चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही नाही.ते फक्त गावाचे नाव आहे.मूळ कथा नारायण धारप यांच्या कथेवर आधारीत आहे.'वारसा हक्काने मिळणारा मोठा पैसा आणि काहीतरी बरोबर घेऊन येतो' अशी थीम आहे.
मी बघणार आहे. नाधा कथा आणि चांगले डिरेक्शन दोन्ही म्हणजे पैसे वसूल.

कुठ्ली कथा? >>> 'अनोळखी दिशा खंड ३' पुस्तकातील 'आजी' नावाची कथा. त्यातून फक्त हस्तरचा रेफरन्स घेतलाय. (याच आजी वर हृषिकेश गुप्तेची गानूआजी बेतलेली आहे )

हस्तर आणि अजून एक कथा, ज्यात वारसाहक्काने मिळालेल्या वाड्यात एका बळदात अमावास्येला एक विशिष्ट गोष्ट अर्पण केल्यास सोन्याची नाणी मिळतात.

(आजी आणि गानू आजी दोन्ही स्टीफन किंग च्या ग्रॅंमा कथेवरून घेतल्या आहेत असा आताच मला फेसबुकवर शोध लागला.ग्रॅंमा सुखान्त नाही.आजी सुखान्त आणि गानू आजी शोकांत आहेत.)

करेक्ट, मी_अनू!

अजून एक कथा, ज्यात वारसाहक्काने मिळालेल्या वाड्यात एका बळदात अमावास्येला एक विशिष्ट गोष्ट अर्पण केल्यास सोन्याची नाणी मिळतात >>> ही कथा वाचली नाहीये बहुधा. कुठलं पुस्तक वगैरे काही आठवतंय का?

धारपांच्या कथासंग्रहांची नावे बदललेली वाटतात फक्त. नव्याने नंतर फारसं लिखाण आढळत नाही. त्यामुळे समर्थांची स्मरणी मधील एक प्रकरण नव्या पुस्तकात आणि जुन्या काही कथा असे आढळले होते. नंतर हे पुन्हा पुन्हा आढळले. अगदी सुरूवातीचे कथासंग्रह आउट ऑफ प्रिंटच नाहीत तर अ‍ॅब्सोल्युट झालेत बहुधा. काही काही कथा आता अजिबात सापडत नाहीत.

अगदी सुरूवातीचे कथासंग्रह आउट ऑफ प्रिंटच नाहीत तर अ‍ॅब्सोल्युट झालेत बहुधा >>> यांची सगळ्यांची तर नावेदेखील माहिती नाहीत. पण कालगुंफा, सरिता, वेडा विश्वनाथ ही या कॅटेगरीतील काही पुस्तकं असावीत.

कथा बहुधा पडछाया संग्रहातली आहे.
वाचायला खूप भयंकर आहे.आपण सारे धरणीमातेची लेकरं पण.(जाऊदे हा धागा नाधा वर भरकटवायला नको.)

ट्रेलर पाहिला, त्यात सोन्याचे नाणे पाहून मला बळद कथा आठवली. कथेचे नाव आठवत नाही पण ती धारपांची नसून मतकरींची असावी.

याच आजी वर हृषिकेश गुप्तेची गानूआजी बेतलेली आहे )>> नाही. गानू आजी ही किंगच्या gramma कथेचे मराठीकरण केलेली आहे. Gramma ही skeleton crew पुस्तकात वाचता येईल.

कोणी तरी मला अंधाधुंद ची स्टोरी संपरकातून सांगा बरं, आमच्याइथे येणं अशक्य आहे आणि पुण्याच्या थेटरातून जायच्या आधी चांगला असेल तर आईला बघायला सांगावा की नाही ते ठरवायचं आहे.
आमची आई फार सेंसटीव्ह आहे , उगाच त्या सिनेमात काही तरी असेल तर दुःखी होऊन बसेल

एक मनुष्य धुक्यातून चाललेला असतो. तो अंध असतो. चित्रपट भर तो धुक्यातून कसा वाट काढतो हे दाखवलेले आहे.

रिया, wiki वर पूर्ण दिली आहे कथा. मस्तं सिनेमा आहे. दु:खी अजिबात नाही.
दृश्यम मध्ये जसं पूर्ण सिनेमाभर एक चिंता राहते की आता हा वेगवेगळ्या अडचणी कशा सोडवणार तसं वाटतं राहतं.

अंधाधुन पाहिला.पहिला हाफ जबरदस्त !!! इतका गोळीबंद, एकदम खिळवून ठेवणारा. पण सेकंड हाफ मात्र पार गंडवलाय ! शेवटी परत ट्रॅकवर येतो जरा पण तरी ३/४ सेकंड हाफची पार वाट लावली आहे. तब्बू आणि आयुष्यमान खुराना एकदम कांटे की टक्कर ! भारी अ‍ॅक्टींग दोघांची.
आपटे बाई मधल्या मधल्या गाळलेल्या जागा भरायला. पण दिलेलं काम नीट केलय.

गोष्ट आणखी कुठल्याच मार्गाने पुढे जाऊ शकली नसती. >>>> पूनम, मला तर अगदी उलट वाटलं. जो प्लॉट आणला आहे तो आणायची अजिबातच गरज नव्हती. पहिल्या हाफच्या मार्गावरून पुढे नेता आला असता जास्त चांगल्या पध्दतीने.

श्रीराम राघवनच्या निमित्ताने का होईना, पण तिचं पोटेन्शिअल आता कळलं मूव्हीमेकर्सना! देर आए एकदम दुरुस्त आए! >>>>> हे ही नाही कळलं. देर कुठे? तब्बूने पार माचिस पासून, विरासत, अस्तित्त्व, चांदनी बार, मकबूल, ते हैदर पर्यंत चांगले रोल केले आहेत की आत्तापर्यंत. मला तर वाटतं तब्बूने सगळ्या प्रकारचे रोल्स करण्यात एकदम चांगला बॅलन्स राखला आहे. मध्यंतरी तब्बू आणि मेरिल स्ट्रीप ह्यांची तुलना करणारा लेख वाचला होता. चांगला होता.

तुंबाड ब्रिलियंट सिनेमा आहे. पण काळजीपूर्वक संवाद ऐकावेत. काही दृश्ये मिस केलीत तर पुढे संगती लागणार नाही. एक प्रेक्षक म्हणून कसा वाटला हे लिहावं का ?
इथे काही जणांनी बळद कथेबाबत लिहीलेले आहे जी मला आठवत नाही आता. मात्र पिशवीतला खामरा मधल्या मनोवृत्ती आणि त्यांची अमानवीयाशी घातलेली सांगड हे आठवले. श्रेयनामावाली हुकली... Sad

तुंबाड मला बघायचाय. १९-२० वर्षाच्या मुला बरोबर बघू शकतो का?

ऑकवर्ड होण्यसारखे सीन वगैरे आहेत का?

पहिल्या हाफच्या मार्गावरून पुढे नेता आला असता जास्त चांगल्या पध्दतीने. >> स्पॉयलर्स शिवाय याची चर्चा होऊ शकणार नाही, त्यामुळे आत्ता इथे त्याबाबत नको बोलायला. जर पुढे नवा बाफ आला तर 'चर्चा' करू Proud

चांदनी बार, मकबूल, ते हैदर पर्यंत >> और उसके बाद? Happy हैदर येऊन किती वर्ष झाली? दृश्यम मध्ये तर बघवलं नाही तिच्याकडे आणि एक मनोज वाजपेयीबरोबर सिनेमा केला तो कोणी पाहिलाच नाही! असो. जे सिनेमे तू लिहिले आहेस त्यातही तिची अशा प्रकारची 'रेकलेस' भूमिका नव्हती. अंधाधुनमधली सिमी अक्षरशः काहीही करू शकते. तब्बूही काहीही करू शकते, तिचं हे पोटेन्शिअल तिच्या आधीच्या सिनेमात म्हणावं तितकं नाही वापरलं गेलं असं 'माझं' मत आहे Happy मध्ये इतकी गॅप पडल्यानंतर तिला असा रोल मिळतो आणि ती तो खणखणीत करते आहे, त्यामुळे ऋषी कपूर पद्धतीने तिला आणखी भारी रोल या निमित्ताने मिळाले तर फार छान होईल, असं परत एकदा 'मला' वाटतं Wink

आजकाल टाटा स्काय बॉलिवूड प्रीमिअर वर नवीन पण प्रदर्शित न झालेले सिनेमे दाखवत आहेत.असाच एक उत्तम चित्रपट चॉक डस्टर पाहिला.शिक्षकांवर इतका चांगला सिनेमा क्वचितच पाहायला मिळतात.कलाकारही नामवंत आहेत.कुठेही मिळाला तर जरूर पहा

जे सिनेमे तू लिहिले आहेस त्यातही तिची अशा प्रकारची 'रेकलेस' भूमिका नव्हती. >>>>> मुद्दा 'रेकलेस' भूमिकेबद्दल आहे की इनजनरल 'पोटेंशियल' असलेल्या भूमिकेबद्दल आहे ? तुझ्या मुळच्या पोस्टमध्येतरी तसं लिहिलेलं नव्हतं. हैदर १४ साली आला होता. विकीच्या मते तब्बूचा पहिला चित्रपट १९८५ साली होता. म्हणजे ३३ वर्षांचा कारकिर्दीत दर ३-४ वर्षांनी एक उत्तर रोल मिळत असेल तर काही कमी नाही. Happy

दृश्यम मध्ये तर बघवलं नाही तिच्याकडे >>>> पुन्हा तोच मुद्दा. मुळच्या पोस्टीत तब्बू दिसते कशी ह्याबद्दल कुठे काय म्हटलय?

असं 'माझं' मत आहे >>>>> आता तू पोस्ट लिहिलीस म्हणजे ते 'तुझच' मत असणार ना..योग्य ते क्रेडीट न देता तू माझं किंवा तुमच्या शेजार्‍यांचं मत इथे येऊन लिहिणार नाहीस ह्याची खात्री आहे. Wink

असो. Happy

और उसके बाद? Happy हैदर येऊन किती वर्ष झाली? दृश्यम मध्ये तर बघवलं नाही तिच्याकडे आणि एक मनोज वाजपेयीबरोबर सिनेमा केला तो कोणी पाहिलाच नाही! असो. जे सिनेमे तू लिहिले आहेस त्यातही तिची अशा प्रकारची 'रेकलेस' भूमिका नव्हती. अंधाधुनमधली सिमी अक्षरशः काहीही करू शकते. तब्बूही काहीही करू शकते, तिचं हे पोटेन्शिअल तिच्या आधीच्या सिनेमात म्हणावं तितकं नाही वापरलं गेलं असं 'माझं' मत आहे Happy मध्ये इतकी गॅप पडल्यानंतर तिला असा रोल मिळतो आणि ती तो खणखणीत करते आहे, त्यामुळे ऋषी कपूर पद्धतीने तिला आणखी भारी रोल या निमित्ताने मिळाले तर फार छान होईल, असं परत एकदा 'मला' वाटतं >>>>> फितुर विसरलात वाटत. त्यात ती कॅटरिना कैफची आई झाली होती. रेखाला रिप्लेस केल होत त्यात तिने.

आता तू पोस्ट लिहिलीस म्हणजे ते 'तुझच' मत असणार ना..योग्य ते क्रेडीट न देता तू माझं किंवा तुमच्या शेजार्‍यांचं मत इथे येऊन लिहिणार नाहीस ह्याची खात्री आहे. >>>>>> Rofl

तुंबाड मला बघायचाय. १९-२० वर्षाच्या मुला बरोबर बघू शकतो का?

ऑकवर्ड होण्यसारखे सीन वगैरे आहेत का?>≥>>

सुरवातीला एक अगदी 3 4 सेकंदाचा सिन आहे जो कदाचित तुम्हाला ऑकवर्ड करू शकेल. मी मुलीसोबत पाहिला, दृश्य लांबते की काय असे क्षणभर वाटले तोवर ते बदलले सुदधा. त्या दृश्यातील संवाद खूप महत्वाचे असल्याने आपल्या डोक्यातले सेटिंग पण बदलते लगेच Happy

आज अंधाधुन पाहणार.. टु एक्सायटेड.. इथले पोस्ट वाचून तर अजूनच Happy>>मी पण. आज दुपारचा शो Happy

Pages