Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघाची पहिली मुलाखत
मेघाची पहिली मुलाखत
बाकी फायनलीस्टच्या मुलाखती दिसत नाही..नाहीतर अगोदर बाहेर आलेल्यांच्या मुलाखती लगेच दाखव्याच्या...
थत्त्यांचं भाषण.. सगळे
थत्त्यांचं भाषण..
सगळे कंटाळलेले.. बिबि ने फा.फॉ. च केलं शेवटी..
https://www.youtube.com/watch?v=enIOgWzDX58
मेघुडीची मुलाखत..
https://www.youtube.com
https://www.youtube.com/channel/UCA5wv3lbx6fn54ou6uytSIA/community?lb=Ug...
थत्ते कसलं दहा पानी भाषण
थत्ते कसलं दहा पानी भाषण वाचून दाखवत होते, थँक गॉड ऐकवलं नाही ते
ते संपल्यावर सर्वांनी उचलून खाली आणलं त्यांना, परत सुरु करतील म्हणून.
येस येस येस..मेघाच जिंकली
येस येस येस..मेघाच जिंकली शेवटी..लव्ह यु मेघा....मस्त खेळलीस सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत..
काल खरच मेघा आतून खुप खुप शांत वाटत होती...अज्जिबात चलबिचल नाही..त्या उलट पुष्की...त्याचं बीपी हाय होतं की काय असं वाटत होतं आस्ताद च्या नॉमिनेशन च्या वेळेस...पुष्की अज्जीबात पटला नाही लास्ट २ मद्धे...पण असो.
मेघा ने अपोझीट टीम च्या सगळ्याना बाहेर काढलच शेवटी....स्वतः च्या बरोबरीत स्टेज वर यायची सुद्धा संधी दिली नाही...
लाईट बंद करताना एकदम टडोपा झालं...सई च्या जोडी ला शमा चं पण नाव घेतलं तिने...आणी स्टेज वर सुद्धा टेक्निकल स्टाफ्,बॅकस्टेज लोक सगळ्यांचे आभार मानले....लोक तिला कितीही फेक, डीसलॉयल, नाटकी काहीही म्हणोत..पण ती खरी आहे हे नक्की...
तिने गेम साठी केलेल्या गोष्टी खर्या मानुन तीला माणुस म्हणून वाईट ठरवाय्चे प्रयत्न सगळ्यांनी केले..पण ती सगळ्याना पुरुन उरली.
बीबॉ चा असाच विनर असायला हवा होता..
Congratulations dear Megha...!!! you deserve this win ...LOve u a lot....!!!
थत्ते, सई, पुष्कर स्मिताला
थत्ते, सई, पुष्कर हे स्मिताला कधीच हाकलवायला सज्ज होते. पुष्कर गेला पुढे पण स्मिताला सतत खाऊ का गिळू नजरेने बघणारी सई तरी atleast स्मिताच्या आधी बाहेर पडली. आस्ताद म्हणालेला स्मिता फायनलला हवी माझ्यापुढे ती विक आहे म्हणून, कित्ती पचका झाला.
आस्तादचा डबल पचका झाला, स्मिता पुढे गेली आणि मेघा जिंकली.
सो मि वर पण बरेच जण पुष्करला
सो मि वर पण बरेच जण पुष्करला कोणी एवढी votes दिली. स्मिता दुसरी हवी होती लिहितायेत.
पण आ रे स सर्वांना मागे टाकून
पण आ रे स सर्वांना मागे टाकून स्मिता इथपर्यंत पोचली याचा खुन्नस काढलाच शेवटी म मां नी. कसं बोलले ते पुष्कर पुढे गेला आणि तो आणि मेघा स्टेजवर आले तेव्हा. पचनी पडलं नाही स्मिता इथपर्यंत येणं.
मेघाने बॅकस्टेज क्रुचे आभार
मेघाने बॅकस्टेज क्रुचे आभार मानले, दिवे बन्द करताना सुद्धा ती सई-शराला विसरली नाही दॅट शोज शी प्लेड विथ हर्ट आणि हेड टुगेदर
<
अगदी !
माझा फेवरेट मोमेंट होता तो , छान आहे हा टॉप २ स्पर्धक निघतानाचा लाइट बन्द करून घर शान्त होतानाचा बिग बॉसचा फॉर्मॅट !
लाइट बन्द करून बाहेर पडतानाच्या मिश्र भावना आणि त्याही वेळी मेघाचं तो मोमेंट सई शराचीही आठवण काढणे !
पुष्करची हालत फारच खराब होती आज , जिला आधी जवळचा मित्रं बनून नंतर सतत टार्गेट केलं/टॉर्चर केलं, तीच मेघा आज पुष्करचा हात घट्ट धरून त्याला धीर देत होती !
मेघाचं विनिंग स्पीच, आधल मधल सगळच बोलणं एकदम मस्तं आणि कॉन्फिडन्ट !
टॉप २ मधे स्मिता हवी होती अॅक्चुअली असं फार वाटलं.
पण ममां नी जे कारण दिलं ते सुध्दा पटलं थोडं फार, इथे नुसतं गुडीगुडी इमेज बाळगायची स्पर्धा नव्हती, जे जिंकण्यासाठी जिद्दीने माइंड गेम आणि टास्क्स दोन्ही खेळले, शो मधे ज्यांनी कन्टेन्ट दिला , स्टँड घेतला, एंटरटेन केलं तेच दोघे टॉप २ मधे आले.
बाकी मधले परफॉर्मन्सेस वगैरे टाइमपास रिमोटच्या कृपेनी फॉरवर्ड केले , नंकिने छान स्टँडप कॉमेडी केली.
आज सगळे फायनलिस्ट, सगळे एक्स हाउसमेट्स छान दिसत होते.
मेघा-स्मिताचे गाउन्स मस्तं होते , सई मात्रं विचित्र भक्कम खांबासारखी दिसत होती.
आस्तादचा ड्रेसही छान दिसत होता आणि जाताजाता गायलाही छान , आस्तस्दच्या पुढील क्रिएटिव जर्नीमधे नक्कीच इंटरेस्ट आहे , आय होप तो चांगली कामं, गायन दोन्ही कंटीन्यु करेल.
मला तर आस्ताद सु.न.ध्या.न च्या नव्या सिझनचा होस्ट झालेला बघायला आवडेल
पाहुण्यात बस्स्लेली आस्तादची स्वप्नाली चसंगली वाटली.
पुष्किची जास्मिन आज आलीच नाही, वैतागली का त्याच्या शेवटच्या आठवड्यातल्या हगिंग ड्राम्याला ?
बाकी या स्पर्धेत सगळ्यात मोठा लॉस सईचा झाला, सुरवातीचे काही आठवडे ती आणि मेघा याच टॉप २ दिसत होत्या, इन फॅक्ट टास्क्स आला कि ती मेघापेक्षा फिजिकली स्ट्राँग असल्याने जास्तं उठून दिसायची पण तिच्याकडे मेघासारखं डोकं नाही आणि पुढे तिचा फोकस हलत गेला , अतिशय हलक्या कानाची निघाल्यानी कोणीही येऊन तिचा प्यादं म्हणून वापर करायला लागलं, पुष्करने तिचा अतिशय वाइट फायदा घेतला आणि तिला ते समजलच नाही आपला काय लॉस झाला !
मेघाशी लॉयल असती तर आज पुष्क्याच्या जागी तीच असती मेघाबरोबर , इतर कोणाचा चान्सच नव्हता !
जाऊ दे, सईने कर्माची फळं भोगली.
चला शेवट बाकी मस्तं झाला , असंख्य एम्सीपी -गुंड दादागिरी करणार्या लोकांत १०० दिवस राहून एक स्ट्राँग बाई सगळ्या सो कॉल्ड सिनियर अर्टीस्ट्सना पुरून उरली, एक एक करत तिने सगळ्यांना धारातिर्थी पाडले आणि तिचा आत्मविश्वास जिंकला !
सगळ्या मेघा फॅन्सच अभिनंदन !
हो खरी runner up तर स्मिताच
हो खरी runner up तर स्मिताच deserve करत होती.... पण आत्तापर्यंत च्या bb च्या प्रवासावर त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नये अस वाटते... त्यातल्या त्यात स्मिता तिला सतत घालूनपाडून बोलणार्या मूर्ख सईच्या पुढे निघून गेली हेही नसे थोडके... In fact sai शमा च्या पन आधी जायला हवी होती.. जर खरी voting ग्राह्य धरत असतिल तर पण तसही घडल नाही... पुष्कर la smita peksha जास्त votes असणे ही possible नाही... But OK at least winner तरी deserving candidate la निवडला... आणि म्हणुनच मला आदित्यचे बोलणे आवडले कारण जर चॅनल ne पुन्हा एकदा partiality करत wrong candidatela जिंकवलं असत तरी ते जे बोलले त्यात meghach सगळं यश and reality सामावली होती....
त्या गाण्यात सई कसली पसरून
त्या गाण्यात सई कसली पसरून झोपलेली सुरुवातीला...फुल ऑन आडदांड गडी आहे तो ... नंतर तिचा तो काळा ड्रेस पण विच सारखा दिसत होता....
मला मेघा चा ड्रेस नाही आवडला तिचे आधीचे ड्रेसेस कितीतरी मस्त असायचे....
स्मिता बद्दल काय बोलू??? ती कशातही मस्त च दिसते....काल ही सुंदर दिसत होती. ग्लॅमरस एकदम.....
लोकूर काका आणि काकूंच्या चेहऱ्यावरील माशी ही हलत नव्हती...काकू तर खूप च खवटलेल्या.... स्मिता ची मॉम हे काय झालं या शॉक मध्ये होत्या.....
मला मेघा नाही आवडत पण तिची मुलगी किती gorgeous आहे....एकदम एलिगंट....
फिनाले आज रात्री शांतपणे
फिनाले आज रात्री शांतपणे पाहिन
पण एक विचार मनात येतो, बिबॉ बद्द्ल लिहीतांना, पाहतांना आपण त्यात इतके समरस झालो. आता एक रितेपणा नक्कीच जाणवेल.
आणि आपल्याला इतका जाणवेल, तर मेघाला किती जाणवेल
सईच्या आईबाबांकडे बघून वाईट
सईच्या आईबाबांकडे बघून वाईट वाटलं, दोघांना एकंदरीत लेकीचं वागणं पसंत नव्हतं आणि दोघांची इथे यायची इच्छा नव्हती असं वाटलं.
मेघाची मुलगी गोड आहे.
सर्व मेघा सपोर्टर्सच्या
सर्व मेघा सपोर्टर्सच्या आनंदात मीही सामील. फार फार आनंद झाला मेघा जिंकली ते, विशेषतः त्या पुष्कीचा पचका करून जिंकली ते फारच भारी. ममांनी उगाच हेड आणि हार्टचा शाब्दिक खेळ खेळला. मेघा त्यालाही पुरून उरली. हार्टशिवाय हा खेळ खेळताच आला नसता असं जाताजाता सुनावलंच
सो हॅपी फॉर हर.
स्मिता स्टनिंग दिसत होती काल. कसला सुरेख शिमरिंग गाऊन होता तिचा आणि कॅरीही करत होती इझ्झात. सिम्पली वॉव. आस्त्याही चिकणा दिसत होता. मेघा एकदम गोड. सई मात्र भयंकर! आधीच ती धष्टपुष्ट, त्यात तो फुगवलेला गाऊन!
पुस्कीला पाहिलं नाही नीटसं, जमेल तितकं इग्नोअरच केलं
अजून एक म्हणजे, पब्लिक व्होटिंग काऊन्ट्स! इतका प्रचंड सपोर्ट असताना मेघा हरली असती तर नक्कीच गोलमाल आहे असं वाटलं असतं. पण तसं झालं नाही. थॅन्क गॉड!
मेघाचं अभिनंदन.
मेघाचं अभिनंदन.
मी महिनाभर बघून मग कंटाळा आल्याने शो बघणं सोडून दिलेलं. आज ती जिंकलेला धागा बघून इकडे बघितलं. अभिनंदन तिचं आणि तुमच्या सगळ्यांचं.
चला धाग्यावरच्या सर्वांचे
चला धाग्यावरच्या सर्वांचे अभिनंदन!
मी २-४ भाग बघितलेले.. सकाळ दुपार संध्याकाळ बघुन कंटाळलो. सकाळी दात घासण्या पासून रात्री झोपे पर्यन्त.
काल अंतीम भाग शेवटी शेवटी बघितला!
अभिनंदन मेघा
अभिनंदन मेघा
तू जिंकली नसती तर आज भक्तांची कडक एकादशी असती
असो...
आमचे हृद्य मात्र स्मितानेच जिंकले !
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है...वही होता है जो मंजुरे खुदा होता है
आजपासून काय मग आता???
आजपासून काय मग आता???
तसे नवीन धागे निघतच आहेत. पण मजा नाही हो तिथे.
मेघा जिंकली नसती तर चॅनलला
मेघा जिंकली नसती तर चॅनलला खूप कॅऑस ला तोंड द्यावे लागले असते.
पुष्कीला शेवटी शेवटी खूप टेन्शन आलं होतं. पण २-३ दिवसांपुर्वी तो ओव्हर कॉन्फिडन्ट पण वाटला.
मेघा फेक, मेघा फेक हे सतत इतर
मेघा फेक, मेघा फेक हे सतत इतर स्पर्धकांकडून ऐकून कंटाळा आला बुवा. आता त्यांच्यातल्या कुणीतरी ती फेक वागायची म्हणजे नक्की काय करायची हे उदाहरणांसहित स्पष्ट करणारा लेख लिहावा पेपरात
विजेतेपदाच्या ज्या मुलाखती आहेत त्या देताना मी मेघाशिवाय कुणाला इमॅजिनच करु शकले नाही कधी आणि काल सुद्धा काय ग्रेसफुली वावरली आणि बोलली शेवटपर्यंत. तिने कंटेंट दिला, कंटेंट दिला हेही फार ऐकलं. खरं तर कंटेंट इतर सगळेच देत राहिले तिला सेंटर ऑफ अटेंशन बनवून आणि घरातल्या इतर छोट्या रेघांपुढे तिची रेघ मोठीच होत गेली दिवसेंदिवस
काल बिबॉ म्हटले, १८-१९
काल बिबॉ म्हटले, १८-१९ सदस्यान्नी आल्यावर कामे वाटुन घेतली. कोणी स्विमिन्ग पुल साफ करायचे काम घेतले तर कोणी तुळशीला पाणी घालण्याचे!
किचनमधले काम फक्त दिसत होते. मधे मधे एकदा मेघा कार्पेट स्वच्छ करताना आणी
ही कामे कधी दिसली?
कोणीतरी बाथरुम स्वच्छ करताना दिसत होते. सई होती बहुतेक. बेसिन स्वच्छ करताना रेशमताईन्चे केस सापड्ल्यावर भान्डणे झाली होती ना!
बाकी, जीम मधला एकही सिन दाखवला नाही काय?
हिन्दि बि बॉ मध्ये जिम
हिन्दि बि बॉ मध्ये जिम दाखवायचे आणि तिथे वर्क आऊट करणारे लोक पण.
आतापर्यंत मी हिंदि बिबॉ चे ३ सिझन आणि मराठीचा हा एक असे एकूण चार पाहिले.
त्यात बायका जिंकण्याचं प्रमाण जास्त होतं. उर्वशी ढोलकिया, शिल्पा शिन्दे आणि ही मेघा
एकच हिंदि चा सिझन गौतम गुलाटी जिंकला होता.
एकच हिंदि चा सिझन गौतम गुलाटी
एकच हिंदि चा सिझन गौतम गुलाटी जिंकला होता.>> आणि पहिला राहूल रॉय.. आशिकी वाला.. मी एकच पाहिला..पहिला.. कंटाळते मी लवकरच.. त्यामुळे एकुणएक एपिसोड नाही पाहिला.. मराठी मधे सुद्धा शेवटचा महिना न पाहल्यातच जमा आहे.. असो
मेघा फेक, मेघा फेक हे सतत इतर
मेघा फेक, मेघा फेक हे सतत इतर स्पर्धकांकडून ऐकून कंटाळा आला बुवा>>>> अस कस? फेकुन दिलच कि मेघाने सगळ्याना.
मला एक शंका आहे. हे स्पर्धक
मला एक शंका आहे. हे स्पर्धक जे घरात राहतात. त्यांना तिथे रहायचे डेली काहीतरी पैसे मिळत असतील ना ?
मेघा जिंकली तर तिला ते डेली+१८,००,००० मिळाले का?
आणि डेली वेजेस कसे ठरत असतील? सिनिऑरिटी प्रमाणे का?
बिबॉच्या घरात कोण राहणार हा निर्णय कसा घेत असतील?
एकच हिंदि चा सिझन गौतम गुलाटी
एकच हिंदि चा सिझन गौतम गुलाटी जिंकला होता.>> आणि पहिला राहूल रॉय >>> १०वा प्रिन्स नरुला
एकच म्हणजे मी जे चार पाहिले
एकच म्हणजे मी जे चार पाहिले त्यातला एकच असं म्हणायचं आहे मला.
फिनाले बघतेय. पुष्कर
फिनाले बघतेय. पुष्कर प्रत्येकाची बॅग बाहेर घेवून जातोय, 'मी वाचलो' हे भाव तोंडावर स्पष्ट दिसतायेत
आजपासून काय मग आता??? Uhoh>>>
आजपासून काय मग आता??? Uhoh>>>
पुनःप्रक्षेपण १४ आठवड्यांचे १४ दिवसांत. नंतर ठरविणार नविन काय ते! तेंव्हा घ्या १४ दिवस पुनःप्रत्ययाचा आनंद!
Pages