Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिला धागा दक्षिणांचा नसतोच.
पहिला धागा दक्षिणांचा नसतोच. एखादा धागा 2000 जाऊ लागला की त्या पार्ट 2 काढतात.
मेघाच खुप अभिनंदन.... !!!
मेघाच खुप अभिनंदन.... !!!
स्वरूप फार सुंदर पोस्ट!
स्वरूप फार सुंदर पोस्ट!
मी इथे लिहिले फार नाही पण तुझ्या, मामी, प्राजक्ता, डीजे, स्मिता_श्रीपाद, मी_चिन्मयी यांच्या पोस्ट्स वाचायला मजा यायची!
मेघाच जिंकायला हवी होती व तीच जिंकली हे पाहून बरे वाटले. मनात कायम चॅनल काहीतरी सेटिंग लावून घोळ घालणार असे वाटत होते शेवट पर्यंत.
हिंदी बिबाॅचा एक सिझन विंदू
हिंदी बिबाॅचा एक सिझन विंदू दारासिंग जिंकला होता.
पहिला धागा दक्षिणांचा नसतोच.
पहिला धागा दक्षिणांचा नसतोच. एखादा धागा 2000 जाऊ लागला की त्या पार्ट 2 काढतात.
Submitted by च्रप्स on 23 July, 2018 - 19:42>>>
अगदी बरोबर!!!

सगळ्यांच्या कंमेंट्स छान आहेत
सगळ्यांच्या कंमेंट्स छान आहेत. स्वरुप, पियू , सानी, दीपांजली, मामी, प्राजक्ता , maitreyee यांच्या कंमेंट्स विशेष आवडल्या. ३ महिने हा बाफ खूप एन्जॉय केला. आपल्यासारखे समविचारी आणि समान आवडीचे लोक आणि त्यांच्या कंमेंट्स, चर्चा वाचायला छान वाटले. गेले किती तरी वर्ष मी मायबोली ची सदस्य आहे. पण अगदीच क्वचितच कंमेंट्स लिहिल्या आहेत. थोड्याफार कंमेंट्स या बाफ वर केल्या आणि ROM mode मधून थोडी बाहेर आले.
मी मेघा फॅन आहे. सगळ्या मेघा फॅन्सचं पुन्हा एकदा अभिनंदन !!!
मेघाबद्दल खूप काही फीलिंग्स आहेत. पण शब्दात व्यक्त करता येत नाही आहेत. I just loved her.
मी मलाच तिच्यामध्ये मध्ये बघते असं काहीसं वाटत होतं. एक इमोशन्स चा Roller-coaster होता .तिच्याबाबती काही वाईट झाल्यावर मूड खूप खराब होत असे . गेले आठवडाभर खूप तगमग झाली specially थत्तेंची मुलखात बघून जवळजवळ BB तिच्यावर अन्याय करणार आणि पुष्करला जिंकून देणार असंच वाटत होतं. ती जिंकली हे कळेपर्यन्त धडधड होत राहिली . मी उसगावात असते . त्यामुळे टीव्हीवर बघायला इथल्या रात्रीच बघू शकत होते आणि फिनाले चा एपिसोड apalimarathiwar yayala सुध्दा २ तास तरी जाणार होते . ती जिंकल्याचं इथेच कळलं आणि आणि मग आनंदाचा क्षण आला. ती हरली असती तर खूप दुःख झालं असतं .
तिच्या खालोखाल शरा आणि स्मिता आवडल्या .
आता काय ? Going to miss BBM and Megha.
या पुढे हि BBM होतील पण माझ्या आणि अनेकांच्या मनातील मेघाची जागा अढळ राहील !!!
माझा सपोर्ट स्मिताला होता पण
माझा सपोर्ट स्मिताला होता पण पुष्कर समोर आल्याने मेघाच जिंकावी असे वाटत होते. त्यामुळे ती जिंकल्याने बरे वाटले.
बाकी मेघाच्या बर्याच गोष्टी आवडल्या नाहीत पण निकाल जाहीर करण्याआधीचे तिचे मनोगत खूप आवडले. विशेष म्हणजे तिने मी फक्त माझ्या फॅमिलीसाठीच नाही पण हा शो घडवण्यासाठी ज्यांचा हात भार लागला आहे, जे लोकं आमच्या बरोबर दिवसरात्र मेहनत करतात त्या पडद्यामागच्या कलाकारांसाठी पण मी खेळले असे सांगितले ते खूप आवडले. तिने ते मनापासून सांगितले असे वाटले.
बाकी मेघाच्या बर्याच गोष्टी
बाकी मेघाच्या बर्याच गोष्टी आवडल्या नाहीत पण निकाल जाहीर करण्याआधीचे तिचे मनोगत खूप आवडले. विशेष म्हणजे तिने मी फक्त माझ्या फॅमिलीसाठीच नाही पण हा शो घडवण्यासाठी ज्यांचा हात भार लागला आहे, जे लोकं आमच्या बरोबर दिवसरात्र मेहनत करतात त्या पडद्यामागच्या कलाकारांसाठी पण मी खेळले असे सांगितले ते खूप आवडले. >>या आणी अशा अनेक छोट्या छोट्या गोश्टीनी ती वेगळी ठरते इतरापेक्षा... काल तिला विनर अनाउन्स केल्यावरही सगळे मराठी ताठा दाखवत बसुन राहिले , निदान तोन्डदेखल हसुन तर दाखवायच, हिन्दीत याउलट असत अगदी फिनालेचा विनर डिक्लेअर झाला की सगळे स्पर्धक स्टेजवर जाउन हसुन तो क्षण तरी सेलिब्रेट करतात मग ,भले बीगबॉस हाउस मधे पार ३६चा आकडा असला तरी आणी रिअल लाइफ मधे एकमेकाच तोन्डहि परत बघणार नाही अस असल तरी .
त्या थत्तेच भाषण फारच मोठ झाल्याने नेमका शेवटचा मोमेन्ट आवरता घ्यावा लागला बीबॉला काय हे! थत्तेना आवरायच की आधिच
वैयक्तिक मत :
वैयक्तिक मत :
शमा उर्फ शर्मिष्ठा : wild card entry हे कायमचे पालुपद मागे. स्वतः खेळून सुद्धा मेघाच्या मैत्रीमुळे स्वतःचे कर्तृत्व झाकलेले. मनमिळावू , शेवटच्या आठवड्यात safe राहायचा खूप प्रयत्न . फायनल मधले पहिले नॉमिनेशन
आस्ताद : मितभाषी , विचारी , संयमी व्यक्तिमत्व . सुरवातीच्या आठवड्यात इमेज खाली - महिला वर्गाला टोचून बोलणे, आवाज वाढवून संभाषण वगैरे वगैरे . शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी सुधारणा . छाप पडून जास्त व्होट गोळा करण्यात अयशस्वी. खूप लोकांना वाटत होते हा जिंकेल .
सई : धडाकेबाज व्यक्तिमत्व . Dont Give UP attitude. बहुतंवशी वेळी प्रकाश झोतात राहिली. थोडी इमोशनल. उठसुठ जादू कि झप्पी इमेज भोवली .
स्मिता : हरहुन्नरी धडाकेबाज व्यक्तिमत्त्व . बऱ्याच अंशी गोंधळलेली . अचूक शब्दात स्वतःला न मांडता आले . एकमेका विरोधात बोलण्यात आणि पाठीमागे नाव ठेवण्यात अजिबात स्वारस्य नसलेली आणि तशी तयारी हि नसलेली . शेवटच्या आठवड्यात बऱ्या पैकी प्रभाव . आस्ताद नंतर हिच्या कडूनच अपेक्षा होत्या
पुष्कर : अतिशय चांगला खेळाडू . उत्तम प्रकारे सर्वाना मान . बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली या शो मध्ये . फारच इमोशनल वाटला . उठसुठ जादू कि झप्पी मुळे महिला वर्गाची नाराजी ओढवली (सर्व बीबी सदस्यांची हीच मते)
मेघा धाडे : पहिल्या दिवसापासून सतत बडबडून लक्ष्यात राहण्याचा प्रयत्न . सुरवातीच्या आठवड्यात magical trio ने साऱ्या स्पर्धकांवर मात . एकटे पाडल्यानंतर हि शर्मिष्ठा च्या साथीने किल्ला लढवला . साम , दाम , दंड , भेद वापरून लढाई जिंकली . खर तर हेच या खेळातून अपेक्षित .
बिग बॉस च्या पहिल्या पर्वातील सर्व सदस्यांचे आणि विजेती मेघा धाडे यांचे मनपूर्वक अभिनंदन !!!!
मेघाचं खूप खूप अभिनंदन !!
मेघाचं खूप खूप अभिनंदन !!
मला राहून राहून वाटतं की मेघा ने आस्ताद सपोर्ट द्यायचानिर्णय हा खूप विचार करून घेतला असावा कारण जर तिने तो निर्णय घेतला नसता तर मेघा पुशकर सई यांचा ग्रुप तसाच राहिला असता आणि या तिघांत मतविभागणी होऊन आस्ताद किंवा त्यांचा ग्रुपमधले इतर कोणी विजयी झाले असते
घना अगदी अगदी. असं वाटतं की
घना अगदी अगदी. असं वाटतं की मेघाने अगदी वेळकाळ बघून स्ट्रॅटेजी म्हणून ग्रुप फोडला. तिला माहीत होतं की याचे परिणाम काय होऊ शकतात. सेम शिल्पा शिंदे स्ट्रॅटेजी. मान गये उस्ताद. इतकी दूरदृष्टी असणारी व्यक्ती जिंकायला हवीच होती
असं वाटतं की मेघाने अगदी
असं वाटतं की मेघाने अगदी वेळकाळ बघून स्ट्रॅटेजी म्हणून ग्रुप फोडला. तिला माहीत होतं की याचे परिणाम काय होऊ शकतात. सेम शिल्पा शिंदे स्ट्रॅटेजी. मान गये उस्ताद. इतकी दूरदृष्टी असणारी व्यक्ती जिंकायला हवीच होती>>>> येस्स. त्यावेळेसच मी बोललेली की मेघाने हे मुद्दाम केले असेल कॉर्नर होऊन सिंपथी घेण्यासाठी. तिच्या बर्याच खेळात मला शिल्पा शिंदेची झलक दिसायची किचन डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणे हेही त्यातलेच. मुळात ती जिथे काम करायची तिथे काहीतरी कंटेट द्यायची शोसाठी त्यामुळे ते दाखवावे लागायचे. बाकीचे सुद्धा दिलेले काम करत असतीलच पण कंटेट नसल्यामुळे त्यांना फुटेज नाही मिळाले.
Megha really deserved
मेघाने अगदी वेळकाळ बघून
मेघाने अगदी वेळकाळ बघून स्ट्रॅटेजी म्हणून ग्रुप फोडला. >>> असू शकेल. शेवटी २ आठवडे तिचा गेम पटला नव्हता मलाही, पण असेल अशीच स्ट्रॅटेजी. मेक्स सेन्स. त्यानंतरच सई पुष्की च्या लोकप्रियतेला गळती लागली आणि मेघाची आणखी वाढली. नंतर जे जे घडले ते सर्व, सई पुष्की बरोबर सगळे घर तिच्या विरुद्ध जाईल आणि कॉर्नर केल्यामुळे इतकी जास्त सिंपथी मिळेल इतके सर्वच नसेल कदाचित तिने ग्रूहित धरले. कारण इतके सगळे प्रेडिक्ट करणे अवघडच आहे. पण ठराविक दिवस राहिले की इन्डिविजुअल गेम खेळायचा असा ठोकताळा नक्कीच असणार तिचा.
स्वरुप, मस्तं पोस्ट !
स्वरुप,
, मी फक्तं डोक्याने खेळले असते तर जिंकले नस्स्ते, डोकं आणि ह्र्दय दोन्ही वापरल म्हणून ट्रॉफी हतात आहे 
मस्तं पोस्ट !
मेघाचे जे इंटरव्ह्युज येत आहेत, खरच ती सोडून कोणीच डोळ्यासमोर येत नाहीये विनर म्हणून !
इतके टु द पॉइंट प्रत्येक मुद्दा जसा खोडून काढून बोलतेय , अशी विनर बघून कलर्स नक्कीच खुष -समाधानी असणार !
मेघाने जाताजाता ममां चा सुध्दा समाचार घेतला
थँकलेस जॉब आहे होस्ट चा मान्य आहे पण पुढच्या सिझनला होस्ट मात्रं प्लिज बदलावा.
ममा बायस्ड आहेतच शिवाय त्यांना कोणीच घाबरत नाही, मराठीही बेकार आणि काहीच वचक नाही त्यांचा !
पुढच्या सिझनला होस्ट मात्रं
पुढच्या सिझनला होस्ट मात्रं प्लिज बदलावा.>> तस असेल तर मेघालाच करा होस्ट नाहितरी सगळे सतत म्हणतात तिचा सगळा अभ्यास झालाय बीबॉचा
बाकी कुणाच्या मुलाखती आल्या
बाकी कुणाच्या मुलाखती आल्या नाहीयेत का? सई ची ऐकण्यात इन्टरेस्ट आहे मला. तिच्या मते व्हॉट वेन्ट राँग. इ.
असेल तर मेघालाच करा होस्ट
असेल तर मेघालाच करा होस्ट नाहितरी सगळे सतत म्हणतात तिचा सगळा अभ्यास झालाय बीबॉचा
<<
गुड आयडीआ
अॅक्चुअली ती हखा सुध्दा चालेल, पर्सनॅलिटी डॉन सारखी आहे आणि ज्या प्रकारे तिने तिच्या पहिल्या एपिसोडला डॉमिनेट करत एकेकाला सुनावलं, सगळे हाउसमेट्स बोलती बन्द होऊन गप्प होते !
वर कोणीतरी लिहिलय त्या
वर कोणीतरी लिहिलय त्या प्रमाणे सईचे पेरेंट्स डिसपॉइंटेड वाटले, वीणाताई तर समारोपाची भाषा करत होत्या, १०० दिवस घरात राहिली हेच विनर झाल्यासारखे आहे वगैरे !
वीणाताईंनी खूप मदत केली तिला बाहेरून , डॅमेज कंट्रोल प्रयत्न केला इंट्रव्ह्युज देऊन , घरी आल्या असताना योग्य निरोपही दिला होता पण पोरीचा फोकस आत पूर्णच हलला आणि ती जास्तच निगेटिव होत गेली !
डि जे ... सहमत...
मेघाच पुन्हा एकदा अभिनंदन...
मेघाची युट्युबवर आताच मुलाखत
मेघाची युट्युबवर आताच मुलाखत बघितली. सई-पुष्करला सही उत्तर देणारी, श राच्या मैत्रीचा सन्मान करणारी, BB ची ट्रॉफी श राचीही आहे म्हणणारी, स्टेजवर अगदी सर्वांची आठवण ठेवुन आभार मानणारी, स्मिताला तुझ्याशी जरा उशिराच मैत्री झाली असे मान्य करणारी (असे झाले असते तर...) मेघा आवडलीच. That's my girl... !
I wish her all the best and success in her future endeavors.
मांजरेजरांची मुलाखतही आली आहे
मांजरेजरांची मुलाखतही आली आहे

मांजरेकरांचे ओरिजनल टॉप ३ राजेश सुशान्त रेशम होते म्हणे
नंतर २ आठवड्यानंतर मेघा असणार हे वाटले म्हणे त्यांना पण स्मिता मात्रं अजिबातच एक्सपेक्टेड नव्हती त्यांना, ती लग्गेच एलिमिनेट होईल असं वाटायचं असं कितीतरी वेळा म्हंटले मुलाखतीत ते !
मेघाची मस्त मुलाखत :
मेघाची मस्त मुलाखत :
Megha Dhade | Big Boss Marathi Winner | Interview : https://www.youtube.com/watch?v=LiMFy5lWVF8
अजून एक, ज्यात ती सई आणि पुष्कर कसे चुकीचे वागले ते बोलली आहे
Bigg Boss Marathi winner || Megha Dhade: Sai and Pushkar tarnished my image || Full Interview : https://www.youtube.com/watch?v=N_hfR4CBPAU
बाकी कुणाच्या मुलाखती आल्या
बाकी कुणाच्या मुलाखती आल्या नाहीयेत का? सई ची ऐकण्यात इन्टरेस्ट आहे मला. तिच्या मते व्हॉट वेन्ट राँग. इ.>>>> सई ची मुलाखत नाही दिसत आहे कुठे युट्यूब वर . मेघाच्या बऱ्याच आहेत .वेगवेगळ्या news आणि youtube चॅनेल्स बरोबर (immediately after event आणि २३ ला) , पुष्की आणि स्मिता ची आहे immediately after event . शराने २३ ला घरी जाऊन दिलेला विडिओ आहे पण सई चा कुठेच video नाही.
मेघा मेघा मेघा, तिच्याशिवाय
मेघा मेघा मेघा, तिच्याशिवाय मराठी bb चा विचार करता येणार नाही, तिने गाजवला हा सिझन. असा कोणी पुढे गाजवेल की नाही शंका आहे. पुढच्या वर्षी हिंदी bb त सन्मानाने बोलावतील तिला, यंदा कपल शो आहे हिंदी.
स्मिता माझ्यामते झाकलं माणिक होती आणि तिला मी आणि काही जणांनी इथे ओळखलं होतं. बाकी म मां, सई, पुष्की आणि बरेच प्रेक्षकही तिला तुच्छ समजत होते. स्मिताचा प्रकाश हळूहळू पडलाच. मेघा म्हणायची रेशम नको, ही चालेल एकवेळ फिनालेला. सई सर्वात पाण्यात बघायची तिला, बिकिनी घालून पण हिला वोटस मिळणार नाहीत असं म्हणालेली, गृहीत धरून बसलेली ही जाणारच. त्याच सईला स्मिताच्या आधी बाहेर पडताना बघितलं, तो मोमेंट माझ्यासाठी प्रेशीयस होता. स्मिताने कडवटपणा ठेवला नाही कोणासाठीही मनात, मेघा जिंकली तेव्हा ती ओरडून टाळ्या वाजवताना दिसली.
माझी पोस्ट पहिला सिझन आठवण काढताना मेघा बरोबर, स्मिताची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोणी कितीही नावं ठेवली तरी bb च्या मनात तिने स्थान निर्माण केलं, ह्या मुलीने कधीही सिपंथी घेतली नाही, कुठलं कार्ड खेळली नाही म्हणूनच आजारी न पडता उत्तम टास्क खेळल्याचं बक्षीस bb ने तिला द्यायचं ठरवलं. बाकी नाव आस्तादचं जास्त पुढे आले.
माणसं फार ओळखता येत नाहीत मला पण स्मिता मला आवडायची, ती झाकलं माणिक वाटायची हे अतिशय योग्य होतं. मी कायम तिला दुसऱ्या स्थानावर बघितलं. मेघालाच पहिल्या नंबर वर बघितलं.
मेघा एकदम कम्पोज्ड आणि लेव्हल
मेघा एकदम कम्पोज्ड आणि लेव्हल हेडेड बोलली आहे. मस्त.
पुष्की आणि स्मिता ची आहे
पुष्की आणि स्मिता ची आहे immediately after event . शराने २३ ला घरी जाऊन दिलेला विडिओ आहे पण सई चा कुठेच video नाही. >>> लिंका द्या ना
पुष्कीचा tv वर बघितला, त्याचं
पुष्कीचा tv वर बघितला, त्याचं मत ठाम तिथली मेघा फेक, नाटकी. सई pure soul
स्मिता पण छान बोलली, इथपर्यंत येईल ती हे imagine तिनेही केलं नव्हतं. बाहेर तिच्यासाठी काम करतायेत एवढ्या प्रमाणात मित्र मंडळी, हे तिला एवढं माहिती नव्हतं आणि प्रेक्षकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला, त्याचा तिला आनंद झाला.
कनफुज्ड नाहीये मी, घरात कोणी कोणाबद्दल निगेटिव्ह बोललेलं आवडायचं नाही फार तिला, ती स्वतः negative बोलणं टाळायची म्हणून ती फक्त हो का, असं का. मला नाही माहीती असं दाखवायची, असं म्हणाली. खरं खोटं माहिती नाही पण एव्हीत bb पण म्हणाले कोणाच्या मागेही तुम्ही कधी वाईट कोणाला बोलला नाहीत, त्याअर्थी खरं असावं कारण झोपे व्यतिरिक्त 14, 15 तास हे लोक्स कसे वागतात हे bb च बघतात, आपल्याला एडिट करून दाखवतात.
पण स्मिताची प्रतिमा बाकीच्यांनी जाऊदे bb ने तरी शेवटचे तीन आठवडे positive केली, म मां ना चांगलं म्हणायला लावलं तिच्याबद्दल. त्याअर्थी bb ना स्वतः ला ती फायनलला हवी होती, हे सिद्ध झालं.
अवचट यांनी शेवटचे तीन मे स पु
अवचट यांनी शेवटचे तीन मे स पु असतील संगीतलेलं, त्यांचं ग्रहमान आहे, चला स ऐवजी स्मिता गेली पुढे हे मस्त झालं.
मेघाने अगदी वेळकाळ बघून
मेघाने अगदी वेळकाळ बघून स्ट्रॅटेजी म्हणून ग्रुप फोडला. >>> त्या आधीपासूनच सई पुष्करचं तिच्याबद्दल आपसात आणि विरुद्ध टीमकडे जाऊन गॉसिपिंग करणं चालू झालं होतं हे तिला कळत असेलच की. हे मेघाने मुद्दाम केलं असेल किंवा नसेल पण दोघांनी आपणहून धोंडा पाडून घेतला. मेघाचं 'मी माझी संभाव्य उमेदवारी आस्तादला दिली' हे लॉजिक तसं विचारांती पटवून घेता येण्याजोगं होतं. शिवाय नंतर ती पुष्करच्या बाजूने खेळली ही चुगली तर पुष्करने स्वतःच केली. म्हणजे ती आपल्या टीमशी डिसलॉयल नव्हती. तिथेही तिने तेच लॉजिक कंटिन्यू ठेवलं की उमेदवारी करता त्याला मत दिलं पण कॅप्टन आपल्याच ग्रूपचा व्हायला हवा. जर सुरुवातीचा धक्का ओसरुन गेल्यावर सईने समजुतीने घेतलं असतं तरीही ती टॉप टू मध्ये असती आज. पण खरोखरच सगळ्यांना त्यानंतर मेघाची प्रतिमा खराब करण्यावाचून दुसरं काही दिसतच नव्हतं. तिचं फिनालेसाठी श रा चं नाव घेण्यामागचं लॉजिकही एक मत म्हणून पटवून घेण्यासारखं होतं ( शिवाय सईने फक्त पुष्कीचंच नाव घ्यायचं आणि मेघाने मात्र दुसरं घ्यायचं नाही हे दुटप्पी धोरण सोडाच ) पण तिथेही तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं कुणी. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांची सहानुभूतीही मेघालाच होती असं एकंदरित दिसत होतं.
) योग्य तो बोध कधीच घेतला नाही. ती सतत सांगत आली की मूळ स्वभाव बदलणे शक्य नाही. आपण एकमेकांना जसं आहोत तसंच अॅक्सेप्ट करुया आणि एकमेकांना धरुन राहूया. आणि ती तसंच वागली. सई-पुष्कर, आऊंचे दुर्गुण दुर्लक्ष करुन त्यांच्याशी प्रेमाने वागली आणि विरुद्ध टीमकडे गॉसिपही केलं नाही. भले ती स्ट्रॅटेजी असेल पण शंभर दिवस तिला ती सातत्याने अंमलात आणता आली ह्याचं तरी क्रेडिट द्या तिला.
गंमत म्हणजे मेघा शब्द फिरवते म्हणणार्यांनी तिच्या बोलण्यातून ( तिच्या अति बडबडीमुळे विटून बहुतेक
मेघा सुरुवातीपासून विजेतेपदाची प्रबळ दावेदार होतीच पण बाकीच्यांनी खुजेपणा दाखवून तिचा विजय फारच सहजसोपा आणि एकतर्फी करुन टाकला
आता तिच्या मुलाखतीही मस्त ग्रेसफुली देतेय ती !
सई आता ' i don't trust you
सई आता ' i don't trust you anymore. And i don't want to talk to you' मोड मधे गेली असेल. सोमिवरच्या कमेंट्स बघून आई-वडीलांनी समाचार घेतला असेल. आणि आता पुष्की पण नाही हग करायला.
खूप चांगला प्लॅटफाॅर्म मिळालेला तिला फॅनबेस बनवायला, उलट हेटर्स जमवून आली.
Pages