बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग एकालाच ऑफर करतात. सर्वांना बसवून एक कोणी घेऊन बाहेर जाऊ शकतो. ऑफर सर्वांपैकी एक कोणी स्वीकारू शकतो, तगडी रक्कम असते हिंदीत, इथे माहिती नाही.

तसं स्मिताने स्वीकारू नये, कारण पैसे ती इथे असलेल्या सर्वांत जास्त कमावते बहुतेक. पण इथे स्पर्धेत पुढे गेली तर मान मिळेल तिला.

शरा करेल मग कदाचित क्विट कारण ती सोडून बाकी सगळ्यांचं पॉसिबल विनर म्हणून नाव घेतलं गेलय, वाइल्ड कार्ड एंट्रीला चान्स कमीच असतो तसाही जिंकायला !

पत्रकार असे काय डमीज सारखे दिसत आणि वागत होते ?! रस्त्यावरून कोणीतरी रँडम माणसे धरून आणलीत असे वाटले मला Proud
कोणीच काही स्मार्टनेस, अग्रेशन तर सोडाच पण फॉलो अप क्वश्चन्स पण नव्हते विचारत!! Uhoh नो वंडर प्रेस कॉन्फरन्स काही फारशी रंगली नाही.

अगं या टिव्हि शो चे पत्रकार असेच नवे असतात. तरूण होतकरू मंडळींची मांदियाळी जमली होती. पण जेन्युइन होते कारण मेघा एका कोणाला तरी ओळखत होती असं दिसलं आणि एकीनं ती लोकमतची पत्रकार आहे असं सांगितलं.

पुष्करला तर मेघाविषयी किती वाईट बोलू नि किती नको असं झालेलं. त्याची बॉडी language कशी होती. मेघा जिंकली तर वेडा होईल तो.
बाकी सई बेक्कार तोंडावर पडली. तिला वाटलंच नव्हतं कि हे तिच्यावर उलटेल म्हणून. सगळा एपिसोड नाही अपलोड झाला आज. तुकड्या तुकड्यामध्ये झालाय.

पत्रकार रजत शर्मा, अर्नव गोस्वामी किंवा निखिल वागळे सारखे हवे होते. पुष्कर रडलाच असता मग. Lol
शरा आहे काय नाही काय सारखंच झालंय. त्यापेक्षा एलिमिनेट झाली असती तरी चाललं असतं. फेसबुक पेजवर तर मेघाच्या कौतुकापेक्षा सई-पुष्करवर टीकेची झोड ऊठलेय. पुष्करची चांगलीच तंतरलीये.

पत्रकार ज्येनुईन होते, त्यांना कदाचित मर्यादा टाकल्या असतील. काही tv वरचे ओळखीचे होते. नावं पण माहीतेयत मला पण आत्ता आठवत नाहीयेत. सईला पापात सहभागी म्हणाला तो एबीपी माझा वर असायचा, किंवा आहेही अजूनही.

पत्रकार परिषद लुटुपुटूची झाली तरी त्यात परत एकदा मेघा छा गयी. हसायचं असेल तर पाच मिनीटं ब्रेक घेऊ म्हणत सगळ्यांची बोलती बंद केली. सई सटकन जमीनीवर आली परिषदेनंतर आणि मेघाशी पॅच अप च्या मोड मधे गेली. पुष्कर आता पुरता भंजाळलाय. सई पॅच अप करु पाहते जाणवताच परत एकदा insecure झालाय.
आता मेघाच जिंकावी असं वाटतंय..

असेल असेल Happy मी मराठी चॅनल्स बघितलीच नव्हती आतापर्यन्त फारशी म्हणुन वाटले असेल तसे. पण विअर्ड वाटले खरे. मला आपली मस्त प्रश्नांची सरबत्ती, उलटतपासणी अपेक्षित असावी.
पुष्कर मूर्ख वाटत होता. मला माफ करा मी असाच आहे असे शेवटी बडबडायला लागला तेव्हा वेडसर वाटत होता. इतके काये सारखं तेच तेच.
आस्ताद त्याच्यापेक्षा खूप बरा वाटायला लागलाय.

बिग बॉसनी माणसातले अनेक नमुने दाखवले मात्र, त्यांचा प्रवास, वावर, त्यांच्या वागणुकीनुसार प्रेक्षकांची बदलत जाणारी मतं सर्वच. माझी स्वतः ची मतं बदलत गेली. आवडते नावडते झाले, नावडते आवडते झाले. काही जणांचं स्थान आहे तसेच राहिलं.

नावडतीचं मीठ अळणी आणि आवडत्याचं सर्वच उत्तम ह्या दृष्टिकोनातून मीच काय, बऱ्याच जणांनी इथल्या बघितलं नाही, बरेच जण मला तरी न्यूटरल वाटले बऱ्याच अंशी. पर्सनल मत. बऱ्याच जणांनी सर्व बाजुंनी विवेचन केलं, जे जे बघितलं त्याचं.

मेघाचा सोमिवर अक्षरशः उदो उदो चालला आहे.. याच श्रेय मेघापेक्षा स,पु आणि आ ला जास्त आहे... तीला फेक म्हणून दाखवताना ते विसरलं की चार बोटं स्वतःकडे आहेत आणि ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले..

मेघाच्या हजरजबाबीला पर्याय नाही.. तीचा तो उपजत गुण आहे.. जेव्हा प्रत्येकाला तुम्हाला इतरांना भेटायला आवडेल का? तर मेघाचे उत्तर मस्त होतं..ती बोलली मला सगळ्यांना भेटायला आवडले पण त्यांनी पहिले सगळे १०० एपिसोड बघावेत..याला १००% अनुमोदन..हाच सल्ला मला इतरांना द्यायला आवडले..ज्यांना मेघा समर्थकांविषयी प्रश्न आहे.. अजून एकदा ती स्पेसविषयी बोलताना मस्त पंच मारला स आणि पु ला वेळ देते कारण बिबॉ संपल्यानंतर ती स ला कधीही भेटू शकतो..स आणि पु कमी भेट होईल.

मेघा काही संत नाही.. पण ती इतरांपेक्षा खूप चांगली, मेहनती, आंनदी आणि विश्वासू आहे.. मेघा विरोधक जेव्हा तिच्या अवगुणाविषयी बोलता तेव्हा तिला बाकीजणाबरोबर तुलना करा आणि बोला... पु गेले काही दिवस बरळतो पण तो हे विसरतो की आम्ही त्याला मे आणि स ला फसवताना १० आठवडे तरी बघत आहे.. अरे जरा खाल्या मिठाला तरी जाग... मे होती म्हणून तू कॅप्टन झाला.. नाहीतर तु स्वतः दोनदा
हरला होता..

मेघाला लोक सपोर्ट देतात कारण तीने अल्पमतात असताना पण उघडपणे प्रस्थापिताविरोधी तोंड उघडले/ नेतृत्व केले होते... आणि जेव्हा तिचा ग्रुप बहुमतात आला तेव्हा पण तिला परत सघर्ष करावा लागतो.. उलट जास्तच आपल्या लोकांबरोबर(ज्यांनी तिला समजून घेतले पाहिजे होते...) आणि आ आणि स्मि...

पुष्कर सैरभैर झालाय ,सईच पीतल उघड पडल्यामुळे पैचप मोड ऑन झालाय। काले दादा नेहमीप्रमाणे लुक्स देत स्टड मोड मधे,शमा दिसलीच नहीं,स्मिता छान दिसत होती,मेघा नेहमीप्रमाणे फॉर्म मधे.
फेलीशा थोड़ी मोठी अस्ती तर बोलली अस्ती ’ऐ बाबा माझ्यापेक्षा तूच जस्ती ललत असतो ले !!!

पुष्कर मूर्ख वाटत होता. मला माफ करा मी असाच आहे असे शेवटी बडबडायला लागला तेव्हा वेडसर वाटत होता. इतके काये सारखं तेच तेच.>>> अगदी अगदी. एपिसोडची शेवटचि 5 मिनीट तर काय बडबडत होता त्याला तरि समजत होत का देवास ठावूक! खूप अस्थिर मनाचा आहे तो. पत्रकार परिषदेत फक्त झलक बघितली तर अशी अवस्था झालीए बाहेर आल्यावर खरी परिस्थिती समजल्यावर वेडा होइल तो.

<<पुष्कर मूर्ख वाटत होता. मला माफ करा मी असाच आहे असे शेवटी बडबडायला लागला तेव्हा वेडसर वाटत होता. इतके काये सारखं तेच तेच<<
अगदी अगदी.. मला तर वाटतय, मेघा विनर झाली तर याच्या डोक्यावर नक्की परिणाम होईल आता.
पत्रकार परिषदेनन्तरही किती वेळ सईबरोबर असम्बद्ध बडबड करत होता. ती उलट त्याला समजावत होती.

आ पु स ला, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मेघा अन मेघाच दिसतेय. तिचा फारच धसका घेतलेला दिसतोय.

पुष्करच्या मनात मेघाबद्दल तीव्र राग आहे हे काल परत एकदा दिसलं. आय लव्ह हर, आय रीस्पेक्ट हर पण ती फेक आहे , खोटं वागते ...कितीदा तेच तेच...एखादा भारी पत्रकार पाठवला असता तर त्याने पुष्कर ची वाट लावली असती. वेडा वाटला मला काल तो तेच तेच बोलताना.
सई काल चांगलीच तोंडावर पडली मेघा वर आरोप करताना. मग जरा जमिनीवर आलेली वाटली.
मेघा शिवाय कुठलाच एपिसोड वा ईव्हेंट पूर्ण नाही होउ शकत हे काल परत एकदा सिद्ध झालं. पूर्ण पत्रकार परिषद मेघा ने खाउन टाकली.
"समोर १० लोक असुदेत नाहितर १० लाख मी माझं मत बदलणार नाही" एकदम फर्म बोलली मेघा.

स पु आ तिच्याविषयी बोलत असताना ती शांतपण गालात हसत ऐकत होती सगळं पण मेघा बोलायला लागली की लगेच स पु आ कुत्सित लुक्स देत होते आणि तिची टर उडवत होते तेव्हा आपण ब्रेक घेउयात का तुम्हाला हसायचं असेल तर असं बोलुन स पु आ चं तोंड मस्त गप्प केलं तिने.
भक्त म्हणायचं असेल तर म्हणा पण मला मेघा काल अजुनच आवडायला लागली आहे.

वर कोणीतरी एक मेघा ची लिंक दिली आहे ती पण मस्त.
गेम काय आहे हे तिला कळलयं हे नक्की. आणि ती बाकीच्यांवर आरोप न करता स्वतः च्या डोक्याने तो खेळतेय.सई ला डावलुन आस्ताद चे नाव घेणे हा गेम चा भाग होता यात सई ला खाली न पाडता किंवा ब्लेम न करता तिने गिल्ट वाटतेय अशा कारणाचा आधार घेतला.सई ला बदनाम करुन तिला दूर नाही केलं.म्हणुन मेघा ला डीसीव्ह केलं असं म्हणावसं वाटत नाही. सई जर हुशार असती तर तिनं या गोष्टीचा फायदा करुन घेतला असता. असो.

गेम काय आहे हे पुष्कर ला पण कळलय पण तो मेघाचा आधार घेउन पुढे आला जे गेम म्हणुन ठीक आहे पण आता काम संपल्यावर तीला दूर करण्यासाठी ब्लेम गेम करत बसलाय.तिला दूर करायचं तर डोकं लावुन कर ना. उगीच ब्लेम करुन तिची प्रतिमा खराब कशाला करतोस. म्हणुन त्याचा राग जास्त येतो.

मेघा ही एक प्रवृत्ती आहे जी प्रत्येकाकडे कमीजास्त प्रमाणात असते. आपलीच जुनी वाक्यं परत बोलताना अनेकदा लोकं त्यात स्वतः ची भर घालत असतात. तेच ती करते तिकडे. मग याला लगेच फेक, खोटेपण म्हणत नाहीत.
"मी एकदा बसल्या बैठकीला १० गुलाबजाम खाल्ले होते" असा किस्सा पुन्हा पुन्हा सांगताना प्रत्येक वेळी १० या आकड्यात १-२ अजुन अ‍ॅड करुन सांगायची सवय अनेकांना असते. मग ते लगेच फेक किंवा खोटारडे ठरत नाहीत. याला exaggeration म्हणतात. खोटेपण नाही.
असो. कोणी काहीही म्हणो. माझं अमूल्य मत मेघालाच Happy

पत्रकार परिषद कसली फालतु होती .
मुळात टॉप ६ ठेवलेत कशाला बिबॉनी ? प्रश्नं फक्त ट्रायोला होते पत्रकारांचे, हेच टॉप ३ ठेवायचे आणि इतर तिघांना एलिमिनेट करायचे.
शर्मिष्ठा-स्मिता- नस्ताद नगण्यं होते अगदी !
अस्तादच काम पुष्करला इशारे करून मेघा बोलायला लागल्यावर चित्र विचित्र चेहरे करण इतपतच , निदान पत्रकारांपुढे तरी कंट्रोल करायचं Uhoh
एकुणच जे काही चाल्लय गेले काही आठवडे टास्क्स, घरातल्यांच्या गप्पा इन्क्लुडींग ही प्रेस कॉन्फरन्स, फक्त आणि फक्त मेघा सेंट्रिक, तुटलेली मैत्री, लॉयल डिसलॉयल, डिसिव्ह, फेक , हेल्दी फ्लर्टींग इ. तेच ते शब्द वापरून गेल्या ३ आठवड्याचं दळण चालु होतं पत्रकारांचही !
पुष्करला तर खरच वेड लागलय, त्याला मेडिकल हेल्पची गरज आहे सिरियस्स्ली.
मेघा आसपास जरी असली तरी हसायला लागतो कुत्सितपणे, रडतो काय, जळून भस्म , इनसिक्युअर , हार्मोनल इंबॅलन्स.. केमिकल लोचा चालु आहे पुष्करचा !
डोकं गदागदा हलवायची सवय आहेच, कपाळही बडवेल लवकरच !
पत्रकार परिषदेत आधी मेघाला टार्गेट करून अचानक सईला आता प्रेक्षकांसाठी पुन्हा मेघाशी खोटी मैत्री करु २ दिवस असं वाटायला लागलय कारण ती बाई म्हंटलीना आम्हाला ट्रायोची भांडणं आवडत नाहीयेत !
ते ऐकून पुष्कि पुन्हा इनसिक्युअर , आपला वेळ ही मेघाला देणार म्हणून !
मेघानी क्लिअर अँड लाउड चांगली उत्तरं चांगली दिली पण सईची , पुष्करची उत्तरं अशक्य हस्यास्पद !
मेघाचं बेस्ट उत्तर, आधी १०० एपिसोड्स बघा मग ठरवा मला भेटायचं कि नाही Proud

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ?
>>>>>>> हो ... हो ..

आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
<<<
होsss , काल रात्री स्मिताला गुड नाईट हग देताना ड्रंक वाटत होता !

बिग बॉस आदर्श घ्यायचा गेम आहे का ? ..अजिबात नाही हो
तेवढ तर कोणी पण सांगेल ...
पण फक्त राडा करायचा, काहीही करून टास्क जिंकायचे अशासाठी पण नाहीये..
नाहीतर मैदानात ठेवले असते ना त्यांना ? घरासाठी एवढा खरचं कशाला केला असता ? Happy
तुमच्यातला सिव्हिलाइज्ड माणूस कसा आहे ? कोणत्या परिस्थितीत कसा वागतो?
हे पण बघायला नको का राव ..
आपण कोणत्या लोकांना सपोर्ट करतो हे पण कळायला पाहिजे ना Happy
आणि श्यामची आई आणि रामायण वाचून आपण सुधारलो असतो
तर आता मनोरंजनासाठी असा कार्यक्रम बघितला असता का ?

आणि हो जे मेघाची एवढी भक्ती करतात ते देवपूजेच्या गोष्टी सांगतात .. .. देव्हाऱ्यात बसवा तिला आता Happy

फेक हा शब्दहि पु ने आ कडुन घेतलाय... व्हिलन गँगमध्ये सगळीच मेघाला तेच म्हणत.. सध्या तो त्याचा मित्र तर तेच तेच तो गिरवतोय. प परिषदेत मेघाबद्दल काहि बोलला अन आ ल विचारतो.. बरोबर ना आस्ताद.. गुरुने मान डोलावली. ती चश्मीश पत्रकार टिव्ही९ वर असते वाटतं.

Submitted by दीपांजली on 20 July, 2018 - 11:21
आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
टाकुन बोलत होता का ?
>>>>>>> हो ... हो ..

Submitted by chamaki on 20 July, 2018 - 11:44
आस्ताद काल बोलताना आणि चालताना अडखळत होता असं कोणाला वाटलं का ?
<<<
होsss , काल रात्री स्मिताला गुड नाईट हग देताना ड्रंक वाटत होता !>>

मला पण वाटला

काल नाही, मला परवा रात्री वाटला (भारतातल्या). फारच प्यायलेला होता. काल ok होता, नीट बोलत होता स्मिताशी.

मेघाशी नडायला जिगरा पाहिजे- हे तीच म्हणलेली आणि तेच काल स्पष्टपणे दिसलं देखील! काय जबरदस्त झेललं तिने सर्वांनाच. मेघा छा गयी!

सईचं विमान आलं जमिनीवर, नाईलाजाने का होईना Lol पुष्कीच्या मागे लागून तिने स्वतःचं पर्सनल नुकसानही करून घेतलं आणि सीझनमध्येही.
पुष्कीबद्दल सर्वांना अनुमोदन, त्याचा वेडेपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.
आस्त्याला कोणी भावच देत नव्हतं काल ते पाहून फार बरं वाटलं. आपलं स्टॅन्डिंग काय आहे बाहेर हे समजलं असावं, कारण नंतर स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला त्याने, पण परत मेघाने काबीज करून टाकलं सगळं.
स्मिताचा नेकपीस ऑसम होता. बाकी तिच्याकडे आणि शमाकडे लक्ष जावं असं काहीच नव्हतं. स्मिताला बाहेर इतका सपोर्ट आहे, मग त्याबद्दल सांगायला कोणीच कसं आलं नाही?

इतका म्हणजे मेघाच्या पावपट सपोर्ट ग पुनम (हा माझा पर्सनल अंदाज ). पत्रकारांनी सांगितलं, आ रात्री झोपायच्या आधी बोलला स्मिताशी ते, तिने नमस्कार पण केला. आपल्याला दाखवलं नाही पत्रकारांनी सांगितलेलं.

आ म्हणाला स्मिताला तुझं fan following वाढत चाललंय सगळीकडे, असं पत्रकार म्हणाले की नाही. ते जरा हळू आवाजात होतं पण समजलं मला.

बिबॉ हाऊसमधे अल्कोहोल अलाऊड नाहीये हे स्पेसिफिकली सांगितलेय मधे ममांनी एका वीकेंडच्या डावामधे. >>> हो का, पण वाटलं तसं.

Pages