Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालच्या मॅचनंतर कुलदीपला
कालच्या मॅचनंतर कुलदीपला टेस्ट टीममध्ये घेणार असे दिसते. 'क्रिएट रेप्युटेशन विकेट्स विल फॉलॉ' हे वॉर्नचे आवडते लॉजिक कुलदीपच्याबाबतीत खरे होऊ शकते. त्याला फारच घाबरुन खेळत आहेत.
काल रोहित शर्माने लौकिकाला न
काल रोहित शर्माने लौकिकाला न जागता सलग शतक झळकावले!
कुलदीपला इंग्रज खूपच घाबरून खेळतायेत असे वाटले!
<< काल रोहित शर्माने लौकिकाला
<< काल रोहित शर्माने लौकिकाला न जागता सलग शतक झळकावले!>> क्रिकेटच्या इतिहासात ब्रॅडमनपासून आपल्या कोहलीपर्यंत अगदीं मोजकेच फलंदाज ' रन गेटींग मशीन'म्हणता येण्याजोगे झाले असावेत. खेळात खरी गंमत आणलीय ती रोहीतसारख्या प्रतिभावान व फार नियमितपणे नसलं तरी बर्याच प्रेक्षणीय व अफलातून खेळी करणार्या सर्वच देशातील अनेक फलंदाजानी. अशांचा खरा लौकीक त्यांच्या 'अनियमितपणात' नसून त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श असणार्या प्रेक्षणीय,अविस्मरणीय खेळींमधे आहे. मला तरी अशा खेळाडूंच्या नजाकतभर्या खेळी, अनियमितपणे आल्या तरीही, आनंददायी व महत्वाच्याही वाटतात.
भाऊ, रागावू नका हो!
भाऊ, रागावू नका हो!
मलादेखिल रोहित खेळत असताना बघायला प्रचंड आवडते. काल त्याने मारलेला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधुन मारलेला एक सुपर्ब टायमिंगचा फटका(?) अगदी सहज नुसता ढकलल्या सारख्या पण टायमिंग आणि मिडलिंग एकदम अफलातून!!
असा खेळत असला की त्याच्यातला आत्मविश्वास दिसतो!
<< रागावू नका हो!>> माझ्या
<< रागावू नका हो!>> माझ्या पोस्ट्मधून तसं ध्वनित होत असेल, तर मनापासून दिलगीरी.
<< काल त्याने मारलेला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधुन मारलेला एक सुपर्ब टायमिंगचा फटका(?) अगदी सहज नुसता ढकलल्या सारख्या पण टायमिंग आणि मिडलिंग एकदम अफलातून!! >>रोहित किंवा तत्सम खेळाडूंच्या चांगल्या खेळींचा असा रसास्वाद घेणं , याला त्यांच्या 'अनियमितते'पेक्षां मीं अग्रक्रम देतो, एवढंच !!
शर्माचा मुख्य त्रास तो
शर्माचा मुख्य त्रास तो भरवशाच्या म्हशीला साधारणपणे टोणगा असतो, हा आहे. प्रेक्षणीय खेळ्या चांगल्या असतातच. त्याबद्दल काहीच तक्रार नाही.
<< प्रेक्षणीय खेळ्या
<< प्रेक्षणीय खेळ्या चांगल्या असतातच. त्याबद्दल काहीच तक्रार नाही.>> तीनदां नापास झालेल्या मुलाने चौथ्यादा परिक्षेत घवघवीत यश मिळवलं, तर तेंव्हां तक्रारीला वाव नसतोच ; पण , त्यावेळींही " कसले बरे मार्कस ? तीनदां नापास झालाय तो " असं न खिजवतां , त्याच्या यशाचं जरा निखळ कौतुक करावं कीं !
सातवी, आठवी, नववी, ह्या
सातवी, आठवी, नववी, ह्या इयत्तांमध्ये शाळेत पहिला येऊन दहावीत राज्यस्तरीय परीक्षेत नापास होण्याचं उदाहरण आहे भाऊ रोहित शर्मा.
कुठे खेळतो आणि कधी खेळतो, ह्यालाही महत्त्व आहेच.
<< सातवी, आठवी, नववी, ह्या
<< सातवी, आठवी, नववी, ह्या इयत्तांमध्ये शाळेत पहिला येऊन दहावीत राज्यस्तरीय परीक्षेत नापास होण्याचं उदाहरण आहे भाऊ रोहित शर्मा. >> सातवी,आठवी, नववी ? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत १८ शतकं , त्यांतली ६ ऑसीजविरुद्ध [ ३ऑस्ट्रेलियात ], आहेत रोहितचीं !!!
ह्यावरून रोहितचा
ह्यावरून रोहितचा ट्रॉफ्यांमधला खेळ आणि बायलॅटरल सीरीजमधला खेळ ह्यातली तफावत स्पष्ट होते. त्यातूनही तो ट्रॉफ्यांमध्ये लीगमध्ये बरा खेळला तर ऐन मोक्याच्या क्षणी बहुधा ढेपाळतो. (चित्र स्रोत - क्रिकइन्फो)
रोहीत कन्सिस्टंट नाही हे एक
रोहीत कन्सिस्टंट नाही हे एक पर्सेप्शन आहे. तुम्ही नक्की तुलना कोणाबरोबर करता हा एक मुद्दा आहेच. तो कोहली नक्कीच नाही. पण फक्त वनडे साठी हा ग्राफ बघितला तर २०१३/१४ नंतर पिवळे, लाल आणि निळे ग्राफ बघा.
http://www.howstat.com/cricket/Statistics/Players/PlayerBatGraph.asp?Pla...
बाकीच्या समकालीन आणि तुलना करता येण्याजोग्या खेळाडूंचा ग्राफ काढून बघायला हवा पण ज्या प्रमाणात शिव्या घातल्या जातात त्या खूपच जास्त आहेत असं माझं सब्जेटीव मत आहे.
सातवी,आठवी, नववी ? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत १८ शतकं , त्यांतली ६ ऑसीजविरुद्ध [ ३ऑस्ट्रेलियात ], आहेत रोहितचीं !!! >>> त्यात तब्बल तीन द्विशतकं हे अॅड करा. सातवी, आठवी, नववी, ह्या इयत्तांमध्ये शाळेत पहिला आला दहावीच्या परिक्षेत नापास झाला म्हणजे नक्की कुठे काय झालं हे काही कळलं नाही.
बाकी कालच शतक हे अत्यंत नजाकतदार, डोळ्यांचं पारणं फेडणारं वगैरे होतं ! भाऊंच्या ह्या विषयावरील सर्व पोस्टींना अनुमोदन.
सातवी, आठवी, नववी, ह्या
सातवी, आठवी, नववी, ह्या इयत्तांमध्ये शाळेत पहिला आला दहावीच्या परिक्षेत नापास झाला म्हणजे नक्की कुठे काय झालं हे काही कळलं नाही. >>> लीगमध्ये खेळून क्रंच मॅचेसमध्ये ढेपाळणार हे इतकं साधं आहे ते. वर लिहिलंही आहे. त्यातून आमिरला सामान्य बॉलर वगैरे म्हणून चँपियन्स ट्रॉफी फायनलमध्ये त्यालाच ३ बॉल ० काढून विकेट द्यायची वगैरे आलंच. बायलॅटरल सीरीज वनडेच्या बर्यापैकी मीनिंगलेस असतात. त्यात बेटा फ्लॅट पिचेसवर घेतो मारून. ते असो.
बायलॅटरल सीरीज वनडेच्या बर्
बायलॅटरल सीरीज वनडेच्या बर्यापैकी मीनिंगलेस असतात. >>>> आता ह्याच्यापुढे काय बोलणार.
(तरी बोलतोचः एकंदरीत वनडे मधले रेकॉर्ड (देशाचे किंवा वैयक्तिक) हे फक्त ट्रॉफिज वरून ठरतात का? बायलॅटरल सिरीज आणि ट्रॉफी ह्यांच एकंदरीत प्रमाण किती असतं ? )
आता ह्याच्यापुढे काय बोलणार.
आता ह्याच्यापुढे काय बोलणार. Happy (तरी बोलतोचः एकंदरीत वनडे मधले रेकॉर्ड (देशाचे किंवा वैयक्तिक) हे फक्त ट्रॉफिज वरून ठरतात का? बायलॅटरल सिरीज आणि ट्रॉफी ह्यांच एकंदरीत प्रमाण किती असतं ? ) >> १ वर्ल्ड कप जिंकणे महत्वाचे की ४ बायलॅटरल सिरीज?
एबीडीने वर्ल्ड कप न जिंकताच रीटायरमेंट घेतली, ह्यावर चर्चा होते, की त्याने किती बायलॅटरल सीरीज जिंकल्या, हे लोकांना पटकन आठवतं? तुम्ही फुटबॉल वर्ल्डकपचा धागा काढता, की फ्रेंडलीजसाठी?
स्पेशली टी-२० आल्यापासून वन-डे मधल्या बायलॅटरल सीरीजची किंमत किती कमी झाली आहे, ह्यावर वेळोवेळी वेगवेगळी आर्टिकल्स आली आहेत. इथे लोक वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप आणि वन-डे लीग काढायला का निघाले असावेत?
https://www.deccanchronicle.com/sports/cricket/090817/bilateral-odi-seri...
https://www.firstpost.com/firstcricket/sports-news/india-vs-australia-bi...
https://www.cricket.com.au/news/odi-global-league-test-championship-bila...
https://www.televisionpost.com/world-test-championship-odi-league-to-bol...
फ्रेंडलीजसाठी >>>> बायलॅटरल
फ्रेंडलीजसाठी >>>> बायलॅटरल सिरीज आणि फ्रेंडली सिरिज ह्या वेगळया असतात ना? फूटबॉल मी चारवर्षांतून एकदा बघतो. त्यामुळे धागा काढतो. फुटबॉलमध्ये बायलॅटरल होतात की नाही ते ही मला मला माहित नाही. पण पुढे मागे भारताने पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ब्राझिल किंवा जर्मनी दौरा केला तर काढेनही धागा.
मागे क्रिकेटच्या वेगवेगळ्या सिरीजसाठी धागे काढायला सुरूवात झाली होती. नंतर शक्य झालं नसेल . दरवर्षी न चुकता आयपीएल (ते इंटरनॅशनल नसलं तरी) धागा निघतोच. त्यामुळे धाग्यांचा मुद्दा अगदीच अस्थानी आहे.
एबीडीने वर्ल्ड कप न जिंकताच रीटायरमेंट घेतली, ह्यावर चर्चा होते, की त्याने किती बायलॅटरल सीरीज जिंकल्या, हे लोकांना पटकन आठवतं >>>> वर्ल्डकप किंवा ट्रीफीज महत्त्वाच्या नाहीत असं म्हणणं नाहीच आहे पण फक्त आणि फक्त त्याच महत्त्वाच्या बाकी सगळं टुकार हे पटत नाही.
१ वर्ल्ड कप जिंकणे महत्वाचे
१ वर्ल्ड कप जिंकणे महत्वाचे की ४ बायलॅटरल सिरीज? > बात हजम नही हुयी भा, जोगींदर शर्मा किती जणांना आठवतो ? दोन्ही गोष्टी आपापल्या जागी तेव्हढ्याच मह्त्वाच्या आहेत. रोहित फायनल मधे खेळत नाही हे भयंकर irritating आहे पण ह्याचा अर्थ त्याने सिरीज मधे केलेले रन्स कमी ठरत नाही. थोडे पुढे जाऊन Tournaments break down बघितला तर
Grouping Span Mat Runs HS Bat Av 100
World Cup 2015-2015 8 330 137 47.14 1
Asia Cup 2008-2014 17 428 69 32.92 0
Aus Tri Series (CB) 2008-2012 15 314 70* 26.16 0
ICC Champions Trophy 2013-2017 10 481 123* 53.44 1
पहिल्या नि चौथ्या ओळी मधला average respectable धरायचा का ? तुम्ही तुलना कोणाशी ह्यावर ठरेल
बायलॅटरल सिरीज आणि फ्रेंडली
बायलॅटरल सिरीज आणि फ्रेंडली सिरिज ह्या वेगळया असतात ना? >>> त्याची वाटचाल तिकडेच चालू आहे, स्पेशली वन-डेमध्ये, चाहत्यांना फार आस्था राहत नाही, असंच वरच्या काही लिंक्समध्ये मी नसलेल्या लोकांनी म्हटलंय.
आयपीएल >> ती टी-२० आहे. मी वन-डे बद्दल बोलतोय. उलट आयपीएलसारख्या लीग्समुळे वन-डेचं महत्व कमी झालंय. आयपीएल मीनिंगलेस आहे असं मी कधीच म्हटलं नाही. त्यामुळे << यामुळे धाग्यांचा मुद्दा अगदीच अस्थानी आहे. >> हे चूक आहे. पीपल रिस्पाँड टू बिग ओकेजन्स, अॅज यू डू टू बाय क्रिएटींग थ्रेड्स. आयपीएल इज अ बिग ओकेजन. वन-डे सीरीज आर नॉट बिग ओकेजन्स द वे दे युज्ड टू बी.
https://india.blogs.nytimes.com/2011/11/29/is-too-much-meaningless-crick...
The Indian team thrashed the English 5-0 in the one-day international series but only die-hard cricket fans seemed to care. I find it hard to recall another series featuring India that generated as little excitement among my friends or on Twitter and Facebook. The stadiums were half-empty even in Mumbai and Kolkata. Television ratings were well below normal for a series featuring India,
ही रड गेल्या दशकभरातली आहे. त्यामुळेच आयसीसीने आता टेस्ट चँपियनशिप्स आणि वन-डे लीग्स अनाउन्स केल्या आहेत, त्या ह्या सामन्यांना जास्त कंटेक्स्ट मिळवून देण्यासाठी.
वर्ल्डकप किंवा ट्रीफीज महत्त्वाच्या नाहीत असं म्हणणं नाहीच आहे पण फक्त आणि फक्त त्याच महत्त्वाच्या बाकी सगळं टुकार हे पटत नाही. >>> मीनींगलेस आणि टुकार ह्यात फरक आहे. मी टुकार म्हटलेलं नाही. पण प्रेशर फॅक्टर आणि चाहत्यांच्या अपेक्षा हे सगळंच बदलतं. आणि मी रोहितला त्यावरूनच क्रिटिसाईझ केलं आहे. कन्सिस्टन्सी वगैरे सगळं तुमच्या मनातून आलं कारण तुम्हाला तो पॉइंट डिफेंड करायचा आहे. तुम्ही वरच्या एकाही मुद्द्याला खोडून काढलं नाही, त्यामुळे आता थांबतो.
बात हजम नही हुयी भा, जोगींदर
बात हजम नही हुयी भा, जोगींदर शर्मा किती जणांना आठवतो ? दोन्ही गोष्टी आपापल्या जागी तेव्हढ्याच मह्त्वाच्या आहेत. >>> बर्याच जणांना?! प्रत्येक फायनलच्या वेळेस धोनी आणि त्याची आठवण माझ्या फेबुवर कोणीतरी काढलेली मी पाहिली आहे. मिसबाहची आयमाय पाकिस्तान्यांकडून निघालेलीही. ह्याउलट २००८-२०१० मध्ये भारत वि. श्रीलंका सामन्यांमध्ये कोण काय दैदीप्यमान खेळलं, हे किती लोकांना आठवेल? मी पुन्हा म्हणतो, टेस्ट चँपियनशिप आणि वन-डे लीग उगाच आले नाहीत. बायलॅटरल सीरीज जास्त एंटरटेनिंग आणि कंपिटिटीव्ह बनवणे हा त्यांचा उद्देश आहेच.
World Cup 2015-2015 8 330 137 47.14 1
Asia Cup 2008-2014 17 428 69 32.92 0
Aus Tri Series (CB) 2008-2012 15 314 70* 26.16 0
ICC Champions Trophy 2013-2017 10 481 123* 53.44 1
पहिल्या नि चौथ्या ओळी मधला average respectable धरायचा का ? तुम्ही तुलना कोणाशी ह्यावर ठरेल >>> अॅव्हरेज रिस्पेक्टेबल धरायचे असतील तर सचिनचा करीयर अॅव्हरेज ४४ आहे आणि रोहितचा ४५.
आणि दुसर्या आणि तिसर्या (ऑस्ट्रेलियामध्ये शतकं वगैरे) अॅव्हरेजबद्दल का गप्प बसायचे?
रोहित फायनल मधे खेळत नाही हे भयंकर irritating आहे पण ह्याचा अर्थ त्याने सिरीज मधे केलेले रन्स कमी ठरत नाही. >> रन्स कमी ठरत नाहीत, पण कमी महत्वाच्या ठरतात (माझ्यासाठी तरी). अॅट लीस्ट यू अॅग्री इन द फर्स्ट लाईन. एनीवे हे सगळे सब्जेक्टिव्ह आहे. पण तो ह्या मॅचेसमध्ये टोणगा आहे हे नक्की. तेच माझं पहिलं वाक्य होतं ह्या विषयात, आणि आता शेवटचंही. बाकी रोहितच्या स्लॉग स्वेप्ट स्विक्सेसचा आणि नजाकतदार शॉट्सचा मी चाहता आहेच.
प्रत्येक फायनलच्या वेळेस धोनी
प्रत्येक फायनलच्या वेळेस धोनी आणि त्याची आठवण माझ्या फेबुवर कोणीतरी काढलेली मी पाहिली आहे >> च्यामारी ही sample space धरायची का आता ? इथे तू नि फेफे दर मॅच सिरीजच्या आधी रोहित ची आठवण काढताच कि
दुसर्या आणि तिसर्या (ऑस्ट्रेलियामध्ये शतकं वगैरे) अॅव्हरेजबद्दल का गप्प बसायचे >> तू स्पर्धांचा विषय काढलास म्हणजे मी ६-७ देश असे धरून चाललो होतो. बाय लॅटरल सोडल्या म्हणून तीन संघ खेळणार्या सिरीज पण सोडल्या होत्या. पहिल्या CAB series मधे सचिनच्या जोडिला रोहित खेळला होता मला आठवते त्याप्रमाणे.
तो क्रंच गेम्स मधे खेळत नाही हा तर माझाही आक्षेप आहे पण बाय लॅटरल मधे खेळतो त्या कमी दर्जाच्या आहेत हे मला तरी पटत नाही. पण अर्थात ते subjective आहे ह्यात शंका नाही.
लीगमध्ये खेळून क्रंच
लीगमध्ये खेळून क्रंच मॅचेसमध्ये ढेपाळणार हे इतकं साधं आहे ते >>>> IPL = Indian premier league
त्याची वाटचाल तिकडेच चालू आहे >>>>> वाटचाल चालू आहे. ने होण्याची शक्यताही आहेच.
एनीवे हे सगळे सब्जेक्टिव्ह आहे >>>> धन्यवाद.
रच्याकने,
कन्सिस्टन्सी वगैरे सगळं तुमच्या मनातून आलं कारण तुम्हाला तो पॉइंट डिफेंड करायचा आहे. >>>>> मी माझी पहिली पोस्ट लिहिली ती जनरल ह्या विषयावरची होती. कारण ह्या आधीही रोहित शर्मा हा विषय इथे बर्याचदा बोलला गेलेला आहे. कन्सिस्टन्सी हा मुद्दा तुझ्या पोस्टसाठी लिहिलेला नव्हता. तुझ्या पोस्टच्या संदर्भात मी फक्त <<<सातवी, आठवी, नववी, ह्या इयत्तांमध्ये शाळेत पहिला आला दहावीच्या परिक्षेत नापास झाला म्हणजे नक्की कुठे काय झालं हे काही कळलं नाही.>>> हे एकच वाक्य लिहिलं होतं.
इथे तू नि फेफे दर मॅच
इथे तू नि फेफे दर मॅच सिरीजच्या आधी रोहित ची आठवण काढताच कि >> मी? मी रोहितबद्दल आणि इथेच किती महिन्यांनी/वर्षांनी लिहितोय. फेफ आणि स्वरूप असतात बहुधा.
सॅम्पल स्पेस असं नाही, पण तुलाही आठवलाच की नाही जोगिंदर शर्मा? पहिल्यावहिल्या टी-२०मधली व्हिक्टरी ही बायलॅटरल सिरीजइतकीच महत्वाची आहे का?
पण बाय लॅटरल मधे खेळतो त्या कमी दर्जाच्या आहेत >> कमी दर्जाच्या नाही रे भाऊ. तू आणि पराग दोघेही टुकार किंवा कमी दर्जाच्या असं मी म्हणतोय असं म्हणताय. त्याचं ऑपोझिशन कमी दर्जाचं आहे म्हणून धावा केल्या असं नाही. मी म्हणतोय 'अर्थहीन'. लोक तितक्या बघत नाहीयेत त्या मॅचेस. हे मीच नाही तर अनेक एक्सपर्ट्स आणि आयसीसीचं बदललेलं धोरण वगैरे म्हणतायत. चाहत्यांचा, अपेक्षांचा दबाव नसताना केलेलं शतक आणि ट्रॉफीमध्ये क्रंच गेम्समध्ये शतक ह्यात काहीच फरक नाही का?
पहिल्या CAB series मधे सचिनच्या जोडिला रोहित खेळला होता मला आठवते त्याप्रमाणे. >> होय, त्यामुळेच आशा जास्त उंचावल्या.
मी भाऊंना फक्त लोकांचा त्याच्याविषयीचा प्रॉब्लेम काय आहे हे सांगतोय, जो तुझ्या म्हणण्यानुसार बर्यापैकी जेन्युईन आहे. तो खेळताना मस्त दिसतो, ह्यात वादच नाही. त्याने द्विशतकं केली वगैरे सगळं मान्यच आहे. (अमान्य काय करणार त्यात?!) मी तर म्हणतो वर्ल्डकप फायनल २०१९ला चौथं द्विशतक कर.
फेफ ऐन क्रंच वेळेस कुठे गेला
फेफ ऐन क्रंच वेळेस कुठे गेला कोणास ठाऊक.
"रे फेफ, झाला काय तुझा रोहित शर्मा?" - अंतू बर्वा टोनमध्ये.
"रे फेफ, झाला काय तुझा रोहित
"रे फेफ, झाला काय तुझा रोहित शर्मा?" >>
चाहत्यांचा, अपेक्षांचा दबाव नसताना केलेलं शतक आणि ट्रॉफीमध्ये क्रंच गेम्समध्ये शतक ह्यात काहीच फरक नाही का? >> आहेच. पण मला व्यक्तिशः World Cup मधे केलेल्या धावा नि बाय लॅटरलमधे कुटलेल्या धावा opposition प्रमाणे मह्त्वाच्या वाटतात. म्हणजे Asia Cup Final मधे बांग्लादेश विरुद्ध काढलेल्या शतकापेक्षा अॅडलेडमधल्या पन्नास धावा मी जास्त मह्त्वाच्या धरेन. लोकांना 'अर्थहीन' वाटल्या तरी त्या धावा नसल्या तर तो संघात राहील का ? त्यामूळे खेळाच्या द्रुष्टीने त्या 'अर्थहीन' ठरत नाहीत. मी खेळ म्हणून बघतोय फक्त म्हणून फा फरक असेल.
लोकांना 'अर्थहीन' वाटल्या तरी
लोकांना 'अर्थहीन' वाटल्या तरी त्या धावा नसल्या तर तो संघात राहील का ? >> त्याला तर ते वरचे सगळे ग्राफ खाली असतानाही संघात ठेवायचे. संघात राहणे वगैरे फॅक्टर्स धोनी/कोहली/शास्त्रीच्या मर्जीवर खूप आहेत आजकाल.
बाकी बांग्लादेश म्हणशील तर त्यांनी कोहली सोडून रोहित आणि धोनी वगैरे फुल टीम असताना आपल्याला बायलॅटरलमध्ये २०१५मध्येच हरवलंय.
ते एशिया कपचं आता कितपत खरंय माहित नाही. आजकाल जोशात आहेत ते सगळे लिमिटेड ओव्हर्समध्ये.
रोहित आणि धोनी वगैरे फुल टीम
रोहित आणि धोनी वगैरे फुल टीम असताना आपल्याला बायलॅटरलमध्ये २०१५मध्येच हरवलंय. > >फक्त एकदा. बांग्लादेश हे उदाहरणादाखल होते.
त्याला तर ते वरचे सगळे ग्राफ खाली असतानाही संघात ठेवायचे. >> मला वाटते ह्यामूळेच प्राग तुझ्याशी वाद घालत होता. कारण फार rarely ऱोहित सिरीज मधे पूर्ण फेल गेलाय असे झालय. बहुतेक वेळा ५-६ मॅचेस मधे एक (किमान पक्षी बघायला तरी) जबरदस्त खेळी नि एक फुटकळ खेळी असतेच. त्यामूळे तो राहतो. त्या खेळीचा सायकॉलॉजिकल impact असतो.
रच्याकने, या इंग्लंड दौर्
रच्याकने, या इंग्लंड दौर्याची स्पोर्टस चॅनल्स वर दिसणारी जाहिरात इंग्रजांच्या दृष्टीने केल्यासारखी वाटली का कोणाला ?!!! आपल्या टीमला शालजोडीत मारल्यासारखी.. जाहिरात संपते ती सुद्धा या नोट वर की पाहूया या वेळेस शर्ट काढला जातो की पॅन्ट निघते !! सगळ्या जाहिरातीचा सूर हा आपली टीम ओव्हरहाइप्ड असून मार खाउन येते बघा असा वाटला !
कणेकरांच्या फटकेबाजीची आठवण आली.. .. लॉर्डच्या मातीत डोंगर डोंगर खेळले असतील !
कुलदीपचा चेंडू कुठे वळणार हे
कुलदीपचा चेंडू कुठे वळणार हे इंग्लिश फलंदाजांना धोनीकडे पाहून कळू शकेल असे गेली मॅच बघताना वाटले!
<< कुलदीपचा चेंडू कुठे वळणार
<< कुलदीपचा चेंडू कुठे वळणार हे इंग्लिश फलंदाजांना धोनीकडे पाहून कळू शकेल असे गेली मॅच बघताना वाटले!>> बहुतेक, इंग्लिश फलंदाजानी नेमकं तेंच केलं, म्हणून कुलदीपला एवढ्या विकेट मिळाल्या !
"रे फेफ, झाला काय तुझा रोहित
"रे फेफ, झाला काय तुझा रोहित शर्मा?" - 'अजून जीव आहे'.
सॉलिड चर्चा मिस केली मी. छ्या! असो. आता आमचे वरातीमागून हे एक तट्टू.
पहिल्याछूट माझ्यावरचा आरोप मान्य करून टाकतो, की मी प्रत्येक सिरीज च्या आधी नोहिट शर्मा विषयी इथे येऊन लिहीतो. स्वरूप आणी मी बर्याच क्रिकेटींग बाबतीत सहमत असतो, पण त्याने कधी नोहिट विषयी इतकी नाराजी व्यक्त केलेली आठवत नाही.
तर, मला नोहिट आवडत नाही - म्हणजे त्याचा खेळ, मैदानावरचा वावर, देहबोली वगैरे आवडत नाही. 'तो कन्सिस्टंट नाही, पण जेव्हा मोठ्या खेळ्या करतो, तेव्हा बघायला मजा येते' वगैरे ऑलरेडी बोलून झालय. आकडेवारी सुद्धा मांडून झालीये, आणी हे सगळं सबजेक्टीव्ह आहे (त्यामुळे कुणीही कुणाची मतं बदलायचा प्रयत्न करू नये) हे सगळं चर्चिलं गेलय. तेव्हा त्यापलिकडे जाऊन मी माझी बाजू मांडतो:
माझी मतं दोन गृहितकावर आधारित आहेत. क्रिकेट हा टीम स्पोर्ट आहे. क्रिकेट हा इंपॅक्ट गेम आहे.
टीम स्पोर्ट म्हटलं की टीम मधल्या प्रत्येक सदस्याचा एक रोल असतो. ओपनर म्हणून लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मधे समोरच्या टीम च्या फ्रंटलाईन बॉलर्स वर आक्रमण करून, आपल्या टीम ला भक्कम आणी वेगवान सुरूवात करून देणं हा ओपनर चा रोल असतो. त्याचा इंपॅक्ट होऊन समोरची टीम बॅकफूट वर जाते आणी मग मिडल ऑर्डर ने येऊन मॅच च्या परिस्थितीनुसार इनिंग बिल्ड करायची /रन रेट वाढवायचा ही पद्धत जास्त योग्य वाटते. रोहित चा गो-स्लो अॅप्रोच मला खटकतो. त्याला कोहली ची नितांत गरज आहे, कारण कोहली त्याला बॅक-फिल करतो. पण एकटा कोहली हे ओझं जास्त काळ उचलू शकणार नाही. सद्ध्या मिडल ऑर्डर सुद्धा कोहली चा अपवाद वगळता 'फायरिंग ऑल इंजिन्स' नसल्यामुळे तर हा प्रॉब्लेम मोठा आहे. बर्याचदा, धवन फास्ट रन्स काढतो आणी रोहित, एका बाजूनं बॉल तटवतो. रन्स काढण्याचा किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा इंटेंट कुठे दिसत नाही.
बर्याचदा, धवन फास्ट रन्स
बर्याचदा, धवन फास्ट रन्स काढतो आणी रोहित, एका बाजूनं बॉल तटवतो. रन्स काढण्याचा किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा इंटेंट कुठे दिसत नाही.>> हे एका अर्थाने बरोबर आहे कि सुरुवातीचे 3-4 ओव्हर्स रोहित फक्त बॉल तटवतो पण त्यानंतर तो strike rate वेगात वाढवतो, तो जितका वेळ अधिक राहील तेव्हढा वेळ strike rate १०० च्या वर जात राहतो. He has to get in to get big. मला वाटते कि त्याचा हा approach टीमला मान्य आहे and they want him to play that role. They have acknowledged and accepted that Rohit will have bigger इंपॅक्ट with this approach than going for higher strike rate for ball 1. धवन सुरूवातीपासून aggressive खेळायचे कारण हेच आहे.
"आपल्या टीम ला भक्कम आणी वेगवान सुरूवात करून देणं हा ओपनर चा रोल असतो. त्याचा इंपॅक्ट होऊन समोरची टीम बॅकफूट वर जाते आणी मग मिडल ऑर्डर ने येऊन मॅच च्या परिस्थितीनुसार इनिंग बिल्ड करायची /रन रेट वाढवायचा ही पद्धत जास्त योग्य वाटते." >> मला नाही वाटत There is one solution that fits all. संघाच्या composition वर नि तुमचे main batsmen कुठल्या क्रमांकावर खेळणार ह्यावर हे ठरेल. England सारख्या टीमला पहिल्या बॉलपासून देमार approach नक्कीच परवडतो. रोहित नि कोहली पहिल्या दहा overs मधे उडाले तर सामन्याचा निकाल आपल्याकरता जवळजवळ ठरलेला असतो.
Pages