अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दारावर एक बाबा आला होता. त्याने सांगितलंय कुणी तुझ्याशी छळकपट करील तर त्याला भयानक त्रास होईल फक्त तु कुणाला त्रास देऊ नको. तवापासून मी कुण्या सैतानाला घाबरत नाही. आणि अक्षरश:कुणी एडस्‌ने कुणी अपघातात मेला. जर इथं मुद्दाम कुरघोडी करत असेल आणि त्यांच्या मुलाबाळांचं काही बरंवाईट झाले तर मी जबाबदार नाही. शक्ती पाठवलीय.

काय एक एक नवीन सुरु झालंय? चांगल्या धाग्याची अक्षरशः वाट लागलीये. चांगलं (धाग्याला धरून) काहीतरी वाचायला यावं तर भलतंच काही चालू असतं. न आलेलंच बरं.

अरे मला कोणीतरी खेचतंय, कोणीतरी गळा दाबतय. कोणती शक्ती आले माझ्या रूममध्ये काय समजत नाय.नक्की काय होतंय बापरे देवा वाचव यातून. रत्नागिरीत 10000 रुपयात बायंगी भूत मिळते ते तर नाय ना सोडले कोणी माझ्यावर, बापरे ती शक्ती मायबोलीवर टायपून पण नाय देत. अरे अशी काय ही शक्ती आता आमरस पुरी मागते ते पण हापूस आंब्याचा कुठून देऊ आता हे. अरे कोणीतरी दाढीवाला साधू पण अवतारलाय, हे नक्की काय होतंय, त्या शक्तीने माझा पूर्ण ताबा घेतलाय, @व्यत्यय मित्रा कुठे आहेस वाचव यातून, पूर्ण त्राण गेल्यासारखा मी पडून आहे त्या शक्तीने माझा पूर्ण ताबा घेतलाय, कायतरी मला ऐकू येतंय, संगीताची धून ऐकू येते, ही धून तर माझ्या लाडक्या सल्लूची आहे , सुलतान मुव्हीचं टायटल सॉंग, 'उपर अल्लाह नीचे धरती बीच मे तेरा जुनुन रे बोकलत' माझे बाहू हे गाणं ऐकून स्फुरण पावताहेत, हळूहळू माझ्यात ताकद एकवटते, आता तर बाहुबलीचं टायटल सॉंग लागलंय, जिओ रे जिओ बोकलतबली आता मी पूर्ण शक्तिशाली झालोय, काही वेळापूर्वी भिजलेल्या मांजरासारखा आडवा पडलेला मी आता खुखार वाघ बनलोय, आली रे आली आता बोकलतची बारी आली, तंटा नाय तर घंटा नाय असे डायलॉग माझ्या मनात उमटताहेत, आणि एकच झटक्यात मी उभा राहिलो,त्या शक्तीला कस्पटासमान उडवून लावली, ती शक्ती आणि तो साधू यांचे पाय आता भीतीने लटापटा कापत आहेत, आता तो साधू आणि शक्ती यांची काय धडगत नाय, आले त्यांच्या मर्जीने जातील माझ्या मर्जीने, दोघांनाही घाण्याला जुंपलाय, भामट्या साधूला घरातला कचरा काढायला लावलाय आणि ती बायंगी भांडी घासते,
भीतीची लहर,
बोकलतचा कहर,

बोकलत तुम्ही प्रतिसादात सर्वात वरती टीप लिहा तुमच्या नावाची,आम्हाला स्किप करायला सोपे पडेल. आणि त्यासाठीही हट्टाने पेटून नाहीच लिहिणार म्हणत असताल तरी हरकत नाही, आधी नाव वाचून प्रतिसाद वाचू.

मला वाटतय प्रीत यांनी माझ्या मुली बद्दल ती कमेंट केली नसून इकडे बऱ्याच जणांना न आवडणाऱ्या आय डि बद्दल केली असावी. आधी मला असं वाटलं की मला लिहिलं असावं. पण नंतर त्या विशिष्ट आय डी ला उद्देशून लिहिलं हे जाणवलं.

जवा पोरंसोरं तळतळाटाने मरतील तवा तुम्हाला अक्कल यईल. ---------- प्रीत असं बोलू नका... कोणाच्याही मुलांना अस बोलायचा कुणालाही हक्क नाही.

गेले काही दिवस बोकलत आणि त्यांचे चेले जे काही करून लोकांना उचकवण्याचा प्रकार करत आहेत ते खरंच खराब आहे. आणि धाग्याची वाट लावलीय लिटरली. या पूर्वी इतक्या वर्षात असं काही घडलं नव्हतं.
लोकांना आपण आवडत नाही आहोत, लोक आपल्याला हाकलून देतायत सरळ सरळ हे कळून ही मुद्दाम आपलं घोडं पुढे दामटणे हा प्रकार चालू आहे.
काही वाचायला यावं तर जिथे तिथे स्वतःची लाल करणे चालू असते. कंटाळा आलाय.
ज्या घटना पूर्वी च्या काळी लोकांसोबत घडल्यात, जे कोणाचं अश्या घटनेत नुकसान झालं, कोणाचा जीव गेला या गोष्टींची मस्करी ही केली जात आहे.
मी भुताला कसं हरवलं, कोण हडळ माझ्याशी लग्न करायला उत्सुक आहे या गोष्टी सांगणे, लोकांना सावध करायला किंवा कुस्ती कशी खेळायची हे शिकवायला या धाग्यावर राहणे याला शहाणपणा म्हणावे का हा प्रश्न पडलाय.
असोच एन्जॉय ईट.

जो पर्यंत हे इथून हाकलले जात नाहीत तो पर्यंत इथे काही लिहिणे मूर्खपणा.

माझ्या मुलीच्या किस्स्यावरून इकडे वाद व्हायला नको होता. त्यात या आयडीज ना हसायला ही आलं बरंच. यातून माणसाची वृत्ती दिसून येतेय.

ही माझी या धाग्यावरील शेवटची पोस्ट आहे.

काल मी माझ्या मोबाईल वर अँड्रॉइड पाय, जे ओरिओ च्या नंतरचं व्हर्जन आहे, ते इंस्टॉल केलं (सटल हंबल ब्रॅगिंग). त्यात डिजिटल वेल बिइंग नावाचं फिचर आहे ज्याने दिवसभराच्या १ तास वापरानंतर माझा मायबोली वापर बंद केला. तर त्यामुळे उत्तर द्यायला उशीर झाला. कुठल्याही शक्तीने माझं काहीच झाड वाकडं केलेलं नाही.
प्रीत00९, या अशा पोकळ धमक्यांनी फक्त काही मनोरुग्ण घाबरतील.

गेट वेल सून! Happy

प्रीतीताई कोण आहेत इथे ? या नावाशी साधर्म्य असलेला आयडी आहे त्याने पुरूष नोंद केलेली आहे. इब्लीस आहेत ना ते ?

बोकलत तुम्ही प्रतिसादात सर्वात वरती टीप लिहा तुमच्या नावाची,आम्हाला स्किप करायला सोपे पडेल>>> माफ करा लिहायचं राहूनच गेलं. घाई गडबडीत लिहिला, त्या शक्तीसोबत लढा देत देत लिहीत होतो म्हणून थोडा गोंधळ उडालेला. पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन धन्यवाद.

अनिष्काजी मी तुमच्या मुलीविषयी वाचलेलंही नाही. कर्मसिध्दांताने आपले पाप मुलाबाळांना भोवते हे मी त्या हलकट आयडीन्ना म्हणालो होतो, मी अश्या पुड्या सोडत असतो. हाहा हीही हुहू.
वैट्ट माणसं मेली की मी पेढे आणुन खातो.

आता वाचलं. अनिष्काजी तुमच्या निष्पाप एक वर्षाच्या लेकराविषयी वाईट लिहूच शकणार नाही मी. मी मुंगीलाही मारत नाही. विनाशायच दुष्कृतां...

भीतीची लहर,
बोकलतचा कहर.
(सगळ्या बोकलत हेटर्सनी नोंद घ्या, इथून पुढे मी या वरच्या दोन ओळी कथेच्या सुरवातीला सिग्नेचर म्हणून टाकणार आहे, या वरच्या दोन ओळी वाचल्यात की पुढची कथा वाचून धागा भरकटवू नये हि नम्र विनंती.)

बापरे काय चाललंय हे... अमानवीय धागा फारच मानवीय झालाय...चांगले भुतं खेतांचे थरारक अनुभव वाचायला आले की नुसतेच एकमेकावर उडवलेले शाब्दिक चिखलाचे शिंतोडेच दिसत आहेत...कृपा करून हे सगळं थांबवा आणि पहिल्या सारखा अमानवीय धागा जिवंत करा

तर मंडळी मायबोलीवरचे हे अमानवीय जग आहे त्यामधे मानवीय नावाचा धागा अत्यंत लोकप्रिय असून त्या धाग्यावर कोकलत नावाच्या आयडीने मानवांशी कुस्ती केल्याचे प्रसंग रंगवले असल्याने अमानवीय आयडी खवळले आहेत. अमानवीय जगात यावरून मोठाच गदारोळ माजलेला आहे. कोकलत या आयडीवर शिव्याशापांचा वर्षाव होत असताना बाई कामदेवी या आयडीने कोकलत यांची जोरदार पाठराखण करीत मानवीय धाग्याला नमोरुग्ण म्हटले आहे. त्यामुळे मानवीय धाग्याचे चाहते भलतेच नाराज झालेले आहेत.
मात्र रुग्ण म्हटल्याने एव्हढे तापायचे कारण नाही कारण एक अमानवीय डॉक्टर पहिल्यापासून तैनातीत आहे असे जोरदार प्रत्त्युत्तर कामदेवी यांनी दिलेले आहे. जय मल्हार मालिकेत दर्शवल्याप्रमाने हा डॉक्तर देखील एकातून दुसरा अवतार घेऊ शकतो आणि प्रत्येक अवतारात तो वरिजनल असतो असे मानले जाते. या डॉक्टरच्या हॉस्पिटलमधे जे रुग्ण जातात त्यांना डॉक्टर दिसत नाही, मात्र इंजेक्शन हवेतून येते, टोचून जाते, तोंड भलतेच काही दिसल्यास आ वासला जाऊन रुग्णाच्या तोंडात बॅटरीचा उजेड पडणे असे प्रकार झाल्याचे आढळलेले आहे. त्यामुळे अमानवीय जगातल्या रुग्णांनी काळजी करू नये या आवाहनाला सत्याची किनार असल्याचे दिसून येते.
- आमच्या बातमीदाराकडून

@उमानु, माझ्या सत्य आणि जीवाचा थरकाप उडवणाऱ्या कथा लोकांना वाचनातून वगळता याव्या यासाठी मी स्वतःची अशी खास सिग्नेचर(भीतीची लहर, बोकलतचा कहर) तयार केलेली आहे, ही सिग्नेचर मी कथेच्या सुरवातीला टाकणार आहे, त्यामुळे धागा आता पूर्ववत होईल याची खात्री बाळगा.

ठिकाण अमरावती
एका परिचितांकडे 2 दिवसांसाठी म्हणून उतरलो होतो, ऐकून माहीत होतं की त्या काकांना कसलातरी त्रास आहे असं. तेथे साधारण 8 वाजता पोचलो, नाश्ता केला, दुपारी जेवण झालं आणि मला प्रवासामुळे भयंकर झोप येत होतीच की त्या काकांचे एक मित्र येऊन गप्पा मारत बसले, मग मलाही झोपता येईना. बराच वेळ बसून ते मित्र गेले. संध्याकाळचे चार वाजले होते साधारण. एकाएकी ते काका धाडकन कोसळले. त्यांना 5 मिनिटात झोपच लागली. मी थोडा फिरून आणि माझं काम होतं ते करून रात्री 8 ला परतलो तर ते काका झोपलेले. मावशींनी सांगितलं. एकदा झोपले की बऱ्याचदा 4, 5 दिवस झोपून राहतात. अर्थात हे महिन्यातून 2 वेळ तरी व्हायचं पण बाकी दिवस नॉर्मल असतात. मग मावशींनी कुणालातरी फोन केला. थोड्याच वेळात शर्मा नावाचा एक किडकिडीत तरुण अगदी सामान्य दिसणारा तिथं आला, काही वेळाने त्याने 2 अगरबत्त्या मागवल्या आणि पेटवून त्यावर हाताची ओंजळ केली, तोंडाने पुटपूटत धूर त्या काकांच्या अंगावरून फिरवला. मी फक्त उत्सुकतेने पाहत. मी मावशींना विचारलं की झालंय काय? त्या म्हणाल्या कळत नाही, सर्व दवाखाने झाले, रिपोर्ट्स नील आहेत. माझा विज्ञानवादी दृष्टिकोन शांत बसू देईना, जे होतं ते पाहून मग विश्लेषण करायचा विचार ठेवून मी गप तमाशा पाहू लागलो. थोड्या वेळाने शर्मा त्या काकांना डोक्यावर मारू लागला, पण काकांना जाग नाही, पाणी मारलं, अगरबत्तीचा चटका दिला तरी काही हालचाल नाही. पुढं शर्माने पिशवीतून एक कापड काढून स्वतःच्या डोक्याला बांधलं आणि पुन्हा मारहाण सुरू. मला त्या काकांच्या पाठी उभा केला, काकांना बसवून ठेवलं तरी ते अवरीनात. बराच वेळ पाणी मारल्यावर त्या काकांनी डोळे किलकिले केले, खूप जोरात कापरे भरून ते vibrate होत होते जसे. म्हणजे ठरवून असे करणे कोणत्याही नटाला जमणार नाही इतकं danger होतं ते थरथरणं. मला झोपू द्या झोपू द्या ओरडत ते काका पुन्हा झोपी गेले. आणि शर्मा देखील हे माझ्या हाताबाहेर आहे असं म्हणत निघून गेला.

मी नंतर मावशींना विचारले असता समजलं की त्या काकांचा काहीतरी बारीक अपघात झाल्यानंतर हा त्रास सुरू झाला. जुजबी दवाखाण्याव्यतिरीक्त त्यांनी कोणत्या तज्ज्ञांची भेट घेतली नव्हती आणि सरळ बुवाबाजीच्या मागे लागले होते. मी समजावण्याचा प्रयत्न केला पण जैसे थे. माझ्या मते त्यांना अपघातामुळे मेंदूस इजा पोहचली होती आणि त्यामुळे ते अश्या recurrent coma मध्ये जात असावेत. अंधश्रद्धा खूप खोलवर रुजल्याने वेळीच उपचार होत नाहीत आणि भयंकर परिणाम होऊ शकतात. ते काका आधी 24 तास, मग हळू हळू वाढत 4 ते 5 दिवसांवर पोचले होते.

अजिंक्यराव पाटील हा किस्सा स्वतंत्र पोस्ट करावा. यावर उत्तम चर्चा होईल.
अपघातानंतरच्या झोपेच्या समस्या या गंभीर असतात. मेंदूला दुखापत झालेली असू शकते. रक्ताची गाठ असू शकते (अचानक कोसळणे वगैरे). ही लक्षणे अपघात झाल्यानंतर काही दिवसांनी समजून येतात. मेंदूला झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी मेंदूला विश्रांतीची आवश्यकता पडते. त्या वेळी खूप झोप येते.
या उलट झोप न येणे, झोपेत व्यत्यय येणे असेही होते. निदान होणे आवश्यक आहे.

@अजिंक्यराव,
अशाच प्रकारची एक मेडिकल केस मागे काही दिवसांपूर्वी ऐकली होती. लातूर शहरात डॉ. रुईकर म्हणून न्यूरोसर्जन आहेत . त्यांनी अश्या एका रुग्णावर यशस्वी उपचार केले आहेत

भीतीची लहर,
बोकलतचा कहर.
तर आज तुम्हाला मी घोस्ट हंटर कसा झालो ते सांगणार आहे. माझं बालपण कोकणातल्या एका खेड्यात गेलं. चारही बाजूंनी डोंगर आणि मधेच लहानसं ५०० घरांची वस्ती असलेलं आमचं गाव. संध्याकाळ झाली की शाईच्या ओघळासारख्या पुढे पुढे धावणाऱ्या सावल्यांच्या शर्यतीवर डोंगर पांघरूण घालायचा आणि सत्ता सुरु व्हायची काळोखाची. काळोख पडला कि गावातील बायका जेवण करायच्या तयारीला लागायच्या. साधारण आठ साडे आठ पर्यंत शेजारी पाजारी जेवण वैगरे उरकून अंगणात नाहीतर ओटीवर एकत्र जमत आणि इकडच्या तिकडच्या गप्पाना सुरवात होत असे. अगदी रोज नाही पण आठवड्यातून २-३ दिवस तरी भुतांच्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगितल्या जायच्या. कधी कोणाला विडी पिणारा भूत दिसायचा, कोणाला चिंचेच्या झाडावरची हडळ, कोणाला नदीच्या किनाऱ्यावरचा झोटिंग तर कोणाच्या रिक्षात नायतर सायकलवर भूत प्रवास करायचा.मी तेव्हा दुसरी तिसरीत असेन. मी कोणातरी मोठ्या माणसाजवळ बसून या गोष्टी ऐकायचो. या सगळ्या गोष्टीत एक भूत वारंवार यायचं ती म्हणजे गावाबाहेर असलेल्या वडाच्या झाडावरची जखिण, बरेच जण तीला पाहिल्याचा दावा करायचे, सुरवातीला भीती वाटायची पण रोज मरे त्याला कोण रडे हा प्रकार माझ्या बाबतीत झाला आणि भीती वाटायची सोडून त्या जखिणीला पाहायची इच्छा माझ्या मनात जागृत झाली, जे जखिणीला पाहिल्याचा दावा करायचे त्यांचा मला हेवा वाटू लागला. भुरभुरणारे सोनेरी केस, गोबरे गोबरे गाल , गुलाबाच्या पाकळीसारखे डोळे , जखिणीचं असं वर्णन मनातल्या मनात करत मी झोपी जाऊ लागलो. 'चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु' हे गाणं ऐकलं की मला जखिणच आठवायची. मला चांगलंच आठवतंय एकदा नळावर बायकांची पाण्यावरून जुंपली तेव्हा एक बाई दुसऱ्या बाईला रागाच्यान भरात जखीण बोलली होती, तेव्हा कित्येकदा मी जखीण बोललेल्या बाईकडे काहींना ना काही निमित्त काढून जायचो, पण एकदा दारू पिऊन घरी आलेल्या नवऱ्याला जोरात लाथ मारताना मला तिचे पाय दिसले आणि माझी निराशा झाली. रविवारच्या दिवशी दुपारी सगळे झोपले की मी त्या वडाच्या झाडाखाली जात असे. दोन तीन प्रदक्षिणा मारून जखीण कुठे दिसे का ते पाहत असे १५-२० मिनिटे जखीणीला शोधून दमलो की त्या वडाच्या पारंब्यांवर थोडे झोके घेऊन परत घरी परतत असे. नंतर पुढे कधीतरी गावात केबल आली. त्यातल्या झी हॉरर शो मधल्या विचित्र चेहऱ्याच्या जखिणी पहिल्यावर मनाला झालेल्या यातना इथे शब्दात मांडणं खूप कठीण आहे. शेवटी तो दिवस आलाच, एकदा मी मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो निघताना खूप उशीर झाला आणि त्या रात्री नेमकी सर्वपित्री अमावस्या होती, साधारण संध्याकाळचे ८ वाजले असतील , बाहेर मिट्ट काळोख होता, मित्राचे बाबा सोडायला येत होते पण बोललो काका तुम्ही नका काळजी करू, तुम्ही सोडायला आलात तर माझ्या बाबाना तुम्हाला परत सोडायला यायला लागेल, एव्हडा रास्ता खतरनाक होता.तर मी म्हणजेच लहानपणीचा बोकलत त्या खतरनाक रस्त्यावरून एकटा यायला तयार झालो, या प्रसंगावरून मी किती धीट होतो याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर मी त्या वडाच्या झाडाजवळ आल्यावर अचानक मला पाठीमागून पैंजणांचा आवाज आला. मी पाठीमागे पाहिले तर कोणीच न्हवत, बरोबर वडाच्या झाडाजवळ आल्यावर पुन्हा तोच आवाज, पाठीमागे पाहिलं तर एक बाई माझ्याजवळ येत होती, असं वाटत होतं ती चालत नसून हवेत तरंगत माझ्याकडे येत होती. माझ्याजवळ आली आणि बोलली बाळ एव्हड्या रात्री एकटा इथे काय करतो आहेस. मी बोललो काय नाय घरी जातोय. ती मला बोलली चल माझ्या घरी मी इथेच वडाच्या पाठीमागे झोपडीत राहते. मी पाहिलं तर खरोखर तिथे एक झोपडी होती. अगोदर तर कधी न्हवती, त्यामुळे मी जाऊ की नको विचार करत होतो, इतक्यात ती बोलली चल तुला बोरकुट आणि पारले बिस्कीट देते. बोरकूटचा नाव काढल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, वयचं काय हो माझं तिसरीतलं खेळण्याबागडण्याचं वय मी तिच्या भूल थापना सहज बळी पडलो आणि तिच्यासोबत झोपडीत गेलो. ती लहानशीच झोपडी होती, आणि विशेष म्हणजे त्या झोपडीत तिचा माझ्या वयाचा मुलगा पण होता. मला पाहताच तो एकदम खुश झाला आणि आई भूक लागली करत ओरडू लागला, मग त्या बाईने त्याला दम दिल्यावर शांत झाला, मला एका चटईवर बसायला सांगून ती जेवणाची तयारी करू लागली. मी बोरकुट मिळणार म्हणून खुश होतो पण ही बया माझ्याकडे लक्ष द्यायला तयारच नाही, शेवटी मीच बसून बसून कंटाळलो आणि तिच्याजवळ जाऊन बोललो ओ काकू बोरकुट देताय की जाऊ घरी. तशी ती भेसूर हसायला लागली आणि बोलली तू आमची शिकार आहेस, जाशील कसा? तुला खाऊन आम्ही मायलेक आमची भूक मिटवणार आहोत. गप जाऊन बस चटईवर. आता मला समजून चुकलं माझी गाठ जखीणीशी पडले. मला एकीकडे आनंद पण झाला की ज्या गोष्टीला पाहण्यासाठी मी तरसत होतो ती चक्क माझ्यासमोर आहे आणि दुसरीकडे दुःख पण होतं की त्याबदल्यात मी माझा जीव पणाला लावलाय. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर भोवळ येऊन अर्धमेला झाला असता, जखीणीच्या तावडीत सापडलं की वाचणं महामुश्किल पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. दहा मिनिटं अशीच गेली, तो लहान पोरगा मला वडापाव समजून माझ्याकडे आधाशाने पाहत होता, नंतर ती जखीण माझा बळी द्यायला माझ्याजवळ आली आणि माझा हात पकडला पण तिला झटका बसावा अशी ती मागे सरकली, एक लख्ख वीज आकाशात चमकली आणि आकाशवाणी झाली, "बोकलत तूझा जन्म हा जगातल्या वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी झाला आहे, आम्ही तुला विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत, कोणताही दुष्ट आत्मा प्रेतात्मा तुझं काहीच वाकडं करू नाही शकत. विजयी भव बोकलत." आणि आकाशवाणी बंद झाली, ती आकाशवाणी ऐकून माझ्या अंगात उत्साह संचारला मी त्या जखीणीसमोर हात केला आणि माझ्या हातातून वीज निघाली आणि ती जखीण क्षणार्धात भस्म झाली, त्याचक्षणी ती झोपडी आणि तिचा मुलगा नष्ट झाले आणि मी वडाच्या झाडाखाली उभा होतो. झालेला प्रकारची वाच्यता कुठेही करायची नाही आणि गोरगरिबांना भुतांच्या तावडीतून सोडवण्याचा निश्चय करून मी घराची वाट चालू लागलो.

बापरे बोकलत, माझं काळीज एव्हढ्या जोरात धडधडायला लागलं की मलाच जोरात आवाज ऐकू यायला लागले. नंतर कळलं की बाजूच्या ढोल पथकाची तालीम सुरू आहे त्याचा आवाज होता तो.

बोकलत यांना या धाग्यातून काढून नाही का टाकता येणार ??>>> सिग्नेचर टाकून पण वाचलीत वाटतं तुम्ही, अहो ती सिग्नेचर तुम्हाला वाचन स्कीप करता यावे यासाठी आहे खास. आता ज्यांना माझ्या सत्य आणि थरकाप उडवणाऱ्या कथा आवडत नाहीत त्यांनी वाचून प्रतिक्रिया देऊ नयेत साधा सरळ विषय आहे.

Pages