क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"विजय नि धवनचे काय होते देव जाणे." - विजय तमिळनाडू साठी अभिनव मुकुंद बरोबर ओपनिंग करतो. धवन मधल्या फळीतून आलाय.

पहिल्या ३ टेस्टसाठी भारताचा संघ :
शिखर धवन. के एल राहुल, मुरलि विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (C) , अजिन्क्य रहाणे (VC), करुण नायर, दिनेश कार्थिक (WK),
रिशभ पंत (WK), हार्दिक पन्ड्या, र. आश्विन, रविन्द्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्म, मोहमद शामि, उमेश यादव, जस्प्रित बुमराह, शार्दुल ठाकूर.

हा ठाकूर काय करतो? बॉलिंग, बॅटिंग का नुसतेच पाणी आणून देतो मधून मधून?

*chose your poison * असामीजी, सापांना सहज हाताळणारा गारुडीच सर्पदंशाने तडफडताना पाहणं हें अधिक तापदायक असतं ! नाॅर्मल इंग्लीश विकेटसवर
सापाला बघूनच घेरी येवून पडलेले आपले फलंदाज पाहिले असल्याने, तशा विकेटसवर आपली वाईट हालत झालीच (देव करो, तसे कधीं न होवो ) तर निदान ती सुसह्य तरी असेल ! Wink

माझ्या अंदाजे खेळपट्ट्या बर्‍याचश्या पाटाच असतील! आणि जो संघ टिच्चून गोलंदाजी करून धावा वाचवेल व फलंदाज कमीत कमी निर्धाव चेंडू खेळतील तो वरचढ ठरेल. पहिल्या २५-३० चेंडूत ७-८ धावा जमवायच्या आणि मग व्यक्तीगत धाव गती वाढवायची पेक्षा जेंव्हा शक्य असेल तेंव्हा १-२ धाव पळायला हव्यात. त्यामुळे समोरच्या गोलंदाजाला प्रत्येकवेळी स्वतःचा सापळा चेंडूची दिशा टप्पा बदलणे भाग पडते.

हें कांहींसं पाल्हाळीक वाटेल पण तरीही मीं लिहीण्याचं धाडस किंवा आगाऊपणा करतो -
प्रथम, कांहीं गृहितं -
१] वर्ल्डकपच्या खेळपट्या फलंदाजीला अनुकूल असणं हा अलिखीत नियमच आहे [ कारण, प्रेक्षकांच्या पैसे वसूलीला अग्रक्रम ] व त्यामुळे प्रत्येक फलंदाजाने आपल्या कुवतीनुसार कमाल धांवा लवकरात लवकर करणं;
२] क्षेत्ररक्षण कमालीच्या उच्च दर्जाचं असणं.
३] फलंदाजाना व गोलंदाजाना खेळाच्या परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची कुवत असणं.

विकेटस घेणं व धांवा रोखणं ही दुहेरी जबाबदारी पेलणं ही गोलंदाज व कर्णधार यांची खरी कसोटी असते. म्हणूनच, कोणत्या गोलंदाजाला केंव्हा व कशाप्रकारे गोलंदाजी करायला सांगणं , यासाठी कर्णधाराला खेळाच्या परिस्थितीची सदैव पक्की जाण असणं, समोरच्या फलंदाजाचा अभ्यास व स्वतःच्या गोलंदाजावर विश्वास असणं निर्णायक ठरतं. विरुद्ध संघाचीही हीच धारणा असल्याने आपला संघ निवडताना खेळाडूंबाबत हे निकष अत्यावश्यक ठरावेत -
अ ] फलंदाजाला त्याच्याकरतां विरुद्ध कर्णधाराने योजलेले बदलते डांवपेंच तात्काळ ओळखतां येण्याची व त्यानुसार आपलं ' शॉट सिलेक्शन' बदलण्याची कुवत [ इथं अनुभव महत्वाचा ठरतो ];
ब] गोलंदाजाला बदलत्या परिस्थितीनुसार कर्णधार सांगेल तशी नेमकी गोलंदाजी करतां येण्याची क्षमता; व
क] वर्ल्डकपच्या एकंदरीतच प्रचंड दडपणाचा खेळावर परीणाम होवूं न देण्याइतपत मानसिक कणखरपणा [ इथंही अनुभव सहाय्यभूत ठरावा].

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अनेक गुणी खेळाडूतून वर्ल्डकपसाठी संघ निवडताना गुणवत्तेबरोबरच सामन्यातील क्षणोक्षणी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःचा खेळ तात्काळ बदलण्याची कमाल क्षमता व 'व्हर्सटॅलिटी ' असणारा, कर्णधाराचे डांवपेंच नेमके अंमलात आणूं शकणारा व दडपणाने न दबणारा खेळाडूच संघात येवूं शकतो. थोडक्यात, गुणवत्तेला अनुभव, नेमकेपणा व बेरकेपणा याची जोड असणं वर्ल्डकप स्पर्धेत तरी अपरिहार्य आहे.

सापांना सहज हाताळणारा गारुडीच सर्पदंशाने तडफडताना पाहणं हें अधिक तापदायक असतं ! >> असे मधे मधे होतेच, आता द्रविड, सचिन, सेहवाग, लक्ष्मण हा लाईन अप पण क्लार्क च्या पार्ट टाईम बॉलिंग समोर चाचपडला होताच. रशिद नि मोईन हे अपवाद असतील अशी आशा धरूया.

फ्लेमिंगो डिफेंस Happy

२ दिवसात टेस्ट सुरू होतीये. धवन खेळेल की राहूल? का दोघही? सद्ध्या सगळ्याच फॉर्मॅट्स मधे भारताची मिडल ऑर्डर ठिसूळ वाटतीये. टीम कोहली वर over dependent आहे. (बॅक टू 90's). वन डेज मधे नोहिट आणी टेस्ट्स मधे विजय ह्यांचाच जरा आधार आहे. त्यातून भुवनेश, बुमराह नसणं, शामी अजून पूर्णपणे फिट / फॉर्म मधे नसणं, उमेश ची स्वैर बॉलिंग, अश्विन, जडेजा चं sub-continent रेकॉर्ड हे चित्र फारसं आश्वासक नाही. होपफुली, पुजारा, रहाणे ह्या दोघांनाही फॉर्म गवसावा, आणी कुलदीप ला इंडिया ने खेळवावं .

<<<फ्लेमिंगो डिफेंस>>>
भारतीय फलंदाजांना बॉलिवूड किंवा कथकलि नाचाचा डिफेन्स दा़खवता येईल.
एखाद्या अति जलदगति गोलंदाजाच्या चेंडूंवर खेळताना काही फलंदाज असेच निरनिराळ्या पद्धती चे नाच दाखवतात.

२ दिवसात टेस्ट सुरू होतीये. धवन खेळेल की राहूल? >> राहुल नि विजय ओपन करतील तर बरे होईल. पुजारा च्या फॉर्मबद्दल प्रश्न आहेत. राहणे फॉर्ममधे आहे कि नाही हे लक्षात येत नाहिये. जेंव्हा जेंव्हा पुजारा नि विजय कोहली नि राहणेला नव्या बॉलपासून वाचवतात तेंव्हा आपण dominating side असतो. भुवी बाहेर असल्यामूळे आपल्याकडे इंग्लंडमधे जिंकून देऊ शकेल असा बॉलर नाही. शमी, कुलदीप वगैरे एखादी इनिंग सहज काढून देतील पण सतत १० विकेट्स (२० पुढची बाब येतेय), सर्वांनाच हातभार लावावा लागेल. बहुतेक वेळा अशा बाहेरच्या लाँग सिरीज मधे आपण पहिली टेस्ट हरतो नि मग पूर्ण वेळ कॅच अप सुरू राहते. ३-४ टेस्त पर्यंत बॅटमन ना पुरेसा सराव मिळून बॅटींग क्लिक होऊ लागते. इंग्लंडचा सध्याचा फॉर्म ढिसूळ आहे. अँडरसन बर्‍याच मोठ्या ब्रेक नंतर आत आला आहे त्यामूळे त्याचा फिटनेस कसा असेल हे नक्की माहित नाहिये. broad पण मोठ्या ब्रेक नंतर खेळणार आहे. तिसरा सीमर नि स्पिनर ह्याबाबत अजून guessing games सुरू आहेत. कुक नि रूट भारताकडे बघून पूर्वानुभवावरून जिभल्या चाटत असतील तरीही त्यांना actually खेळावे लागेल. हे सगळे लक्षात घेता, माझ्या मते उगाच 'आम्ही नं. १ टीम असल्यामूळे आम्ही जिंकण्यासाठीच खेळतो' अशा व्यर्थ भ्रमामधे राहण्यापेक्षा 'न हरणे' ह्याकडे लक्ष दिले तर योग्य ठरेल. जसे बॅटसमन फॉर्ममधे येतील तसे composition बदलून बॉलर dominated team घेऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करता येतील. ह्या विचारानुरुप मला सहा बॅट्समन घ्यावे + कीपर असे वाटते.
विजय, राहुल, पुजारा, कोहली,राहणे, कार्थिक, पंत/नायर (नायर due to lack of choice - पंत play safe strategy मधे बसत नाही हे मलाही मान्य आहे, जाडेजा Lords वर मॅच असल्यामूळे खेळेल असे वाटत असल्यास तोही चालेल), इशांत, उमेश, कुलदीप, शमी (शमी हा केवळ नाइलाज म्हणून आहे. बुमराह फिट असेल तर तो असू दे. )

नायर च्या जागी पंड्या खेळेल असा माझा अंदाज आहे. एक तर बॉलिंग ऑप्शन मिळतो, एक एक्स्ट्रॉ स्पिनर खेळवता येतो आणी बॅटींग मधे काऊंटर अ‍ॅटॅक करण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे कार्थिक नंतर मला वाटतं, पंड्या, अश्विन, कुलदीप / जडेजा, इशांत आणी उमेश / शामी असा लाईन-अप असेल.

मी पआंड्याला बाहेर ठेवलेले कारण मूव्हींग बॉल मधे चाचपडतो नि अँडरसन समोर जाण्याएव्हढे त्याचे तंत्र वाटत नाहिये.

"मी पआंड्याला बाहेर ठेवलेले कारण मूव्हींग बॉल मधे चाचपडतो नि अँडरसन समोर जाण्याएव्हढे त्याचे तंत्र वाटत नाहिये." - For whatever it's worth, पंड्या हा सद्ध्या best available option आहे. मला वाटतं, तोच खेळेल. एखादा इरफान खान category मधला all-rounder असता, तर मजा आली असती.

दौरयासाठी एकदा आपली सर्वोत्तम टीम निवडली ( मग आपल्या मते प्रत्यक्षात ती तशी असो वा नसो ), कीं खेळाडूचा फाॅर्म , विशेषतः पहिल्या दोन तरी कसोटीत, हा निकष दुय्यम ठरावा. म्हणून, फलंदाजीत रहाणे, पुजारा हे संघात नसणं संभवत नाही.

म्हणून, फलंदाजीत रहाणे, पुजारा हे संघात नसणं संभवत नाही. >> असे कोणी म्हटलय ? कुठे वाचल्याचे आठवत नाही.

<< असे कोणी म्हटलय ? कुठे वाचल्याचे आठवत नाही.>> सॉरी ! वर्ल्डकपच्या संदर्भातील चर्चा व आतांची कसोटीबद्दलची चर्चा यांत कुठेतरी माझा गोंधळ झाला. मनापासून दिलगिरी !
उद्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा !

गेल्या वेळेस इंग्लंड भारतात आले होते तेव्हा बघायला गेलो होतो. त्या आठवणी जाग्या झाल्या. तसाच निकाल लागो अशी इच्छा. Happy

माझी प्लेइंग ११:
विजय, राहुल, पुजारा, कोहली, राहणे, कार्तिक, पंड्या, कुलदीप, अश्विन, ईशांत, यादव
१२ वा: जडेजा

बेंचवर :
ओपनिंग साठी धवन, मिड्ल ऑर्डर साठी नायर, कीपर/बॅटिंग साठी पंत, स्पिन साठी जड्डू आणि फास्ट बोलिंग साठी शामी
असल्यानी टीम सीरियसली खेळेल असं वाटतंय.

इंग्लंड टॉस जिंकून बॅटींग फर्स्ट. पंड्या खेळतोय, आश्विन खेळतोय, राहुल खेळतोय, पुजारा संघाबाहेर. यादव शमी शर्मा पेसर्स. विजय धवन कोहली रहाणे कार्तिक उरलेले.

कोहलीला पुजाराशी काही प्रॉब्लेम आहे वाटतं ...

हा यादव फार लूज बॉल्स देतो बुवा. अगदी ताजेतवाने असतानाही जरा कन्सिस्टंट नाही हात. प्रेशर बिल्ड कसे होणार?

आता स्लीप कॉर्डन प्रताप सुरू होणार. वन हॅज टू फील फॉर इशांत शर्मा. इतकं प्रेशर बिल्ड करून दुसर्‍या बाजूने धावा लीक होणार आणि स्लीप कॉर्डनही कॅच सोडणार.

स्लिपवाले ते कुठे कुठे सन स्क्रिम लावतात ना अंग भाजून टॅन होऊ नये म्हणून.. त्याचे हात न धुताच खेळायला उभे रहातात, म्हणून सारखे कॅच सोडतात..

Pages