Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"मला वाटते कि त्याचा हा
"मला वाटते कि त्याचा हा approach टीमला मान्य आहे and they want him to play that role." -ते तर झालच. ती भुमिका घ्यायची असेल, तर इथली चर्चा व्यर्थच आहे. आपल्या चर्चेमुळे टीम सिलेक्शन, काँबिनेशन काहीच बदलत नाही. त्यामुळे इथे चर्चा करायची असली, तर ही भुमिका नाही घेता येत.
"रोहित नि कोहली पहिल्या दहा overs मधे उडाले तर सामन्याचा निकाल आपल्याकरता जवळजवळ ठरलेला असतो." - कोहली - येस, रोहित - काहीही फरक पडत नाही. फरक पडण्याइतपत कन्सिस्टंसी ने तो कधीच खेळत नाही. कोहली उडाला तर वाट लागण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे आपली brittle middle order. रैना-धोनी हे past their sell by date आहेत. मला शॉ, गिल, अय्यर, पंत, संजू, इशान किशन आणी अशा अनेक तरूण खेळाडूंकडून अपेक्षा आहेत.
त्यामुळे इथे चर्चा करायची
त्यामुळे इथे चर्चा करायची असली, तर ही भुमिका नाही घेता येत. >> अरे पण जर तर ला काहीच अर्थ उरणार नाही ना मग ? Core strategy बदलणे अशक्य आहे पटकन.
रोहित - काहीही फरक पडत नाही. फरक पडण्याइतपत कन्सिस्टंसी ने तो कधीच खेळत नाही. >> मला वाटते कि तो नक्कीच मॅच विनर आहे. consistency नाही हे मान्य पण असे बरेच सामने आहेत जे त्याने एकहाती किंवा impact वर जिंकलेत. बहुतेक वेळा त्याच्या मोठ्या खेळ्या नि जिंकणे हातात हात घालून गेलय. मी stats बघितले नाहिये, त्यासाठि भा येण्याची वाट पाहू
रैना-धोनी हे past their sell by date आहेत. >> मला +१ म्हणायला आवडेल पण भ.भा. शी वाद घालायची अजिबात इच्छा नाहिये
"Core strategy बदलणे अशक्य
"Core strategy बदलणे अशक्य आहे पटकन." - आपलं बोलणं ऐकून / वाचून थोडीच भारतीय संघाची core strategy ठरणार आहे!, हे आपलं स्वांतःसुखाय आहे.
"consistency नाही हे मान्य पण असे बरेच सामने आहेत जे त्याने एकहाती किंवा impact वर जिंकलेत." - ह्यावर कुणीतरी आधी म्हट्ल्याप्रमाणे, ते कितपत महत्वाचे होते वगैरे डिस्कशन आहेच. पण ते एक असो. माझा मुद्दा कन्सिस्टंसीचा च आहे रे.
"मला +१ म्हणायला आवडेल पण भ.भा. शी वाद घालायची अजिबात इच्छा नाहिये" -

'रोहित- नोहिट की मोहित' असा
'रोहित- नोहिट की मोहित' असा नवा धागा काढा बरे!
त्यापेक्षा, रोहित चर्चाच रहित
त्यापेक्षा, रोहित चर्चाच रहित केली तर !
आजचा अंदाज सांगा!
आजचा अंदाज सांगा!
कोण खेळेल चांगले? कुणाची गोलंदाजी चांगली होईल? कुणाची फलंदाजी चमकेल?
चांगल्या जलदगती गोलंदाजाची उणीव भासतेय! पंड्याला मार खावा लागतोय!
कुलदीप पुन्हा जाळ्यात पकडेल का इंग्रजांना?
रोहीत सलग दोन डाव शतक केल्याने थकलाय? कोहलीला खेळायला हवे. राहुलला मागच्या सामन्यात संधी साधता नाही आली, त्यालाही संधी आहे.
रोहित १८ चेंडू ढकलून २ धावा
रोहित १८ चेंडू ढकलून २ धावा काढून बाद!
सिरीज डिसायडर आहे म्हटलं आज.
सिरीज डिसायडर आहे म्हटलं आज.
आणि रैनाही लवकर गेला. आज फेफचा दिवस दिसतोय.
"आज फेफचा दिवस दिसतोय." -
"आज फेफचा दिवस दिसतोय." -
जर माझा दिवस म्हणजे इंडीया हारणार असेल, तर मी कधीच 'आजचा दिवस माझा' म्हणणार नाही. 
पण टीम सिलेक्शन मधले हे ब्लंडर्स खूप ढळढळीत आहेत. अय्यर, पंत, शॉ, गिल, सॅमसन, किशन, मावी, नागरकोटी अशा तरूण खेळाडूंचा खेळ आहे हा. एकटा कोहली, एकटा कुलदीप आणी कधीतरी लखलखणारा रोहित हे एखाद-दुसर्या मॅचेस जिंकून देतील. पण मोठ्या स्पर्धा जिंकायला टीम मधे ४-५ मॅचविनिंग बॅट्समेन आणी २-३ चांगले बॉलर्स हवेत. सुदैवानी, बॉलिंग ची बाजू भक्कम वाटतीये.
सुदैवानी, बॉलिंग ची बाजू
सुदैवानी, बॉलिंग ची बाजू भक्कम वाटतीये. >> आज कळेल. आजचे selection विचित्र आहे. रैना long term मधे असणार नाही हे दिसत असूनही तो राहिला निओ राहुल बाहेर ? सहावा बॉलर हवा म्हणून एव्हढे desperation असेल तर मग ठाकूर कसा काय आत आला यादव किंवा कौलच्या जागी ? injuries आहेत का ?
कोहली गेला कि बाकी गुंडाळून ठेवायचे हे परत सिद्द झाले.
"ठाकूर कसा काय आत आला यादव
"ठाकूर कसा काय आत आला यादव किंवा कौलच्या जागी ?" -दोघांनाही वैट्ट पिटला होता मागच्या मॅच ला. त्यापेक्षा दोघांनी बिनडोक बॉलिंग केली होती. २५० च्या आसपास ६ विकेट्स वर इंग्लंड असताना, ह्या दोघांनी त्यांना शेवटच्या ५-७ ओव्हर्स मधे ३२५ चा पल्ला गाठायला मदत केली होती.
रैना का आहे ह्याचं कारण - सहावा बॉलर - हे प्रचंड दुबळं आणी हास्यास्पद आहे. मागच्या मॅच ला त्यानी २ ओव्हर्स (१८ रन्स) टाकल्या होत्या. त्या आधीच्या मॅच मधे ० ओव्हर्स. तितपत काम स्वतः कोहली सुद्धा करू शकतो. अय्यर / राहूल ला बसवून खेळवण्याइतपत तो फॉर्म मधे नाहीये. अगदीच थोडीफार बॅटींग करून बॉलिंग ऑप्शन वगैरे देणारा खेळाडू (लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट) म्हणजे अक्षर पटेल आहे टीम मधे (वर्स्ट केस सिनारिओ).
अरेरे, आजहि भारताचा पराभव.
अरेरे, आजहि भारताचा पराभव. तो सुद्धा रूट नि मॉर्गन यांच्यापैकी एकालाहि बाद न करता आल्यामुळे. एक दिवशीय सांअने अटीतटीचे व्हायला पाहिजेत - इथे तर अगदीच एकतर्फी झाले.
मी माझ्या आठवणीतले १९५२ सिरिजचे स्कोअरकार्ड्स परत पाहिले. तेंव्हा टेस्टमधे ५८ सर्वबाद, शंभरच्या आत सर्वबाद असे स्कोअर बरेचदा होत. एक इनिंग नि २०० पेक्षा जास्त धावांनी पराभव हे हि होत असे. नंतर माझ्या आठवणीप्रमाणे अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली १९७० नंतर भारताने इंग्लंडला इंग्लंडमधे प्रथम हरवले. त्यानंतर अधून मधून भारत जिंकू लागला पण नंतर २५ वर्षे माझा क्रिकेटशी संबंध पार तुटला. कुठल्याहि टीमचे कुठलेहि खेळाडू, सामने काहीहि माहित नाही!
पुढचा वर्ल्डकप लक्षात घेता ही
पुढचा वर्ल्डकप लक्षात घेता ही सिरीज आपल्यासाठी खेळाडू टेस्ट करायची उत्तम संधी होती, पण अनाकलनीय कारणांमुळे आपण ती सपशेल वाया घालवली.
रोहित अन धवन हे आजघडीला सेट ओपनर्स आहेत आणि वर्ल्डकपमधे ही ते तसेच असणार, राहुल जर तिसरा ओपनर असणार असेल तर त्याला तसा खेळवायला हवं होतं (टी २० मधे ते केलं, पण तयारी ५० ओव्हार्सच्या वर्ल्डकप ची करायची होती ना) चौथ्या नंबरवर त्याला पाठवून नक्की काय साध्य करायचंय? का केवळ त्याला खेळवण्यासाठी अट्टाहास?
तिसर्या नंबरवर कॅप्टन कोहली (आता याबद्दल कुणालाच संभ्रम असायचं कारण नाही).
मग येतो तो आपला वीकेस्ट झोन, मधली फळी.
मनीश पांडे (कभी हां कभी ना), केदार जाधव (ईंज्युअर्ड), श्रेयस ऐय्यर (बाकावर), रैना (कसा परत आला कोण जाणे), धोनी (पीक फॉर्म मधे ही ईंग्लिश कंडिशन्स मधे फार ग्रेट कामगिरी नाही, आता तर उतरणीला लागलाय), दिनेश कार्तिक (एका टीट्वेंटी विनिंग स्कोअरनी पार टेस्ट टीम पर्यंत मजल, पण लाँग टर्म चं काय??), राहणे (आहे का काही चान्स?? टेस्ट मधे गेल्याखेपेसारखा आऊट्स्टँडिंग खेळला तर येऊ पण शकेल) अन राहुल (ओपनिंग ला स्कोप नाही, पण प्लेइंग ११ तो बनता है ना) यातले ३.
कीपर चे सद्यस्थितीतले ऑप्शन्स वरतीच पाहिलेत, पण निव्वळ कीपिंग बघता वर्ल्डकप नंतर युद्धपातळीवर शोध घेण गरजेचं आहे.
ऑलराऊंडर्स मधे हार्दिक पांड्या पलिकडे कुणी नाही.
स्पिनर्स मधे कुलदीप, चहाल अन अक्षय (नशिबात असेल तर अश्विन, जड्डू पैकी कुणितरी येईल)
पेसर्स मधे भुवी, शार्दुल, यादव, कौल (?), मोहित(??), ईशांत(???), शमी (????)
अवघड ए रे बाबा....
बोलर्स मधे बुमरा (इंज्युअर्ड)
बोलर्स मधे बुमरा (इंज्युअर्ड) विसरलो. पण ९९% तोच भुवी चा वर्ल्डकप मधे पार्टनर असेल.
माझी वर्ल्डकप साठी प्लेईंग ११:
धवन, रोहित, कोहली, ऐय्यर, धोनी, केदार, पांड्या, भुवी, कुलदीप, चहाल, बुमरा (१२ वा: राहुल)
अण्की न.1 तुम्ही रोहित
अण्की न.1 तुम्ही रोहित शर्माचे नाव घेतलेत? रोहित शर्माचे? तुम्हाला सध्या जमावाने घेरून ठार मारण्याची भारतातली पद्धत माहीत आहे ना? सांभाळा...
<<सध्या जमावाने घेरून ठार
<<सध्या जमावाने घेरून ठार मारण्याची भारतातली पद्धत माहीत आहे ना? सांभाळा... Happy>>
अहो पण आता ते बेकायदेशीर करणार आहेत ना? मग काय चिंता?
अहो भारतातला कायदा म्हणजे काय, कुणाची हिंमत आहे का तो मोडायची?
खुश्शाल रोहित शर्मा म्हणा - तुम्हाला जमावाने घेरून मारले तरी पर्वा नाही. आम्ही मायबोलीवर त्यांचा तीव्र निषेध करू.
शर्माला काही काढत नाहीत
शर्माला काही काढत नाहीत वर्ल्डकप पर्यंत.. सारी दुनिया एकतरफ आणि जोरूका आडनावबंधू एकतरफ.
अँकी... स्पिनर्स मध्ये अक्षय कोण रे? अक्षर म्हणायचे आहे का? त्याच्याआधी वॉशिंग्टन सुंदर येईल स्क्वाड मध्ये असे मला वाटते
ईशांत, शमी, मोहित, अश्विन आणि जडेजा ह्यांना वन डे ची दारं कधीच बंद झाली आहेत.
यादव, कौल आणि चहार हे भुवी आणि बुमराहनंतरची पेसर्स आहेत. पंड्यामुळे त्यांचा नंबर फायनल ११ मध्ये फक्त ईंज्युरी रेप्लेसमेंट म्हणून लागू शकतो.
जाधव ची जागा आता कार्तिक ने घेतलीच तो काही सोडणार नाही. पण जाधवची ऑफस्पिन बोलिंग आणि ब्रेक थ्रू मिळवून देण्याची कन्सिस्टन्सी खरी आहे.
रहाणे = पुजारा ईन मेकिंग.
पांडेचा वर्ल्द कप स्क्वाड मध्ये कमबॅक जवळ जवळ अशक्य.
अय्यर असेल स्क्वाड मध्ये पण फिल्डींग फारच बेभरवशी आहे त्याची.
दुनिया एकतरफ आणि जोरूका
दुनिया एकतरफ आणि जोरूका आडनावबंधू एकतरफ >>
पंत टेस्ट नि India A मधे पोहोचला आहे नि नीट खेळलाय. असेच सुरू राहिले तर तु World Cup squad मधे घुसेल. वर्षभर आधी टीम ठरवणे लॉटरी आहे रे.
World Cup च्या आधीच्या टेस्ट्स वर लक्ष द्या बरं
शर्माला काही काढत नाहीत
शर्माला काही काढत नाहीत वर्ल्डकप पर्यंत.. सारी दुनिया एकतरफ आणि जोरूका आडनावबंधू एकतरफ. >>>
धवन, रोहित, कोहली, ऐय्यर, धोनी, केदार, पांड्या, भुवी, कुलदीप, चहाल, बुमरा (१२ वा: राहुल) >>> राहुल धवन पेक्षा जास्त कन्सिस्टंट आहे ना लिमिटेड ओव्हर्स मधे? का ते फक्त २०-२० मधे?
धवन वर ते जोक येत असत ना? एकदा त्याने ५ रन्स काढले व आउट झाला. पुढच्या मॅच मधे त्याला बसवले व भारत ५ रन्स ने हरला. तेव्हा त्याचा फोटो आला होता आणि "बघा मला घेतले असते तर..." ची कॉमेण्ट होती
रोहित, धवन, कोहली, पंड्या,
रोहित, धवन, कोहली, पंड्या, धोनी, कुलदीप, चहल, बुमराह, भुवनेश हे ९ जण - कुणी जायबंदी झालं नाही, तर नक्की आहेत. प्रश्न आहे २ जागांचा, ज्यासाठी ह्या वेळी राहूल, कार्थिक, रैना ह्या तिघांना संधी देऊन पाहिली. अय्यर हा आणखीन एक ऑप्शन आहे. संधी देऊन बाहेर बसलेले, पण कदाचित संघात येऊ शकतील असे आणखी दोघं म्हणजे पांडे आणी रहाणे - पण शक्यता धूसर आहे. पंत, शॉ वगैरे पैकी कुणीतरी टीम मधे असतील कदाचित, पण प्लेयिंग ११ मधे खेळवणं अवघड आहे.
राहुल धवन पेक्षा जास्त
राहुल धवन पेक्षा जास्त कन्सिस्टंट आहे ना लिमिटेड ओव्हर्स मधे? का ते फक्त २०-२० मधे? >> फा, वर्ल्ड कपसारख्या आयसीसी ईवेंट ह्या बॅनरखाली धवनला डेथ वॅलीतल्या 'डेविल्स गोल्फकोर्स' वर बॉलिंग टाकली तरी त्याचे मग 'धवन्स गोल्फकोर्स' म्हणून नामकरण करावे लागेल
एवढा कन्सिस्टंट आहे धवन आयसीसी ईवेंटमध्ये.
वर्ल्ड्कपसारख्या मोठ्या व
वर्ल्ड्कपसारख्या मोठ्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधे अनुभवाला विशेष महत्व असतंच असतं व त्याकरतां वय, इन्कन्सिस्टन्सी [ फिटनेस नव्हे] इ. बाबतींत थोडीशी तडजोडही समर्थनीय असूं शकते. नविन, उदयोन्मुख खेळाडूना [ अगदीं असामान्य प्रतिभावान खेळाडू सोडून ] संधी देण्याची ती जागा नाही. निवड समितीने अनुभवावर भर देवून येत्या वर्ल्डकपसाठी संघ निवडला तर मला तें योग्यच वाटेल. [ अर्थात, हें 'सब्जेक्टिव्ह' आहे हें सांगणे नलगे !]
भाऊ मान्य फक्त अजून
भाऊ मान्य फक्त अजून वर्षभरामधे संघामधे आज नसलेले येऊ शकतात हाही भाग आहेच. नं ४ नि ५ ह्या जागा अजून मोकळ्या आहेत नि अजून कोणीही वेगवेगळ्या कारणांसाठी त्यावर हक्क मागितलेला नाहिये - राहूल, राहाणे, पंत, शॉ, अय्यार, पांडे, रैना, क्रूणाल, मयांक, शुभमन, कार्थिक, सॅमसन सगळे available आहेत.
पंत, शॉ, शुभमन, क्रुणाल, मावी
पंत, शॉ, शुभमन, क्रुणाल, मावी, नागरकोटी ह्यांना नॅशनल टीममध्ये कमीतकमी भारतात एक आणि भारताबाहेर एक वन-डे सिरिज खेळवल्याशिवाय स्क्वाड मध्ये आजिबात घेणार नाहीत.. घेऊही नये.
थोडक्यात भाऊंच्या मुद्दयाला +१
मयांक का?
जर आयपीएल च्या बेसिसवर तू पंत, गिल, शॉ वगैरेंना आत आणत आहेस तर त्याच बेसिसवर रहाणे, पांडे, रैना यांना आधी बाहेर काढणे योग्य नाही का
मयांक का? >> मागच्या रणजी
मयांक का? >> मागच्या रणजी मधली नि यंदाच्या India A series (Eng) मधले रन्स बघ.
खेळवल्याशिवाय स्क्वाड मध्ये आजिबात घेणार नाहीत.. घेऊही नये. >> हो पण मुद्दा "World Cup उद्या नसून वर्षभारने आहे नि ह्या जागा पूर्णपणे open आहेत" हा आहे. त्या वेळात पंत, शॉ, शुभमन, क्रुणाल, मावी, नागरकोटी कशाला, तू नि मी पण खेळून येउ शकू probability theory मधे
जर आयपीएल च्या बेसिसवर तू पंत, गिल, शॉ वगैरेंना आत आणत आहेस तर त्याच बेसिसवर रहाणे, पांडे, रैना यांना आधी बाहेर काढणे योग्य नाही का >> कशाला मी तर तुला नि मला पण आत घेतोय, ह्यंनी काय पाप केलय. jokes apart मी फक्त IPL धरत नव्हतो. form, reputation, आधी England मधला खेळ सगळे धरून union बनवली होती.
स्क्वाड मध्ये आजिबात घेणार
स्क्वाड मध्ये आजिबात घेणार नाहीत.. घेऊही नये. >>
पंतला ह्या टेस्ट सिरीजच्या स्क्वॉडमध्ये घेतला की आजच.
पंतला ह्या टेस्ट सिरीजच्या
पंतला ह्या टेस्ट सिरीजच्या स्क्वॉडमध्ये घेतला की आजच. >> हाबला आज मायबोलीच्या चकरांमधे news वाचायला वेळ मिळालेला दिसत नाही
अरे पण पहिली पायरी म्हणून एका
अरे पण पहिली पायरी म्हणून एका ईंटरनॅशनल सिरिजसाठी त्यांची नावे ऑफिशिअली डिस्कशन टेबलवर तर येऊ दे आधी... थेट वर्ल्ड कपचा विचार का करायचा त्यांना घेऊन? मग कप १ वर्षांनी असो नाही तर १० वर्षांनी. ज्यांच्याकडे आज कॅप नाही त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायला बेस आणि स्टॅट्स तर हवे ना.
पंत बद्दल वाचले रे...मी
पंत बद्दल वाचले रे...मी 'खेळल्याशिवाय' म्हणालो... नुसते स्क्वाड मध्ये घेऊन त्याचा डेटा आणि स्टॅट्स बिल्ड होणार आहेत का
... आणि ते बिल्ड नाही झाले तर त्याचे नाव वर्ल्ड कप साठीच्या डिस्क्शन टेबलवर येणार आहे का?
अरे पण पहिली पायरी म्हणून एका
अरे पण पहिली पायरी म्हणून एका ईंटरनॅशनल सिरिजसाठी त्यांची नावे ऑफिशिअली डिस्कशन टेबलवर तर येऊ दे आधी >> अरे बाबा पंत officially T20 खेळलाय वर्षभरापूर्वीच. आता टेस्ट squad मधेही आहे. शॉ नि गिल थेट India A मधे घुसले U19 च्या जोरावर. Do you really think they are not in radar already ? " थेट वर्ल्ड कपचा विचार का करायचा त्यांना घेऊन? " हे कुठे उगवतेय तेच कळत नाही. मी म्हणतोय वर्षभराने असलेल्या World Cup साठी वर्षभरामधल्या कुठल्या तरी सिरीज मधे ह्यातले कोणि आत येउ शकतात नि चांगले खेळले तर World Cup ही खेळू शकतात. ह्याउलट तुम्ही आत्ताच एक वर्षाने कोण असेल नि नसेलच हे ठरवून मोकळे होत आहात ? What am I missing ?
Pages