बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघा आवडत होती....आवडत राहिल Happy
एक सर्वसामान्य माणूस जसा असतो, ती तशीच आहे. गुण अवगुण असणारच. पण ती माणूस म्हणून चांगली वाटली.
एकटीने हे सर्व झेलणे सोपे नाही, जवळचेच दातओठ खात आरोप लावतात, तेव्हा स्थिर रहाणे फार अवघड होते. पण ती आतून दुखावली तरी डिग्निटी सोडून वागली नाही असे मला वाटते. Happy

After Megha's answers to reporters today, So much humour, gifs fun stuff trending created by Megha fans .

Few haters: Why you support Megha always? You are biased, paid , bhakt etc etc !!!
Me: I am very strong headed person .. samor 10 viewer asude 10 hajar asu de nahi tar 10 lakh asude maz mat maz mat aahe mi tyachyavar tham aahe...!!!

This one on Fuski drama :
Pushkar at his clinic
Mareez : Doctor sahab Kal se loose motions hai
Pushkar : tu quit kyon nahi Kiya
Mareez : Kon sa quit
Pushkar : dekha Again Tu Accep nahi karta !
#Acceptancephobia #pagal_Hua

डिजे.... Rofl फंडु आहे हे.

पुष्की उतावीळा झालाय की ट्राॅफीशी कधी एकदा लग्न होतंय .... त्यामुळे त्याचं असं झालंय.

मेघा बॅशिंग, गुडघ्याला बाशिंग

काल आ म्हणाला रे-रा चे वागत होते त्याने मला पर्सनली काही नुकसान होत नव्हतं..माझ्या गेम वर काही परिणाम होत नव्हता..सो मी त्यांना का बोलू?
मग फुस्की सै च्या वागण्याने आ चं काय नुकसान झालं,त्याच्या गेम वर काय परिणाम झाला म्हणून तो त्या दोघांवर कमेंट्स करतो??

बिबॉ हाऊसमधे अल्कोहोल अलाऊड नाहीये हे स्पेसिफिकली सांगितलेय मधे ममांनी एका वीकेंडच्या डावामधे.>>>
मध्यंतरी एक लेख वाचला होता हिंदी बिबॉ बद्दल.. Unknown facts about Bigg Boss तऱ्हेचा लेख होता. त्यानुसार काही काही स्पर्धक अतिप्रचंड प्रमाणात alchoholic असतात आणि त्यामुळे ज्युस कार्टन्स मधून दारूचा पुरवठा केला जातो. बिबॉचे घर म्हणजे rehab सेंटर नाही म्हणून मग ते असा मार्ग काढतात.
खरं खोटं चॅनेल जाणे.

मला तर पुष्कर वेगळ्याच टेन्शन मध्ये वाटला. सध्या सई ज्या प्रकारे वागतेय त्याच्याशी, त्याची फळं त्याला बाहेर जाऊन काय प्रकारे चाखावी लागणार आहेत, त्या कल्पनेने थरथरत असावा तो.

स्मिता मला एकदम बॅलन्स्ड आणि न्युट्रल वाटते पहिल्या दिवसापासूनच. मि तिला कधी स्ट्रॅटेजी ठरवताना, कुणाला कन्व्हिन्स करताना, किंवा कुणाजवळ रडताना कधीच नाहि पाहिलं. आपला टास्क तिने प्रत्येकवेळी मनापासून केला. काल अस्ताद ला दिलेली सुचना पण किती गोड होती.

last but not the least, असं ही फासा पलटू शकतो की फायनल ला स्मिता शरा आणि अस्ताद ( the least expected winners) पण असू शकतात.

अस्ताद ने रचलेली कविता उत्तम गायली.
सई आणि पुष्कर जाता जाता राडे घालतायत. फारच खालची पातळी. सई त्यातल्या त्यात जास्तच. हरप्रकारे लिबर्टी घेतेय. घ्यावी जरूर घ्यावी पण प्रेक्षकांनी ओकारी येईपर्यंत? दिड तासात मिठ्या मारण्याची वारंवारिता पाहता दिवसभरात घरातल्या लोकांना त्या मिठ्यांचा किती कंटाळा आला असेल (नुसत्या पाहूनच) त्याची तर कल्पनाच करवत नाही.

मेघा बॅशिंग, गुडघ्याला बाशिंग >>> Lol
आस्तादने पण सॉलिड पलटी मारली काल. सई-पुष्करबद्दल मागे बोलत होतास विचारल्यावर... .. तेच मी सईशी पण जाऊन बोललो वगैरे टोटल डिप्लोमॅटिक टेपा. तो स्मिताशी जे बोलला ते आणि सईला बोलून दाखवलेले डायलॉग जे त्याने ऐकवले ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या.
मेघाविषयी काहीही चांगलं बोललं की सई पुष्कर आस्ताद जी वाकडी तोंडं करुन उपहास दाखवतात चेहेर्‍यावर त्याने ते स्वतःच्या पायांवर अजूनच धोंडे पाडून घेत आहेत हे त्यांना एपिसोड्स पाहून सुद्धा कळेल की नाही कोण जाणे. मेघावर आरोप लावताना मेघाचं लॉजिक खिलाडूवृत्तीने तेही कधीच मान्य करत नाहीत, पूर्वग्रहाचा चष्मा लावूनच बघतात कायम.

स्मिता गोड, निरागस वगैरे असली तरी अजिबात दोन वाक्यं धड बोलता येत नाहीत तिला हे मला दिवंसेदिवस अजूनच प्रकर्षाने जाणवतंय. म्हणजे साधं संभाषण करतानाही घोळ घालत असते सतत. भाषेचा संबंध नाही. विचारांना क्लॅरिटी असेल तर मराठी-इंग्लिशचं कडबोळं करुन आपलं म्हणणं पोचवलं जातंच. तेच लॅकिंग आहे.

मेघावर आरोप लावताना मेघाचं लॉजिक खिलाडूवृत्तीने तेही कधीच मान्य करत नाहीत, >> ...आणि मेघा स्पोर्टींगली घेत नाही म्हणून कागांवा करत बसतात.

स्मिता ना कोणाच्या अध्यात मध्यात, त्यात पटकन काही बोलली तर चुकते बरेचदा मग म मां ओरडतात त्यामुळे तिने नंतर अजिबात काही न बोलणे. आपलं आपलं काम करणे, मदत हवी असेल तर करणे हेच जास्त केलं. फार कुठे कुचाळक्या, gossiping च्या वाटेला नाही गेली. परवा पण आ शी बोलत होती स पु बद्दल पण नंतर म्हणाली, जाऊदे आपण नको बोलायला. बिग बॉस ने मेघा बोलली स्मिताबद्दल ते उगाच दाखवलं. छान होतं दोघींचं अबोल नातं एकमेकींशी, बोलायच्या एकमेकींशी, नाही असं नाही पण रिस्पेक्ट करायच्या एकमेकींचा.

तसं स्मिताला कोणी काही बोलले तर माफ करते ती, सईने बाप पण काढलेला, मोलकरीण पण म्हणलेल्या दोघी. पण ह्या बाबतीत मेघाला माफ पटकन नाही करू शकली ती.

शरा एक स्पर्धक म्हणून नाही पण एक माणूस म्हणून खुपखुप आवडलेली आहे!
तिला पक्के माहित होते की मेघा आणि सई-पुष्कीमध्ये जितके वितुष्ट येईल तितके तिचे स्वतःचे महत्त्व वाढणार आहे.... तिला हेही माहित होते की मेघासाठी सई नेहमीच प्रायोरिटी राहिली आहे
पण ती कधीही या संधीचा फायदा घेताना दिसली नाही..... रादर शक्य होईल तिथे तिने या ट्रायोमध्ये समेट घडवून आणायचाच प्रयत्न केला!
दुर्मिळ असतात अशी माणसे...... शो नाही पण मन नक्कीच जिंकून जातात असे लोक!

स्मिता मात्र खरंच एकटी रडत बसते बिचारी, आ आणि रे समोर nominate झाली, तिला खात्रीच होती आपण जाणार. रडत बसायची. एकदा रेशमने समजावलं. रेशमची साथ कधी सोडली नाही स्मिताने. मेघा आणि स्मिताचं पहिल्यापासून जमलं असते तर तिने कधीही मेघाची साथ सोडली नसती.

<<पण ती कधीही या संधीचा फायदा घेताना दिसली नाही..... रादर शक्य होईल तिथे तिने या ट्रायोमध्ये समेट घडवून आणायचाच प्रयत्न केला!
दुर्मिळ असतात अशी माणसे...... शो नाही पण मन नक्कीच जिंकून जातात असे लोक!<<

अगदी अगदी. अलिप्त राहुनही मेघाला स्पेस देणारी... सपोर्ट देणारी! मेघावर शराला नॉमिनेट करण्याचा आरोप होउनही बाजु साम्भाळुन घेणारी. मनापासुन टास्क करणारी आणि प्रसन्गी मेघावर तिच्या भल्यासाठी ओरडणारीही.
! सई सारख्या बालीश मैत्रीणीपेक्षा ती सुरवातीपासुन हवी होती मेघाबरोबर.

सईला शरामुळे मेघापासुन तुटल्याची जाणिव होतेय हे कळल्यावर, शरा मेघाला म्हणाली कि "वाटलच तर ४ दिवस बोलु नकोस माझ्याशी. '

शरा, मेघाच रात्री १२-१२:१५ पर्यन्त काम करताना दिसायच्या किचनमधे.

शर्मिष्ठा स्पर्धक म्हणूनही छानच आहे... फक्त ती आधीपासून हवी होती... सगळ्याच बाबतीत sai पेक्षा उजवी आहे ती.. माणूस म्हणून तर उत्तमच...ती काही episodes पाहून गेली त्यामुळे megha कडे तिचा कल असणे साहजिक होत.. कारण मेघा खूप गोड आहे.. पण त्या मैत्रीला सगळेजण follow करते अस म्हणायचे अगदी ममा सुद्धा विनाकारण डाफरायचे... Sai अन मेघाची जोडी पण होतीच ना... फक्त शर्मिष्ठा साई सारखी वचावचा भांडत नाही म्हणजे ती मेघाला follow करते as नाही.. She is very mature than sai... शमा task पन उत्तम खेळते.. घरातले काम पण करते अन सगळ्यांना समजून पण घेते... मला तर वाटत she is very sporting person... किती बोलतात तिला सगळे तरी ती seriously घेत नाही...

सई खरं म्हणजे उगाच आरोप करतेय श रा आल्यावर तू बिझी झालीस तिथे. ही पुष्कीबरोबर सतत बिझी असायची तेव्हा मेघा बिचारी एकटी किंवा आऊ बरोबर असायची त्याचा विचार केला का तिने. अतिशय स्वार्थी मुलगी आहे सई. पत्रकार आलेले तेव्हा तिच्यावर उलटलं सर्व म्हणून आता मेघा मेघा करतेय परत.

पण हेही खरं श रा बाहेरून बघून आलेली म्हणून डायरेक्ट मेघाला जॉईन होणं हे सेफ ठरलं तिला, इथपर्यंत पोचली. गुणी आहे, नो डाऊट पण कठीण होतं ते, सोपं झालं बघून आल्यामुळे.

पूर्वी किचनमध्ये रेशम, जुई, आऊ, स्मिता ह्याही दिसायच्या. नंतर फक्त मेघा आणि शरा दिसतात. काल शरा स्मितासाठी , स्मिताने किचनमध्ये काम केलं तर मला चालेल, असा मेघाकरवी निरोप धाडत होती. मी येताजाता पाहिले, त्यामुळे नक्की कॉन्टेक्स्ट माहिती नाही.

स्मिता करायची की पूर्वी, हल्ली कमी दिसते.

आता मी बाजू नाही घेत स्मिताची Wink पण दिसत नसली तरी हरकत नाही, ती बाकी सगळ्यांचे हेअरकट, आयब्रोज, मसाज वगैरे अशी कामं करून देते. ती करते ते bb जास्त दाखवत नाहीत, त्यामुळे लपून राहते.

सईला काहीच काम नको असते. स्मिता बहुतेक सकाळचा ब्रेकफास्ट करते. अनसीन अनदेखा मध्ये मगाशीच बघितलं, श रा omlet खात स्मिताने छान केलंय कौतुक करत होती. मग जास्त मेघा शरा करतात.

अंजूताई, तेच तर. बाकी मी आज पण स्मिताला मत दिले हां(तू आठवलीस मत देताना >>> हो गं तुला आवडते माहितेय मला. Thank u. आज मी मेघाला दिलं. परत रात्री एपिसोडला स्मिताला देणार.

<<<- व्हिलन ग्रुप मध्ये बॅक बिचींग सुरु असताना हिने सुध्दा हिरीरिने सहभाग घेतला आहे.. त्यामुळे ति मागे बोलत नाही वगैरे राहुच द्या...
- फुलाच्या टास्क मध्ये पुष्कर चा एक हात उलटा कारुन ( पिरगाळुन ) ओढनारी हि स्मीताच होती बर का... ( जेव्हा त्याच्यावर दोघ बसलेले ) ज्या वरुन आऊ व सुशांत मध्ये नंतर वाद झाला..
- त्या मेघाच्या फेक म्हणण्या बाबतीत.. तेव्हा स्मिता किती नाटकी आहे ते कळते..<<<

पटतय मोरपन्खीस!!

रात्री अकराच्या आत द्यायचंय मात्र. ज्यांना कोणाला मत कोणालाही द्यायचं असेल त्यांनी लक्षात ठेवा, आज रात्री अकरापर्यंत फक्त.

आज सहजच सुरेश भटांची ही गझल वाचत असताना बिग बॉसचे घरच आठवले..... किती apt आहे ना ही गझल इथे!

(तो फक्त कंसातला एक बदल केलेला आहे)

"आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी !
मी बोचताच माझी केली शिकार त्यांनी !

त्यांच्यासमान नाही येथे कुणी विचारी,
आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी !

त्यांना पसंत नाही ताजा पहाटवारा,
आधीच बंद केले एकेक दार त्यांनी !

झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे,
माझ्यावरी दयेचा (दग्याचा) केला प्रहार त्यांनी !

माझ्या घरात आला पाऊस माणसांचा..
त्यांच्या घरात नेला त्यांचा पगार त्यांनी !"

टास्कमध्ये फिजिकली कोणी कोणाला hurt केलं ते चूकचं होतं मग ती स्मिता का असेना, त्याचा माझ्याकडून निषेधचं. नंतर तिने सुशांतला पण एका संदर्भात माफ केलं तेही मला नाही पटले पण बहुतेक सर्वांनी समजावलं असणार, मी तेव्हाही टीका केलेली लिहून.

रा रे आ सु आणि सई सुध्या task मध्ये फिजिकली hurt करायचे दुसऱ्याला, स्मितापण आली त्यात. सई ने लाथ नव्हती का मारली जुईला किंवा वाळू task मध्ये स्मिताला पाडलं सईने म्हणून bb नी आत बोलावलं होतं, मग एक फोन पण आलेला की सई तू दुसर्यांना दादागिरी करता म्हणतेस आणि स्वतः तू पण तेच करतेस.

एनीवे आवडत्या लोकांच्या चुका पाठीशी घालत नाही मी, पण सर्वात स्मिता बरीच उजवी आहे एवढंच. अजिबात personal वगैरे घेत नाहीये Happy . लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं.

सई शाळेत एक्दम आगाऊ, मॅनर्सलेस मुलगी वाटली. रोज घरी चिठ्ठी जायची म्हणे! मेघाला मुद्दामुन तिघांनी त्रास दिला.
तो फुस्की तर चेहरा इतका त्रासिक करतो. डरपोक! रडतांना आणि ह्सतांना सारखाच दिसर्तो.

Pages