बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मेघा fans घे अभिनंदन... सगळे biased वागत असून मेघाने सगळ्यांना झुगारून यश खेचून आणलं... पुष्कर आणि मेघा stage वर असताना आदित्य पावसकर मस्त बोलले.. जाम आवडल मला... शिवाय पुष्कर chi आई म्हणाली की या show मध्ये तुझे संस्कार दिसले... तेव्हा मी shocked झाले आणि वाटलं हे बोलण्याची खरच गरज होती??

शेवटी दोघे स्टेजवर आले तेव्हासुद्धा शर्मिष्ठा सोडून एकानेही मेघाच नाव घेतलं नाही. विरोधी टीम स्मिताच नाव घेत होती. नंतर ते ही पुष्करचे नाव घ्यायला लागले.
तर सई सुद्धा पुष्कीच विनर पाहायला आवडेल अस म्हणाली. पुष्करही आस्तादसारखा मित्र कमावला असे म्हणाला.
जिच्या बळावर दोघे पुढे आहे ते दोघे चिटर स पु...यांना चांगलं थोबाडाव अस वाटत होतं.

<<शिवाय पुष्कर chi आई म्हणाली की या show मध्ये तुझे संस्कार दिसले<< अगदी, हे खरंच फनी होतं. Lol

Could not sleep peacefully last night !> > Same here Happy आणि मेघा जिंकली नसती, तर आज आणि पुढचे काही दिवसही शांत झोप लागली नसती Proud >> अगदी अगदी

च्रप्स सोडून द्या.>> +१०० कोल्ह्याला द्रक्षे आंबट
हुर्रे !! मेघा जिंकली!!
पुष्कर आणि मेघा stage वर असताना आदित्य पावसकर मस्त बोलले.. जाम आवडल मला >> + १००
खरेच, खुप छान बोलले.

वा मस्त , मेघा जिंकली खूप आनंद झाला. जणू माझ्यातलंच काहीतरी जिंकल्यासारखं वाटतयं. वर कुणितरी म्हटल्याप्रमाणे मी सुध्दा मेघाला माझ्यात पाहत होते. एवढ्या लोकांच्या नकारात्मक वातावरणात राहून स्वत:च मनोबल जराही ढलू न देता खेलणं, ब्राव्हो मेघा.. तु जिंकलीस अन् तु जिंकलस...

मेघाचे खुप खुप अभिनंदन!! मायबोलीसाठी तिची मुलाखत मामींनी घ्यावी अशी विनंती!
Submitted by पुंबा on 22 July, 2018 - 23:18>>>
म्हणजे अर्णब मोदींची घेतो तसं असणार तर..फायनल कंमेन्ट..

खूप खूप आनंद झालाय मलाही. सर्व मेघा स्पोर्टर्सचे हार्दिक अभिनंदन. नाचो !!!

बाकी मला लोकांना दाखवण्यापुरते सुदधा जासमिन आणि फेलिशा आले नाहीत याचं खूप आश्चर्य वाटतंय. जासमिन ला नक्की खूप जास्त राग आला असणार. ती भेटायला घरात आली होती तेव्हाही अजिबात असलं काही खपवून घेणारी वाटली नाही. भेटायला आल्यावर, केकवर मेसेज लिहून हिंट देऊन, बिबॉ ने जासमिन फेलिशा चा व्हिडीओ दाखवून सुद्धा त्याला शेवटी शेवटी त्यांची अजिबात आठवण राहिली नाही हे अगदीच दिसून आलं. सई डेस्पो झाल्यासारखी वागत होतीच पण याने तरी तोल ढळू द्यायला नको होता हेमावैम. खरं खोटं माहीत नाही पण सोमि वर बरेच जण म्हणत आहेत की हे दोघे मेघा विरोधात गेल्याने हरले ते अंशतः खरं आहे. मेघा सोबत असेपर्यंत त्यांचा फोकस गेम वरून हलला नव्हता तो मेघाच्या विरोधात जाऊन लूजर टीमला जॉईन झाल्यावर पार कोलमडलाच. एक मेघा सोडल्यास इतर लोकांचं नक्की उद्दिष्ट काय आहे असं वाटायला लागलं.

आस्तादला जिंकायचं होतं की नाही ते माहीत नाही पण मेघाच्या प्रतिमेचा उंचावत जाणारा ग्राफ काही अंशी का होईना पण मलीन करण्यात तो यशस्वी झाला. तिचा ग्रुप फोडण्यात यशस्वी झाला. तिला एकटं पाडून पुन्हा एकदा झुंडीने तिच्यावर वार करण्यात यशस्वी झाला. स्मिता ला सगळ्यांचं फेव्हरेट होण्यातच (त्यांच्या गुडबुक्स मध्ये राहण्यातच) समाधान होतं हे तिच्या सुशांतशी बोलण्यातून आणि आत्तापर्यंतच्या वागण्यातून दिसून आलं. ती नक्कीच घरात आणि बाहेरही सगळ्यांची आवडती झाली आहे. शर्मिष्ठा ला तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेलं सगळं विसरायचं होतं. बिबॉमध्ये आल्यावर तिला नक्कीच खूप डायव्हर्ट व्हायला मिळालं असेल सगळ्यांशी फाइट करताना. मेघाला बिबॉ जिंकायचं होतं ते तिला मिळालं. थोडक्यात "जो जे वांछिल.." परिस्थिती.

सई नक्की कश्यासाठी आली होती असा प्रश्न पडावा इतकी ती गेमपासून डेव्हिएट झाली शेवटी शेवटी. तिला फेम हवा असेल तर तो नक्की मिळाला. पण लोकूर फॅमिली ला असा फेम निश्चितच अपेक्षित नव्हता. मेघासोबत असताना म्हणा किंवा समोरचा ग्रुप स्ट्रॉंग असताना तिचे जे दुर्गुण (आळशीपणा, अती लाडवलेली असणे, अहंकारीपणा, तुसडेपणा इ.) झाकले जात होते तेही शेवटी शेवटी उघडे पडले. पुन्हा इंडस्ट्रीत काम मिळवताना त्याला नक्कीच याचा त्रास होणार आहे.

पुष्करचा फोकस मात्र शेवटपर्यंत ट्रॉफीवर होता. त्याला जिंकायचं म्हणून सईचं प्यादं म्हणून वापर करता करता तो इतका वाहवत गेला की त्याने त्याची इमेज गमावली, प्रेक्षकांचा आदर आणि वोट्स गमावले, (जासमिन खरंच राग आल्याने फिनालेला आली नसेल तर) एक सुंदर बायको आणि मुलीच्या विश्वासाला तडा दिला, मेघासारखी मैत्रीण (आणि प्रोड्युसर) गमावली. आणि एवढं करून शेवटी जिंकला नाहीच. ते त्यागराजचं गाणं "साला नशिबाने गंडवलंन्" पुष्करलाच सूट होईल अगदी.

मेघा आधीपासून जिंकण्यासाठीच खेळत होती, तर बाकीचे तिला वाईट कसं दाखवता येईल हेच बघत होते आणि त्याचसाठी खेळत होते. अगदी सई , पुष्करचंही नंतर तेच झाला. सतत मेघा कशी वाईट आहे हाच विषय. अगदी खेळण्यांच्या टास्कलासुद्धा पुष्कर केवळ मेघा म्हणाली आम्ही जिंकू , म्हणून तिला चुकीचं ठरवण्यासाठीच खेळला.
ती जिंकली पण जुई,रेशम तोंड पाडून बसलेल्या. बाकीचे दिसले नाहीत. रेशमने तर सुरुवातीला आऊ आणि मांजरेकर बोलत होते तेव्हाच जाम्भई दिलेली.
असो, मेघा जिंकली मस्त वाटलं.

सईने तिच्या आईबाबांना नक्कीच दुखावलं, त्यांचे चेहेरे सांगत होते, तिचं वागणं पसंत नाही आणि ती पुढे जाणार ही चिन्हे नाहीत ते.

पुष्करने मेघावर डायरेक्ट जे आरोप केले त्यामुळे मेघाविरोधी मतं त्याच्याकडे वळली असण्याची शक्यता आहे.

स्मिता बाहेर पडल्यावर म मां जास्त खुश झाले, कारण शेवटी तिला tont मारला. मला हे दोघेच अपेक्षित होते, गुडी गुडी खेळणाऱ्यांसाठी हा गेम नाही.

अजिबात आजारी न पडणे आणि टास्कस नीट खेळणं ह्यासाठी स्मिताला प्राईझ मिळालं ते बरोबर होतं.

मेघा आणि स्मिता दोघी गोड ग्रेसफुल दिसत होत्या, शेवटी दोघी स्टेजवर असत्या तर कित्ती छान वाटलं असतं.

स्मिता खूप आवडतं असली तरी मेघा पहिली यावी असंच वाटायचं पण स्मिता दुसरी असावी असं कायम वाटायचं.

शेवटी तिघांना स्टेजवर का नाही बोलावलं मग हे बक्षीस स्मिताला तेव्हा द्यायचं आणि 2nd रनर अप घोषित करायचं ना. तिला आधीच बाहेर काढायची काय गरज होती.

मेघा आणि स्मिता खरच खुप छान दिसत होत्या, फिनाले मधे आलेले सगळेच सो कॉल्ड प्रस्थापित जरा आखडु मुडमधेच होते की आपल्यापेक्षा कमी काम केलेली माणस कशी आली बुवा फिनाले मधे , एक्दम खेळकर अ‍ॅटीटुड मधे जरा बोरिन्ग असले तरी थत्तेच होते, आउना कशाच काही पडलेल नाही आहे हे फार पुर्वी सिद्ध झालय, रुतुजाच्या चेहर्‍यावर ती आधी गेल्याची खन्त दिसुन येत होती, सुशान्त, त्यागराज ,जुई असे अनेक जण अजुनही तो राग धरुन पुश्कि-सई-मेघाविषयी आकस धरुन होती,
पुश्की इतका इमोशनली ड्रेन आणि लो कॉन्फिडन्स मधे होता कुणीही एलिमीनेट झाल की हाच रडत होता , कड्यावरुन जस्ट परतुन आलो टाइप भाव , रेशम म्हटली सुद्धा की एवढा काय टेन्स होतोय ( घरी गेल्यावर काय काय वाढुन ठेवलय याचा विचार करत असेल).
सगळ्यात भारी स्मिता होती , एक्दम calm and quiet , सगळ्यानि येवुन कौतुक केल यातच सगळ भरुन पावल मुलिने, निर्गुण निराकार सन्तपदाला पोहचली आहे कन्या कुठेतरी मेघा जास्त पॉप्युलर आहे हे तिने आणी आस्तादने मान्यच केल होत. आस्ताद त्याबद्दल नाराज होता स्मिता नाही, बीग बॉस विनरच्या क्वालिटी मला दिसल्ञा नाहि तिच्यात पण एक उत्तम व्यक्तीचे सगळे गुण आहेत... तिने जरा कॉन्फीडन्स वाढवावा आणि भाषेवर प्रभुत्व मिळवाव , शी विल गो लॉन्ग वे.
सईड्याला अन्दाज आलाच होता ती रेस मधुन बाहेर पडलिये याचा, तिचे पॅरेन्ट प्रचन्ड डिस्टर्ब वाटत होते सै-पुश्की नाटकावरुन अस त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. सईला ममानी सुद्धा बाहेर आल्यावर आडुन सुचवल की तुझा फोकस हलला होता , ते अजुन काहितरी म्हणणार होते पण मधेच ताम्हणकर बाई बोलल्या काहितरी आणि ममा लॉस्ट द ट्रॅक,
पुश्किने स्टेजवरुन आइ-वडिलासाठी गेम खेळतोय सन्गितल आणी एदम आठवुन जस्मिनच नाव घेतल ,
मेघाने बॅकस्टेज क्रुचे आभार मानले, दिवे बन्द करताना सुद्धा ती सई-शराला विसरली नाही दॅट शोज शी प्लेड विथ हर्ट आणि हेड टुगेदर, तिचा फोकस एकही दिवस हलला नाही आणि मी तर काय आत्मशोधाला आले , माझी स्पर्धा माझ्याशीच आहे टाइप मखलाशीही कधी केली नाही. जिन्कायला आणि खेळायलाच आले आहे हे डे-वन पासुन डिक्लेअरही केल होतच.
मधे मधे अप-डाउन करत सिझन सपला , इथल्या चर्चेमुळे तो बघायला मजा आली .

मेघा अन पुष्कर यांनी जेव्हा दिवे बंद केले तेव्हाही मेघानं सई आणि शमाची आवर्जून आठवण काढली. एक हात माझा, एक पुष्करचा, एक सईचा आणि एक शमाचा असं करून तिनं आणि पुष्करनं चारही हातांनी लिव्हर खेचली. इथे मेघा इतरांपेक्षा वेगळी ठरते.

हो मामी, मेघाने कायम सईवर प्रेम केलं. सई दुसरी असती काल, स्वतः च्या वागणुकीने गेली. विनर म्हणून एकदाही तिने काल मेघाचे नाव घेतलं नाही.

ती स्मिताला कित्ती बोलायची, कायम नॉमीनेट करायची, ही विक आहे, जाईलच गृहीत धरून. पुष्करपण सेम पण स्मिता पुढे जात राहिली, माणसं कमवत गेली. ह्या गोष्टीसाठीच जशी सई स्मिताच्या आधी बाहेर पडली, तसाच पुष्कर पण पडायला हवा होता.

अच्छा ओके प्राजक्ता, मला बऱ्याच स्पर्धेत तीनजण स्टेजवर असतात शेवटी, मग इथे का असं केलं असं वाटलं.

स्मिता पैसे घेऊन बाहेर नाही पडली, याचा मला आनंद झाला. भले ती तिथे हरली, ok. पण पैसे घेऊन बाहेर पडली असती तर votes देणाऱ्या प्रेक्षकांचा अपमान झाला असता.

आधी वाटत होतं की स्मिता असायला हवी होती फायनल 2 मधे. कारण ती डिझर्विंग होती. पण नंतर वाटलं बरंच झालं पुष्कर आला. मेघाचा सगळ्यात जास्त अपमान आणि विश्वासघात त्यानेच केला होता. जिंकण्यासाठी तिची इमेज डॅमेज करायला गेला. त्यामुळे तिला जिंकताना सगळ्यात आधी त्यानेच बघायला हवं होतं. खर्रकन् तोंड पडलं असेल. मेघाने काही गमावलेलं नाही. उलट अपेक्षेपेक्षा जास्तच कमावलं आहे. स्मिता सोडून इतर सगळे मात्र सोबत घेऊन आलेलं सगळं अर्ध्यापेक्षा जास्त गमावून गेले. यात रेशम सारखे लोक आहेत ज्यांना फारसा फरक पडत नाही कारण त्यांचं करिअर बर्यापैकी पूर्ण झालंय. फरक पडेल सईसारख्या लोकांना ज्यांनी आपली एक चांगली छाप उमटवणं अपेक्षित होतं. या शो चा फायदा थोडाफार होईलंच सगळ्यांना पण जितका अपेक्षित होता तितका कदाचित नाही होणार.

ज्या कोणाला बिबॉमधून संदेशाची अपेक्षा होती त्यांनी बंगाली मिठाईतील संदेश घेऊन खाणे आणि इतरांना वाटणे.

रेशमला दिला नाही तरी चालेल - तिच्याकडे ऑलरेडी एक आहे. Wink

येस्स मेघा जिंकल्याचा आनंद वाटला. वेल डिजर्वड विन!! पुष्कीच्या आरत्या सतत पाहून चॅनल काहीतरी करून त्याला जिंकवतात की काय असं वाटायला लागलं होतं पण तसे झाले नाही Happy कान्ट बिलिव आय अ‍ॅम सेयिंग धिस पण फिनाले ला मला रेशम आणि मेघा ला बघायला सर्वात आवडले असते. जरा टशन राहिली असती. स्मिता सुद्धा वेल डिजर्व्ड इन टॉप ३. पुष्की आणि सई एकत्रच एलिमिनेट व्हायला हवे होते. सईला काल थत्त्यांनी रिएलिटी चेक दिला होता. त्यामुळे तिने सहज अ‍ॅक्सेप्ट केले एलिमिनेशन. मेघाची फॅमिली छान बोलली. लोकूर मंडळी नाराज होती. पुष्की आज टोटल नर्वस ब्रेकडाउन मोड मधे होता. वेड्यासारखा दर वेळी रडत काय होता. पर्फॉर्मन्सेस मी बहुतेक सर्व फा. फॉ. केले. नंकि - भूशण चा आणि रेशम चा पण जरा एंटरटेनिंग वाटला. जुई नेहमीप्रमाणे वाकड्या तोंडाचा अ‍ॅटोट्यूड घेऊन बसली होती शेवटपर्यन्त. रेशम आणि राजेश मात्र दिलखुलासपणे बोलत होते अन स्मिताबरोबर मेघा किंवा पुष्कीचे कौतुक पण करत होते.
अशारितीने संपले १०० दिवस. शेवटी दिवे बंद करतानाचा सीन टचिंग वाटला. त्या दोघांच्या मनस्थितीची कल्पना येऊ शकते.
एकूण मजा आली इकडे रोज वाचताना अन लिहिताना.
मग आता इथले दिवे कोण बंद करतंय? Happy

मामी Rofl

पियु आणि प्राजक्ता पोस्ट्स आवडल्या.
पुष्कर म्हणजे ना घर का ना घाट का कुत्ता धोबी का झाला. शेवटी शेवटी सई आणि त्याचं काहितरी निराळंच चाललं होतं. आणि ते नसतं सुरू झालं तरिही ते जिंकले नसतेच. पण निदान चांगलं खेळून बाहेर गेले असते तर सईने आई वडिलांचा आणि पुष्किने बायकोचा रोश तरी नसता ओढवून घेतला.
हे म्हणजे तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. त्यात त्यांच्या डान्स ची गाणी म्हणजे जले पे नमक.

मी पहिल्यांदाच बघितलं बिग बॉस. हिंदीतलंही कधी बघितलं नव्हतं.

कधी कधी कंटाळाही आला बघायचा. गुंड लोकं दादागिरी करायचे तेव्हा खूप रागही यायचा. सई-पुष्करनेही प्रचंड बोअर केलं. हा शेवट्चा आठवडा नाहीच बघितलं मी.

मलाही शेवटच्या ५ मध्ये रेशम हवी होती. पुष्करची शेवटी शेवटी अगदी कीव कराविशी वाटत होती. स्मिता जरा बरी वाटायला लागलेली पण ती विनर मटेरियल कधीच वाटली नाही. आस्ताद तर गली का गुंडाच होता शेवटपर्यंत.

बिग बॉस सुरु झालं तेव्हा पहिले दोन तीन एपिसोड मेघाच्या बोलण्याचा अगदी कंटाळा आला होता. अर्थात तिच्या आपलंच म्हणणं लावून धरण्याच्या स्वभावाचा रागही यायचा पण तरीही ती मला खरी वाटली. त्यामुळे पहिल्यापासून मी मनातून आणि नंतर नंतर वोट करून तिलाच सपोर्ट करत होते. इथल्या मेघा हेट्र्सच्या पोस्ट्समुळे या बीबी नां जान आणली.

काही म्हणा , पुष्कर हॉट दिसला चांद मातला मध्ये. एकदम आग परफॉर्मंस झाला.
सई त्याच्या नादी न लागती तर आज मेघाला ट्फ फाइट असती. पुष्करही वाया गेला आस्तादच्या नादी लागुन.

पुष्कर आणि सई एकमेकांच्या नादी लागून आणि मग मेघाच्या विरुद्ध जाऊन फुकट गेले. मेघाने आस्तादला नॉमिनेट केल्यानंतर त्यांचा डाऊनफॉल सुरु झाला. ते तिघं समोरच्या ग्रूपमध्ये सगळे गुंड असूनही त्यांना पुरून उरले होते. अगदी त्यांच्या नाकात दम आणला होता. असं असताना आपल्याच ग्रूपची कार्ड्स/सिक्रेट्स दुसर्‍या ग्रूपसमोर उघड करणं हा निव्वळ बालिशपणा होता.

ते दोघेही तेव्हापासूनच मनातून पुर्ण उतरले. त्यामुळे ते दोघे बाहेर पड्ल्यावर मला आसुरी का काय म्हणतात तसा आनंद झाला.

मेघा जिंकली Happy

खूप बरे वाटले. तिची अव्ही दाखवल्यावर ती रडत होती तेव्हा तिला हग करावेसे वाटलेले. खूप वेळा माझेच डोळे पाणावले.

ज्यांनी खरंच संघ्र्ष केलाय, आपल्याच माणसांकडून दुरावा अनुभवलाय, पण आपला रस्ता सोडला नाही, ते मेघाची अवस्था नक्कीच समजू शकतील
फळ तर मिळणारच होते.,,,,,,,,,,,,,,,, Happy

मेघा, हॅपी फॉर यू! लव्ह यू Happy

कोणी observe केल का? मेघा la trophy दिल्यानंतर stage वर blast झाला तेव्हा पुष्कर खाली बसलेला एकदम उठून स्टेज वर आला... अन्‌ सगळ्यात मोठा पचका म्हणजे ममानी त्याला खाली पाठवलं... Lol

हो ना, थत्त्यांनी येऊन सईच्या फुग्याला टाचणीच लावली. आणि किती टेपा लावत होते ते! काय तर म्हणे अर्धा महाराष्ट्र मेघामागे उभा आहे आणि अर्धा पुष्करमागे. आणि तरीही १% उरलेत ते मेघाकडे गेले तर मेघा जिंकेल आणि पुष्कीकडे गेले तर पुष्की जिंकेल. अशा तर्‍हेने काकांनी १०१% च्या चोख हिशोब सांगितला.>>>> थत्ते यांनी बरोबर सांगितल होत मग...
खुप छान वाटलं काल मेघाचं यश पाहुन ... मस्तच Happy

मला खूप खूप लिहावेसे वाटते मेघा साठी..पण कसे, काय, किती तेच समजत नाही...खूप खूप छान वाटले मेघा जिंकली याचे...luv you मेघा ...

Pages