क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Take a bow, विराट कोहली. हे शतक गांगुली च्या ब्रिस्बेन च्या शतकासारखं, सिरीज चा टोन सेट करणारं ठरावं ही सदिच्छा!

कोहली जबरी पुन्हा एकदा!

हे शतक गांगुली च्या ब्रिस्बेन च्या शतकासारखं, सिरीज चा टोन सेट करणारं ठरावं ही सदिच्छा! >>> आमेन.

ESPNcricinfo वरचा scoreboard बघुन मला भुवन आणि कचरा चा last wicket stand आठवला.

कोहलीला जिंक्स करायला नको म्हणून आतापर्यंत श्वास रोखून मॅच बघत होतो. २७४/१०. काय जबरदस्त इनिंग कोहली! दीडशतक एका धावेने हुकलं पण ज्जेबात! दुसर्‍या इनिंगमध्ये लोक उभे नाही राहिले तर फटके द्या एकेकाला!

७४ चेंडूतील ५७ धावांच्या भागीदारीत यादवची १ धाव १६ चेंडूत!
तर कोहलीच्या ५२ धावा ५८ चेंडूत..

मस्त सुरूवात. अश्विन ने परत एकदा कुक ला 'फिरकीच्या जाळ्यात ओढलं'. उद्या ही इंटेन्सिटी कायम ठेवायला हवी.

ब्रिटिशांचा कुक वरचा भरोसा की रूटचे कुकप्रेम वाखाणण्यासारेख आहे.
आणि कुकचा डाऊनफॉलही एवढा स्टीप असेल हे ४० मॅचेस आधीपर्यंतच्या कुक ला बघून वाटत नाही.

Take a bow, विराट कोहली. हे शतक गांगुली च्या ब्रिस्बेन च्या शतकासारखं
>> अगदी हेच डोक्यात आलं होतं. एक क्षण वाटलं पण की कोहली पण दादा सारखाच उडी मारून सेलेब्रेट करतो का...

पण आपण ईंग्लिश कंडिशन्स मधे (त्यांच्या पेसर्सना ८ विकेट्स पडलेल्या असूनही) आपल्या २ पेसर्सना डावलून अश्विन ला नवा चेंडू देतो, अन तो विकेटही काढतो ही गोष्ट पेसर्सना इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देत असावी का?

२ पेसर्सना डावलून अश्विन ला नवा चेंडू देतो, अन तो विकेटही काढतो ही गोष्ट पेसर्सना इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देत असावी का?>>

माझ्या मते नको यायला!
कुकचा बळी ही अश्विनची हक्काची भाकरी! त्यामुळे त्या हक्काच्या भाकरीसाठी त्याला बोलिंग देणारच कोहली दिवसातील ५-६ षटके केवळ गोलंदाजी होणार असेल तर!

<< २ पेसर्सना डावलून अश्विनला नवा चेंडू देतो, अन तो विकेटही काढतो ही गोष्ट पेसर्सना इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स देत असावी का?>> इंग्लीश पेसर्सनी याच वातावरणात व याच खेळपट्टीवर केलेली गोलंदाजी बघून जर आपल्या पेसर्सना न्यूनगंड येत नसेल, तर अश्विनला दिवसाच्या शेवटच्या षटकांत गोलंदाजी देण्याने तसा न्यूनगंड येण्याचं कारणच नाही ! Wink
<< कुणीतरी कोहलीचा झेल सोडला ना सुरुवातीला? बिच्चारा झोपला नसेल रात्रभर..>> झेल सुटूनही आपल्या जिद्दीला, एकाग्रतेला व आत्मविश्वासाला जराही धक्का न लावूं देतां अशी खेळी करणं यामुळे त्या खेळीचं आगळेपण उलट खुलूनच येतं ! ! शिवाय, इंग्लीश पेसर्सनी 'स्लीप कॉर्डन' वर अति विश्वास दाखवून, 'थर्ड मॅन ' न ठेवल्याने कोहलीला कांहीं चौकारही मिळाले, हेंही लक्षात घ्यायला हवं .(Too many slips spoil the catch ! )

'शोईंग द इन्टेन्ट' चा खरा अर्थ कोहलीने काल दाखवला, विशेषतः अ‍ॅण्डरसनच्या विरुद्ध खेळताना. दुर्दैवाने त्याच्या अनेक सहकार्‍यांनी त्याचा अर्थ सतत स्ट्रोकप्ले करणे असा लावला असावा.

इंग्लंड 26-2 व दोन्ही विकेटस अश्विनला ! इंग्लंडच्या पेसरसना मात्र आतां न्यूनगंड वाटण्याची शक्यता !

६-८६ आता इशांत गन सुरु!

आजच संपवणार दिसत आहेत सामना! दोन्ही संघांना विकेण्ड साजरा करायला!

त्या करनच्या नावाने सुपारी द्या बरे कुणाला तरी. पुजाराला सांगा, तेव्हढाच त्याचा हातभार. खेळू तर देत नाहीत.
<<<ते कोण इथं इशांतला शिव्या देत होतं?>>>
अहो इथे कुणालाहि शिव्या देणारे लोक येतात. त्या कुठल्या गाण्यात म्हंटले आहे ना - तू कौन है तेरा नाम है क्या, सीताभी यहाँ बदनाम हुई!
तसे. तेंडूलकर, उद्या कोहलीला पण!

खेळाडूंना दर दिवसाचे पैसे मिळतात का? असतील. कारण पाच दिवस सामना चालेल या हिशेबाने तिकीट ठेवून पैसे मिळतील असा अंदाज असतो. सामना लवकर संपला तर दोन दिवसाचे पैसे वाया जातील. त्यापेक्षा खेळाडूंना दर दिवसाचे पैसे दिले तर तेच खेळ थोडा वेळ लांबवतील.
इशांतने एका षटकात १० धावा, धवन च्या हातून झेल " सुटला". ७ बाद ८७ वरून १३१!

आता काय प्रकाश कमी म्हणून खेळ थांबवला! पुनः येतील का आज खेळायला? केंव्हा?

हत्ती गेला आणि शेपूट अडकलंय का पुन्हा....चौथ्या डावात २०० करायचे म्हंटले तर पुन्हा ये रे अफ्रिकेच्या मागल्या सारखे व्हायचे...
पंड्या ऐवजी जडेजाचा विचार करावा का पुढच्या मॅचला ?

फलंदाजांनी कोहलीपासून प्रेरणा घेवो वा ना घेवो , गोलंदाज मात्र प्रेरीत झालेत हे नक्की! कसोटी मालिकेची 'भवानी' तर बरी झालीय !!

शेपूट वळवळलच !!
दोन दिवस आहेत. १ च्या आसपास रनरेट ठेवला तरी चालेल म्हणं!

Pages