टेलरला ते वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून समजतं. त्याने ती खूप अपसेट होते. त्यानंतरचे दोघांचे संवाद त्यांच्यातलं नातं दर्शवतात.
आपण एकमेकांसोबत १२ महिने १३ काळ राहू शकत नाही हे दोघांनाही समजून चुकलेलं असतं; मात्र कलाकार म्हणून एकमेकांपासून दूर राहणेही त्यांना कठीण जातं. ही कुतरओढ खूप छान घेतली आहे.

स्टार कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यांतल्या कहाण्यांमध्ये मला सहसा फारसा रस नसतो; मात्र सिनेमा म्हणून `बर्टन अँड टेलर' मला आवडला.

Pages