अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनामिका जरुर वाच. पण एक सांगते नुसते विष्णु सहस्त्रनाम वाचु नकोस. त्या पुस्तकात ( पोथीमध्ये ) रुद्र शाप विमोचन स्तोत्र आहे का ते आधी बघ. कारण रुद्र शाप विमोचन वाचल्याशिवाय विष्णुसहस्त्रनामाचे फळ मिळत नाही असे मी एका धार्मिक ग्रंथात वाचले होते. त्यामुळे ते स्तोत्र असलेलीच पोथी घे. फार फार तर अर्धा तास लागतो. तुझ्या वेळेनुसार एक तर सकाळी १२ च्या आत किंवा सांयकाळी दिवेलागणीला हे स्तोत्र वाच. पण निश्चीत अशी एक वेळ ठरवलेली बरी. जनरली बुधवार हा श्री विष्णु आणी महालक्ष्मीचा मानला जातो. त्यामुळे बुधवारीच सुरु कर.

हो. पण मी लिहीले आहे त्याच पद्धतीने वाचा. पण सुरुवातीला अर्धा तास लागतो. पुढे सवय होऊन २० मिनीटात पण होऊ शकते.

रश्मी, माझ्याकडे असलेल्या पोथीत रुद्र शाप विमोचन नाहीये Sad नेट वर पण शोधतेय मघापासून, नाहीये ना, उद्या आता बुकस्टाॅलला ट्राय करते.

Happy मिळाले एकदाचे नेटवर रश्मी. रुद्र शाप विमोचन. आता सुखाने झोप लागेल मला. Lol

घरातील कामे, स्वयंपाक, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे ही सगळी कामे ती करी >>>>>>>>>>> बिना कपड्यांनी?? हे शक्य आहे का?

सस्मित, ही घटना माझ्या आजीच्या गावी घडलेली आहे, त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली तर, कामाचा उरक खूप असायचा. तेव्हा, मातीचे रस्ते, वीज नाही, गुराढोरांचा पण खूप राबता, त्या शिवाय दळण- भात हातांने कांडणे, लोणची-पापड सगळं घरच्या घरी, पाणी भरणे, नदीवर कपडे धुणे वगैरे. थोडक्यात काय तर कामाची यादी न संपणारी. त्या काळात वर सोवळं हा प्रकार पण भलताच कडक असायचा . तेव्हा फक्त बायकांचीच मक्तेदारी स्वयंपाकघरावर असायची. वर घरही दहा बारा खोल्यांची मोठी. माझ्या मते तिला मग ती घरातली कामे दिली असावीत.

चंपा, तिचा वावर घर भर नसून स्वयंपाक घर, किंवा तिची वापरातली खोली इथे असू शकतो. त्या काळात पुरुष मंडळी सहसा स्वयंपाक घरात जात नसत, काय हवे नको ते मागून घेण्याची पद्धत होती.

मी काॅलेजला असतांना हाॅस्टेलमधल्या मैत्रीणीने सांगितलेला तिच्या मामाचा किस्सा. मैत्रीणीचा मामा घरे रंगवण्याची लहानसहान कामे घेत असे. एकदा त्याला बाजूच्या गावात एक घर रंगवण्याचे काम मिळाले, घरमालक पैसेही बर्‍यापैकी देणार होते, भाडेकरू बहुतेक परगावचा माणूस होता व सगळं स्थिरस्थावर झाल्यावर बायकोलाही आणणार होता. मामाने काम घेतले खरे पण प्रत्यक्ष काम करतांना त्याला सारखे वाटू लागले की आपल्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे. एका खोलीतले काम संपवून तो दुसर्‍या खोलीतील भिंत रंगवण्यासाठी शिडीवर चढला तर अचानक एक बाई पुढे शिडी जवळ यायला लागली. केस सगळे चेहर्‍यावर घेतलेले, त्यामुळे चेहेरा दिसत नव्हता. अचानक झालेल्या प्रकाराने मामा शिडीवरून पडतापडता वाचला. मामाला जाणवले की हे काही तरी वेगळे आहे. त्याने देवाचे नाव घेवून खाली उडी टाकली व धावतच जावून नाक्यावर त्या भाडेकरूंची वाट पहात बसला. तिथे त्याला समजले की त्या गावचे कुणीही तिथे कामाला जायला तयार नव्हते, अनेकांना ती बाई घरात दिसली होती. मामाने भाडेकरूंना गाठून सर्व परिस्थिती कथन केली, व ताबडतोब ती जागा सोडायला सांगितले तर तो माणूस ऐकेना, त्याने तर मामालाच वेड्यात काढले, मी रहातोय ना, मला काही दिसली नाही म्हणाला. त्या माणसाने मामाचे अजिबात ऐकले नाही वर बायकोलाही तिथे रहायला घेउन आला. आठ दिवस बरे गेले. नंतर एक दिवस जेव्हा तो माणूस संध्याकाळी कामावरून घरी आला तर बायको तसेच केस तोंडावर घेऊन पायरीवर बसलेली, खूप उपाय केले पण गुण येईना पण जेव्हा ती जागा सोडली, व दुसरीकडे रहायला गेले तेव्हा ती बरी झाली. पुढे एकदा तो माणूस मामाला रस्त्यात भेटला तेव्हा त्याने ही हकीगत मामाला सांगितली.

हे अमानवीय नाही बहुतेक पण
स्वप्नात स्वतः चाच मृत्यू बघण्याचा अर्थ काय होतो
कारण सकाळी बघितलेली स्वप्न खरी होतात अस म्हणतात
Uhoh

स्वप्नात स्वतः चाच मृत्यू बघण्याचा अर्थ काय होतो

>>>> माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे स्वप्नात कुणाचाही मृत्यू बघणे म्हण्जे ती व्यक्ती दीर्घायुषी होते

स्वप्नात स्वतः चाच मृत्यू बघण्याचा अर्थ काय होतो

>>>> माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे स्वप्नात कुणाचाही मृत्यू बघणे म्हण्जे ती व्यक्ती दीर्घायुषी होते

कऊ, जर स्वप्नात कोणाचा मृत्यू बघितला तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. स्वतःचाच मृत्यू दिसला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. घरच्या देवासमोर अगरबत्ती लावून आपल्याला पडलेले स्वप्न सांगावे. (मनातल्या मनात ) व महादेवाचा जप 'ओम नमः शिवाय ' 108 (एक माळ) करावा. मला जेव्हा अशी स्वप्ने पडतात तेव्हा मी वरील उपाय करते.

घरच्या देवासमोर अगरबत्ती लावून आपल्याला पडलेले स्वप्न सांगावे. (मनातल्या मनात ) व महादेवाचा जप 'ओम नमः शिवाय ' 108 (एक माळ) करावा. >>>>>> हे माहीत नव्हते. माहीती बद्दल आभार अनामिकाजी Happy

मला तरी कधी पडलं नाही असंल स्वप्न पण लहानपणी सापांचे खुप स्वप्न पडायचे आताही कधीकधी पडताता पण मृत्युचे स्वप्न कधी पडलं नाही.

ह्या धाग्यावरील माझा पहीला प्रतिसाद

अनामिका : जरा स्पष्टच बोलतोय पण तुमच लिहिण आता अतिशयोक्तीकडे चाललयं. टाकायचे म्हणुन किस्से टाकताय अस वाटतय>>>>>११११ Uhoh

मला पण सापाची स्वप्न खूपवेळा पडतात.
माझ्या घरीच सलग २-३ वेळा खूप वाईट स्वप्न पडली. जवळच्या माणसाचा मृत्यू, डिवोर्स असं लागोपाठ दिसलं. बहुतेक न्यूज मधल्या वाईट वाईट बातम्यांचा परिणाम असावा.

पत्रिकेत कालसर्प योग असेल तरीही सापाची स्वप्न पडतात पडताळून पहा.>>>>कायपण Rofl Rofl Rofl Rofl कालसर्प योग्य म्हणजे गेल्या जन्मीच्या पापाचे भोग असतात. सापांचा आणि या योगाचा काही संबंध नाही.

माझा एक अनुभव

मी प्रेगेन्ट असताना , सातवा महिना लागला आणि माझी औटभरणी होणार होती त्याच्या तीन दिवस अगोदर हा विचित्र अनुभव आला , औटभरणी नंतर मी माहेरी जाणार होती बाळंतपणासाठी . तर झालं असे कि सातवा महिन्यात मला झोपेचा भारी त्रास वाहायचा , भरपूर पाणी पियाल्याने मला बाथरूम ला जायला लागत होत. झोप हि उशिरा लागायची आणि त्यात मला का माहित नाही रात्री खिडकीतून बाहेर बघण्याची लहर यायची , आणि मी एक स्टूल किंवा खुर्ची घेऊन खिडकी जवळ बसायची आणि बाहेर बघत बसायची किती तरी वेळ , रात्री केव्हा हि .... माझे यजमान येऊन मला तिकडून उठवून आत आणायचे . ते मला विचारत काय बघतेस एवढ्या रात्री बाहेर . मी सांगायची कि मला झोप नाही येत आणि मला रात्री काही दिवसापासून एक कुत्रा दिसतोय खाली सफेद रंगाचा , दिवसा तो कुत्रा मला कधी दिसला नाही , कारण तो कुत्रा जरी सफेद असला तेर त्याची शेपूट जे होत विस्कटेलल , मळलेलं दिसत मला . तो फक्त मला रात्री दिसायचा जेव्हा पण मी खिडकीतून रात्री पाहायची तेव्हा . माझा नवरा माझ्या सासूशी बोलला बहुतेक या बदल . औटभरणी च्या आदल्या रात्री तो मला कुत्रा काही दिसला नाही. मी किती तरी वेळ बसून आसायची खिडकी जवळ पण नाही दिसला . मी झोपयाला गेली मला झोपेत एक भास झाला कि मी वरून खाली पडतेय आणि माझं शरीर धाडधाड हलतंय आणि मी एके गाडी च्या पाठी धावतेय , लाल लाल रक्त हि दिसलं मला . मी खरेच फार घाबरली शब्दच नाही आहे हे सांगायला . तरी हि मनावर ताबा ठेवून झोपली , सकाळी नवऱ्यला सांगणार होती पण ते फार कामात होते , औटभरणीच्या गडबडीत सर्व काही मी बाजूला ठेवलं . माझी औटभरणीचा कार्यक्रम सुंदर झाला , आणि मी माझ्या आईवडिलांबरोबर माहेरी आली . आणि एक आठवडा हि नाही झाला माझा नावरच्या कॉल आला कि माझी सासू माळ्यावरून खाली उतरताना खाली पडली , कमरेला फार लागलं , डोक्याला जखम हि झाली , हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं . घरी फार गडबड झाली आहे तुला परत यावं लागेल , तू तयार रहा . आणि मी परत सासरी गेली . सासू जेव्हा घरी परत आल्या तेव्हा हे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं त्यांनी जे मला सांगितलं ते एकूणच मी हेरान झाले . त्यांनी सांगितलं कि आई (सासू) जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा कुत्र्याच्या अचानक भोकन्याच्या आवाजाने घाबरल्या त्या आणि त्याचा तोल गेला आणि पडल्या त्या . हा विचित्र अनुभव आलं मला पण त्या नंतर मला काही त्रास झाला नाही . मी डिलिव्हरी पर्यंत सासरी च होते .

लहिण्यात काही चुकलं तर प्लिज माफ करा

@ vaishali agre तुमच्यावर येणारं संकट सासूबाईंनी त्यांच्यावर घेतलं.

Pages