Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धवन, विजय आणी राहूल छान खेळले
धवन, विजय आणी राहूल छान खेळले. पुजारा, रहाणे आणी कार्थिक ने निराशा केली. रहाणे आणी पुजाराने आजचा दिवस खेळून काढायला हवा असं वाटत होतं. Rahane must hit the straps. सीझन ची पहिलीच टेस्ट असली तरी विजय सारखं टेंपरामेंट अपेक्षित आहे रहाणे आणी पुजाराकडून. कार्थिक एवीतेवी बदली खेळाडू आहे, त्यामुळे जाऊ दे.
कालच्या संध्याकाळी गाडी थोडी
कालच्या संध्याकाळी गाडी थोडी डगमगल्यानंतर आज हार्दिक पंड्याच्या ७१ आणि उमेश यादवच्या शेवटच्या फटक्यांच्या जोरावर भारत ४७४/१०. अफगाणिस्तानच्या इतिहासातली पहिली टेस्ट बॅटींग इनिंग थोड्याच वेळात सुरू होईल.
अफगाणिस्तान ५९/६ . शम्भरही
अफगाणिस्तान ५९/६ . शम्भरही होणार नाहीत असे दिसते.
१०० केले की राव!
१०० केले की राव! अफगाणिस्ताननी!
चला आज संध्याकाळ किंवा उद्या पहिल्या सत्रात संपेल सामना!
चौथ्या पाचव्या दिवशी रशीद खान
चौथ्या पाचव्या दिवशी रशीद खान च्या बोलिंग मुळे कदाचित जरा इण्टरेस्टिंग होउ शकली असती मॅच. तोपर्यंत पोहोचणारच नाही आता.
अपेक्षेप्रमाणे सामना दुसरा
अपेक्षेप्रमाणे सामना दुसरा दिवस संपायच्या आत संपला!
आज वर असे किती सामने झाले जे दोन दिवसातील १६० षटकात संपले?!
http://stats.espncricinfo.com
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283076.html
कमीत कमी दिवसात (२) संपलेल्या टेस्ट मॅचेस ची लिस्ट.
धागा वाचताना लक्षात आले की ही
धागा वाचताना लक्षात आले की ही बातमी इथे अजून शेअर केली गेली नाहिये. बर्याच लोकांना कदाचित आधीच माहिती असेल, तरीही...
आयसीसी ने गेल्या काही दिवसात महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे सर्व आयसीसी मेंबर्सना आंतरराष्ट्रीय टी २० चा दर्जा देणे! येत्या १ जुलै पासून सर्व महिला संघ तर १ जानेवारीपासून सर्व पुरुष संघांचे टी२० सामने आंतराष्ट्रीय गणले जातील. म्हणजे सर्व १०४ देशांना आता एकमेकांविरूद्ध टी२० खेळता येईल.
थोडक्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्या देशांची संख्या आता १२-१८ न रहाता १०४ होईल.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_International_Cricket_Council_memb...
http://www.espncricinfo.com/story/_/id/23324980/t20s-all-icc-members-int...
थॉर माणूस - धन्यावाद. वाचतो.
थॉर माणूस - धन्यावाद. वाचतो. हे नव्हते ऐकले.
आज इंग्लंड ने तब्बल ४८१ रन्स मारले आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मधे!
आज इंग्लंड ने तब्बल ४८१ रन्स
आज इंग्लंड ने तब्बल ४८१ रन्स मारले आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मधे! >> काहीही सुरू होते आज.शेवटच्या ४-५ overs मधे Hales किंवा Morgan राहते तर ५०० सहज झाले असते. एकदम लुटूपूटूची मॅच वाटत होती.
<<थोडक्यात, आंतरराष्ट्रीय
<<थोडक्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्या देशांची संख्या आता १२-१८ न रहाता १०४ होईल.>>
म्हणजे जशी अमेरिकेचा सॉकर ची संघ आहे, तसा क्रिकेटचा संघ पण टी २० सामने खेळणार?
याबाबत एच १ बी व्हिसा वाल्यांना अमेरिकन संघातून खेळता येईल का? की वेस्ट ईंडिजचे खेळाडू विकत घेऊन अमेरिका टीम करणार? त्यांना ग्रीन कार्ड देऊन टाकतील! बेसबॉलसारखे?
याबाबत एच १ बी व्हिसा
याबाबत एच १ बी व्हिसा वाल्यांना अमेरिकन संघातून खेळता येईल का? >>>>> भारी मुद्दा आहे.
पण मग अमेरिका अगेन ग्रेट कशी होणार ?? 
झक्की हा घ्या अमेरिकेचा संघ..
झक्की हा घ्या अमेरिकेचा संघ..
http://www.espncricinfo.com/unitedstatesofamerica/content/player/country...
बर्याच आधी पासूनच अस्तित्त्वात आहे.. फक्त सध्या झोपलेल्य अवस्थेत आहे..
काल इंग्लंड ने काहीच्या काही
काल इंग्लंड ने काहीच्या काही बॅटींग केली. ऑस्ट्रेलिया ला इतकं हतबल झालेलं कधी पाहिलेलं नाहीये.
सध्या आपली ए टीम इंग्लंड मधे मस्त खेळतीये. दोन्ही मॅचेस जिंकल्या आहेत. त्यापैकी पहिली जरा लिंबु-टिंबू टीम बरोबर होती. पण पृथ्वी शॉ, आगरवाल, अय्यर, पंत, चहर वगैरे लोकांनी संधीचं सोनं करावं ही अपेक्षा आहे.
ए टीम चे लक्षातच नव्हते.
ए टीम चे लक्षातच नव्हते. धन्यवाद फेफ. बघतो स्कोर्स. आता मुख्य टीमही जात आहे ना जुलैपासून?
हो मुख्य टीम सुद्धा जातीये.
हो मुख्य टीम सुद्धा जातीये. दोन्ही टीम्स फॉर्म मधे आहेत. चांगली व्हायला हवी सिरीज.
England च्या ODI form बघता
England च्या ODI form बघता काळजी करावी लागणार आहे. काल म्हणजे literally golf swing सुरू होते. World Cup ची तयारी म्हणून अशी बॅटींग धार्जिणी पिचेस बनवली जातायेत का कोण जाणे ?
याबाबत एच १ बी व्हिसा
याबाबत एच १ बी व्हिसा वाल्यांना अमेरिकन संघातून खेळता येईल का? की वेस्ट ईंडिजचे खेळाडू विकत घेऊन अमेरिका टीम करणार? त्यांना ग्रीन कार्ड देऊन टाकतील! बेसबॉलसारखे?
नवीन Submitted by नन्द्या४३ on 19 June, 2018 - 18:36
अगदीच अशक्य नाही, आतादेखील काही संघांमधून उपखंडातील खेळाडू दिसतील तुम्हाला (उदा. युएईचा स्वप्निल पाटील, कॅनडाची जवळपास निम्मी टीम
). एका देशातल्या खेळाडूला दुसर्या देशाकडून/देशांतर्गत स्पर्धांमधून खेळता येऊ शकते पण त्यासाठी काही नियमांची पूर्तता करावी लागते. कोल्पॅक डील नावाचा एक प्रकार आहे, दक्षिण आफ्रिकेतले खेळाडू त्याचा फायदा घेऊन काऊंटी क्रिकेट खेळत आले आहेत. एखाद्या देशातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मात्र नागरीकत्व किंवा अॅन्सेस्ट्रीचे नियम लागू होऊ शकतात. त्यानंतरही एका पुर्णवेळ सदस्य संघातून दुसर्या पुर्णवेळ सदस्य संघात जाण्यापुर्वी ठराविक काळ जाऊ द्यावा लागतो. (उदा. ऑस्ट्रेलिअन खेळाडूला न्यूझीलंडतर्फे खेळण्यापुर्वी ४ वर्षे ऑस्ट्रेलिअन क्रिकेट पासून दूर रहावे लागेल. जसे कि ल्यूक राँकीने केले.) पण पुर्णवेळ सदस्य संघातून इतर संघांमधे जाण्यासाठी हा नियम नाही. त्यामूळे उद्या अमेरीकन संघाने नागरीकत्व (जसे वॅन डर मर्व ने साऊथ आफ्रिका आणि नंतर नागरीकत्वाच्या आधारावर नेदरलंड कडून खेळताना केले होते) किंवा अॅन्सेस्ट्रीच्या (जे डर्क नॅनसने ऑस्ट्रेलिया आणि नेदरलंड कडून खेळताना केले होते) आधारावर कॅरीबीअन खेळाडू घ्यायचा ठरवला तर तो खेळाडू लगेच अमेरीकेकडून खेळू शकतो.
पण सध्या अमेरिकन क्रिकेट संघटना कॅरीबिअन संघटनेपेक्षाही जास्त गाळात असल्याने तसे होईल का ही शंकाच आहे.
७ जुलै - धोनी, ८ जुलै -
७ जुलै - धोनी, ८ जुलै - गांगुली, १० जुलै - गावसकर! - वाढदिवस.
जुलै म्हणजे एकदम क्रिकेटर महिना दिसतोय.
ODI series झक्कास होईल असे
ODI series झक्कास होईल असे वाटते. इंग्लंड ची जबरदस्त बॅटींग वि. wrist spin !
रोहित शर्मा नि धवन वर बरेच काही ठरेल असे वाटते. इंग्लंड पाहिल्या बॉलपासून धुवत सुटते. आपण बरेच circumspect असतो नि मग सुटतो. त्यामूळे जो दर over मागे अर्ध्या एक धावेचा फरक राहणार आहे तो कोण कसा मॅनेज करेल (we make up for it either scoring faster or slowing down England in later stage of the match) ह्यात निकाल ठरेल का ?
वन-डे सिरीज चुरशीची होणं
वन-डे सिरीज चुरशीची होणं अपेक्षित आहे. शर्मा-धवन जोडी महत्वाची आहेच.
गेल्या काही मॅचेस पाहिल्यावर परत एकदा एक गोष्ट अधोरेखीत झालीये की कोहली ला फॉर्म गवसणं अत्यंत गरजेचं आहे. फॉर्म मधे असलेला कोहली विलक्षण सातत्यानं खेळतो. इतकी कन्सिस्टंसी बाकी कुणी फारशी दाखवत नाही. राहूल एक मॅच खेळला, दोनदा विशेष काही न करता आऊट झाला. शर्मा जी का बेटा आता परत 'ह्याला काढत का नाहीत' असं म्हणायची वेळ येईपर्यंत खेळेल असं वाटत नाही (पूर्वातिहास बघता). रैना टीम मधे आहे हे फक्त स्कोअरकार्ड बघून लक्षात येतं. आणी धोनी पुणेकर आहे (म्हातारपणाच्या सत्काराच्या दिशेनं वाटचाल चालू ठेवायची).
फॉर्म मधे असलेला कोहली
फॉर्म मधे असलेला कोहली विलक्षण सातत्यानं खेळतो. इतकी कन्सिस्टंसी बाकी कुणी फारशी दाखवत नाही. >> +१ पूर्वीच्या ODI मधे ज्या तर्हेने तो खेळायचा तो कोहली हल्ली दिसत नाही. टेस्ट्स वर प्राधान्य दिल्यामूळे त्याच्या एकून शैली मधे नि inning build करण्याच्या approach मधे बदल झालाय.
हार्दिक परत मोकळे पणाने खेळायला लागल्यामूळे नि धोनी उचलून मारण्याच्या शैली मधे परत गेल्यामूळे रैनाऐवजी अजून कोणी हवे असेल तरी आणता येईल (कार्थिक, पंत वगैरे). बुमराह नि भुवी असणार आहेत का ODI साठी ?
बुमराह नाही - त्याच्या जागी
बुमराह नाही - त्याच्या जागी शार्दुल ठाकुर आहे. भुवी आहे.
शार्दुल ठाकुर = (अजित आगरकर - विकेट्स) + [(आगरकरच्या ओव्हर मधले बॉल क्रमांक ४ आणी ५) * ३ ] * १० ओव्हर्स
शार्दुल ठाकुर = (अजित आगरकर -
शार्दुल ठाकुर = (अजित आगरकर - विकेट्स) + [(आगरकरच्या ओव्हर मधले बॉल क्रमांक ४ आणी ५) * ३ ] * १० ओव्हर्स >>>
शार्दुल ठाकुर = (अजित आगरकर -
शार्दुल ठाकुर = (अजित आगरकर - विकेट्स) + [(आगरकरच्या ओव्हर मधले बॉल क्रमांक ४ आणी ५) * ३ ] * १० ओव्हर्स
एकदम परफेक्ट वर्णन..
रच्याकने,, अजित आगरकरला विकेट्स बर्यापैकी मिळालेल्या आहेत बरका.. मला जे आठवते आहे ते जर बरोबर असेल तर वनडे मधे सगळ्यात फास्ट ५० विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
मला जे आठवते आहे ते जर बरोबर
मला जे आठवते आहे ते जर बरोबर असेल तर वनडे मधे सगळ्यात फास्ट ५० विकेट्स त्याच्या नावावर आहेत.>>>
हो तेंव्हा २१ सामन्यात ५० बळी घेतले होते त्याने! पहिले ५ चेंडू अफलातून आणि शेवटच्या चेंडूवर चौकार अथवा षटकार हे वैशिष्ठ्यदेखिल शेवटपर्यन्त जपले!
“अजित आगरकरला विकेट्स बर्
“अजित आगरकरला विकेट्स बर्यापैकी मिळालेल्या आहेत बरका.” - म्हणुनच ‘अजित आगरकर - विकेट्स’ असं लिहीलय.
एक एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत
एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत खरी चुरस असली तरी फिरकी गोलंदाजीच निर्णायक ठरणार असं मला कां वाटतंय ?
हो मी ही ते अजित आगरकर मायनस
हो मी ही ते अजित आगरकर मायनस विकेट्स असेच वाचले.
कोहली फॉर्म मधे आला तर भाऊ
कोहली फॉर्म मधे आला तर भाऊ म्हणतात तसं, रशिद वि. चहल, यादव असा मुकाबला रंगायची शक्यता आहे. फारा दिवसात असं बॉलर्स चं द्वंद्व पहायला मिळालं नाहीये.
Pages