बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता किती क्युट आहे, सगळे तिची प्रशंसा करतायेत बघून किती शॉक दिसतेय, मजा तर बाकीच्या तिघांचे चेहरे पाहून येतेय जेव्हा सगळे फायनल 2 मध्ये स्मिताचे नाव घेतायेत

सई ताम्हणकर कसली बारीक झालीये. व्वाव.
>>>>>>

नका हो नाव काढू... कळवळून विनंती आहे. तो धागासुर कुठूनही वास काढत धडकेल इथे.

आताच्या एलिमिनेशन राउंडकरता सई ताम्हणकर आली होती आणि अॅक्टिविटी एरीयात बझर राउंड झाला. अजून रिझल्ट दाखवला नाहीये. ब्रेक झाला आहे पण सई बाहेर पडली असणार.

स्मिता बाहेर ...एकलव्य>>>अरेरे मी वोट केलं होतं स्मिताला बिबॉ बघत नव्हते तरीही. मेघाच विनर हे नक्की आता...

एकलव्यचा खबरी भारी आहे, लग्गेच बातम्या देतो. सईच्या जाण्याची बातमी त्यांनी मागेच दिलेली

मेघा आणि स्मिता आल्या तर दोम्ही ग्रुप मधले एकेक representative आल्यासारख होइल, काल सुशान्त कितै वेळा स्मिताला काय काय सान्गत होता,

Pages