बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कालचा गेमच नाही कळला!
असो, पण आता आपलं मत स्मितालाच!
तिला एलिमिनेट होऊ देऊ नका.
आ रे पैकी कोणी जाणार नाहीत.. मागच्या आठवड्यासारखं परत बी बॉ आपल्याला गंडवून शुक्रवारी एक टास्क घेणार आणि श राला बाहेर घालवतील.
त्यांनाच आ रे पैकी कोणीही जायला नकोय..

हिंदी बिगबॉसमधे aeroplane madhe केलेला.आणि इथे बैलगाडी. >>>> हो का Lol
पण कोणाला तो टास्क कळला नाही असेच मलाही वाटले. पहिल्या बझर नंतर कोणीच उतरायचा प्रयत्न केला नाही.शर्मिष्ठाने तर आधी उतरून संधी घ्यायला हवी होती. कशाची वाट पहात बसली ती? मेघाने आधी तोंड कशाला उघडायचं की मला पब्लिक सेव करेल इ.! ती इन्डायरेक्टली पुष्कीला तू घे ना रिस्क असं सांगत होती Happy मग तो अचानक उतरल्यावर तिचे धाबे दणाणले!
रेशम आस्ताद नी प्रयत्न पण केला नाही? फायनल ला जायची इतकी खात्री ?! की स्मिता आपल्यापेक्षा वीक आहेच असा विश्वास आहे त्यांना ?

मै +१
सगळ्याच लोकांचा आणि मेघाचा प्लॅन काय होता नक्की ? कोणीच उतरायचं नाही आणि सगळे पैसे सेव्ह करायचे सगळ्यांनी नॉमिनेट होऊन ??
हे सगळेच ८५ दिवसाच्या टास्क मधे जागा धरून बसायची आणि मी नाही उठणार मोड मधे आहेत , आज अ‍ॅक्चुअली बरोब्बर उलट होतं, लवकर उडी मारा सेव्ह व्हा.. बेसिकली फिनाले मधला स्पॉट विकत घ्या, पेड सिट्स भरणे प्रकार Proud
टास्क नक्की काय याची पहिला बझर झाल्यावर अक्कल आली बिबॉ अनाउन्समेन्ट नंतर !
पुष्कर अ‍ॅक्टेड स्मार्ट, खरं तर ते पूर्णपणे सईचं डोकं होतं पण क्रेडीट दिलं तर तो पुष्कि कसला , तो फक्तं लाँग हग्ज देतो, कॅमेर्यात बघून म्हंटलाच कि मी हे डिसिजन कोणाच्या इन्फ्लुअन्सने नाही घेतलय !
शरा आणि स्मिता पहिल्या उतरतील असं वाटलं होतं आज.
आज अ‍ॅज ऑलवेज रुल्स क्लिअर लिहिले नव्हते आणि बिबॉ सईवर डिसिजन सोपवून मोकळे झाले , आज क्लिअरली शराच्या आधी मेघाने उडी मारली होती पण सई गाडीच्या पायरीवर पाय म्हण्जे गाडीबाहेर वरून कनफ्युज झाली !
स्मिता अ‍ॅज ऑलवेज कनफ्युज्ड , तिला चपळपणे आल असत बाहेर पण काय करावं सम्जेना !
बाकी मेघावर कायम वीकेंडला पॉइंटर अस्स्तोच, यावेळी तिच्या आधीच्या बोलण्याने आणि पुष्कर उतरल्यावर बदलेल्या डिसिजन वरून वीकेन्डच्या वारात प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे कारण डाउट घ्यायला जागा आहे कि पुष्करला इमोशनल ब्लॅकमेल करत त्याला नॉमिनेट करून स्वतः उडी मारून सेफ करयाचा विचार होता असं वाटु शकतं !
अस्ताद रेशम जिथे जागा मिळते तिथे लोळत पडतात, एक तर खात्री आहे चॅनल टाकणारच फिनाले मधे किंवा काही पर्वा नाही.
असो, अता यांची रोजची मैत्री /फाइट्स / रुसणे फुगणे/ पॅचप्स मधे इतकी फ्लक्चुएशन्स चालु आहेत कि नक्की खरं काय शोधायचा प्रयत्नं केलात तर सिंहासन मधल्या निळु फुले सारखे प्रेक्षक वेडे होणार शेवटी !
मला वाटतय कि सोमवारी सगळे गोड बोलतात नॉमिनेशन असताना आणि बुधवारी कडाकडा भांडण टास्क मधे !
बाकी पुष्किच मेघाला पत्रं त्याने वीकंडच्या वारात वाचल असत तर अजुन जास्त फुटेज खाल्ल असत प्रेमळ पत्रापेक्षा Wink

आस्ताद नॉमिनेटेड आहे, तर हा चांगला चान्स आहे... लोकांनी बाकीच्यांना भरभरून व्होट करून त्याला काढलंच पाहिजे घराबाहेर.

स्मिताला तर त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त व्होट्स मिळतील हे नक्की. तो ज्या पद्धतीने स्मिता आणि सगळ्याच बायकांशी बोलतो, त्यांच्याबद्दल विचार करतो त्यावरून तो मनातून पारच उतरलाय. त्यातून स्मिताकडूनच तो हरला तर पोएटिक जस्टिस होईल! Happy

पण रेशमही बाहेर पडायचे चान्सेस आहेत! घरात तर ती कायम कंटाळलेली असते, नाटकात कामही करायचं आहे बाहेर आल्यावर, त्यामुळे ती उलट प्रार्थना करत असेल, मला व्होट करू नका Proud

अब आया ऊंट पहाड के निचे Lol पुढच्या आठवडयापासून रेशम boys रुम मधे एकटी झोपणार की कुठे ते बघायच आहे Lol

स्मिताच्या फॅन्सनी भरभरून वोट्स द्या, सगळ्याच हाउसमेट्सना तिची पॉप्युलॅरिटी दाखवून धक्का द्या Happy

पुष्कर अ‍ॅक्टेड स्मार्ट, खरं तर ते पूर्णपणे सईचं डोकं होतं >> हाच सल्ला ती मेघा ला पण देऊ शकली असती ,याच वरुन दिसत की सई ची मैत्री किती partial आहे.तिला जी चिन्ता पुष्करसाठी वाटते ती मेघा साठी नाही वाटत. या साठी मेघा तिला कन्फ्रँट करत नाही .तेच सई सारखी मेघा शमा च्या मैत्री बद्दल बोलत असते खरच खूप immature आहे सई .पुष्कर स्वताच्या डोक्याने कधिच चालत नाही अजिबात balanced personality नाहिये त्याची.

तुरु करेक्ट. बिग बॉसने सरळ आता सईला मस्करी म्हणून पु किंवा मे पैकी एकाला तू नॉमिनेट कर म्हणायला हवं होतं सर्वांसमोर मग कळलं असतं मेघाला. फार मेघा सै सै करतेय.

सो मि वर पण काही मेघा फॅन्स स्मिताला voting करा सांगतायेत. काही हो म्हणतायेत, काही आम्ही नाही करणारपण म्हणतायेत.

मेघा बोलणी खाणार शनीवारी.

स्मिता काय रे ला म्हणत होती.. म्हणे मी तुमच्या बरोबर नॉमिनेट होईन ना..मग उडी माराय्ची ना पटकन.. इतके दिवस सेफ राहिलीयेस नॉमिनेट होऊन तर तुला समजाय्ला हवं ना की तुला प्रेक्षकांचा सपोर्ट आहे म्हणुन..

मी केलं स्मिताला वोट.. आ-रे रहावेत अशी अजिबात इच्छा नाही.. त्याण्ची स्वतःची पण तशी इच्छा नाही.. किती ते निरिच्छ असावं..

स्मिता एवढी multitallented असून स्वभाव असा का तिचा. ती stunt बाईक रायडर आहे, तिचे ship वरचे अनुभव ऐकले अनसीन अनकट तर सर्व कामात हुशार, तिथेही कौतुक तिचे, लवकर प्रमोशन. पण इथे दबून का असते रे ताई आ दादा, सर्वांनाच. तिची स्वत: ची वार्षिक कमाई बहुतेक इथे असणाऱ्या सर्वांपेक्षा जास्त आहे. यु tube वर बघितलं.

एवढ्याशा गोष्टीचं एवढं मोठं करून सांगणारी लोकं असताना ही आपली स्वतः ला परदेशात award मिळाले मराठी फिल्म साठी हे ही कधी सांगत नाही, परवा रे ताईला म्हणाली तेव्हा समजलं.

आस्ताद स्वतः च्या गुर्मीत जे काय मराठीत वैचारिक बोलतो ते आता माझ्या डोक्यावरून जातं, किती माजात.

एरवी त्याचं मराठीवर प्रभुत्व आहे हे मला आवडतं पण बोलतो किती माज असल्यासारखं. नम्रपणा कणभर पण राहिला नाहीये आता.

मी दिले स्मिताला वोट, त्या दोघांपैकी कोणीही जावो, ही राहिली पाहीजे, खुप चांगली वाटते ती.

कालचा एपी अजुन नाही पाहीला, बघेन सवडीने, पण वोटींग केले, स्मिता जायला नको

स्मिता एवढी multitallented असून स्वभाव असा का तिचा >> M tv च्या 2009 च्या एका शोमधे एकटी मुलगी होती ती biker शेवटच्या काहि जणामधे, एक यूट्यूब वर clip बघितली होती त्यात खूप ऊंच बिल्डिंग वरुन रोप ने बाइक खाली सोडलि होती आणि खाली येताना बाइक स्टार्ट करायची होती .तीने असे खूप stunts केले आहेत, ट्रक वगैरे चलवला आहे .

https://youtu.be/QP9m2Ykcdz8

https://youtu.be/9FK3OQf-FIQ

पण इथे ती सीनियर लोकापुढे दबून गेलिये. बाहेर पण ती मित भाषी आणी introvert असावी ,किती लोकान्नी तिला फसवल असेल पैशाच्या वगैरे बाबतित काय माहित!! तिला सेल नाही करता येत स्वताच talent .

हे एवढ सगल आस्ताद कड़े असत तर बैल फुगुन डायनासौर झाला असता Lol Lol

ह्या लोकांच्या म्हणजे सहभागी असणार्‍यांच्या एक गोष्ट लक्षात येत नसेल कदाचित. म्हणजे हे सगळं स्क्रीप्टेडच आहे असं धरूनच चाललेय मी आता. ही लोकं बिग बॉसच्या घरात जशी वागतात त्यावरूनच आपण त्यांना जज करतोय आणि तिथे तिसरा बीबी उघडावा लागला इतकं डिस्कस करतोय. पण ह्यांचं इम्प्रेशन आपल्यावर इथे जसे वागलेत तसंच रहाणार आहे. इथून बाहेर पडल्यावर आस्ताद काळे आवडायला लागेल असं निदान माझ्याबाबतीत तरी होणार नाहीये.

मी स्मिता ला वोट केल. सर्वांनी भरभरून वोट्स द्या स्मिता ला .

तुरु thank u त्या स्मिताच्या बाईक व्हिडीओसाठी. कसली सॉलिड आहे ती, कित्ती गोड दिसतेय आत्तापेक्षाही. इतकं काही मला माहिती नव्हतं.

मधल्या काही गोष्टींमुळे तिचा confidence गेला असावा.

पुष्कर ने जसं उडी मारुन स्वता ला सेफ केलं ते पाहुन मेघा ला असं झालं की काय करु नी काय नाही.
नक्किच भिती वाटत होती तिला की आ आणि रे सोबत उभी राहिले नाँमिनेशन ला तर मत मिळता की नाही.

Pages