धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अश्विनीमामी on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम् , परत परत पहाणारे किती यावरुन जरा वाहवलो खरा.
गल्ला होईलही जास्त पण हिट होईल का या बाबत मी चांगलाच साशंक आहे.

ट्रेलर, गाणी, सेट्स, हिरो, हिरॉइन काहीच आवडले नाही. नुसतंच कचकड्याचं वाटलं सारंच. मोठमोठ्या हवेल्या(अगदी गरीब असलेल्या नायकाचे देखिल मोठे टूमदार घर), इंग्रजी बोलणारी नायिका, सिक्स पॅकवाला नायक, झिंगाट गाण्यात अगदी बॉलिवूड स्टाईल कोरिओग्राफी, गाण्यांमध्ये जाणवणारा कृतक भाव हे सगळंच चित्रपट या माध्यमाचा व मुळात सैराटचा फार गंभीरपणे विचार न केल्याचे फलित भासते आहे.
आणखी: नागराज मंजुळेंनी सगळ्यात मोठी गोष्ट फॅंड्री व सैराटमधून केली ती म्हणजे सौंदर्यशास्त्राचे नवे सिद्धांत मांडले. परश्या काय किंवा आर्ची काय, ते लोकविलक्षण सुंदर, सर्वगूणसंपन्न, नैतिकदृष्ट्या योग्य, सौभाग्यशाली असे नायक- नायिका नाहीयेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील अपूर्णतेतील सौंदर्य सैराटच्या फ्रेम न फ्रेममधून खुलून येते. सैराट केवळ जातीभेदावर भाष्य करतो असे नाही, स्त्री वादावरदेखिल बरेच ठोसपणे बोलू पाहतो. धडक हे सगळे करू शकेल का किंवा मुळातच धडकला ते करायचे आहे काय याचे उत्तर मला तरी समाधानकारक दिसत नाहीये.

मुळात सैराट ची फक्त स्टोरी घेऊन(जसे सरकार चित्रपटाच्या आधी त्याची कल्पना गॉडफादर वरुन घेतली आहे असा उल्लेख येतो तसा करुन) हा पूर्णपणे वेगळा पिक्चर म्हणून बनवायला हरकत नाही.
त्यात 'नाचे झिंगाट' आणि 'पहली बार है पहली बार' वगैरे मोडतोड गाणी असायलाच हवीत असा आग्रह नको. (ते फक्त ए आर रहमान च्या गाण्याना चांगलं जमतं Happy )

मानव, तुम्ही महाराष्ट्र टेरेटरी आणि PAN इंडिया + ओवरसीज टेरेटरी यांची तुलना करत आहात ना?
>>>>>>

ईथे बरेच लोकं धडकच्या दर्जाचे मूल्यमापन करतानाही ही गल्लत करत आहेत.
दिग्दर्शकाने आपल्या टारगेट ऑडियन्सच्या हिशोबाने चित्रपट बनवला आहे हे विसरत आहेत. आणि उगाच आपल्या मातीतील आपल्याला जवळ वाटणार्‍या सैराटशी तुलना करत आहेत.

झिन्गाट मध्ये जानू बेबी एकदम ऑफ ट्रॅक नाचतेय असं वाटते .
ईशान ने धिन्गाणा घालायचा प्रयत्न केलाय पण तो मुळातच चांगला डान्सर असल्यामुळे फसल्यासारखा झालायं
पण त्याचे डोळे लईच आवडले .
तु पिझ्झा खातेयस आणि मी शेन्ग्दाणे - खुदकन हसू आलं एक्दम ऐकून .मज्जा वाटली .

जानू नाचताना इशानच्याच स्टेप्स पण कमी एनर्जी ने करताना दिसते, त्यामुळे ते पाट्या टाकल्यासारखे वाटते.

पेहेली पेहेली बार गाण्यात मूळ याड लागले गाण्यातील म्युझिक पीस मिस्सिंग आहेत, (कदाचित ट्रेलर मध्ये कापले असतील, ओरिजिनल गाण्यात असतील) पण त्यामुळे ते गाणे फारच टू द पॉईंट वाटते, त्यात रेंगाळायला होत नाही.

पेहेली पेहेली बार गाण्यात "ए परश्या आर्ची आली बघ" जो हिन्दीमध्ये ओरडतो , कसला फाटक्या आवाजात ओरडतो तो .
काय बोलतोय ते पण कळत नाही

याड लागलं चे हिंदी वर्जन आज ऐकले, मला एकही शब्द कळला नाही. रादर मराठी गाणॅच ऐकु येत होते.
परत एकदा ऐकले तरी तेच Uhoh

तीन खानांचे सुरुवातीलाच तीन ब्लॉकबस्टर लवपट आहेत.
१. शाहरूख - डीडीएलजे
२. सलमान - मैने प्यार किया
३. आमीर - क्यू से क्यू तक !

हा मला क्यू से क्यू तक ची जादू करणार असे वाटू लागलेय हळूहळू एकेक ट्रेलर बघत..
परश्या आणि आर्ची मेली तेव्हा डोळ्यात पाणी आले नव्हते, हा पोरगा काढणार. फार गोड आहे.

>> १. शाहरूख - डीडीएलजे
दस्तूरखुद्द शाहरुख वरचा अभ्यास एव्हढा कच्चा? Happy
शाहरुख चा दीवाना बर्‍याच आधीचा होता आणि त्याला लव्ह स्टोरी म्हणता येईल. डी डी एल् जे येईपर्यंत दुसर्‍या अनेक सिनेमांमुळे शाहरुख ऑलरेडी स्टार झालेला होता.

टिपिकल करण जोहरपट आहे धडक.. हॅपी ending दाखवेल की काय??!!
आर्चीच्या देहबोलीत बेदरकारपणा आणि आवाजात जरब आहे. जान्हवीला त्यातली एक सहस्राश acting सुद्धा जमल्यासारखी वाटत नाही. ईशान च्या ग्वाड चेहऱ्यामुळे त्याला बाकी सगळं माफ करावंसं वाटतंय
बाकी grandeur फक्त मोठ्या हवेल्या आणि मोठे सेट्स वापरून येत नाही. हे काहीच नसूनही सैराटची प्रत्येक फ्रेम ग्रँड होती. उदा. 'सैराट झालं जी' जेवढं ग्रँड दिसतं,वाटतं ती सर धडकच्या मोठाल्या वाड्यांमध्ये नाही.
मागे झी talkies वर 'सैराटच्या नावानं चांगभलं' ही सैराटच्या मेकिंग वरची फिल्म दाखवत होते.. सलग काही रविवार. nagaraj is a visionary. अक्खा सिनेमा त्याला आधी दिसला आणि मग त्याने तो पडद्यावर आणला.

सशल,
दिवाना ऋषी कपूरचा होता. शाहरूखने छोट्याश्या भुमिकेत भाव खाल्ला ती गोष्ट वेगळी. पण तो काही स्टार वगैरे झाला नव्हता. जेव्हा त्याने डर मध्ये माधुरीला आणि अंजाममध्ये सनी देओलला खाल्ले तेव्हाही सनी, माधुरी हे तेव्हाचे स्टार होते. शाहरूख तुलनेत नवखाच. निगेटीव्ह शेड भुमिका करून झाल्यावर सुपर्रस्टार पदाकडे पहिले पाऊल त्याने ज्या रोमांटीक चित्रपटातून टाकले तो म्हणजे डी डी एल जे च .. पुढे यश चोप्रा यांनी त्याला सल्ला दिला की तुला सुपर्रस्टार बनायचे असेल तर पुढे याच पठडीतले रोमांटीक चित्रपट करावे लागतील. आणि ते त्याने केले.

पुढे यश चोप्रा यांनी त्याला सल्ला दिला की तुला सुपर्रस्टार बनायचे असेल तर पुढे याच पठडीतले रोमांटीक चित्रपट करावे लागतील. आणि ते त्याने केले.>>>>>>>

नशीब,
.......
यशराज बॅनर ला टिकून राहायचं असेल तर मला घेऊन याच पठडीतले रोमँटिक चित्रपट बनवावे लागतील असे शाखा ने यश चोप्राला ठणकावून सांगितले, आणि त्यांना ते ऐकायला भाग पडले......
हे असले काही वाचायला लागले नाही

एका पेपर ने धडक चा धक्कादायक शेवट सांगूनच टाकला.
स्पॉयलर वॉर्निंग वगैरे काही प्रकार माहितीच नाही Happy
सैराट पेक्षा थोडा वेगळा आहे.

<मागे झी talkies वर 'सैराटच्या नावानं चांगभलं' ही सैराटच्या मेकिंग वरची फिल्म दाखवत होते.. सलग काही रविवार. nagaraj is a visionary. अक्खा सिनेमा त्याला आधी दिसला आणि मग त्याने तो पडद्यावर आणला.>+१

अभिनय कसा करून घेतलाय ते छान दाखवलं. स्पेशली त्या बाळाकडून.

सैराट झालं जी मधला तो रंगपंचमीचा सीन..ज्यात आर्ची परश्यावर रंग फेकते..background ला आहे काय तर गावातली जुनाट घरं, धूळ, मळलेल्या पायवाटा, दगड, रखरखीत परिसर, अगदी सर्वसाधारण कपड्यातले लोक..पण काय कमालीची जादू आहे त्या सीनमधे, जी परदेशातली लोकेशन्स, महागडे सेट, कॉस्च्युम्स मधूनही पकडता येत नाही..खरंच कमाल आहे मंजुळेंची Happy
हे असलं काही धडक मधे असेल अशी कल्पनाही करवत नाही!

सिंबा, सैराट असो वा बाहुबली, हे चित्रपट बनवायचा एक फॉर्म्युला असतो. तो कॉपी करून त्याचा रिमेक बनवता येतो. तसा प्रयत्न तरी होतो.
पण डीडीएलजे किंवा डीटीपीएच सारख्या चित्रपटांचा काही फॉर्म्युला नसतो. तर निव्वळ जादू असते. तशी कमाल ईतरांना ठरवून जमूच शकत नाही. ती बस्स अवतरते... Happy

त्यांचा बायसड वाटतोय, कारण त्यांना सैराट आवडला नव्हता, म्हणून आता धडक कसा जास्त भारी सैराट पेक्षा हे लिहितायत. सैरातचीच मापे कढतायत.

अकलूज नही है फिल्ममे
राजस्थान दिखावें
अंग्रेजी सबको ही आवे
बुडांधार न दावे

ओ अब झनक गया
दिल मे मेरे
और हाथों मे हाथ आया जी
धडक गया जी
ओ ओ
धडक गया जी

अकलूज नही है फिल्ममे
राजस्थान दिखावें
अंग्रेजी सबको ही आवे
बुडांधार न दावे

ओ अब झनक गया
दिल मे मेरे
और हाथों मे हाथ आया जी
धडक गया जी
ओ ओ
धडक गया जी

एका प्रामाणिक कथावस्तूला विदृप करून केवळ पैशाच्या जोरावर ते वि दॄ पी करण जस्टिफा य करणे बरोबर नव्हे. ही डंबिंग डाउन सोशल प्रॉब्लेम्स वृत्ती करण जोहर मानसिकतेत नेहमी दिसून येते. अरे जरा बसूदे दु:खाचे चरचरीत,
डाग येउदे सफरिंग बाहेर. जरा सखोल विचार करा?! नॉट एव्हरी थिंग इन लाइफ इज शायनी हॅपी फॉर सम पीपल.

अरे पोरं हकनाक मेली आता त्या बारक्याला कोण बघे ल म्हणून चार दिवस झोप उडुदे. लंगड्याच्या मनात ल्या उपजत प्रेम भावनेला कधी प्रतिसादच मिळ णार नाही ह्यातला दर्द जरा समजून घ्यावा. दलित मुस्लिम मुलगा किती होनहार प्रामाणि क आहे व हा स्टिरीओ टाइप नव्हे हे समजू देत.

एक प्रेक्षक वर्ग म्हणून आपण जास्त चांगले काही डिझर्व करतो कि नाही?!

पण नाही चॉकोलेट पान च देणार ते हिट करवणार कारण डिस्ट्रिब्युशन मसल पॉवर.

अमा, शंभर टक्के सहमत!
सुदैवाने सगळीकडे धडकच्या युट्यूबवरच्या प्रमोशनल व्हिडिओज खाली अमराठी (काश्मीर ते कन्याकुमारी आणि पाकिस्तान सुद्धा) लोकांच्या सैराट सरस असल्याच्या प्रतिक्रिया वाचते आहे. त्याने दिलासा मिळाला!

सुदैवाने सगळीकडे धडकच्या युट्यूबवरच्या प्रमोशनल व्हिडिओज खाली अमराठी (काश्मीर ते कन्याकुमारी आणि पाकिस्तान सुद्धा) लोकांच्या सैराट सरस असल्याच्या प्रतिक्रिया वाचते आहे. त्याने दिलासा मिळाला!>>>>>>
+10000

काल एक भन्नाट चित्र पाहिले यावर प्रतिक्रिया म्हणून. 'मोनालिसा' च्या चित्रापुढे उभे राहून कोणीतरी लहान मुले रेघोट्या ओढून एखाद्या व्यक्तीचे चित्र काढायचा प्रयत्न करतात तसे करत आहे - आणि मोनालिसा च्या चित्राला "सैराट" नाव देउन या रेघोट्या चित्राला "धडक" नाव दिले आहे Happy

अमांच्या वरच्या प्रतिसादाला अगदी अगदी झालं. काल सगळ्या रिव्ह्यू मधली सालं काढलेली वाचून रात्री परत सैराट बघितला. डंब डाऊन बघवणार नाही.

Pages