अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. बोकलत,रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय.>>>>> +१११११११११११११११११११११११

माझ्या घरी सफाई साठी येणाऱ्या मावशींनी मला त्यांचा अनुभव सांगितला. त्या एका हॉस्पिटल मध्ये साफ सफाई च्या कामाला जातात रोज संध्याकाळी. त्यांना मधूनच एखादया दिवशी एक केस मोकळे सोडलेली बाई दिसते आणि अदृश्य होते. नेमकी गर्दी नसते आणि अंधार पडायला येतो तेव्हा .त्या म्हणतात की अजून पर्यंत काही त्रास झाला नाही.

खरचं दुसरा धागा काढा हो प्लिज ! शिर्षक : अमानविय शक्तिंशी बोकलत ह्यांचे मानविय द्वंद्व !!!!! असे काहि तरि ठेवुन द्या>>>>> Rofl नाव लईच भारी
@बोकलत :.....आता धागा काढाच तुम्ही...वाचू आम्ही दुसऱ्या धाग्यावर

पुण्याच्या वाड़ीया हॉस्पिटलचा परिसर पण कुख्यात आहे असा ऐकलं आहे ... तिथे म्हणे लोकांना झाडावर एक बाई केस मोकळे सोडलेली बसलेली दिसते. डोक खाली अणि हात समोर ते पण पूर्ण पांढरे निर्जीव् ... कुणाला काही माहिती?

प्लॅंचेटचा आम्हीदेखिल प्रयत्न केला ग्लास पालथा घालून ४-५ जण रूम मधले होतो बॅचलर असताना. पण अर्धा तास होऊन गेला तरी एकही बोलावलेला आत्मा येईना. मग पालथा ग्लास उताना केला अजून ४ ग्लास आणले आणि मग काय आम्हा ५ ही जणांचे आत्मे धडाधड बोलू लागले पुढल्या अर्ध्या तासानंतर!

प्लॅंचेटचा आम्हीदेखिल प्रयत्न केला ग्लास पालथा घालून ४-५ जण रूम मधले होतो बॅचलर असताना. पण अर्धा तास होऊन गेला तरी एकही बोलावलेला आत्मा येईना. मग पालथा ग्लास उताना केला अजून ४ ग्लास आणले आणि मग काय आम्हा ५ ही जणांचे आत्मे धडाधड बोलू लागले पुढल्या अर्ध्या तासानंतर!>>>>

Lol Lol

प्लॅंचेटचा आम्हीदेखिल प्रयत्न केला ग्लास पालथा घालून ४-५ जण रूम मधले होतो बॅचलर असताना. पण अर्धा तास होऊन गेला तरी एकही बोलावलेला आत्मा येईना. मग पालथा ग्लास उताना केला अजून ४ ग्लास आणले आणि मग काय आम्हा ५ ही जणांचे आत्मे धडाधड बोलू लागले पुढल्या अर्ध्या तासानंतर!>>>> Rofl

<<प्लॅंचेटचा आम्हीदेखिल प्रयत्न केला ग्लास पालथा घालून ४-५ जण रूम मधले होतो बॅचलर असताना. पण अर्धा तास होऊन गेला तरी एकही बोलावलेला आत्मा येईना. मग पालथा ग्लास उताना केला अजून ४ ग्लास आणले आणि मग काय आम्हा ५ ही जणांचे आत्मे धडाधड बोलू लागले पुढल्या अर्ध्या तासानंतर!<< अगागा ... कृष्णाजी, धन्य! Rofl

बोकलत हा एक आत्मा आहे. आपण जिवंत नाही हे त्यास ठाऊक नाही.>>>>असू शकतं. कारण मी जिथे तिथे जातो तेव्हा लोकं बोलतात आला मेला. आणि बॉसला पगारवाढीच्या दिवशी मी दिसतच नाही. मग मीच मोबाईलमध्ये सेल्फी काढून पाहतो दिसतोय कि नाही ते.एकदा तर आरशात पाहून माझे पाय उलटे नाहीत याची खात्री केली. काय बोलताय नी काय नाय. आजकाल तर वेगळंच घडतंय, आजूबाजूच्या भूत हडळींच्या पत्रिका मला यायला लागल्या आहेत आता याला दहशत म्हणू की माझ्यावरचे प्रेम कळत नाही. आणि एकदा तर कहरच झाला तुम्हाला सांगतो रात्रीचे १-२ वाजले असतील अचानक मला कुठलीतरी शक्ती खेचायला लागली. खूप घाबरलो रामरक्षा, मारुती स्तोत्र बोलून पण काही फायदा नाही झाला. शेवटी बोललो जाऊ दे पाहू तरी ही शक्ती कुठे नेते. तर ती शक्ती मला खेचत खेचत बाजूच्या घरात घेऊन गेली. पाहतोय तर चार टाळकी बनियान हाल्फ पँट घालून प्लँचेट करत बसली होती, आता हसावं की रडावं तेच कळत न्हवतं. आणि प्रश्न पण काय तर लग्न कधी होणार, नोकरी कधी मिळणार, परीक्षेचा निकाल काय काय लागणार, हे असले प्रश्न ऐकून माझ्या डोक्याची वाटीच सरकली आणि ते ज्या वाटीला हलवायला सांगत होते ती उचलून एकाच्या टाळक्यातच घातली. या प्रकाराने सगळे सैरावैरा पळू लागले. एक तर आ वासून त्या वाटीकडे पाहत बसला होता दुसऱ्या दिवशी समजलं त्याला हार्ट अटॅक आला होता, कसाबसा वाचला बिचारा. त्यामुळे मी भूत असण्याची तुमची शंका खरी असू शकते.

प्लॅंचेटचे अजुन दोन प्रकार माहीत आहेत, एका प्रकारात पाण्याचा माठ ठेवण्याचे तिन पायाचे स्टूल वापरतात. त्यामधे आत्मा तिनमधील एक पाय आपटून संदेश देतो. साधारणपणे एक ठोका म्हणजे 'हो' आणि दोन ठोके म्हणजे 'नाही' असा कोड ठरवतात, व प्रश्ण विचारतात. दुसर्या प्रकारात एक टांगता दिवा असतो व त्याच्या झोक्यांवरुन संदेश मिळतो. पण हा प्रकार खुप धोकेदायक आहे, ह्यामधे दिवा जोर जोरात हलुन पडल्यामूळे आग लागू शकते.
प्लॅंचेट प्रकार जितका सोपा तितकाच धोकेदायक आहे. आत्माला बोलवणे आपल्या हातात असते. पण त्याला परत पाठवणे आपल्या हातात नसते. ज्याप्रमाणे माणसे हजार स्वभावाचे असतात, तसेच आत्मेसुधा हजार स्वभावाचे असतात, कारण तेही आपल्यासारख्या माणसांचेच असतात. त्यामुळे तुम्ही एखादा व्यक्तीच्या आत्मास आवाहन केले तरी कोणी ' बिन बुलाया मेहमानही' येऊ शकतो. एखादा चूकीचा शब्द, एखादी चूकीची सुचना मोठी समस्या होऊ शकते. त्यामूळे ह्या आगीच्या खेळापासून दुर राहीलेलेच श्रेयस्कर........................

पण एक मात्र गोष्ट आहे, बोकलतने कथा टाकायची सुरवात केल्यापासून रोज धागा चर्चेत आहे. अतिशोयोक्ती कमी करून तुम्ही पण गंभीरतेने हा धागा घेतला तर बरं होईल एव्हडेच सांगतो.वाचक काहीतरी नवीन अनुभव वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडतात आणि तुमचे विनोदी वाचन वाचल्यावर निराशा पदरी येते. या गोष्टीवर तुम्हीच विचार करा बाकी तुमची मर्जी.

चार्ली चॅप्लिनला बुट खाताना बघुन कोणी खदखदुन हसतो, तर कोणी अंतर्मुख होतो. शेवटी सौंदर्य बघणार्‍याच्या नजरेत आणि गांभीर्य वाचणार्‍याच्या मनात असते. बोकलत यांचे अनुभव मी तितक्याच गांभीर्याने वाचतो जितक्या गांभीर्याने इतरांचे अमानवी अनुभव वाचतो.

सच्चे मनसे जो अमानवीय अनुभव पे यकीन करते है उन्हे बोकलत पे भी यकीन होगा, लेकीन जो बुद्धीवादी बोकलत पे शक करेंगे क्या पता वो कल को किसीके भी अमानवीय अनुभव पे शक करे!!

अमानवीय के सच्चे पाईक बने और बोकलत पे रोक लाना बंद करे.

मला नेहमी एक प्रश्न पडतो. अमानवीयांना कोणत्या भाषा येत असतील? भाषाभाषांमध्ये देखील त्यांची आवडनिवड असेल का? कारण असे वाटते की आपल्याला त्यांना किंवा त्यांना आपल्याला काही पटवून द्यायचे असले आणि भाषेमुळे गोंधळ झाला तर? गैरसमजातून उगीच डूख धरणे वगैरे होईल.

गैरसमजातून उगीच डूख धरणे >>> एक अमानवीय अस्तित्त्व माझ्यावर डूख धरून आहे. ते डोळ्याला दिसत नाही. आरशात दिसत नाही. कॅमे-यात दिसत नाही. त्याचा आवाज कुणी ऐकलेला नाही, ते कोण आहे हे कुणालाच ठाऊक नाही, गाव माहीत नाही. पण ते आहे. आपोआप स्क्रीनवर अक्षरे उमटतात आणि जहरी, विखारी पोस्ट्स येत राहतात. मांत्रिक आदमखान यांनी मंत्र म्हटल्यावर ते काही काळ जाते पण पुन्हा दुस-या रूपात (?) येते. भयंकर अमानवीय अस्तित्त्व , त्यातून गैरसमज झालेले आणि सटकलेले. My बोली नावाच्या झपाटलेल्या भाषेत ते संवाद साधते.

मी खूप वर्षांपासून मायबोलीचा चाहता व वाचक आहे. अमानवीय माझा खूपच आवडीचा धागा आहे. इतका की काही तासा तासांनी नवीन काहीतरी आलंय का हे चेक करत असतो. बोकलत,रावल तुम्हाला हात जोडून विनंती प्लीज ह्या धाग्याचे झाड सोडा. तुमची खूप चीड येतेय बोकलत साठी + ११११११. रावल यांच्या कथा जरी असल्या तरी त्या सिरीयस होत्या म्हणून रावल यांनी ह्या झाडावर राहीले तर चालेल.

वाडिया हाँस्पिटल बाबत प्रत्यक्ष घडलेली घटना.माझ्या चुलत सासूबाई दम्याने आजारी असताना या दवाखान्यात होत्या.घरी आल्यावर रोज दुपारी 12 वाजता अनवाणी चालत त्या परिसरातील एका झाडाखाली बसून रहात.बाकी त्या सगळं करत.गौरी गणपती बसवत.देवालाही जात.मात्र कोणी अडवलं तर हिंसक होत.घाण घाण शिव्या देत.असे सुमारे 12 वर्षे चालले होते.उन पाऊस काही असलं तरी त्यांचा नियम चुकला नाही.

Pages