Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे एवढं पिडुनच्या पिडुन जर ही
हे एवढं पिडुनच्या पिडुन जर ही राधाक्का गुरुला माफ करुन ह्रायली ना तर .. तर...तर...
मला आवड ले दोन्ही भाग. ती
मला आवड ले दोन्ही भाग. ती कोर्टात जायला निघते तेव्हा अगदी भरून आले. प्रत्यक्षात हे सर्व खूपच अवघड असते. राधिकाला मनोरु ग्ण
ठरव णे किती बेकार. आ णि मध्येच मोजो आलेले तुकारामाच्या रुपात. ते जाम फनी
सुलू, हे सगळं आपल्याला दिसत
सुलू, हे सगळं आपल्याला दिसत असतं ( ऑफिसमधले आणी शेजारी साक्षीदार म्हणून कोर्टात आणणे) पण त्या दाढी केड्याला यातलं काहीच दाखवता येत नाही, येडचॅप कुठला.
राधिका, स्लीव्हलेस घालुनही हाव ना , त्यॅव ना का बोलुन र्हायली?
FB वरुन साभार..
FB वरुन साभार..

मुलं असणारी स्त्री शक्यतो
मुलं असणारी स्त्री शक्यतो संसार टिकवायलाच बघते, त्या नादात नालायक नवर्यांना ती स्त्री अबला वाटते, ते अजुन त्यांचा अपमान करतात, त्यांना मानसिक त्रास देतात. तरी बिचार्या फक्त मुलांसाठी तडजोड करतात. मला तर वाटते की खुप आधी तीने गुरुला पोलीसांत देवुन त्याच्यावर खटला करुन मग घटस्फोट घ्यायला हवा होता, पण मग शिरेल चालु होताच संपली असती.>>>>>>>>>>>>> वि. बी. तुमची पोस्ट पटली पण शिरेल इथूनच खऱ्या अर्थाने चालू व्हायला हरकत न्हवती. म्हणजे डिव्होर्सी राधिका अथर्वला वाढवण्यासाठी आणि घराचा प्रपंच चालवण्यासाठी आधी स्वतःला ग्रूम करते आणि मग हळूहळू छोटा उद्योग निर्माण करते या मध्ये गुरु अनेक विघ्न आणतो त्याला नामोहरम करण्यासाठी राधिका पेटून उठते आणि आणखी जोमाने काम करून ALF ची कंपनी टेक -ओव्हर करून त्याला टेबल पुसायला लावून साठा-उत्तराची कहाणी पूर्ण होते.
चला म्हणजे वर्षभर संपत नाही
चला म्हणजे वर्षभर संपत नाही सिरीयल. आता माझा गुरूने नामोहरम होऊन टेबल पुसणे यातला इंटरेस्ट पण संपला. जाऊदे. दळत रहा, दळत रहा. आठ ला बघणाऱ्या प्रेक्षकांनी trp वाढवत राहा. एक नं वर आणत राहा आणि केड्या सकट सर्वांचा बँक balance वाढवत रहा.
राधिकाला मनोरु ग्ण
राधिकाला मनोरु ग्ण
ठरव णे किती बेकार >>>> ++++११११११ राधिकेच्या वकिलाने विचाराव कि गुरुचे शेजारी, त्याचे कलिग्ज, रघू, बकुळा इ. लोकान्ना गुरु काय लायकीचा माणूस आहे हे माहित होत. एक माणूस मनोरुग्ण समजू शकते, इतकी सगळी माणस एकावेळी मनोरुग्ण कसे काय होऊ शकतात ब्वा! मानसिक रोग काय म्हणजे मलेरिया आहे हा का एकाकडून दुसर्यामध्ये infection व्हायला?
मोजो आलेले तुकारामाच्या रुपात. ते जाम फनी >>>> ते किर्तनकाराच्या भुमिकेत आले होते पुष्पक विमान चित्रपटाची जाहिरात करायला. मोजो किर्तनकार असतात, सुभा त्यान्चा नातू झालाय.
सुलू, हे सगळं आपल्याला दिसत असतं ( ऑफिसमधले आणी शेजारी साक्षीदार म्हणून कोर्टात आणणे) पण त्या दाढी केड्याला यातलं काहीच दाखवता येत नाही, येडचॅप कुठला. >>> नैतर काय.
राधिका, स्लीव्हलेस घालुनही हाव ना , त्यॅव ना का बोलुन र्हायली? >>>> हाव ना रश्मी. बाकी तुझी स्मायली मस्तय.
आज शनाया पुन्हा पचकणार आहे.
हिच्या पचकण्यामुळे गुरुवाला heart attack येतो वाटत. म्हणजे हि कोर्ट केस गेली खड्डयात आणि नेहमीच दळण सुरु. 
तो जज पण काय एक नमुना होता. घरी आलेल्या पाहुण्यान्ना यजमान बसा बसा करतात तसे हा आल्या आल्या सर्वान्ना बसा बसा म्हणत होता.

गॅरॅचा बीपी शूट होण्याचा
गॅरॅचा बीपी शूट होण्याचा ड्रामा.
शनायाचा डायलाॅग अगदी पटला मला आज. 'अरे गॅरॅला राधिकासोबत रहायचं नाहीये. राधिकाला त्याच्यासोबत रहायचं नाहीये. आम्हाला दोघांना एकत्र रहायचंय तर देऊन टाका नं डिवोर्स.'
अग बाई आम्ही हे सांगून थकलो.
त्या गॅरॅला पण शनायाशी फार काही घेणंदेणं नाहीये. त्याला फक्त राधिकाचा माज उतरवायचा आहे( i mean seriously??). त्याला स्वतःला तिला डिवोर्स द्यायचा होताच ना आधी. पण आता उलटून ती डिवोर्स देतेय तर ते घशाखाली उतरत नाहीये त्याच्या. टीपीकल MCP.
गॅरॅच्या आईपुढे तर हात टेकले बाई. एवढं आंधळं प्रेम?
अग बाई आम्ही हे सांगून थकलो..
अग बाई आम्ही हे सांगून थकलो.... चिन्मयी.... !!
एम सी पी म्हणजे काय?
गॅरी ची आई तर अगदी पात्र आहे! पण असतात हं अशा बायका....!!
जसं की अमांनी म्हटलंय वर.... सासरचे पहिल्या सुनेला सपोर्ट न करता उलट घालवून देतात.....!!
मुलाला अनकंडीशनल पाठींबा.....!! नातवंडं पण हवी जवळ!
MCP= Male Chauvinist Pig
MCP= Male Chauvinist Pig
बाकी गुगल करा. मस्त आणि परफेक्ट definitions मिळतील.
गॅरॅ हा पण एक definition च आहे MCP ची.
गॅरी इज जस्ट... आणि
गॅरी इज जस्ट... आणि बीपी शूट झाले तर चक्कर येते. हा हार्ट अॅटेकची अॅक्टिंग करत होता. न्यायालयाचे गांभीर्य काहीच नाही. घरगुतीच वाट्ते आहे सर्व. कोणी ही मध्ये उठून अरे हा काय बोलतोय ही काय बोलतेय करतात. असे बोलता येत नाही.
यायालयाचे गांभीर्य काहीच नाही
यायालयाचे गांभीर्य काहीच नाही. घरगुतीच वाट्ते आहे सर्व. >>>
ह्या शिरेलीत हाफिस घरगुती पद्धतीचे वागणे. मिटिंगा जणु गहु निवडता निवडता किंवा भुईमुगाच्या शेंगा फोडत मारलेल्या गप्पा!
कंपनीचे मोठ्ठे साहेब येऊन रिसेप्शनिस्ट समोर उभे राहुनच गुरुला झापतात! तर न्यायलय म्हणजे सासु सासर्यांसमोर केलेल्या तक्रारींसारखेच असणार ना!
न्यायालयाचे गांभीर्य काहीच
न्यायालयाचे गांभीर्य काहीच नाही. घरगुतीच वाट्ते आहे सर्व. > राधक्कांन्नी जज साहेबांन्ना राधिका मसाल्याची सिग्नेचर डिश (कि असंच काहीतरी होतं न एका एपिसोड मधे) आणली नाही घरून हेच नशीब !
तो एक प्रोमो दाखवत होते, हा
तो एक प्रोमो दाखवत होते, हा म्हणतो बायकोवर प्रेम करतो पण बायकोच्या मनावर परिणाम झालाय. त्यावर गुरुमाता काय म्हणाली नाय का.
बरं ह्याचं अफेअर सिद्ध करायला ढिगाने पुरावे आहेत आणि डोक्यावर परिणाम झालेली बै राधिका मसाले कसं उत्तुंग शिखरावर नेऊ शकते हे दाखवायचे पण पुरावे आहेत ना, मग अशा गोष्टी कशा टिकणार. गुरु किती manupulate करू शकणार. हुश्शार राधिका ताय काय करतायेत आता.
श्या मी पण का उगा विचार करतेय याचा, मीन्स या सिरीयलचा
ते जज साहेब राधिकाच्या
ते जज साहेब राधिकाच्या आधीच्या एका (क्लाएंट!) कंपनीच्या मालकांसारखे दिसतात... जीवन कंपनी का काहीतरी होती ना......!!!!
कसले थकेल जज आणलेत...जरा तरी उत्साही, तडफदार दाखवायचे!!

कसले थकेल जज आणलेत...जरा तरी
कसले थकेल जज आणलेत...जरा तरी उत्साही, तडफदार दाखवायचे!!


Angry>>>>>>> मग ते दलेर मेहेंदीच्या ट्युन वर नाचणारे हवे होते का?
थकेला हूं मै, थकेला हूं मै
थकेला हूं मै, थकेला हूं मै
नवरा बायको के इस केसने
आधा कर दिया मुझको रे
थकेला हूं मै
दोनो रोते है जार जार
होगयी मेरी निंदे चार
सुनु अब किसकी बार बार
थकेला हूं मै, थकेला हूं मै...
ते jolly जज असतील तरी त्यांना
ते jolly जज असतील तरी त्यांना, रश्मी म्हणते तसं करायची ताकद राधिका, गुरु, शनाया, गुरुमाता ह्या सर्वांत आहे. त्यामुळे आधीच जज्ज असे घेतलेले बरे.
अंजू, सही !
अंजू, सही !
राधक्कांन्नी जज साहेबांन्ना
राधक्कांन्नी जज साहेबांन्ना राधिका मसाल्याची सिग्नेचर डिश (कि असंच काहीतरी होतं न एका एपिसोड मधे) आणली नाही घरून हेच नशीब ! >>>> कसे आणणार? ती पडली तत्त्वान्ची भोक्ती ना. नाहीतर ती कधीच गुरुवाला डिवोर्स देऊन मोकळी झाली असती.
गुरु म्हणतो की मला राधिकाचा माज उतरवायचा आहे. Look, who is talking?
शनायाला गुरुची कधीपासून काळजी वाटायला लागली, त्याला heart attack आल्या आल्या लगेच त्याच्याकडे धावत पळत आली ते? का त्याच्याबरोबर राहून खरच प्रेमात पडली कि काय त्याच्या?
रश्मी
न्यायालयाचे गांभीर्य काहीच
न्यायालयाचे गांभीर्य काहीच नाही. घरगुतीच वाट्ते आहे सर्व. कोणी ही मध्ये उठून अरे हा काय बोलतोय ही काय बोलतेय करतात. असे बोलता येत नाही. >>> अगदी अगदी. बाकी कुणी एक निरिक्षण केल का? कोर्टाचे शुटिन्ग लायब्ररीमध्ये घेतलय. सिरियलच बजेट कमी पडल का?
हो की सुलु. तरी मला ते
हो की सुलु.
तरी मला ते बघतांना विचीत्र वाटत होतं. पण येता जाता बघत असल्याने ते पटकन लक्षात नाही आले, तुझ्या आले ते. 
निर्माता आणी केड्या दोघेही डोक्क्यावर पडलेत.
राधिकाला घरचेच साक्षीदार का हवेत? बाकी आनंद, जेनी, पानवलकर, श्रेयस, रघु, नाना-नानी, पत्रकार महाजनी वगैरेंना साक्षीला का नाही बोलावले?
निर्माता आणी केड्या दोघेही
निर्माता आणी केड्या दोघेही डोक्क्यावर पडलेत. >>>>
राधिकाला घरचेच साक्षीदार का हवेत? बाकी आनंद, जेनी, पानवलकर, श्रेयस, रघु, नाना-नानी, पत्रकार महाजनी वगैरेंना साक्षीला का नाही बोलावले? >>>> तेच ना. गुरु म्हणतोना की मी एवढया कर्तबगारीने पुढे आलो, मग त्याचे कलिग्ज ऑफिसमध्ये गुरु किती अनएथिकल वागतो ते नीट सान्गू शकतात कोर्टाला. मेबी नेक्स्ट सुनावणीला बोलावतील त्यान्ना.
कोर्टाचे शुटिन्ग
कोर्टाचे शुटिन्ग लायब्ररीमध्ये घेतलय. सिरियलच बजेट कमी पडल का?>>>> मला तो चला हवा येऊ द्या मध्ये बॅकग्राऊंडला वापरतात तसा प्रोजेक्टरवाला पडदा वाटला.. बाकी बजेट कमी पडतंच आहे बहुतेक. हल्ली घर, ऑफिस इ. सेट वाटतोय.. आधीचे खरे फ्लॅट्स होते
राधिका ते स्लीव्हलेस, ढगळ
राधिका ते स्लीव्हलेस, ढगळ ब्लाऊज का घालायला लागलीए अचानक ? एकदम मेक ओव्हर?
आणि तो कॉर्पोरेट ब्लेझर-सूट नाही का आता?
गुरुमातेला अगदी सहन करवत नाही...!! कसली लाऊड, इल्लॉजिकल बाई आहे !
गुरुपिता एकदम मस्त मात्र!
स्लीव्हलेस, ढगळ ब्लाऊज का
स्लीव्हलेस, ढगळ ब्लाऊज का घालायला लागलीए >+१
करिअर वूमन रेवतीसारखे छान
करिअर वूमन रेवतीसारखे छान सुटसुटीत आणि साजेसे कपडे घालू शकतात हे बहुतेक तत्वांत बसत नाही त्यांच्या. एकतर ते अजिबात न शोभणारे टाइट ब्लेझर्स घालून फिरायचं, नाहीतर अशा साड्या आणि अजब ब्लाऊजेस. आधी बरी दिसायची त्यापेक्षा. छान लांबसडक वेणी नाहीतर मस्त अंबाडा. मेकओव्हरच्या नादात सगळंच गंडलंय. सिरियरल मधली नायिका केस मोकळे पिंजारूनच फिरली पाहिजे असा अलिखित नियम असावा बहुतेक.
गुरुमाता तर हातात
गुरुमाता तर हातात व्हेंटिलेटरचं स्टार्ट बटण घेऊन बसलेय. 'माया गुरुले काही बोलू नका. नाहीतर मी आजारी पडतेय बरं'. : राग:
एक दिवस तोच कान चावेल तिचा आणि म्हणेल आधीच का थांबवलं नाहीस म्हणून.
हे केस मोकळे का सोडतात
हे केस मोकळे का सोडतात सगळ्याच हिरवणी? मला तर आजिबात कंफरटेबल वाटत नाही ते.
आपण असं घरी-दारी, किचनमधे, झोपताना, उठल्यावर वैगेरे केस मोकळे ठेवु शकतो का?
पण ह्यांच काय लॉजिक समज्त नाही. हिरोईन अगदी गरीब घरातली दाखवली असेल तरी चांगले स्ट्रॅटनिंग-रीबॉन्डिंग केलेले सुळसुळीत केस. जानुबै मोकळे केस, देवयानी मोकळे केस, आदिती मो के, राधाका शन्या मो के.
पण हे मो के जास्तच डोळ्यात आले जेव्हा सुभद्राने (गायतोंडेची बायको) पण केस मोकळेच सोडले होते.
गायतोंडॅ कोण????
गायतोंडॅ कोण????
Pages