बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला आता मोगाम्बो सारखेच रोल मिळणार बाहेर, माजोरडा अतिरेकी व्हिलन.

रे कित्ती आळशी. सई कित्ती खात पीत होती. पुष्कर, मेघा, श रा आणि स्मिताच राबत होते जास्त. राधा प्रेम ला जरा नीट सर्व्हिस दिली, सचित होता म्हणून बहुतेक. ओम सुरभीला स्मिता आणि पुष्करने बरी दिली, बाकी फार कोणी लक्ष देईना. त्यात स्मिताने थंड पाणी वापरलं फुट मसाजसाठी म्हणून तो चिडला. पुष्की खोटं बोलला, सारवासारव केली म्हणून चिडला. तीन star जास्तच दिले त्यांनी, दोन पुरे होते.

रे मेघाला सांगत होती hyper होऊ नको म्हणुन पण ते आेमचे shoes Polish करताना त्याच ऐकुन न घेताच पळत होती.

>>राज आणि योग तुमच्या पोस्टस आवडल्या. मै, स्मिताबद्दल काही अंशी सहमत. पण तरी मला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच. Happy
आधीच्या पानावर कुणीतरी एक नवीन टास्क मांडला होता. आयडी बघितला नाही पण सिरीयसली बिबॉने तुम्हाला क्रिएटिव्ह टीममधे घ्यायला हवे.
धन्स, नी!
स्मिता बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच! आजकाल अशा मुली फार बघायला मिळत नाहीत.. very well grounded!
बैल गाडी चा बदलून लिहीलेला टास्क म्हणत असशील तर तो मी लिहीला होता.. टाईमपास म्हणून..बाकी काही नाही.. 'फुकटचा' वेळ.. Wink
असो. स्मिता व तीच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा!

सई कित्ती खात पीत होती. >>> शरा ने पोह्यात साखर घातली म्हणून परत दुसर्‍यांदा केलेल्या पोह्यांची चव बघताना, तोच उष्टा चमचा पाहुण्यांसाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेल्या बाउल मधे घालून दुसर्‍यांदा पोहे खाल्ले सईने !!! Wink
मेघाने तयार केलेलं रोज कॉकटेल दिसताना तरी भारी दिसत होतं !
परवा कोणी तरी स्मि च्या जुन्या बाईक स्टंट वाल्या दोन व्हिडिओंची लिंक दिली होती .. ते पाहिले.
बंदी में सॉलीड दम है ! फिनाले मधे पाहिजेच ती!

Actor Kiran Mane's opinion about Megha अभिनेत्याला नाटकाची 'पॅशन' कशी असावी हे सांगताना आमचे अभिनयगुरू पं. सत्यदेव दूबे म्हणायचे, "नाटकाच्या पॅशनसाठी खोटे बोलायचे का? तर बोलायचे. चोरी करायची का? तर करायची..."

...त्यांचा सांगण्याचा उद्देश हा होता की जर तुम्हाला जिंकायचे असेल, यश मिळवायचे असेल तर कशाचीही पर्वा न करता 'जीव तोडून' संघर्ष करा... हीच पॅशन - हाच जिगरा बिगबाॅसच्या खेळात कुणाचा दिसत असेल तर ती आहे फक्त आणि फक्त 'मेघा धाडे' !

...शो मध्ये येण्यापूर्वी मेघा फारशी कुणाला माहिती नव्हती. याउलट तिच्या स्पर्धेत उषा नाडकर्णी, राजेश शृंगारपुरे, आरती सोळंकी, भूषण कडू, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, जुई गडकरी, सुशांत शेलार असे खूप काम केलेले, प्रेक्षकांच्या ओळखीचे, छोट्या प्रमाणात का असेना पण स्वत:चा फॅन फाॅलोइंग असलेले कलावंत होते...पण बिगबाॅसच्या खेळात या पोरीने असा करीश्मा दाखवला की सगळा खेळ तिच्या बाजूने झुकला ! 'मेघा छा गयी' !! या कलाकारांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जेवढी लोकप्रियता मिळवली असेल , त्याच्या दहापटीने हिने पहिल्या सहा-सात आठवड्यात मिळवली !!! तिच्या समर्थनासाठी उत्स्फूर्तपणे शेकडो व्हाॅटस् अॅप ग्रुप निघाले... अगणित फेसबुक पेजेस तयार झाली... फेसबुक पोस्टस् - व्हाॅटस् अॅप मेसेजेस - ट्विटर ...सगळीकडे मेघा - मेघा - मेघा....

... स्वच्छ फोकस - प्रत्येक टास्क नीट समजून घेऊन, जिंकण्याच्या दुर्दम्य इच्छेने, शेवटपर्यन्त चिकाटीने खेळत रहाणे - स्वत:च्या ग्रुपशी 'लाॅयल' रहाणे, ग्रुपमधले सहकारी 'सेफ' व्हावेत यासाठी कधीकधी स्वत: नाॅमिनेशनचा धोका पत्करणे - ग्रुपमधला मित्र कॅप्टन व्हावा यासाठी सामदामदंडभेद वापरून प्रसंगी 'अनफेअर' खेळल्याचा आरोप डोक्यावर घेणे - विरोधी ग्रुपची झोप उडवणे - टास्कमध्ये 'आऊट आॅफ द बाॅक्स' विचार करून विरोधी टीमची गोची करणे - टास्क व्यतिरीक्त घरातल्या सगळ्या कामात सक्रिय सहभाग असणे... अशा अनेक-अनेक गुणांमुळे मेघाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली..बिग बाॅस 'बघणेबल' केलं...

...प्रेक्षकांच्या दुर्दैवाने मेघाला या सगळ्याबाबतीत 'टफ फाईट' देईल असा एकही स्पर्धक या अख्ख्या घरात नाही. हल्ली तर रोजच्या कार्यक्रमात ९०% वेळा मेघावरच कॅमेरा असतो...कारण मेघा असेल तिथे काहीतरी 'हॅपनिंग' असते. 'स्टफ' असतो. बाकीच्यांवर कॅमेरा गेला की ते एकतर मेघाविषयी कुचेष्टेने बोलत असतात, किंवा अंगावर पांघरूण घेऊन लोळत पडलेले असतात. मेघाच्या लोकप्रियतेचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर फक्त रोजच्या एपिसोडमधले सिन्स बघा-चर्चा ऐका !

...तगडे-तगडे स्पर्धक 'आऊट' करून आज फक्त मेघा ग्रुप फिनालेच्या लास्ट विक पर्यन्त पोहोचला आहे... जो ग्रुप या कार्यक्रमाआधी कुणाच्या खिजगणतीतही नव्हता ! ही सगळी एकट्या मेघाचीच करामत... पुष्कर सई शर्मिष्ठा स्ट्राँग आहेत, पण एकेकटे लढू शकत नाहीत.. आधाराशिवाय ते कोसळतात. मेघा एकटी सगळ्यांना भिडते-नडते-लढते ! हा दुर्मिळ गुण तिला या खेळात सर्वश्रेष्ठ ठरवतो !!

मेघा, शेवटी निकाल काय लागायचा तो लागो... तू आम्हा सर्वांची मनं जिंकली आहेत ! तू 'फायटर' आहेस, तुझ्याकडे 'जिगरा' आहे.. तुझं चिडणं-हसणं-रडणं-प्रेम करणं-जीव लावणं-आसूसून खेळणं-बडबड करणं...आम्हाला सगळंच मनापासून आवडतं..आमच्या नजरेत तूच आणि तूच विजेती आहेस !!!

- किरण माने.

Rofl
पहिल्या ओळीपासूनच सगळं गंडलय.. पण यामूळे किरण माने कोण हे बहुतेक कळेल!
कुणी विजेता व्हावा म्हणून किती ते 'पेड' ढोल्स बडवावे लागतात.. Proud

रच्याकने: असेच काही पेड ढोल्स ईथे बि बॉ सुरू झाल्यावर साधारण दीड महिन्या नंतर अचानक ऊगवले आणि मग पहिल्याच पोस्ट पासून एक कलमी कार्यक्रम राबवला. बाकी बरेचसे सदस्य जे अगदी पहिल्या आठवड्यापासून ईथे लिहीत आहेत त्यांनी असा कुठलाही कार्यक्रम राबवलेला नाही.
- साभार, मायबोलीवरील जुने शेरलॉक होम्स.

घना...पोस्ट छान आहे. फक्त आता स्वतःची गणना आमच्यासारख्या काही लोकांप्रमाणे 'भक्त' या कॅटेगरीमधे करून घेण्यास सज्ज व्हा.
ता.क. मेघाच्या चाहत्यांना किंवा सपोर्टर्सना इथे भक्त असे संबोधले जाते.

तो किरण माने पहिल्यापासूनच मेघाचं गुणगान गातोय फेबु वर. त्या रेणुका खोत च्या २-३ पोस्ट्स मध्ये मी पाहिलं आहे.

ओह! म्हणजे हे 'खाते' पहिल्या दिवसापासून टॉप अप आहे तर? Proud
आता काही शेवटच्या दिवसांसाठी सॉरी, निर्णायक दिवसांसाठी राखून ठेवलेली खाती 'लाईव्ह' होतील..
आणि तरी पब्लिक ला लिडरशिप, फोकस, आणि काय काय दिसते बा... Proud

किरण माने कुणी पेड भक्त नाहीत ते एक चांगले अभिनेते आहेत राधिका चा भाऊ च काम आहेच माझ्या नवऱ्याच्या बायको या मालिकेत . आणि ते फेसबुकवर मित्रयादी मधेय आहेत माझ्या एका चांगली सामाजिक जाणिव असलेले अभिनेते आहेत. आता अभिनेते सहित इतके सारे लोक विकत घ्यायला मेघा काय मुकेश अंबाणीची बहीण नाही. जेव्हा एखाद्या मताचा प्रतिवाद करू शकत नाही तेव्हा लोक त्या व्यक्तीला लेबल लावून मोकळा होतो . चालुदेत.

मग भक्त नाही का??..मागच्या धाग्यावर कोणतरी म्हणलेला चुकांसाहित समर्थन करतो म्हणून प्रेक्षकांना चुकीचे शब्द वापरू नका..म्हणजे तुम्हाला मान्य आहे की मे चुकते..पण तरी तिचं खरा असे म्हणणारे भक्तच असतात..पण तुम्हाला ते नाही कळणार तुम्ही sarcastic smiley टाका फक्त..रे चिपनिस आहे..आ रा सु भू MCP आहेत..पण मग मे खोटरडी आहे असा म्हणायचं नाही..

>>किरण माने कुणी पेड भक्त नाहीत ते एक चांगले अभिनेते आहेत राधिका चा भाऊ च काम आहेच माझ्या नवऱ्याच्या बायको या मालिकेत .
बघा.. आता कळलं किरण माने कोण ते. धन्स!

>>जेव्हा एखाद्या मताचा प्रतिवाद करू शकत नाही तेव्हा लोक त्या व्यक्तीला लेबल लावून मोकळा होतो .
ईथे 'मामी' या आयडी ने अक्षरशः शतकाने लेबलं लावली आहेत बि बॉ मधिल सदस्यांना.. (बहुतांशी अत्यंत खालच्या पातळीची!) त्या बाबत काय म्हणणे आहे आपले? ईथल्याच अजून एका आयडी ने खुद्द ममां च्या चारीत्र्यावर थेट खालच्या दर्जाचे भाषण केले आहे.. त्यावर काय म्हणायचे आहे आपल्याला?
मेघा चा जयघोष करा हो... काहीच आक्षेप नाही. पण किरण माने हा काही मापदंड नव्हे. ना ही अभिनयातला नाही बि बॉ मध्ये कोण ऊत्तम आहे हे सांगण्याचा. Happy

ईथे काही ठराविक आय्डी ठराविक अजेंडा राबवत आहेत हे सर्वांनाच माहित आहे.. बहुतांशी ईतर सर्व सदस्य हे दोन्ही बाजूने मत व्यक्त करताना दिसतात. 'मी मेघा प्रचारक आहे' हे एकदा एखाद्या सदस्याने स्पष्ट लिहीले की पुढील वाद संपतो.

चालू देत..

रच्याकने: प. सत्यदेव दुबे हयात नाहीत. तेव्हा.. त्यांच्या नावाने काहिही खपवून, किंवा त्यांचे विचार सोयीसकर वापरून पुढे आपला स्वार्थ जोडण्याच्या या अशा धंदेवाईक प्रवृत्तींमूले खरे तर खूप अधिक नुकसान होते. नाटका बद्दलची (थियेटर) पॅशन कुठे आणि अक्षरशः प्राथमिक शाळेतील खेळापेक्षाही कमी दर्जाचे खेळ करून बि बॉ ची स्पर्धा जिंकण्यासाठी मारामारी कुठे.. ऊगाच आपले काहितरी जोडायचे. प. सत्यदेव दुबे सारख्या थियेटर महर्षींचे नाव घेताना तरी निदान काही संकेत पाळायला हवे होते. सगळेच मुसळ केरात!

अरे हा ओमप्रकाश शिंदे कसला कुचकट बोलला. एक शब्द कौतुकाचा नाही. सगळी नुसती मापं.
हे नाही ते नाही, हे असं का ते तसं का? Angry

>>अरे हा ओमप्रकाश शिंदे कसला कुचकट बोलला. एक शब्द कौतुकाचा नाही. सगळी नुसती मापं.
हे नाही ते नाही, हे असं का ते तसं का?

फारच कमी बोलला... खरेच एखादा सेलेब्रिटी कस्ट्मर असता (रियल लाईफ सिनारीओ) तर अजून वाईट्ट सोलले असते.. निव्वळ पांढरे काळे कपडे घातले की आपण एखाद्या फाइव स्टार हॉटेल/रिसॉर्ट चे थेट मॅनेजर वा कर्मचारी असल्याचा नुसता आवेश होता सर्वांचा. त्या साठि लागणारी बुध्धी, कुवत, दृष्टिकोन, सर्वच शून्य!
एकच स्टार द्यायला हवा होता निव्वळ कपड्यां बद्दल. नशीब दोन तरी ठेवले त्याने.
Happy

बोलू दे योग मला त्याचं काही नाही. पण त्याची एकूण बॉडील लँग्वेज आणि तोंडावरचे भाव निव्वळ खत्रुड होते.
हसतमुखाने नीट सांगता आलं असतं जी काही तक्रार होती ती.

>>हसतमुखाने नीट सांगता आलं असतं जी काही तक्रार होती ती.

कुठला असमाधानी किंवा रादर वैतागलेला कस्ट्मर 'हसतमुखाने' फीडबॅक देताना पाहिला आहे? आपण तरी देतो का? Happy
त्याने दोन तीन वेळा शांतपणे पुष्कर, स्मिता च्या चूका निदर्शनास आणुन दिल्या होत्या की... ठीक आहे स्क्रिप्टेड असले तरी ज्या पध्दतीने त्याने फीड्बॅक दिला मला तरी पटले.
असो.

बोलू दे योग मला त्याचं काही नाही. पण त्याची एकूण बॉडील लँग्वेज आणि तोंडावरचे भाव निव्वळ खत्रुड होते.
हसतमुखाने नीट सांगता आलं असतं जी काही तक्रार होती ती.>>>> अरे त्याची कळी खुलली नसेल अजून Wink
(झी च्या 'खुलता कळी खुलेना' सिरियलमद्धे मेन लीड होता तो)

पण मला आवडले त्याचे वागणे असेही बिबॉने सांगितले होते ना की येणारे पाहुणे कडक असतील वै. त्यामानाने सचित विणा खूप सौम्य होते.

सै ची मॕनेजर जाम गंडलेली. पु ला पाहुण्यांसमोरच बडबडत होती. किचनमधेपण कशी बसलेली येडचाप वाटत होती. स्टार हॉटेलची मॕनेजर न वाटता खानावळ + loading boarding चालवणारी वाटली.

>>>सै ची मॕनेजर जाम गंडलेली. पु ला पाहुण्यांसमोरच बडबडत होती. किचनमधेपण कशी बसलेली येडचाप वाटत होती. स्टार हॉटेलची मॕनेजर न वाटता खानावळ + loading boarding चालवणारी वाटली.

वर कुणितरी लिहील्याप्रमाणे, अर्थातच एक स्मिता सोडल्यास बाकी कुणालाच त्या बाबतीत ना कसला अनुभव ना दृष्टीकोन. सई सारख्यां कडून तर अपेक्षा ठेवणेचच चूकीचे आहे. आस्ताद तर पुन्हा 'अंगरक्षक' मोड मध्ये असल्यागत वावरत होता, फक्त कपडे वेगळे होते. व 'जी हुकूम' च्या जागी 'यस सर' एव्हडाच बदल होता... Lol रेशम, अ‍ॅज युजवल डीड नॉट केअर अ बीट.. पुष्कर नेहेमीप्रमाणेच पहिल्या बाकावरचा विद्यार्थी बनू पहात होता.. काहीही सांगा मी आहे काम करायला. स्मिता चे अदबशीर सेवा देणे सुरू होते.. किमान बॉडी लेंग्वेज तरी योग्य होती. आणि जिथे जिथे 'दर्शनीय' क्रेडीत घेता येईल म्हणजे खाद्य पेय पदार्थ ई... तिथे मेघा जातीने हजर होती. कॅमेरा स्वतः कडे जितके वेळा बघत नसेल तितके वेळा मेघा कॅमेरा कडे लक्ष ठेवून असते.. Lol ऊरली, शरा- तर ती नेहेमी प्रमाणे स्वताचे अस्तित्व जमेल तसे जपत होती. शरा म्हणजे तो खेळाडू जो दुसर्‍याने हुकूमाच्या एक्क्याने हात घेतला तरी माझ्याकडचा गोटू कसा महत्वाचा होता हे सांगत बसतो. Proud
आस्ताद मोडः हे तर काहीच नाही...!

मला तर ओम जामच आवडला. ( त्याच्या सिरियल्स नाही पाहिलेल्या कधी) मस्त बेअरिंग घेतले होते त्याने. नेस्क्ट सीझन ला यायला पाहिजे स्पर्धक म्हणून Happy
फेबु वर पुन्हा बाबागाडी टास्क दाखवत आहेत! हा काय मूर्खपणा आहे?!

रेशमला नाॅमिनेट झालं तरी चालणार होतं तर आता नाॅमिनेट झाल्यावर का इतकं लंबंचौडं explanation देत बसलीये शराला? ते पण मेघाला टारगेट करत?

'ती तिचा गेम खेळतेय, मला काही फरक नाही पडत' म्हटल्यानं काय होणार? अस्ताद, रेशमची जळजळ ठायीठायी बाहेर पडतेय. किती विखार भरलाय त्यांच्या डोक्यात. पकाऊ आहेत.

विखार वगैरे तर आहेच पण आळस किती. कालच्या टास्कमध्ये पण जिथे काही काम नसेल असल्या ड्युटीज घेतल्या आस्त्या आणी रेशमने. कसला उत्साहच नसतो गोघात. बळं बळं करतात टास्क्स पण. खरं तर रेशम चांगली कूक आहे असा अभिप्राय अनेकांनी वेळोवेळी दिलाय(मेघानेसुद्धा), तरीही तसे काम जिथे चमकायचा चान्स होता, तसे घेतले नाही तिने. हा आळस म्हणावा नाही तर काय!

मला वाटतय की टास्क म्हणून का होइना पण या इंडस्ट्रीतल्या पाहुण्या म्हणून येणाऱ्या नवख्या (तिच्या दृष्टीने) लोकांना सर्व्ह करणे, त्यांचे हुकुम पाळणे, त्यांच्या पुढेमागे करणे तिला कमीपणाचे वाटत असावे!

अरे काय हे, बाबागाडी टास्क परत ? का??
ऑलरेडी ४ लोक पोचले आहेत कि फिनाले वीक मधे , तरी त्यांचे फोटो गळ्यात का ?

शिक्कामोर्तब करायला. किंवा शेवटचा (कदाचित) एक किचाट घालायला. मुळमुळीत चाल्लंय ना सगळं. एकमेकांच्या मानेवर बसले नाहीत, अपशब्द काढले नाही आणि 'पर्सनल' झाले नाहीत तर बिबाॅचं मन रमणार नाही ना.

इन जनरलच मला वाटत होते की शेवटच्या आठवड्यातील टास्क्स हे चढत्या क्रमाने अवघड होत जातील. फिनाले मधे जायला बैलगाडी टास्क अन हॉटेल टास्क असले काय कामाचे. टू ईझी!
काहीतरी अवघड असायला नको का जरा?! नाहीतर नुस्ती एक उडी मारली बैलगाडीतून की चालले फिनालेत याला काय अर्थ आहे!

नंकि ची मुलाखत पहा, तो म्ह्स्णे रेशम आस्तादला आणि बर्याच जणांना टास्क समजलाच नाही.
ज्याची जास्त बोली लागलीये त्याला उतरु न देणे हा टास्क होता, जिथे राडा करायला झटापटी होण्याचे भरपूर चान्सेस होते पण हे झोपून लोळत राहिले इथेही त्यामुळे झालं उलटच , सगळ्यात पहिली उडी मारली सर्वात महाग माणसानी Proud

Pages