Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेघाचे अभिनंदन.
मेघाचे अभिनंदन.
पहिला राहुल रॉय जिंकलेला, तो
पहिला राहुल रॉय जिंकलेला, तो बघितलेला. दुसरा का तिसरा राहुल महाजन होता तेव्हाही एक मेल स्पर्धक जिंकलेला.
<आणि डेली वेजेस कसे ठरत असतील
<आणि डेली वेजेस कसे ठरत असतील? सिनिऑरिटी प्रमाणे का?>
हो सिनियॉरिटी आणी पॉप्युलरिटीवर अवलंबून होते. आऊ, रेशम, राजेश, स्मिता हे भरपूर पैसे देऊन आणले गेले होते. आस्ताद, जुई, सुशांत मध्यम दरात आलेले. मेघा, सई, पुष्कर, थत्ते,विनीत, ऋतुजा यांचा पर डे बराच कमी होता. साधारणतः ३०- ७० हजार रू पर डे अशी रेंज होती.
हिंदी बिग बॉसचा एक सिझन एकता
हिंदी बिग बॉसचा एक सिझन एकता कपुरच्या सिरीयल मध्ये ते 'आरारा' म्हणणारी गुजराती नटी जिंकली होती. दक्षा बेन नाव बहुदा.
आऊला तर १ लाख पर डे होता रेट
आऊला तर १ लाख पर डे होता रेट असं युट्युब वरचा व्हिडीओ सांगतोय.म्हणजे काही न करता खेळता त्यांनी ७२ दिवस राहुन विनर पेक्षा जास्त कमावलेत.
हिंदी बिग बॉस विनर लिस्ट
.
आऊला तर १ लाख पर डे होता रेट
आऊला तर १ लाख पर डे होता रेट असं युट्युब वरचा व्हिडीओ सांगतोय.म्हणजे काही न करता खेळता त्यांनी ७२ दिवस राहुन विनर पेक्षा जास्त कमावलेत. >>>>हो , पण प्राईज मनी पाहता त्यावर विश्वास बसत नाही
मराठी मधे खुप चिंधीगीरी केलीय त्यांनी असेच वाटले
आरती, भूषण आणि किशोरचे स्किट
आरती, भूषण आणि किशोरचे स्किट मस्त झाले
आऊ तेव्हा पण तोंड पाडून बघत होत्या.
एक लाख डेली? मला जरा
एक लाख डेली?
मला जरा अतिशयोक्ती वाटतेय हा आकडा म्हणजे.
बैलगाडी च्या task मध्ये prize
बैलगाडी च्या task मध्ये prize money कमी होण्याचं जे तंत्र वापरले गेले तो फॉरमॅट आहे की megha जिंकणार अशी चिन्ह दिसायला लागल्यावर केलेली साजिश होती?
Format आहे तो मोक्षू. गेलेले
Format आहे तो मोक्षू. गेलेले पैसे पुन्हा कमविण्यासाठी नंतर दुसरा टास्क पण देतात
काल फिनाले संपेपर्यंत ऑनलाईन
काल फिनाले संपेपर्यंत ऑनलाईन यायचे नाही असे ठरवले होते.... कारण चुकुन जर कोण जिंकलय हे आधीच कळले असते तर त्या त्या मोमेंटमधली मजा गेली असती!
अर्थात अगदीच अपेक्षित क्रमाने मंडळी बाहेर गेली.... पुष्करबद्दल गेले दोन तीन दिवस ज्या काही अफवा येत होत्या त्यामुळे तो टॉप ३ मध्ये अपेक्षित होता.... मेघाबद्दल प्रचंड विश्वास असूनही जेंव्हा फायनल दोन म्हणून ते दोघेच उभे होते तेंव्हा क्षण दोन क्षण दगाफटक्याची शक्यता वाटून गेली पण फायनली मेघा जिंकली आणि हुश्श्य झाले एकदाचे!
खर म्हणजे पुष्करला इतकी मत कुणी दिली असावित असा प्रश्न सतत पडत होता पण एकंदरीत त्या दोघांच्या मतातली तफावत प्रचंड असणार आणि गेले काही एपिसोड मेघाला कडवा विरोध केल्यामुळे मेघाहेटर्सची मते त्याच्याकडे वळून त्याने फिनालेतल्या इतरांना थोडेफार मागे टाकले असावे.... बिगबॉस जिंकावे असे मटेरीअल अज्जिबातच नाहिये तो पण आयुष्यात यशाने नेहमीच हुलकावणी दिलेला एखादा कुणीतरी यशाच्या इतक्या जवळ येउन परत एकदा हरतो (काही का कारणाने असेना) तेंव्हा त्याच्याबद्दल जी सहानुभूती वाटती ती पुष्करबद्दलही वाटली!
सईमध्ये फिनालेला मेघाच्या शेजारी उभे रहायचे पोटेन्शिअल होते पण.... असोच!
सीझनच्या मध्यावर मला वाटलेले की मेघा, सई आणि रेशम या तिघी फिनालेला फायनल तिघी म्हणून उभ्या असतील पण नंतर नंतर रेशम फारच ढेपाळली!
सई, पुष्कर, मेघा एक ट्रायो म्हणून जरी आवडत असले तरी सई आणि पुष्करचे विरोधात जाणे कुठे ना कुठे तरी मेघाच्या पथ्यावरच पडले.... प्रस्थापितांविरुद्ध लढल्यामुळे जो पाठिंबा या तिघांना सुरुवातीला मिळायचा तोच शेवटी शेवटी मेघाला मिळायला लागला.... loan fighter लोकांना नेहमीच आवडतो आणि मेघाने शेवटपर्यंत आपली इमेज बाहेर वाईट जाणार नाही याची काळजी घेतली
स्मिता खुप सेफ खेळली.... दुसऱ्यासाठी तर सोडाच पण स्वतासाठीही स्टॅंड घेणे तिला कधी जमलेच नाही.... ती अल्पसंतुष्ट वाटली मला.... त्यात तिच्या स्वताच्याच ग्रूपने तिला वेळोवेळी खच्ची केले... तिच्यामुळे टास्क जिंकूनही क्रेडीट कुणीतरी दुसरेच घेउन गेले.... इतक्या सरळ लोकांचा हा गेम नाहीये नक्कीच!
आस्तादला मी बरीच नावे ठेवली.... आस्ताद आणि सुशांत या दोन लोकांना मेघाने वेळोवेळी मदत करुनही त्यांनी त्याची किंमत ठेवली नाही... आस्ताद तर मेघाला टोमणे मारायची एकही संधी सोडत नव्हता.... काहीतरी खुन्नस असल्यासारखेच वागत होता तिच्याशी!
माणूस म्हणून तो वाईट नसेलही पण खुप ऑन-ऑफ वाटले त्याचे वागणे.... मेघा चक्कर येउन पडल्यावर तिला आत उचलून नेणारा, तिला धीर देणारा आस्ताद खरा की मिळेल त्या संधीचा फायदा घेउन मेघावर कुरघोडी करणारा आस्ताद खरा? हे त्याला प्रत्यक्षात ओळखणारेच सांगू शकतील!
त्याचा आवाज खरेच चांगला आहे..... स्वताला गायक वगैरे म्हणवणाऱ्या त्यागराज वगैरे मंडळींपेक्षा तो खरच उजवा आहे!
वरती कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे गाण्यांच्या रिॲलिटी शो साठी तो एकदम परफेक्ट होस्ट होउ शकेल!
शरा बद्दल मी आधीही लिहलेच आहे.... ती माणूस म्हणून खुप आवडली.... निरपेक्ष मैत्री निभावणारी, न सांगता बरेच काही समजून घेणारी, अल्लड, खेळकर, हरहुन्नरी, जीव लावणारी आणि जीव लावावी अशी सर्वांना हवीहवीशी वाटणारी जिवलग मैत्रीण दिसली मला तिच्यात!
आता इतर स्पर्धकांविषयी थोडक्यात....
रेशम काल जरा बोअर वगैरे वाटली तरी चिडकी नाही वाटली.... फिनालेला नसल्यामुळे आलेली निराशा तिच्या चेहऱ्यावर दिसत होती पण फिनालेला पोहचलेल्यांवर जळताना नाही दिसली ती!
राजेश पण move on झालेला वाटला पण सुशांत, जुई, भूषण वगैरे मंडळी अजूनही जुन्या विरोधी पार्टीवर खार खाउन असल्यासारखी वाटली!
ऋतुजा रहायला हवी होती यावर बहुदा कुणाचेच दुमत नसावे!
राजेश दाढी वगैरे शिवाय एकदमच सोबर आणि सौम्य दिसत होता.... त्याने मागे एकदा पाहुणा म्हणून घरात आलेला तेंव्हा आणि कालसुद्धा संभाव्य विजेती म्हणून मेघाचे नाव घेतले (आता ते खरेखुरे त्याला तसे वाटत होते की रेशमला जेलस फील व्हावे म्हणून तो मेघाचे नाव घेत होता कुणास ठाउक?)
चौगुलेंचे स्कीटमधले पंचेस बरे होते.... एकुणात त्या कंटाळवाण्या डान्स परफॉर्मन्सपेक्षा आरती, भूषण आणि चौगुलेंचे ते स्कीट बरे वाटले!
आउ काल घरातल्या पेक्षा फ्रेश दिसत होत्या!
थत्ते काल उगाच बोअर मारत होते.... बाकी त्यांचे ते लांबलचक भाषण आणि त्यांना पब्लीकने स्टेजवरुन खाली घेउन येणे स्क्रीप्टेडच असावे!
थत्ते काल दोन वेळा तोंडावर आपटले... एक म्हणजे सोशल मिडियाचा हवाला देउन बाहेर आल्यावर तुम्हाला बघा कायकाय फेस करावे लागतेय असे म्हणून आतल्यांना उगाचच घाबरवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मांजरेकरांनी हे सगळे न्यूसन्स असते वगैरे म्हणून आतल्या लोकांना व्यवस्थित धीर दिला आणि थोडक्यात थत्तेंचा पचका केला (मुळात ते उगीच काहीतरी बोलायची थत्तेना काय गरज होती कुणास ठाउक) आणि दुसरे म्हणजे डोक्याने खेळणाऱ्या मेघा पेक्षा भावनांनी खेळणारा पुष्कर जिंकेल असे म्हणून थत्ते परत एकदा गंडले.... अहो लोक पण बघतायत राव!
ते नेमके उलट होते.... पुष्कर डोक्याने खेळत होता आणि मेघाचा भर भावनांवर आणि माणसे जोडण्यावर होता
मेघाबद्दल इतके लिहलय की आता परत नव्याने काय लिहू.... काल जेंव्हा फिनालेच्या सुरुवातीला ती म्हणाली की आज या इतक्या मोठ्या क्षणाच्या इतक्या जवळ येउन ठेपल्यावर जी अस्वस्थता असायला हवी ती तितकी जाणवत नाही.... शांत शांत वाटतेय!
हे एका उत्तम खेळाडूचे लक्षण आहे.... जेंव्हा परफॉर्म करायचे होते तेंव्हा करुन झालय, १००% देउन झालय आता जो निर्णय होईल तो स्वीकारायचा... बस्स!
(याच्या बरोबर उलट पुष्कर होता.... पूर्ण फिनालेभर तो कमालीचा सैरभैर होता)
घराचे लाइट बंद करताना तिला सई आणि शराची आठवण काढावीशी वाटली.... त्याचवेळी पुष्की तिला म्हणत होता की थांब थांब (एकटीने बंद करु नकोस) मी येतोय! (एक आहे ज्याला लाईट बंद करण्याचा मान स्वताकडे घेण्याची पडलेली आहे आणि एक आहे जिला स्वताच्या यशात आपले बाहेर पडलेले साथीदार आठवत आहेत.... वृत्तीतला फरक बघा!)
थत्तेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर देणारी मेघा जशी आवडली तितकीच बिगबॉसच्या पडद्यामागच्या शिलेदारांना श्रेय देणारी ती एक परिपूर्ण आणि परिपक्व विजेती वाटली..... You deserved it megha!
(स्वताच्या पराक्रमाची टीमकी वाजवत बसणाऱ्या खेळाडूंपेक्षा आपल्या सहखेळाडूना उचलून धरणारे, सपोर्ट स्टाफला क्रेडीट देणारे, ग्राउंडस्मनचे आभार मानणारे आणि प्रेक्षकांसमोर नम्र होणारे खेळाडू/कप्तान लोकांना नेहमीच आवडत आलेत)
मांजरेकरांबद्दल सुरुवातीला आपण सगळेच साशंक होतो.... आता सीझन संपताना हे अवघड आव्हान त्यांनी चांगले पेलले हे आवर्जून नमूद करावेसे वाटते!
खरच तो एक thankless job आहे.... सोशल मिडीयाच्या या गदारोळात ही भुमिका निभावणे नक्कीच सोपे नाही!
त्यातून सतत सलमानशी तुलना (मी देखील केली).... पण लोकांनी मांजरेकरांना या भुमिकेत स्वीकारले आणि याचे क्रेडीट नक्कीच त्यांच्याकडे जाते!
बाकी तो घरातील लाइट बंद होण्याचा क्षण अगदीच टडोपा होता ..... त्या अगोदरचे बिगबॉसचे निवेदनही हृद्य होते!
उन्हाळ्याच्या सुट्टीचे पंधरा वीस दिवस माहेरपणाला आलेल्या लेकींनी, मुलांच्या सुनांच्या सहवासाने, नातवंडांच्या दंग्याने, गप्पागोष्टीनी, उत्साहाने फसफसलेले गावाकडचे घर जसे एकेक मंडळी बाहेर पडतात आणि शेवटच्या पाहुण्याला दारापर्यंत सोडून घरातले आजोबा एकेक दिवा मालवत माजघरात निघून जातात तेंव्हा ते घर कसे दिसते तसले काहितरी वाटत होते जेंव्हा मेघा आणि पुष्कर घराबाहेर पडले, ते सरकते दार बंद झाले आणि त्या बिग बॉस च्या नावाची ती निऑन अक्षरे बंद झाली तेंव्हा!
फारच सेंटी प्रसंग!
बाकी इथे लिहायला, वाचायला मज्जा आली!
आपण जसा विचार करतो तसेच समविचारी लोक बघून अगदी अगदी झाले..... पहील्या दोन तीन ओळी वाचून कुणी लिहले असेल हे ओळखण्याइतपत लोक ओळखीचे झाले
हल्ली तसा मी आयपीएलचा सीझन सोडून फारसा ॲक्टीव्हली लिहित नाही मायबोलीवर पण इथे बऱ्याच पोस्टी पाडल्या (कदाचित Game + Action + Emotion) हे आयपीएल आणि बिग बॉसमधले समान सूत्र यामागे कारणीभूत असावे!
मामी आणि दिपांजली यांच्या पोस्ट खरच एंजॉय केल्या!
मेघाहेटर्सनी मजा आणली.... नाहीतर फारच एकतर्फी झाले असते सगळे प्रकरण!
फारच मोठी झालीय ना पोस्ट? पण 'आपल्या मराठी बिग बॉस' साठी एव्हढ तर पाहिजेच ना!
वाह स्वरूप!! झक्कास पोस्ट!!
वाह स्वरूप!! झक्कास पोस्ट!!
स्वरुप, एकदम मस्त पोस्ट !
स्वरुप, एकदम मस्त पोस्ट !
मामी आणि डीजे ह्यांच्या ही सुरुवातीपासूनच्या पोस्ट्सनी खूप धमाल आणली आणि अन्जू, एक नमूद करायला आवडेल की स्मिताची जी बाजू तू सुरुवातीपासून लावून धरलीस त्याचा स्मिता टॉप टू मध्ये यावी असं वाटण्याला खूप हातभार लागलाय
त्या बिग बॉस च्या नावाची ती
त्या बिग बॉस च्या नावाची ती निऑन अक्षरे बंद झाली तेंव्हा! >> ती सुध्द्दा गदगदल्यासारखी वाटली
स्वरूप मस्त पोस्ट.
स्वरूप मस्त पोस्ट.
काल फिनालेला राजेश आणि रेशम लाम्ब लाम्ब कसे काय बसलेले? एकमेकांशी बोलताना पण दिसले नाहीत.
स्वरुप , मस्त पोस्ट..
स्वरुप , मस्त पोस्ट..
आज मी जुना बिग बॉस चा धागा पाहात होते सगळ्यात पहिला..तर त्यात सुरुवातीला "मेघा धाडे कोण बाई आहे किती लाउड आहे" ई ई कमेंट होत्या..
आणी मग पुढे पुढे त्यांचं स्वरुप बदलत गेलं...खुर्चीसम्राट नंतर मेघा चा गेम सगळ्याना आवडायला लागला..
तो बदलणारा बीबी बघायला मज्जा आली
स्वरूप फारच मस्त पोस्ट. मी
स्वरूप फारच मस्त पोस्ट. मी काल तुला मिस केलं, म्हणतच होते या इतक्या चर्चेत स्वरूप नाही. आता कारण समजलं आणि पटलंही.
स्वरुप छान पोष्ट .. अगदि
स्वरुप छान पोष्ट .. अगदि सगळ्यांच्या मनातलं
राजेश आणि रेशम लाम्ब लाम्ब
राजेश आणि रेशम लाम्ब लाम्ब कसे काय बसलेले? >>> राजेश-रेशम ची स्टोरी तो घराबाहेर पडल्या पडल्या संपली. मधे ते फिल्म प्रमोशन ला आला होता तेव्हाही रेशम कडे अजिबात बघितले पण नाही. फॉर्मल हलो करून मेघाचे कौतुक करत बसला. शनिवार च्या भागात पण जेव्हा सगळे घरात आले भेटायला तेव्हा एकदही रा- रे एकत्र, एकमेकाशी बोलताना दाखवले नाहीत.
आता घरी खेटराने पूजा झाल्यावर पुष्की पण सईला तशीच ट्रीटमेन्ट देताना दिसला तरी नवल वाटू नये
स्वरुप मस्त पोस्ट. पण रे मला
स्वरुप मस्त पोस्ट. पण रे मला काल सुद्धा खूनशीच वाटली. बोलायला जेन्व्हा जेन्व्हा संधी मिळाली तेन्व्हा तेन्व्हा ती ठासवत होती की मेघा प्रामाणिकपणे खेळली नाही.
स्वरूप मस्तच पोस्ट, भारी एकदम
स्वरूप मस्तच पोस्ट, भारी एकदम.
मलापण मेघाहेटर्सची मते शेवटी वळली पुष्करकडे असंचं वाटलं, त्याचा तोटा स्मिताला झाला असावा. पण तरीही पुष्कर दुसरा येऊन सो मि वर फक्त शिव्या खातोय आणि स्मिता तिसरी येऊनही भाव खातेय, कौतुक होतंय तिचे. ही स्मिताची कमाई आहे
.
अन्जू, एक नमूद करायला आवडेल की स्मिताची जी बाजू तू सुरुवातीपासून लावून धरलीस त्याचा स्मिता टॉप टू मध्ये यावी असं वाटण्याला खूप हातभार लागलाय >>> thank u, so sweet of you. माझ्याबरोबर काही जणांना स्मिता आवडायची, नंतर मात्र बऱ्याच जणांना आवडायला लागली. ती nominate झाली की मी काळजीत असायचे सतत तेव्हा मला अनेकांनी धीर दिला, ती सेफ होईल असं म्हणत त्यात प्रामुख्याने पुंबा आणि डीजेचं नाव घेईन मी. अजून पण ज्यांनी धीर दिला त्यांना आणि ह्या दोघांना धन्यवाद.
जसे सैड्या पुष्की सर्वांच्या मनातून उतरत गेले तशी स्मिता स्थान मिळवत गेली. तिच्यावर दोघे खूप खार खायचे, हे स्मिताचं यश आहे.
वेगवेगळ्या कारणाने रे रा grp मधले दिग्गज बाहेर पडत गेले, पण कितीही ठरवून दुस्वास करून स्मिताला बाहेर काढता आलं नाही, महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. पुष्करला पण मागे सारायला हवं होतं ही चुटपूट लागली मात्र मला. खुनशी नजेरेने तिच्याकडे सतत बघणारी सई तिच्याआधी बाहेर पडली याचा विशेष आनंद झाला आणि कोणीही सईचं नाव घेतलं नाही पण स्मिता पुढे जाईल हे म्हटलं त्याचाही फार आनंद झाला मला काल.
मेघाचं स्थान कायम अबाधित राहिले लोकांच्या मनातलं. तिच्या आणि दुसऱ्या नं च्या मतात खूप तफावत असणार नक्कीच. डिक्लेअर करायला हवं होतं. मेघा निर्विवाद जिंकायला हवी हेच मनात होतं. स्मिता दुसरी हवी होती हेही सतत वाटत राहते मात्र.
सर्वप्रथम मेघाचे त्रिवार
सर्वप्रथम मेघाचे त्रिवार अभिनन्दन!!!!
लाईट बन्द करण्याचा क्षण सुरेखच!!!
पुष्करच्या जागी स्मिता हवी होती Top 2 मध्ये. तिची २ लाख देऊन बोळवण केली.
आस्ताद शेवटी शेवटी शान्त शान्त झालाय. नाईस चेन्ज!
ममा जेव्हा राजेशला unfortunately बाहेर पडाव लागल घरातून अस म्हणाला तेव्हा राजेश ची रिएक्शन 'एपिक' होती.
पुष्कर आणि सईची निखळ मैत्री अस big boss म्हणत होत, अन हे नाचत होते romantic गाण्यान्वर!
मैत्री या थीमशी रिलेटेड गाण लावायच होत ना जस की कुछ कुछ होता है मधल ' लडकी बडी अन्जानी है'. परफेक्ट बसत होत हे.
बाकी पुष्कर अख्खया फायनलभर थरथरत होता.
शरा-मेघा चा पिन्गा, आस्ताद- स्मिता, रेशम, ऋजूता हयान्चे परफार्मन्सेस चान्गले होते. ज्यान्नी कुणी जुईला लडकी धाकड है वर परफार्मन्स करायला लावला त्याला माझ्यातर्फे धन्यवाद!
बाकी आरती-भूषण-किशोरच स्किट भारी होत. किशोर ने आऊन्वर केलेले जोक्स आऊन्ना आवडले नाहीत. कश्या तोन्ड पाडून बसल्या होत्या.
कुणी एक नोटिस केल का की, जेव्हा काल मेघावर एलिमिनेशन प्रान्क केल तेव्हा सईला आन्नदाच्या उकळ्या फुटत होत्या. कशी ती मेघाकडे बघत होती.
चला आता भेटूया पुढच्या सिझनला!
मेघाचं अभिनंदन. इथल्या अणि
मेघाचं अभिनंदन. इथल्या अणि एकुणात सगळ्याच सोशल मिडियात चाललेल्या सर्कस वरुन हा निकाल अपेक्षित होता. अॅक्टिंगमध्ये नसला तरी राजकारणात मेघाला भरपुर स्कोप आहे. पोटातली जळजळ शक्यतो पोटातच ठेउन, ओठावर मात्र लोकांना आवडतं तेच आणायचं कसब तिने आत्मसात केलेलं आहे...
बाय द वे, बिग बॉसच्या अगदी
बाय द वे, बिग बॉसच्या अगदी पहिल्या भागाची लिंकच सापडली नाही. दक्षिणाच्या लेखनातही नाही. बिग बॉस १ -१६ मे ला उघडलेला धागा दिसतोय त्याआधीही एक धागा असणार ना ? बिग बॉस एप्रिलमध्येच सुरु झाले.
अर्चना सरकार यांचा पहिला धागा
अर्चना सरकार यांचा पहिला धागा आहे अगो.
ते 'आरारा' म्हणणारी गुजराती
ते 'आरारा' म्हणणारी गुजराती नटी जिंकली होती. दक्षा बेन नाव बहुदा.>>>>
नाही. कसोटी जिंदगी की मधली कोमलिका म्हणजे उर्वशी ढोलकिया जिंकली होती.
त्याच सिरियल मधली श्वेता तिवारी पण जिंकली होती एक सीजन
मी नंतर नाही बघितले, हे
मी नंतर नाही बघितले, हे लोक्स जिंकलेले ते ऐकून माहितेय. जुही परमार पण जिंकलेली.
दक्षाबेन म्हणजे केतकी जोशी ना, ती नव्हती का जिंकली.
मराठी bb ला सैड्या पुष्की
मराठी bb ला सैड्या पुष्की फ्लर्ट आवडतय लोकांना असं का वाटलं. कित्ती टीका होत होती. तरी त्यांना अति फुटेज दिलं bb ने.
मी राहुल रॉय जिंकला आणि तो
मी राहुल रॉय जिंकला आणि तो आशुतोष जिंकला ते हिंदी bb follow केलेलं.
Pages