अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही बोकलत .. मजा आली... लगे रहो... आपण तुमचे फ्यान.
तुम्ही जखीण, पिशाच वगैरेंना घाबरत नाहीत तर मानवांना घाबरून पळण्याचा प्रश्नच येत नाही, रेप्युटेशनचा सवाल है.

सावधान संकरित पैदास भुतांनी हा धागा हायज्याक केला हाय. इग्नोरास्र मारा करा.>>>>अटेंशनास्त्र मारल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे Happy

@ बोकलत....मायबोली वर प्रत्येक प्रकारच्या लेखन साठी विविध सेक्शन्स आहेत....तुमचे लिखाण खरेच चांगले आहे पण ते विनोदी सदरात चांगले आहे(जरी तुमच्या मते खरे अनुभव असतील तरी)...अमानवीय धागा थरारक अनुभव घेण्या साठी वाचक येतात त्यातील अनुभव वेगळा आणि विनोदी लेखन वाचण्याचा अनुभव वेगळा..दोन ठिकाणी दोन्ही वाचायला आवडेल सगळ्यांना... म्हणुन तुम्ही अट्टाहास सोडून नवीन धागा उघडा..इथे नको लिहू म्हणणारे ही विनोदी लेखन म्हणुन आनंदाने वाचतील तिथे... प्लीज हा धागा बंद पडू देवू नका .. unnecessary २००० मेसेजेस झाले की धागा बंद होईल आणि ना तुमचे लेखन लिहिता येणार ना अमानवीय अनुभव...म्हणून कृपा करून तुम्ही नवीन धागा काढून लेखन करा आम्हाला वाचायला आवडेल

उमानु -- ++++१

दक्षिणा आपण यात लक्ष घालावे ... ऍडमीन म्हणून

बोकलत यांना टोकलत तर ते अजून कोकलत बसतील, त्यापेक्षा त्यांना इग्नोर करुन टाकलत बर होईल.....>>>>> Rofl

बोकलत तुमच्या कथा विनोदी असल्या तरी प्लीज, प्लीजच अमानवीय धाग्यावर लिहु नका, दुसरा धागा काढा.

बोकलत..तुमची कथा चांगली आहे. दुसर्‍या धाग्यावर प्रतिक्रिया दिली आहे. क्रुपा करून इथे विनोदी कथा टाकू नका. आम्ही सगळे जण सांगतोय त्याचा तरी जरा मान ठेवा.

२१ प्रतिसाद म्हणुन बघायला आले तर ईथे परत तेच रामायण...
बोकलत तुम्हाला खरच विनंती आहे की आम्ही ईथे काही सिरीअस किस्से वाचायला येतो आणि तुमच्यामुळे या धाग्यावर उगीच प्रतिसाद जास्त न आत काहीच नाही अशी अवस्था होते आहे.
तुम्हाला लिहायला मनाई कोणीच करत नाहीये पण ते ईथे नको..प्लीज दुसरीकडे लिहा. तुमचे चाहते तिथे येउन वाचतील.

उमानु -- ++++१

दक्षिणा आपण यात लक्ष घालावे ... ऍडमीन म्हणून>>>>>>१११

नोकरीत असताना सुरूवातीला मी सुरगाणा या दुर्गम तालक्यात काम करत होतो. खेडोपाडी फिरावं लागायचं म्हणून तिकडेच एक रुम भाड्याने घेतली होती. कारवीच्या कुडाच्या भिंती असलेलं खोपटंच होतं ते. तिकडे खेड्यांना पाडे असे म्हणतात.
सुरगाण्याला नोकरी म्हणजे नातेवाईक भिती घालत,तिकडे जादुटोणा जारण मारण वगैरे खूप चालायचे त्यावेळेस. माणसाचा कुत्रा,कोंबडा करतात असं बोलायचे.
एक दिवस मी असाच सुटीवरून पोहोचलो ,खुप धुळ होती म्हणून शेजारी केरसुणी जीला ते लोक साळुता म्हणतात मागायला गेलो. दुपारी बरीच घरे बंद होती म्हणून जरा लांबच्या घराकडे गेलो तर घरात अंधुक उजेडात एक म्हातारी,एक मध्यम वयाची स्री दिसली. त्यांचं एका कुत्र्याबरोबर काहीतरी तंत्रमंत्र चाललेलं होतं. कुत्र्याला कापड घातलेले होते व सर्वांगावर कुंकू टाकलेले होते. मी आवाज देताच म्हातारीने वळून पाहिले. तीची ती विचित्र नजर व अवसान पाहुन मी खूप घाबरलो व काही नाही काही नाही असे म्हणत तिथून पळून आलो. कोणालाही काही सांगितलं नाही.

@प्रीत००९ : अरे बापरे
भूत नसतात असे विज्ञान मानते, पण मी एक विज्ञान कथा वाचली होती त्यांनी भूत हि संकल्पना विज्ञानाच्या भाषेत सांगितली ( मग चालत यांना बर का )
समांतर विश्वाची कल्पना तुम्हाला असेल, हे एक असे काल्पनिक जग आहे जसे कि आरशात आपण पाहतो तसं. म्हणजे त्या विश्वात तुम्हची प्रतिकृती आहे
ती अगदी तुमच्या सारखी दिसते,बोलते,विचार सुद्धा तुमच्या सारखा करते.
तर अशी किती समांतर विश्व असू शकतात? तर अगणित...
अशी समांतर विश्वे कधी तयार होतात ? जेंव्हा जेंव्हा एकापेक्षा अधिक शक्यता निर्माण होतात तेंव्हा हे विश्व विभागले जाते.
एक सोप्पे उदाहरण समजा एक व्यक्ती नदीच्या पुलावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे. आता इथे दोन शक्यता आहेत
एक त्याने आत्महत्या केली व दोन त्याचा विचार बदलला व तो मागे सरकला
आता ज्या विश्वात त्याने आत्महत्या केली तेथील लोक्कांसाठी तो मेलेला आहे मात्र दुसऱ्या विश्वात तो अजूनही जिवंतच आहे
या समांतर विश्वात प्रवास कसा करायचा हे माहित नाही.. काही अशी उदाहरणेही तुम्हाला नेट वर मिळतील ज्यात अपघाताने काही लोकांनी असा प्रवास
केल्याचा दावा आहे. मात्र चुकून काही क्षण त्या जिवंत असलेल्या विश्वातील व्यक्ती मेलेल्या व्यक्तीच्या विश्वात आली अगदी काही सेकंद व मिनिट
तर जे लोक हे पाहतील ते त्याला भूत समजतील...

unnecessary २००० मेसेजेस झाले की धागा बंद होईल आणि ना तुमचे लेखन लिहिता येणार ना अमानवीय अनुभव>>>२००० मेसेज झाले कि अमानवीय ३ येणार, आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर तो धागा मी उघडणार.

बोकलत..तुमची कथा चांगली आहे. दुसर्‍या धाग्यावर प्रतिक्रिया दिली आहे. क्रुपा करून इथे विनोदी कथा टाकू नका. आम्ही सगळे जण सांगतोय त्याचा तरी जरा मान ठेवा.>>>> धन्यवाद योगी सर, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. आणि यापुढेही राहील, पण तुम्ही मला जरा समजून घ्या असं एकाएकी बाहेर हाकलवून देऊ नका.

बोकलत यांना टोकलत तर ते अजून कोकलत बसतील, त्यापेक्षा त्यांना इग्नोर करुन टाकलत बर होईल.....>>>>मी पण तेच बोलतोय, मला इग्नोर करा, त्यासाठी खास सिग्नेचर पण टाकले मी लेखाच्या सुरवातीला. पण प्रत्येक जण येतोय आणि प्रतिसाद देतोय बोकलतला इग्नोर करा, सकाळपासून १०-१२ प्रतिसाद हेच 'बोकलतला इग्नोर करा' आता हे असे प्रतिसाद लिहून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष नाही तर चांगलंच लक्ष देताय, हे सिद्ध होतं.

बोकलत यांना टोकलत तर ते अजून कोकलत बसतील, त्यापेक्षा त्यांना इग्नोर करुन टाकलत बर होईल.....>>>>मी पण तेच बोलतोय, मला इग्नोर करा, त्यासाठी खास सिग्नेचर पण टाकले मी लेखाच्या सुरवातीला. पण प्रत्येक जण येतोय आणि प्रतिसाद देतोय बोकलतला इग्नोर करा, सकाळपासून १०-१२ प्रतिसाद हेच 'बोकलतला इग्नोर करा' आता हे असे प्रतिसाद लिहून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष नाही तर चांगलंच लक्ष देताय, हे सिद्ध होतं.>>>>>> Proud हाय दैय्या ! पण अहो बोकलत, ( असला आय डी का घेतला देव जाणे ! ) तुम्ही पण का एवढे हट्टाला पेटलाय? हा धागा जर अमानवी शक्ती, त्यांच्या गोष्टी व गुढता या करताच काढलाय, तर मग इथे तुम्ही मुद्दाम अशा कथा का लिहीताय? तुमच्यासाठी जर वेगळा धागा आहे, तर तिथे लिहा.

बरं, तुम्ही म्हणता की ह्यात २००० हजार पोस्टी होऊन आपोआप धागा बंद होईल. पण ३ रा धागा काढल्यावर तुम्ही तिथे पण पिंगा घालालच की. आणी ज्या अपेक्षेने, उत्सुकतने आम्ही इथे वाचायला येतो, ती आमची उत्सुकताच संपणार नाही का? मग तुम्ही इथे कितीही कथा लिहील्या तरी वाचणार कोण?

ए दक्षिणा समजाव की ह्यांना.

जाऊ दे आता तुम्ही सगळे म्हणताय जा तर ही माझी शेवटची पोस्ट या धाग्यावरची, पण जाता जाता सांगून जातो ती शक्ती ज्याने कोणी माझ्यावर सोडली होती त्याला मनापासून धन्यवाद. माझी भरपूर कामं करून घेतली, ३ दिवस झाले त्या बाबाला आणि शक्तीला घाण्या बैलासारखा जुंपलाय, तो बाबा तर जास्त लाडातच आला होता काल, बोलत होता श्रावणी सोमवार आहे दही-खिचडी वेफर्स पाहिजे, ऐकेच नाय, शेवटी कपडे वाळत घालायचा पोकळ बांबू घेतला आणि धपाधप दिले, तेव्हा वठणीवर आला भामटा बाबा, ती बायंगी जरा चांगली आहे, कपडे धुवायची, भांडी घासायची कामं बरोबर करते. अजून आठवडा तरी मी काय सोडणार नाय त्यांना. इथल्या कोणी पाठवली असेल तर नोंद घ्यावी.

होय.
बोकल त, इतरत्र वाचूच तुमचे लिखाण.
ही डि सेन्सी, समजुतदार पणा दाखवल्याबद्दल आभार!

हुश्श्श <<<<बोकलत यांची शेवट्ची पोस्ट आहे हे वाचुन आंनद झाला.>>>> +११११११

<<<जाऊ दे आता तुम्ही सगळे म्हणताय जा तर ही माझी शेवटची पोस्ट या धाग्यावरची>>>>
__/|\__ आभारी आहे.

जाऊ दे आता तुम्ही सगळे म्हणताय जा तर ही माझी शेवटची पोस्ट या धाग्यावरची>>>>>
धन्यवाद बोकलत....त्या नवीन धाग्यावर जरूर लिहा ...वाचत आहे तिथे Happy

माझी नोकरी बहुतेक ९५% आदिवासी भागात झाली. तर अशाच एका तालुक्यात काम करताना एका तलाठी तात्याची ही गोष्ट. ग्रामसेवक तलाठी यांच्याशी आमचा रोजच संबंध येत असे व त्यातून मैत्री होत असे. तिकडे तलाठ्यांना तात्या अशी उपाधी असे. आम्हाला भाऊसाहेब. तालुक्यातील एका दुर्गम गावातील एका स्ञीचे तलाठ्याकडे जमीनीसंदर्भात काम होतं. ते काम पुर्ण केल्यावर तिने त्याला जेवणाचे आमंत्रण दिलं.
तर हे महाशय आपल्या मित्राला बरोबर घेऊन गेले. कोंबड्याचे जेवण, मोहाची दारू असा बेत होता. बाई एकटीच होती. त्याकाळात स्ञियाही तिकडे दारू पित असत. जेवणं झाली,निघायचं तर बाई जावू देइना. त्याला शरीरसंबध करण्यास सांगु लागली. तो नाही म्हणाला तर विचित्र भाषेत बोलत बळजबरी करायला लागली. तलाठ्याच्या मांडीवर थाप मारली व म्हणाली बघते कसं नाही म्हणतो ते.
दोघे घाबरले हे काहीतरी निराळच आहे हे बघुन कशीबशी सुटका करून पळुन आले. दुसऱ्या दिवसापासून या महाशयाचे वीर्य आपोआप सारखे बाहेर पडायला लागले.प्रकृती क्षीण होऊन एकदम शरीर बारीक होत चाललं. डॉक्टरी उपाय चालेनात. मग तिकडच्याच एका भगताकडे जाऊन त्याने सांगितलेला उपाय केला तेव्हा बरा झाला.
ता.क. काही जणांना ही गोष्ट अश्लील वाटू शकते. क्षमा असावी.

प्रीत, केवळ अश्लीलता अन हिडीसपणाचा आरोप होईल म्हणून एक भयानक जवळून पाहिलेला अनुभव सांगायचे टाळत होतो, असो.

एक ऐकलेली कथा माझ्या मित्राकडून खरे खोटे माहित नाही पण असेच असते का? कुणाला माहित असेल तर सांगावे
तर त्याच झालं असं माझ्या मित्राच्या शेतात ज्वारी चे पीक घेतलेले होते, बाजूला हि त्याचा शेजारी त्यानेही ज्वारी लावली होती
पण जेंव्हा कापणी होऊन मोजण्याची वेळ आली तेंव्हा ती काढलेल्या ज्वारी पेक्षा खूप कमी भरत व बाजूच्या शेतात जास्त पोती निघत
पिकावरून तर तेवढी पोती निघेल असं वाटायचं नाही. पण असे दोनतीन वेळा झाल्यावर कोणीतरी त्यांना सांगितले कि कोकणातून त्यांनी
काहीतरी आणलं आहे ( कदाचित एक प्रकारचे सांगकाम्या भूत ) जे सांगेल तसे करते इकडची ज्वारी तिकडच्या ढिगात अदृश्यपणे
आणून देते. पण माझ्या मित्रांच्या वडिलांना पुरावा हवा ना भूताला कसे पकडणार चोरी करताना
मग त्यांनी एक युक्ती केली ज्यावेळी पीक मोजण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी स्वतःच्या ज्वारीत कुंकू किंव्हा तस्यम काही रंग मिसळले व मोजून होताच
बाजूच्या शेतात जाऊन त्याला विचारले तुझ्या कडे माझी रंग लागलेली ज्वारी कशी आली वगैरे

पण असे असते का कुणाला काही अनुभव ?

घरात एकटीच होते, लाईट गेले होते. छोटा एक दिवा लावलेला होता. उठुन रात्री काम कराय्चा जाम कन्टाळाल असल्यामुळे अजुन दिवे लावले नाहीत. इत्क्यात छतावरुन धप धप आवज येउ लागले. अम्च्या ईमारतीची गच्ची नेहमी बन्द असते, कधीच उघडत नाहीत. वरच्या मजल्यावर आम्चे एकच राहते घर आहे, बाकी लोक नव्ते तेव्हा. म्हणजे मध्यरात्री मी एकटी, अन्धार आणि बन्द असलेल्या गची वरुन येणारे अवाज. खुप घाबरले. घट्ट पन्घरुन घेऊन राम राम म्हणत राहिले खुप वेळ तशीच. नन्तर १-२ तासानी ते अवाज थाम्बले. लाईट आले. पहाटे गावाला गेलेली घरची माणसे परत आली. मग मी हा किस्सा सान्गत होते.

तेव्हा जवळच उभ्या असलेल्या खलच्या मजल्यावर राहणार्या काकु म्हनाल्या की, काल लहान मुले,गच्चीत खेळत होती. मोठी माणसे सुधा तिथे बसली होती.

म्हणजे मी उगाचच घाबरले होते. Sad

आफ्रीकन काळ्या जादूचा एक प्रकार .… यात प्रयोग कर्ता एका बाहुलीच्या सहाय्याने तांत्रिक क्रिया करून एखाद्या व्यक्तीला पिडा देतो . आजचा हा किस्सा Texas येथील एका महिलेसोबत घडलेला आहे . या बाईला गूढ गोष्टींबद्दल खूप रस होता . घरात तिने अनेक गूढ गोष्टी साठवल्या होत्या … voodoo doll बद्दल या महिलेन बरच ऐकल होत . २००४ या साली एक कुतूहल म्हणून या महिलेने e -bay या संकेत स्थळावरून ही वुडू खरेदी केली . फक्त showpiece म्हणून घेतलेली वस्तू हि त्या स्त्री साठी चांगलीच महागात पडली . ती बाहुली घरात आणल्या नंतर काही दिवसातच तिला घरात विचित्र भास वह्वायला लागले . घरात अदृश्य शक्तीचं वास्तव्य तिला जाणवायला लागल .

एके संध्याकाळी ती बाई तिच्या शयनगृहात पुस्तक चाळत बसली होती . तील तिच्या तळघरातून कसलातरी आवाज आला . कोणतरी तळघराचा जिना हलकेच चढत आहे अस तिला वाटल .
तिला घरात चोर घुसले आहेत अस वाटल , म्हणून तिने हातात rod घेऊन त्या जिन्याजवळ गेली . तर जिना आणि तळ घरात कोणाच नव्हत . सगळ सामान जिथल्या तिथे . फक्त ती वुडू डॉल त्या जिन्यावर पडून होती . जी तिने २ दिवसापूर्वीच showpiece म्हणून e -bay वर order करून मागवली होती . आल्या आल्या तीने ती तिच्या showcase मध्येच ठेवली होती . ही अचानक इथे कशी हे तिला समजल नाही . बहुतेक समजल असाव पण तीच मन हे मानायला तयार नव्हत कि ही झपाटलेली बाहुली आहे .

एके रात्री ती तळघरात काही कामानिमित्त गेली . तिच्या पायावर कोणीतरी धारधार वस्तू ने वार केला . ती महिला जोरात किंचाळली . घाबरून ती तडक hall मध्ये आली . तिने नीट बघितल तर पायावर ३ नखांनी ओरबाडल होत .

त्यानंतर रोज रात्री तिला अंगावर असे वार होत होते . कधी कधी अंगावर हलकेच कापले जायचे . तर कधी कधी खूप गंभीर . एका रात्री तिला कोणीतरी तिच्यावर एवढ्या जोरात वार केला की तिला हॉस्पिटल मध्ये जाऊन टाके मारून घ्यायला लागले .

त्यानंतर तिने ती डॉल कफ़न मध्ये टाकून तळघरात पुरूनच टाकली . त्यानंतर रोज रात्री तिला तळघरातून पिशाच्च्याचा हसण्याचा आवाज यायचा . पण तिने भीतीने तो दरवाजा कधी उघडूनच बघितला नाही . पण तिथे पुरल्यापासून त्या भुताने तिच्यावर परत कधी आक्रमण केल नव्हत . पण स्वप्नात येउन नाना प्रकारे त्रास देत असायचा .
एकदा वैतागू तिने ती पुरलेली बाहुले उकरून काढली आणि जाळण्याचा प्रयत्न केला . पण ती काही केल्या जळेना. ती जळत नाही बघितल्यावर बाजूलाच असलेल्या कैचीने तिने ती कापायला सुरवात केली पण कैचीच तुटली . जाळायचा प्रयत्न केला पण ती जळेना .

तिने ती डॉल ebay ला परत करायच ठरवल . ebay ने ती त्याच्या मुळच्या मालकाला पोहोचती केली . त्या दिवशी तिला वाटल , गेल्या २ वर्षातून पहिल्यांदाच ती एवढ्या शांत झोपली होती , पण त्याच रात्री सुमारे १२ च्या सुमारास दरवाजाची बेल वाजली . दरवाजा उघडला तर कोणीच नव्हत . सगळ सुमसाम . ती दरवाजा बंद करणार इतक्यातच तीच लक्ष खाली गेल . खाली ती बाहुली होती.
तिने बाहुलीच्या मूळ मालकाला call केला . मालकाने सांगितल कि ती माझ्या घरून रात्री अचानक गायब झाली आहे . मी आता तीच शोधत आहे .

दुसर्या दिवशी तिने त्या बाहुलीला एका packet मध्ये pack करून परत तिच्या मालकाला पाठवली . मालकाने तिला call करून सांगितल कि parcel रिकाम आहे . त्या रात्री परत ती बाहुली तिच्या दारात आढळली .

तिने त्या मालकाची भेट घ्यायचं ठरवल . समक्ष भेटूनच बाहुल देईन अस ठरवून ती त्याच्या घरी काही पूर्व कल्पना न देता गेली . त्याच दिवशी ती पोहोचायच्या आधी त्या मालकाचा अतिशय गूढ रित्या मृत्यू झाला होता .
शेवटी कंटाळून तिने हा प्रकार चर्च च्या पाद्री ला सांगितला . त्याने काही एक अनुष्ठान करून त्या बाहुलीला एका जागी पुरायला सांगितल . आणि तिने परत त्या जागे जवळ जाऊ नये अशी सक्त टाकीत दिली .

त्यानंतर परत कधी तिला त्या बाहुलीचा त्रास झाला नाही . पण अस म्हणतात की ती बाहुली एका पिशाच्च साधना करणाऱ्या तंत्रीकाची होती . तो त्या बाहुलीच्या आधारे अनेक लोकांना त्रास देत असे . त्या बाहुलीत त्याने एक पिशाच्च घुसवून ठेवला होता . पिशाच्च घुसवून त्याने ती बाहुली त्या मालकाला दिली , मालकाला त्या पिशाच्चाने खूप त्रास दिला . मालकाने तिच्या पासून सुटका मिळावी म्हणून ती e -bay वर विकायची ठरवली . दुर्दैवाने ती या महिलेने विकत घेतली .

Pages