अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पतरु, तुमची मेहनत वाया न जावो ही इथल्या आम्हा सर्वांतर्फे सदिच्छा.
बाकी 'तिथे' इथे अनुभव लिहिलेलेच कसे मनोरुग्ण वगैरे आहेत आणि बोकलत यांनी कसा हा धागा समृद्ध बनवला हेच मांडून राहिले ना लोक. आता काय म्हणावे. Uhoh

ही माझ्या मेहुण्यांनी सांगितलेली घटना..

ते तेंव्हा परंड्याला पं.स. मध्ये होते बर्‍याचदा रात्री अपरात्री बार्शी ते परंडा जावे लागत असे. एकदा असेच रात्री एकदिड च्या सुमारास जीप ने बार्शी कडून परंड्याला चालले असताना रस्त्यात कुणी तरी पांढरे कपडे घातलेली व्यक्ती पडली होती. हे पुढे ड्रायव्हर शेजारी होते ते पाहून ह्यांनी ड्रायव्हर ला गाडी अरे थांबव म्हणायला लागले परंतु त्याने जीप वेगात नेली पुढे जाताच ह्यांनी मागे वळून बघितलेले तर पांढरा माणूस वडाच्या सुरपारंब्यावर झोके घेत होता... पुढे आल्यावर ड्रायव्हर म्हणाला त्यांना 'साहेब ह्या जागेवर कायम हे घडते मी ४थ्यांदा अनुभवलयं हे!'

त्यांचे असे बरेच अनुभव आहेत ते सांगेन इथे!

<<रावल यांच्या कथा जरी असल्या तरी त्या सिरीयस होत्या म्हणून रावल यांनी ह्या झाडावर राहीले तर चालेल.>> धन्यवाद @योगी९००
बरं चला जरा सिरीयस होऊ.
जगात एवढे खून,बलात्कार होतात. कोणी भूताने, आत्म्याने अजून बदला घेतला असे नाही वाचण्यात आले.
तरी हि मी अनुभवलेली सत्य घटना जशीच्या तशी कोणताही काल्पनिक बदल न करता...
आम्ही जेंव्हा प्लँचेट चा प्रयोग केला तेंव्हा माझ्या काकांकडील पुस्तक त्यांच्या नकळत आणून मी मित्रांना दाखवले. माझ्या काकांकडे भरपूर पुस्तके आहेत
म्हंटल काय कळतंय त्यांना काम झालं कि ठेवू परत.. त्या पुस्तकात दिले होते कि कमीत कमी चार व्यक्ती हव्यात प्लँचेट करायला म्हणून मी तिघांना तयार पण केलं एक वयाने आमच्यात मोठे होते ते तात्या,संदीप व रोहन . जागा मिळाली. पुस्तकात सांगितलं होत कि सुरवातीला आत्मे नाही येणार कमीत कमी २१-२२ दिवस ठराविक वेळेत रोज १ तास आत्म्याला आव्हान करा. जसे जसे यात तुम्ही पारंगत व्हाल तसे आत्मा कमी वेळेत येईल.
पुस्तकात काही खबरदारीचे उपाय हि होते ते सर्वांना वाचून दाखवले. आत्म्यांना आवाहन करण्यासाठी संदीप तयार झाला. त्याला ते पुस्तक वाचायला हि दिले.
आम्ही जिथे हा प्रयोग करणार ते तात्यांचे दुकान होते. दुकान तसे नावालाच होते म्हणा तिथे आम्ही बुद्धिबळ खेळायला व गप्पा मारायलाच जमत असू. तरी कुणाला शंका नको म्हणून रोजची आमची मिटिंग संपली कि घरी जेवायला जाऊन परत आम्ही तिथे जमत असू व दुकानाचे शटर लावून प्रयोग करत असू . सुरवातीला चार दिवस काहीच अनुभव नाही आला. तरी मी सर्वाना सांगितले होते कि कुणीही चेष्टा करायची नाही, मुद्दामहून प्लॅन्चेट बोर्ड वरील पेला हलवायचा नाही, सगळे सिरीयस होते.
पण पाचव्या दिवशी संदीप ला ताप आला तो म्हणाला आज मी नाही येऊ शकत, मी म्हणालो अरे प्रयोग काही झाले तरी अपूर्ण नाही ठेवायचा. बाकीचे त्याला चिडवू लागले कि तू भुताच्या भीतीने आजारी पडला. संदीप म्हणाला मी भीत नाही, मी येतो पण मला आव्हान करायला नाही जमणार. एक तास आव्हान माझ्याच्याने शक्य नाही. सर्वानी मग ती जबाबदार माझ्यावर सोपवली, मी तयार झालो, त्या रात्री मी आव्हाहन करायला चालू केलं आणि अर्ध्या तासाने लाईट गेली. अंधारात थोडी भीती वाटत असतानाही आम्ही प्रयोग चालू ठेवला. तेव्हा आम्हाला जाणवलं कि आम्ही जी दोन बोटे पेल्यावर ठेवली आहेत ती एकमेकांना धडकत आहेत. आत्ता पर्यंत आम्ही चार दिवस हा प्रयोग करत होतो असे कधी झाले नव्हते. मधेच लाईट आली व लगेच गेली परत काही घडले नाही.
एक तासाने आम्ही तो बोटे थडकण्याच्या गोष्टी विषयी बोललो कुणीही ते मुद्दाम करत नव्हते. लाईट जाणे हि आम्ही नेहमीचीच साधी घटना धरली यात भुतांचा काही संबंध नसावा. सर्व जण आपापल्या घरी पांगलो.
पण आजारी असताना पण तू काम कुठे मरायला गेला होतास या वाक्यावर संदीपने त्याच्या आईला हकीकत सांगितली व मी त्यांच्या शिव्या खाल्ल्या त्या वेगळ्या व त्यांनी ते पुस्तक जाळलं तेही वेगळं. तरी संदीप बंड करून दुसऱ्या दिवशी आला तेंव्हा माझ्या घरीहि हे उद्योग संदीपच्या आईने सांगितले. माझ्या घरच्यांना असल काही नवीन नव्हतं तरी घरचे म्हणाले तुला एकट्याला काय करायच ते कर लोक्काना कशाला ओढतोस..
तात्याची बायको स्वामी समर्थ मार्गातील होती त्यांनी हि गोष्ट ताईंना ( या मार्गात अध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या स्त्री व्यक्तीस ताई नावाने संबोधले जाते )
सांगितली. त्यांनी तात्यांना बोलावणे पाठवले व मलाही घेऊन या असे सांगितले. आम्ही गेलो भेटायला. त्यांनी मला विचारलं का करतोस तू हे असं .. काय साद्य करायचं तुला..
मी म्हणालो माझी पात्रता नाही कि मी देवाला पाहू किंवा अनुभवू शकू..देव आहे का हा प्रश्न आहेच माझ्या मनात पण जर मी भुताला पहिले वा अनुभवले
म्हणजे सावली पाहिली हि प्रकाश आहे हे समजेलच...
ताई म्हणाल्या कश्याला विषाची परीक्षा घेतोयस. देवपण अनुभवू शकतोस तुझी तयारी असेल तर मी सांगितलेली साधना कर. त्यांनी मला गुरुचरित्र व मानसपूजा सांगितली व गुरुवार पासून चालू कर म्हणून सांगितले. झालं तात्याही बाहेर पडले मग सगळंच बारगळ. पण मला त्या रात्री भयानक स्वप्न पडले
कि मी जागृत आणि झोपेच्या अश्या मधल्या अवस्थेत होतो कारण मी माडीवर झोपत होतो व खाली आई व बाबा झोपत असत त्यांचे बोलणे मला ऐकू येत आहे
एक व्यक्ती माझ्या जवळ येऊन त्याने पोटात हात घालून जोरात दाबले व मला भयंकर वेदना झाल्या मी ओरडण्याचा प्रयत्न करतोय पण तोंडातून शब्द फुटेना
फक्त घशातून विचित्र घरघर निघत होती.. मी पूर्ण झोपलो नव्हतो हेही खर कारण मला ऐकू येत होत आई म्हणत होती कि रमेश असा का करतोय मी पाहून आले,बाबा म्हणतायत तो झोपेत आहे जाऊदे पण आईचा पावलांचा आवाज दादऱ्यावर आला आई आली व मला हाक मारली रमेश काय झालं म्हणून तेंव्हा तो माणूस स्वप्नातून (?) गेला व मला बर वाटू लागलं.
परत असे आजतागायत नाही घडले...

१) माझ्या सासर्‍यांच्या बाबतीतली गोष्ट.ते रात्रीचे घरी चालत येत होते.अंतर बरेच होते.वाटेत कोणी नव्हते.रस्त्यावर लाईट नव्हते.थोड्यावेळाने एक ओळखीचा माणूस त्यांना भेटला.त्याच्या हातात बॅटरी होती,गप्पा मारत दोघे आले.त्याने सासर्‍यांना दारापर्यंत सोडले..घरी आले जेवले वगैरे, दुसर्‍या दिवशी बोलता बोलता म्हणाले की अमुक अमुक भेटला होता.त्याने सोबत केली.त्यावर साबा म्हणाल्या की कसं शक्य आहे? तो तर १ का २ दिवसांपूर्वी वारलाय. त्यानंतर सासर्‍यांनी २-३ दिवस अंथरुण धरले.
२) एका परिचिताने स्वतःबाबत आलेला अनुभव सांगितलेला. कोकणातल्या पावसाळ्याच्या रात्री अचानक दार वाजले म्हटल्यावर त्यांनी दार उघडले.दारात बहिणीला पाहून त्यांना आश्चर्य वाटले.अग, अशी कशी आलीस तू यावेळी? तर काही नाही रे,तुला भेटावंसं वाटलं म्हणून आले.यांनांही वाटले की गाडी खोळंबली असेल म्हणून ही अशी अवेळी आली.
चहा करून दिला,गप्पा मारल्या.नंतर झोपायला निघून गेले.दुसर्‍या दिवशी बघतात तर काय बहीण घरात नव्हती.
आपल्याला भास झाला म्हणावं तर टेबलावर रिकामी चहाचा कप तसाच होता. १-२ दिवसांत तार आली की बहीण वारली म्हणून.

आता काय खरं काय खोटं माहित नाही.मला,स्वतःला अनुभव आल्याखेरीज पटणार नाही.२ नंबरची गोष्ट लहानपणी ऐकली होती ती त्या वयात खूप भारी वाटली होती.

तेव्हा मी फारतर पाचसहा वर्षाचा असेन. आमचं दोनच खोल्यांचं घर होतं.पाठीची खोली खुप अंधारी व कोंदट होती पुढची खोली कौलाची,तिथेच चूल एकाबाजुला मोरी व तिथंच शेळीसह आम्ही सर्व रात्री झोपायचो.
एकदिवस मला रात्री जाग आली तर मागच्या खोलीतून टांगे बैलगाड्या सारखी वाहनं एका रांगेत चालत समोरच्या भिंतीवरून कौलात जात होती. मी एकदम देहभान हरपुन ती मजा बघत होतो ते दृष्यच इतकं जादुई होतं की काळ जणू थांबला होता. त्या रांगेत मी बोट लावून अडवून बघत होतो पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. शेवटी हे काहीतरी विचित्र चालू आहे याची जाणीव झाली.खूप भीती वाटली लगेच डोळे गच्च मिटून पांघरूण घेऊन झोपलो. ती वाहनं चार इंच रुंदीची होती व खूप रंगीबेरंगी होती.
परत एकेरात्री जाग आली तर आतल्या खोलीत सोनेरी ऊन पडलेले, सोनेरी वाळसर गवतात एक साधु महाराज साध्या वेशात ध्यानाला बसलेले दिसले. आणि अचानक डोळे उघडुन प्रेमळ नजरेने माझ्याकडे बघितले. मी इतका शहारलो व घाईघाईने अंथरुणावर पडून डोक्यावर पांघरूण घेऊन झोपलो. आतासुद्धा मला ते बाबा डोळ्यापुढे दिसतात असे वाटते व अंगावर शहारे येतात.

माझ्या कथा येत राहणार. ज्यांना वाचायच्या नसतील त्यांनी दुर्लक्ष करा. कथेच्या सुरवातीला तसं लिहीत जाईनच.वाईट शक्तींच्या विरोधात लढा कसा द्यायचा हे माझ्या कथेत असल्याने,माझ्या कथा भावी पिढीला मार्गदर्शक ठरू शकतील, त्यामुळे इथे लिहीत राहणं माझं कर्तव्य आहे.

नाशिकची वणी आमची कुलदेवी. एकदा आम्ही पुण्याहून रात्रीचा प्रवास सुरू केला होता तिकडे जायला.
भाड्याची गाडी ठरवली. आम्ही ७-८ जण होतो. रात्रीची वेळ असल्याने बहुतेक जण झोपी गेले होते.
अचानक करकचून गाडि थांबल्याने जाग आली. कोणत्या तरी पुलावर होतो. काकाने ड्रायवरला विचारले असता तो म्हटला काय झाले कळले नाही गाडी अक्षरशः ओढली गेलीये विरुद्ध दिशेला. मी खरंच झोपेत नाहीये, किंवा प्यायलेला पण नाही. तो खूप घाबरलेला. ५-१० मि. त्याची धडधड थांबेपर्यंत सगळे धीर देत होते. नंतर एका ठिकाणी चहा पाजला वगैरे. बाकीचा प्रवास नीट पार पडला.

दुसरा प्रसंग, आम्ही ऑफिसमधले काही जण कर्दे बीच ला गेलो होतो. एका कलिगची लहान मुलगी ४-५ वर्षाची ती पण होती. कोकणात एका घाटातून जाताना ती मुलगी अचानक खूप रडायला लागली. काहिही केल्या शांत होत नव्हती. बराच वेळ गेला. मैत्रीणीने तिच्या गुरूंचा अंगारा ठेवला होता. तो लावल्यावर कमी झाले रडणे आणी झोपली. मैत्रीणिने सांगितले गेल्या वर्षी पण ते सेम याच रोडने गेले असता त्या जागीच तिची मुलगी रडायला लागली होती. या ट्रीपला त्यामुळे तिला धाकधुक होतीच. आम्हाला कोणाला तसे बोलली नाही पण दुसर्‍यांदा असे झाल्यावर तिने सांगितले.

इथे अमेरिकेतच वर्जिनिया मधे माझ्या चुलत बहिणीकडे गेलो होतो. पहिल्यांदाच तिच्या घरि जात होतो. संध्याकाळी ७ ला पोचलो. त्यांच्या घरात शिरल्या शिरल्या काहीतरि डिप्रेसींग च वाटायला लागले. काय ते नाही सांगता येणार. असं वाटलं कधी निघू इकडून. कशीबशी ती रात्र काढली. सकाळी निघालो नवर्‍याला सांगितले तर डीट्टो त्यालाही ते फिलिंग आले होते.

लोणावळ्याजवळ एक झपाटलेले हॉटेल आहे. गुगल करून वाचू शकता किस्से. त्याखालच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत.
महाबळेश्वरला पण एक बंगला आहे. दापोलीहून येतांना एकदा आमचे अचानक महाबळेश्वर ला राहण्याचे ठरले. एजंटने अगदी स्वस्तात त्या बंगल्यातल्या मागच्या दोन खोल्या दिल्या. पाच सहा एकर मधे बंगला आहे. दाट झाडी आणि पैसे एकदम स्वस्तात.
संध्याकाळी चहाची तल्लफ आल्यावर लक्षात आलं की आजूबाजूला कसलीही सोय नाही. मावशी येऊन गेल्या कि चहाची सोय नाही. मग तंगडेतोड करीत चौकात आलो. चहा पिताना त्याने चौकशी केली. चहावाला तेव्हां काहीच बोलला नाही पण म्हणाला इथे कसलीच सोय नाही, दुसरे हॉटेल मिळाले तर बघा. एजंटला मी पैसे परत करायला सांगेन.
दुस-या दिवशी सकाळी पुन्हा त्याच चहावाल्याकडे गेलो तेव्हां त्याने पुन्हा विचारले , किती दिवस राहणार आहे ?
मी आम्ही चाललोय म्हणालो. त्यावर तो म्हणाला , का हो काही झालं का ?
मी नाही म्हटल्यावर गप्प झाला. मी खोदून खोदून विचारलं की असा प्रश्न का विचारला..
तर म्हणाला, त्या बंगल्याबद्दल बरंच काही ऐकायला मिळतं म्हणून कुणी तिकडे जात नाही. असं तुमच्यासारखे शेवटच्या क्षणी आलेले स्वस्तात मिळते म्हणून जातात. पण काही झाले नाही ना , मग जाऊ द्या.
आम्हाला तरी कसलाच अनुभव नाही आला.
अफवा पसरवत असतात लोक.

( अवतरण चिन्हे उमटत नाहीयेत. त्या ऐवजी @ हे चिन्ह उमटतेय )

आजकाल जवळपास प्रत्येक घरामध्ये "मोकळं" होण्यासाठी एक ठराविक जागा दिलेली असते.

तिथे जाऊन करायच्या कृती हे बोकलत मायबोली आणि त्यातही या एका धाग्यावर सातत्याने करत आहेत.
कुठे तरी काहीतरी यांचे नक्की बिघडलेले आहे.

माझी सावत्र आजी जेव्हा गेली तेव्हा आम्ही खूप लेट पोहोचलो गावी. संध्याकाळी 7 ला वगैरे. आम्हाला फोन करून सांगण्यात आलं की डायरेक्ट स्मशानात च या. माझ्यासोबत माझी 1 वर्षाची रेहा असल्यामुळे मी तिकडे येणार नाही म्हणत होते. पण घरी जायचा रस्ता त्या स्मशानाच्या बाजूने च जात होता. मी नवऱ्याला गाडी बरीच पुढे लावायला सांगितली त्या ठिकाणापासून.
ते सर्व झालं, मी नंतर गावी 4 दिवस राहीन असं ठरवलं. नवरा आणि माझी मॉम मुंबई ला निघून आले.
त्या रात्री पासून साधारण साडे अकरा नंतर रेहा जोरजोरात किंचाळत , रडत उठायची. उठून सरळ धावायला सुरू करायची. उचलून घेतलं तरी आवरायची नाही मला . अंग जोरात टाकून रडायची. आधी मला वाटलं की पोट,कान काही दुखत असेल, तिला दूध वगैरे देऊन बघायची पण 0शून्य !
मी जमतेम 3 दिवस राहिले आणि घरी आले सरळ. तिथे ही हाच प्रकार. मी डॉक्टर कडे नेलं पण सर्व नॉर्मल असल्याचं dr ने सांगितलं. माझ्या मॉम ने तिला दृष्ट वगैरे काढली आणि माझ्या माहेरची देवी अंबादेवी ला साकडं घातलं. तरी काही फरक पडला नाही. 15 दिवस हे नाटक चाललं.
मी 15 रात्री जागून काढल्या . पण नंतर हे बंद झालं. अजून ही ती कधीतरी रडते अशी झोपेत, कोणाकडे तरी बोटं दाखवते. पण खूप नॉर्मल आहे सध्या !

भांडखोर आईबापांच्या दहशतीमध्ये बालपण गेलेल्या किंवा खूप लाडात वाढलेली मुलं इतरांचं लक्ष वेधून घेण्याकरिता सतत काही ना काही चाळे करत असतात.मग अजुनच एकटे पडतात. दुसऱ्याला पीडणारे आतुन भयानक दु:खी असतात. त्यांना सहानुभूतीची गरज आहे.

भुतांना मी पाहिलं नाही म्हणून ते असतात असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही तसेच ते नसतात असेहि आपण का बरे म्हणावे
काही लोक या धाग्यावरील लोकांना मनोरुग्ण म्हणतात.. म्हणूदेत बापडे .. तुम्हाला तसे म्हणायला आम्ही अडवत नाही पण आमचे अनुभव सांगायाला
लागलो कि तुम्ही मनोरुग्ण म्हणावे हे काही पटत नाही...
माझे सर्वात मोठे काका जेंव्हां गेले तेंव्हा मी त्यांच्या उशाला बसलो होतो.. ते एकदा म्हणाले होते " ते दोघे आले बघ मला घ्यायला काळतोंडे"
मला वाटलं मरताना माणूस काहीतरी असंबद्ध बोलत असेल..
खरा धक्का तर मला त्यानंतर १७ वर्ष्याने बसला.. बायकोचे आजोबा आजारी होते म्हणून मी तिच्यासोबत तिच्या गाऊ गावी गेलो व दोन दिवस राहून आलो
आल्यावर आजोबा गेल्याचे कळले.. काही दिवसांनी बायको मला म्हणाली , शेवटी शेवटी आजोबाना भास होत होते म्हणत होते " ते माझ्या पायाजवळ कोण बसलंय हाकलवं त्यांना " आम्ही म्हणायचो कुठे कोण आहे तर म्हणायचे " ते दोघे काळे बसलेत"

आश्चर्य याच कि माझे काका व बायकोचे आजोबा यांच्या म्हणण्यात साम्य कसे ??
अजून कुणाला असाच अनुभव आहे का

रमेश रावल तुम्हाला इथे कुणी काही म्हटलं आहे असं नाही वाटत मला. तुमच्या किस्यांमध्ये आचरटपणा नाही असं मला वाटतं. तुम्ही स्वतःवर का ओढून घेताय??

ते काळतोडयांबद्दल नक्की ऐकलं नाही पण माझे पणजोबा जायच्या आधी बोलायचे काळ्या कपड्यातील माणसं आलीत. मला नेतील वगेरे

अजून कुणाला असाच अनुभव आहे का >>> हो आहे माझे मोठे काका वारले ३ वेर्शापुर्वि तेहि असच काहिस बोलायचे, माझे वडिल दिसायचे त्यांना पायाजवळ बसलेले मरनापुर्वि २ दिवस आधि अनि ते बोलावत आहेत अस सांगायचे.माझे वडिल वारल्याला १० वर्ष झालीत.

<<रमेश रावल तुम्हाला इथे कुणी काही म्हटलं आहे असं नाही वाटत मला. तुमच्या किस्यांमध्ये आचरटपणा नाही असं मला वाटतं. तुम्ही स्वतःवर का ओढून घेताय??>>
मला कोणी काहीं नाही बोललं, मी या धाग्यावरील लोकांना असे म्हणालो, आणि तसेही मला कोणी बोलले तरी माझी काही हरकत नाही.
पण आत्ता मी सुद्धा या झाडावरील एक सदस्य आहे त्यामुळे कोणी असे काही सत्यता न तपासता बोलले कि वाईट वाटणारच.
माझ्याही बुद्धीला भूतं आत्मा पटत नाहीत, मी हि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काही पुस्तके वाचली तेंव्हा मलाही ते पटू लागलं
पण जे अनुभव मी स्वतः जवळच्या व्यक्तीकडून अनुभवले त्याची उकल नाही होत.
उदाहरणात मागे जे मी अनुभव सांगितला कि अर्धवट स्वप्न अवस्थेत एक माणूस येऊन माझ्या पोटात हात घालून जोरात दाबू लागला त्याला मी स्वप्न समजून
सोडून देऊ शकतो कारण तसे परत कधीच नाही झाले. कदाचित माझे काका व बायकोचे आजोबा म्हणाले दोन व्यक्ती व काळे हा निव्वळ योगायोग समजू
तरी अजून एक अनुभव सांगतो याला काय म्हणाल
मी कॉलज मध्ये असताना माझा एक मित्र मला म्हणाला तुला ज्योतिष येत ना मग मला एक प्रश्न विचारायचा आहे.
मी म्हंटल विचार मी अजून अभ्यास करतोय माझ्या ज्ञानानुसार सांगेन
त्याने सांगितले कि त्याच्या कर्नाटकातील ताईच्या स्वप्नात एक बुरखाधारी व्यक्ती येते व म्हणते मी तुझ्या मुलाला जगू नाही देणार. आणि दोन वेळा ग्रभ पडला.
दोन वेळा कश्या कारणाने पडला हे त्याने सांगितले कि नाही हे मला नाही आठवत पण दोन वेळा पड ला हे नक्की. त्याचा प्रश्न होता कि आता तिसऱ्यांदा ताई
गरोदर आहे काय करावे , पुढे काय होईल?
मी प्रश्न एकूण चाटच पडलो, म्हटलं या बाबतीत तू माझ्या काकांनाच विचार..
माझ्या काकांकडे, म्हंजे माझ्या घरी तो प्रथमच येत होता.. काकांना त्याच्या विषयी वा त्याच्या ताई विषयी काही माहिती असणे अश्यक्यच होते
त्याने प्रश्न विचारला, काकांनी विचारलं तुझ्या भावोजींचा सोन्या चांदीचा दुकान आहे का - मित्र म्हणाला हो आहे
खाली दुकान वर घर असे आहे का
हो आहे - मित्र
त्या घरात कोणाचातरी अकस्मात मृत्यू झाला आहे तो त्रास देत आहे-काका
ते मला नाही माहित पण यावर काही उपाय - मित्र
माझे काका दुर्गा देवीचे भक्त आहेत व ते कोणत्यातरी गावी दर महिन्याला जातात तिथे देवीची पूजा वगैरे असते. तेथून ते अंगारा आणतात
मी म्हंटले कितीतरी वेळा त्यांना मला पण यायचं आहे तुमच्या बरोबर पण त्यांनी मला कधीच नाही नेलं असो
तर तो अंगारा घरात फुकायला व एक नारळ त्यांची त्या घरातून उतरवून पाण्यात सोडण्यास सांगितला व हे हि सांगितले कि त्या घराच्या पूर्वैस एक विहीर आहे
त्यात टाकलं तरी चालेल. आणि काळजी करण्याचं कारण नाही यावेळी सुखरूप संतती होईल व मुलगाच होईल.
बाहेर आल्यावर मी मित्राला म्हंटल काकांच्या हो ला हो करत होतास कि खरोखर काका म्हणाले तस तुझ्या भावोजींचा सोन्याचांदीचे दुकान, खाली दुकान वर
घर वगैरे आहे ?
तो म्हणाला अगदी तसच आहे तुमच्या काकांना कस कळलं
मी म्हटल आता फक्त दोन गोष्टी राहिल्या कोणी मेलंय का त्या घरी व पुरविकडे विहीर आहे का
आम्ही पिसिओ मधून फोने लावला व वरील गोष्टी विचारल्या तर त्याची ताई म्हणाली या घराचा मालकाने फाशी घेतली होती इथे व आहे पूर्वेला विहीर
मी नंतर काकांना विचारलं कि ज्योतिष्याच्या कोणत्या नियमाने तुम्हाला या गोष्टी कळल्या तर ते म्हणाले दुर्गा देवीच्या कृपेमुळे मला कळते भरपूर वेळेस.
त्यानंतर जवळ जवळ एक वर्ष्याने तो मित्र परत मला म्हणाला कि तुझ्या काकांना भेटायचं आहे मी त्याला घेऊन आलो
त्याने काकांना सांगितले कि ताईला मुलगा झाला व ते तुम्हाला कपडे करू इच्छितात..
काका म्हणाले मला काही नको फक्त दुर्गा देवीच्या नावाने तिथेच एक नारळ फोडायला सांग...

आजकाल जवळपास प्रत्येक घरामध्ये "मोकळं" होण्यासाठी एक ठराविक जागा दिलेली असते.

तिथे जाऊन करायच्या कृती हे बोकलत मायबोली आणि त्यातही या एका धाग्यावर सातत्याने करत आहेत.
कुठे तरी काहीतरी यांचे नक्की बिघडलेले आहे.>>>>बापरे हे काय नवीनच आता Rofl Rofl Rofl . हा चक्क अपमान आहे अमानवीय धाग्याच्या चाहत्यांचा. तुम्ही अशा ठिकाणी पाहता या धाग्याला??? अहो निदान घरामागच्या पडवीत तरी ठेवायचा की हा धागा, तुम्ही डायरेक्ट मोकळं करण्याच्या जागीच नेऊन ठेवलात आम्हा सर्वांना.

>>आजकाल जवळपास प्रत्येक घरामध्ये "मोकळं" होण्यासाठी एक ठराविक जागा दिलेली असते.

मला वाटतं ते देवघराविषयी बोलताहेत जिथे आपण आपलं मन मोकळं करू शकतो, आपले ताणतणाव विसर्जित करू शकतो. बोकलत या धाग्यावर येऊन मन मोकळं करताहेत.

वर प्रीत यांनी अनिष्का आणि त्यांच्या मुली बद्दल पर्सनल कमेंट करायला नको होती (भांडखोर आईबापांच्या दहशतीमध्ये बालपण गेलेल्या किंवा खूप लाडात वाढलेली मुलं इतरांचं लक्ष वेधून घेण्याकरिता सतत काही ना काही चाळे करत असतात.)
अनिष्का यांच्याबद्दल काहीही माहीत नसताना असे ताशेरे मारणं योग्य नाही Sad

विरोधामुळे बोकलत सुपरस्टार झाला. ऋन्मेष नंतरचे मायबोलीवरचे दुसरे उदाहरण.
>>> हो, पण बोकलत धाग्याच्या विषयाला धरूनच प्रतिसाद टाकतायत, धागा भरकटवत नाहींयत. हा फरक आहे.

ते मी कुणाला लीवलय ते मी पाहुन घेइन उगी अनिष्काजींना मधी आनु नका. असलं लिहीताना फार गुदगुल्या व्हत्याय नव्ह? जवा पोरंसोरं तळतळाटाने मरतील तवा तुम्हाला अक्कल यईल.

Pages