बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघा आणि पुष्कर यांचे आधी ठरलेले की बक्षीस किंमत वाचवण्यासाठी 3 ही बझर ला कोणीच उतरू नये त्यामुळे सर्वच नॉमीनेट होतील आणि शमा व स्मिता वीक असल्याने आपण नक्की सेफ होऊ परंतु बिग बॉस ने बझर नंतर उतरणे बंधनकारक केल्याने insecure पुष्कर लगेच न कोणताही विचारविमर्ष करता उतरला पण हा अमानवी आस्ताद आणि आळसखोर रेशम आजी मेघावर तोंडसुख घेऊ लागले

मेघा पण बोलुन फसलीच की..... त्यामुळे आयतं कोलीत भेटलं आ आणि रे ला मेघा विरूध्द बोलायला.
उलट मेघा , रेशम आणि आस्ताद असते तर आस्ताद नक्की गेला असता.

>>मेघा ला असं झालं की काय करु नी काय नाही.
To be or not to be.. Proud

असो.. आता फिनाले चा संघर्ष सुरू. साम (स्मिता, रेशम) दाम (मेघा, सई) दंड (आस्ताद), भेद (पुष्कर)..
लोकुर पॉवर मुळे सई ची वर्णी आधीच लागली आहे. पुष्कर त्याच्या चतुर खेळामूळे व मेघा पि आर मुळे फिनाले ला नक्कीच जातील. आणि टी आर पी अधिक हवा म्हणून तिकडून रेशम व स्मिता जातील फिनाले मध्ये. [ममा म्हटले गेल्या भागातः कुणि हरणार असेल तरच जिंकण्याची मजा आहे!]
आस्ताद ची भूमिका किंग मेकर ची होती तेव्हा त्याला फरक पडत नाही. असेही बि बॉ च्या बाहेर त्याच्याकडे दुसरी बरीच कामे आहेत.
राहिली, शरा: तीला फिनाले पर्यंत ठेवतील का काढतील हे गुलदस्त्यात आहे. तीला पाहिल्यावर मात्र नात्यातील एका पुतण्याची आठवण येते. बाबा ९०% मिळाले हे पण तो अगदी रडवेल्या चेहेर्‍याने सांगत असे. Lol

रच्याकने: बैलगाडी टास्क जाम गंडलेला होता.. पण किमान हा एक फिनाले पूर्वीचा टास्क तरी जरा ईंट्रेस्टींग करता आला असता. ऊदा:
१. सई ला गाडी चालकाचे काम द्यायचे.
२. एक एक करून सर्व सदस्यांनी तीला तीच्या बैलगाडीत बसवून घेण्यासाठी मनवायचे. कसे तर तीला स्वताच्या हिश्शातील (२५ लाख पैकी आधी सर्वमान्य झालेल्या रकमेतील काही हिस्सा) काही रक्कम देऊ करायची. एक सदस्य दुसर्‍याला त्याची ऑफर सांगू शकत नाही. फक्त सई व मायबाप प्रेक्षकांना ते कळेल.
३. सर्वात जास्ती ऑफर ज्याच्याकडून आधी आली त्याला प्रथम बैलगाडीत घेणे सईवर बंधन कारक असेल.
४. असे करत करत बैलगाडी सई व ईतर चार सदस्यांनी भरली की ते सर्व सेफ.
५. ऊरलेल्या दोन सदस्यांचेच नॉमिनेशन होणार.
६. परंतू सई ला कॅप्टन म्हणून विशेष अधिकारः गाडीत बसलेल्या एका सदस्याला ऊतरवून त्या जागी आधी ऊरलेल्या (म्हणजेच नॉमिनेट झालेल्या) दोन पैकी एका सदस्याला ती गाडीत बसवू शकेल.
७. जर सई बि बॉ जिंकली, तर प्रत्येक सदस्याने देऊ केलेली त्याच्या ऑफर ची रक्कम (२५ लाखा मधिल ठरलेल्या वाट्यातील ऑफर केलेला हिस्सा) देखिल तिला मिळणार. अन्यथा ती रक्कम त्या सदस्याला परत मिळेल.
८. जर सई च्या विशेष अधिकार वापरल्याने एखादा सदस्य वाचलाआणि सई बि बॉ जिंकली तर त्या सदस्याच्या हिश्शाची (आधीच्या २५ लाख च्या टास्क मध्ये ठरलेली संपूर्ण रक्कम) संपूर्ण रक्कम त्या सदस्याला सई ला द्यावी लागेल. अन्यथा ती संपूर्ण रक्कम त्या सदस्याला परत मिळेल.
९. जर सई खेरीज गाडीत बसलेला एखादा सदस्य पुढे बि बॉ जिंकला तर सई च्या वाट्याला असलेली हिश्शाची संपूर्ण रक्कम (२५ लाख मधिल सई चा सर्वमान्य संपूर्ण वाटा) त्या सदस्याला मिळेल.
१०. ऊरलेल्या नॉमिनेट झालेल्या सदस्यापैकी जो वाचेल त्याची स्वताची रक्कम त्याला ठेवता येईल शिवाय एलिमिनेट झालेल्या सदस्याची रक्कम मात्र त्याला मिळेल. Happy
११. एलिमिनेट झालेल्या सदस्याला काहीच रक्कम मिळणार नाही (२५ लाखाच्या वाट्यातील) . Proud

नियमः
१. एक सदस्य फक्त दोनदाच सई ला ऑफर देऊ शकतो.
२. पहिल्या राऊंड मध्ये सदस्य निवडल्यावर दुसर्‍या राऊंड मध्ये ऑफर देताना दोन सदस्य संगनमताने सईला एकत्रीत ऑफर देऊ शकतात. यात ज्या दोघांची ऑफर जास्त त्या दोघांनाही सई ला गाडीत घ्यावे लागेल.
३. दोन सदस्यांकडून सारख्याच रकमेची ऑफर आली तर कुणाची घ्यायची हा निर्णय सईचा असेल. मात्र तीने तसे का केले याचे स्पष्टीकरण तिला द्यावे लागेल- दोन्ही सदस्याला, व बिग बॉस ला.
४. पहिल्या राऊंड मध्ये गाडीत चढलेल्या सदस्याला नंतर च्या रांऊड मधिल सर्व दिल्या जाणार्‍या ऑफर्स माहित असतील.
५. पहिल्या राऊंड मधिल सदस्याला (पुष्कर असे समजुयात) एक विशेष अधिकार असेलः पाच्व्या व शेवटच्या सदस्याकडून जी ऑफर दिली जात आहे ती सई ला मान्य नसेल तर, स्वताच्या हिश्शातील काही रक्कम देऊन त्या शेवटच्या (म्हणजे सई सोडून चौथ्या) सदस्याला गाडीत घेण्यासाठी सहाय्य करता येईल. तसे केल्यास ती ऑफर स्विकारणे सई वर बंधनकारक असेल. अशा मार्गाने गाडीत आलेला सदस्य याला स्वताची रक्कम सई ला द्यावी लागेल शिवाय पुष्कर ला देखिल त्याने देऊ केलेली जास्तीची रक्कम सई ला द्यावी लागेल. सई जिंकली तर. अन्यथा, दोघांनाही आपापल्या रकमा परत मिळतील.
६. मात्र पुष्कर ला तसे सहाय्य करायची ईच्छा नसल्यास शेवटाचा म्हणजे पाचवा सदस्य बसवताना सई खेरीज ईतर तीन अशा गाडीतील सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठरवायचे आहे की पाचवा सदस्य कुणाला घ्यायचे. सर्वानुमते ठरल्यास गाडीत आलेल्या पाचव्या सदस्याला त्याच्या हिश्शातील सर्व रक्कम गाडितील ईतर सर्व सदस्यांना देणे बंधनकारक असेल. सर्वानुमते ठरत नसेल तर मात्र तीनही सदस्य नॉमिनेट असतील.

चला.. खेळा बि बॉ च्या इतीहासातील सर्वात सोप्पा पण थोडा सस्पेंस, थ्रिलर, व शेवटी राडा करता येईल असा गेम! Happy
सहित्यः बैलगाडी, कॅल्क्युलेटर, व डोके
बझर वाजला की सई ची गाडी सुरू व प्रत्येक बझर ला सर्व सदस्यांनी एक एक करून सई ला ऑफर द्यायची आहे.
एव्हडे सुस्पष्ट करून देखिल गेम कळला नसेल तर ईथल्या चाणाक्ष व हुश्शार सदस्यांना बि बॉ च्या घरात डेमो द्यायला बोलावून घ्यावे.

काल खरेच इंटरेस्टींग टास्क होते.... स्वताची वर्थ ठरवायची होती..... मेघाने ११ लाख आणि शराने साडेपाच अशी मस्त सुरुवात केली होती.... पण आस्तादला अचानक साम्यवादाचा किडा चावला आणि सर्वांना चार साडेचार लाखाच्या आसपास मांडवली करावी लागली.... पुष्कीने सगळ्यांच्या गुडबुकात गेल्याचा फायदा उठवत सर्वात मोठी रक्कम उचलली आणि स्मिताला as usual मुखदुर्बळपणामुळे सर्वात लहान रक्कम घ्यायला लागली.... शराचा तर आवाज तू नंतर आलीयस म्हणून सगळ्यांनीच बंद करुन टाकला.... त्यामुळे सगळ्यात वाटून उरलेली रक्कम तिच्या वाट्याला आली!
पुष्कर किती आस्तादच्या आहारी गेलाय हे काल परत एकदा दिसले ... आस्तादला त्याची स्वताची किम्मत मान्य आहे का हे तो चारचारदा विचारत होता.... त्यावेळी त्याला बाकी कुणाचे ॲप्रूव्हल घ्यावे वाटले नाही परंतु मेघाची किम्मत ठरवताना तो मेघाला न विचारता आस्तादला आणि रेशमला विचारत होता की तिची किम्मत तुम्हाला मान्य आहे का? का बुवा हे डबल स्टॅंडर्ड?
रेशमने तर तिथे पण आळस केला! अरे स्वताची किम्मत पण दुसऱ्यांनी ठरवायची?
तिला तिच्या किमतीपेक्षा मेघा स्वताची काय किम्मत लावतेय आणि मग ती कशी चुकीची आहे हे सुनावण्यात जास्त इंटरेस्ट होता.... तिला बोलू तर देत नव्हतीच वरुन माझे बोलणे (बोलणे कमी बोलणीच जास्त!) झाल्यावर तू बोल निवांत दहा मिनिटे मी ऐकत बसते म्हणाली आणि मेघा बोलायला लागल्यावर मला तुझ्याकडून काही explanation नकोय म्हणून तिथून उठायला लागली.... थोडक्यात मेघा बॅशिंग हा एक कलमी अजेंडा.... मेघा पण वेड्यासारखी यांना explanation देत बसती!
आस्ताद आधी स्वताची किम्मत ८ लाख म्हणाला, मग साडेचार लाख म्हणाला मग मेघाची अकरा असेल तर माझे चोवीस आहे म्हणाला!.... अरे इतके कसे तुझे सगळे मेघावर अवलंबून?

थोडक्यात बिगबॉसला या टास्कमधून काही मसाला मिळाला नाही

मग आले बैलगाडीचे टास्क!
जे आधी कुणालाच झेपले नाही... जेंव्हा झेपले तेंव्हा पुष्कीने मारली उडी.... सगळ्यात महागडा असुनसुद्धा आ आणि रे ने त्याच्या उडीबद्दल अवाक्षर काढले नाही आणि मग मेघा उतरणार म्हंटल्यावर तिला बसले टोचत.... अरे तुम्हाला उतरायचेय तर उतरा बसायचेय तर बसा पण यांचा सगळा गेम मेघाभोवती.... मग स्मिताला उतरायला भरीस पाडले... पण स्मिताने उडी मारायला उशीर केल्यावर शराला सपोर्ट करत बसले का तर मेघाला हरवायचे.... गाडीतून उतरायचे होते पण रे आणि आ ने शराने पाय आधी गाडीबाहेर टेकवला म्हणून जो कांगावा चालू केला आणि "ही ह्यांची मैत्री" म्हणत कुचकट हसत आस्तादने अजुन एक काडी टाकायचा प्रयत्न केला..... शराने त्याला बिल्कुल हवा दिली नाही..... तिसऱ्या बझरनंतर मात्र मेघाने टेकवलाच पाय चपळाईने बाहेर... मग मात्र आस्ताद आणि रेशमचे चेहरे बघण्यासारखे झालेले!

खर म्हणजे तिसऱ्या प्रयन्तात मेघापेक्षा शराला रोखणे त्यांना जास्त सोपे गेले असते पण तेव्हढ कुठल कळतय त्यांना गेममधल.... नुसता आरडाओरडा आणि काड्या करणे बरोबर जमते!
थोडक्यात आस्ताद आणि रेशमचे कुठलेच अंदाज काल बरोबर आले नाहीत
आता त्यांना स्मिताबरोबर कॉंपीट करायचय.... समस्त आस्ताद आणि रेशम फॅनक्लबने (थोडक्यात मेघाहेटर्सनी) कारणे शोधायला सुरुवात केली आहे!
नाटकात काम करायचय म्हणून फिनालेच्या एक आठवडा बाहेर पडण्याच्या चर्चेचे जाम हसू येतय.... अरे नाटक आहे ना मग थांबतील की ते एखाद आठवडा!
उगाच आपले काहीच्या काही सबबी!

योग. गेम मस्त आहे. तेच तेच रिपीट गेम बघुन कन्टाळा आलाय. आणी असहि हे लोक स्पर्धक नसुन दानधर्म करायला आल्यासारख खेळत होते काल

व्हिलन गँगच्या सदस्यांनी पक्षी: भूषण, जुई, सुशांत स्मितासाठी वोट अपील केलंय. आमची मैत्रीण स्मिताला भरभरून वोट द्या. आता कुठे गेलं त्यांचं आस्ताद आणि रेशमप्रेम?

अंजूताई बघ गं...
https://youtu.be/JqODSB8iGUA

तुम्ही मेघाचे फॅन्स असा किंवा हेटर्स, कृपया स्मिताला मत द्या. स्मिता शेवटच्या तीघांत सली पाहिजेच. तिच्यासारखी सालस पोरगी कुणीच नाहीये तिथे. प्रामाणिक, स्वतःत मस्त असणारी, सगळ्यांसाठी झटणारी, कुणाचाही पानउतारा न करणारी स्मिता नक्कीच त्या दोघांपेक्षा जास्त डिझर्व्ह करते तुमचं मत.
<जाऊदे माझं कर्तव्य काय, तिला वोट देणं हे.>
हो. अंजूताई, स्मिता नक्की वाचेल.

<व्हिलन गँगच्या सदस्यांनी पक्षी: भूषण, जुई, सुशांत स्मितासाठी वोट अपील केलंय. आमची मैत्रीण स्मिताला भरभरून वोट द्या. आता कुठे गेलं त्यांचं आस्ताद आणि रेशमप्रेम?>
अहो, हे फार आधीपासूण चालूये. आणि ते म्हणायचे, मेघा ग्रुपची मैत्री खोटी आहे.

काल आमचं टाटा स्काय मध्येच झोपलं, त्यामुळे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा अधिक भाग बुडला होता माझा.
ते पांढर्‍या फळ्यावर किंमती लिहित होते आणि रेशम म्हणाली की माझी किंमत तुम्ही जी ठरवाल ती मला मान्य आहे तिथपर्यंत पाहिलं.
आता कालचा एपिसोड पाहतेय हापिसात वूट वर Wink आणि त्या अगोदर स्मिताला व्होट केलं.
आता एकच ... स्मिताला व्होट करणार रोज.

रोज व्होट करून उपयोग नाही. शक्य असेल तर भेटेल त्या प्रत्येकाला व्हूट अ‍ॅप इन्स्टॉल करून व्होट करवून घ्या. Happy
एका मोबाईलवरचे एकच व्होट ग्राह्य धरले जाते.

अरे voot चा काही घोळ झालाय का?
Vote now वर क्लिक केल्यावर जे पेज ओपन होतय त्याच्यावर गेल्यावेळचेच nominated contestants दिसतायत!
आस्ताद आणि रेशमचा option च नाहीये!
(अर्थात मी त्यांना वोट देणार नाहीये तरीही काहितरी गडबड दिसतीय)
लोकहो तुम्हाला दिसतीय का रेफ्रेश्ड लिस्ट?

व्हिलन गँगच्या सदस्यांनी पक्षी: भूषण, जुई, सुशांत स्मितासाठी वोट अपील केलंय. आमची मैत्रीण स्मिताला भरभरून वोट द्या. आता कुठे गेलं त्यांचं आस्ताद आणि रेशमप्रेम?
>>>> बाहेर गेल्यावर त्यांचे डोळे उघडले. देर आये, दुरुस्त आये. Rofl

स्वरुप, मस्त पोस्ट.

>>तुम्ही मेघाचे फॅन्स असा किंवा हेटर्स, कृपया स्मिताला मत द्या. स्मिता शेवटच्या तीघांत सली पाहिजेच. तिच्यासारखी सालस पोरगी कुणीच नाहीये तिथे. प्रामाणिक, स्वतःत मस्त असणारी, सगळ्यांसाठी झटणारी, कुणाचाही पानउतारा न करणारी

या न्यायाने मग स्मितालाच कायम मत द्यायला हवे वि. मेघा, सई, शरा, रेशम कुणिही असोत. म्ग खरे तर तिलाच विनर म्हणून घोषित करायला हवे.
पण मेघा कं चं असं आहे की मेघा, स्मिता किंवा सई, स्मिता नॉमिनेटेड असल्या की- मेघा/सई ला मत द्या कारण स्मिता डंब, कन्फ्युज्ड, वगैरे वगैरे..
थोडक्यात स्मिता ला मत द्या म्हणणे हे सर्वांसाठी सोयीस्कर आहे. कारण तिथे प्रत्येकाच्या मनातील सद्भाव पोसला जातो. (aka- megha guilty concious moment!) याला म्हणतात सही जगह पे आये...! Proud

प्रथेनुसार फिनाले वीकला पांच जण जातात. याचा अर्थ या आठवड्यात दोन एलिमिनेट होणार. काल नॉमिनेट झलेल्यांपैकि दोन एलिमिनेट होणे जवळजवळ अशक्य. तर उरलेल्यांमधुन कोण नॉमिनेट होणार? अपराधीपणाच्या भावनेतुन पुष्करची ऑलरेडी तंतरलेली आहे. तो नॉमिनेट झाला तर एलिमिनेट नक्कि होइल, मग महिला मंडळाचं राज्य बिग्बॉसच्या घरावर... Happy

फिनाले वीक मधे ५ जण. मग त्या वीक मधे पुन्हा टास्क असतात का बाकीच्यांच्या एलिमिनेशन साठी ? की शेवटच्या दिवशी वोटिंग मधेच ४ लोक एलिमिनेट होतात ? तसंच आता या आठवड्यात ती हॉटेल गेस्ट वगैरे फालतू टास्क्स आहेत त्याच उपयोग काय ? सदस्यांना ती करायला मोटिवेशन तर हवं ना!

>>मग त्या वीक मधे पुन्हा टास्क असतात का बाकीच्यांच्या एलिमिनेशन साठी ?<<

आठवत नाहि, पण टॉप थ्रीज ना मॉलची सहल घडवतात हे आठवतंय...

@स्वरूप - तुमच्या posts फार आवडतात मला... मोठ्या असतात पण वाचताना नाव बघायच्या आधीच लक्षात येत तुमची post असेल म्हणून.....वरच्या post मधला शब्द न् शब्द पटला आणि आवडला पण...

>>शरा ला तब्येतीच्या कारणावरून बाहेर काढण्याची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे असं दिसतंय.
unfortunate..! but if that happens, she has paid price for opting to play in Megha Co.. another use and throw casualty! Sad
If you have loads of money you can go from Monday sickness to Finale..(Sai) but if you don't have godmother/father you can't even last all Mondays, no matter how good you are.
वैयक्तीक मतः स्मिता जिंकलेली बघायला आवडेल. पण सर्वच गेम्स मध्ये व एकूणात पुष्कर चा खेळ व वावर सर्वांच्यात जास्त सरस वाटतो, त्यामूळे तो खरा दावेदार आहे. पण बहुदा सई ची सेटींग झालेली आहे आधीच. (नॉमिनेशन ते कॅप्टन ते अंतीम फेरीत प्रवेश या ऊड्या निव्वळ २ आठवड्यात!) तेव्हा मेघा, रेशम, स्मिता यांना फक्त शोभेला 'ऊभे' करणार. निक्काल ठरलेला आहे.

योग, बाकीच्या मेघा समर्थकांचं माहित नाही, मी पहिल्या धाग्यातसुद्धा स्मिताचंच नाव घेतलं होतं आवडती स्पर्धक म्हणून.
रे ग्रुपच्या दादागिरी, स्वार्थीपणा आणि खुनशी प्रवृत्तीमुळे तिच्यावर पण लोकांचा विनाकारण रोष आलेला. पण जसजसे एक एक गुंड गळत गेला, तसतशी स्मिता उठून दिसू लागली आहे. आतासुद्धा मेघा आणि स्मिता या दोघीच बेस्ट कंटेस्टंट्स आहेत. दोघींपैकी कुणीही जिंकलं तरी आवडेल.

मलाही वाट्तय कि शरा ला तब्येतीवरून हाकलणार Sad
नंकि चा इंटरव्ह्यु, छान बोललाय.
कालचं टास्क कोणाला समजलं नाही यावरची त्याची कॉमेंट छान आहे , त्यालाही वाटतय सई घेणार ट्रॉफी !
https://youtu.be/rayBXtgtIjE

>>योग, बाकीच्या मेघा समर्थकांचं माहित नाही, मी पहिल्या धाग्यातसुद्धा स्मिताचंच नाव घेतलं होतं आवडती स्पर्धक म्हणून.
रे ग्रुपच्या दादागिरी, स्वार्थीपणा आणि खुनशी प्रवृत्तीमुळे तिच्यावर पण लोकांचा विनाकारण रोष आलेला. पण जसजसे एक एक गुंड गळत गेला, तसतशी स्मिता उठून दिसू लागली आहे. आतासुद्धा मेघा आणि स्मिता या दोघीच बेस्ट कंटेस्टंट्स आहेत. दोघींपैकी कुणीही जिंकलं तरी आवडेल.

खरे तर तुम्ही माझ्या पोस्ट्स आधी पासून वाचल्या असतील (पहिल्या बाफ पासून) तर हे लक्षात येईल की मी देखिल कुणा एकाचा समर्थक नाही, प्रचारक तर नाहीच नाही.. Proud काही लोकं काही पोस्ट बघून अंधभक्त वगैरे नेहेमीचे पालूपद सुरू करतात तो भाग वेगळा..
पण मुळात मेघा एक नक्कीच चांगली कंटेस्टंट आहे यात वाद नाही.. खुद्द घरातील सदस्यांनी मान्य केले आहे वेळो वेळी व ममां नी देखिल. फरक एव्हडाच आहे की मेघा ला अक्षरशः कुठल्याही किमतीवर ही स्पर्धा जिंकायची होती/आहे. स्मिता ने मात्र नेहेमीच मर्यादा राखून खेळ केलेला आहे आणि बहुतांशी प्रामाणिकपणे व सचोटीने खेळली आहे. हेच मी वेळो वेळी नमूद केले आहे... आजू बाजूला ईतके नकारात्मक व दबावपूर्ण वातावरण असताना असे संतुलन राखणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. This is the real strength and strong character. निव्वळ या साठी तिला लोकांनी जिंकून द्यायला हवे. नुसते वायफळ बडबड आणि लोकांवर आरडा ओरडा आणि आपलेच म्हणणे खरे हे पटवून देणे म्हणजे strong नव्हे.
as they say- all things equal, Smita deserves to win the Trophy just as she has won all the hearts ! स्मिता जिंकली नाही तरिही ती जिंकावी असेच बहुतांशी लोकांना वाटणे यातच तीला सर्व काही मिळाले. याऊलट मेघा जिंकली तरी एका ट्रॉफी व काही रकमेशिवाय तीने फार काही कमावलेले नसेल यातच बरेच काही आले.
हे गणित नक्कीच स्मिता च्या फायद्याचे ठरणार आहे असेही आणि तसेही. And thats the real winner!

"जहां पनाह.. ये सब रंग मंच की कठपुतलीया है... जिनकी डोर बिग बॉस के हाथो बंधी हुई है... Happy

Pages