धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अमा on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बघणार नाही. एरवी सैराट ची छाप नसती तरी पाहिला नसता.
जान्हवी चे स्पेलिन्ग सर्व पेज ३ मॅगझिन्स झान्वी लिहीतात. आणि तिने गोणपाटाला तीन छिद्रे पाडून त्यात डोके व २ हात घातले तरी तिच्या फॅशन सेन्स चे जबरदस्त कौतुक करतात.
फॅशन पोलीस च्या लाडक्या कन्या:
झान्वी, दिया मिर्झा, आलिया, दिपीका
नावडत्या ध्रुवबाळ:
विद्या बालन, सोफी चौधरी, हुमा कोणीतरी, प्रियंका चोप्रा, एकता कपूर.

श्रीदेवी गेल्यावर तिला मुलगी आहे व तिचा चित्रपट येतोय हे भारतात नुकत्याच जन्मलेल्या मुलालाही कळेल इतका प्रचार झालेला आहे.
>>>>

मला फिल्मी गॉसिप आणि पेज थ्री न्यूजमध्ये ईण्टरेस्ट नाही. कानावर पडली तर ठिक पण मुद्दाम ऐकायला जात नाही.
चित्रपटांचे ट्रेलर मी मुद्दाम बघायला जात नाही. काही कॉन्ट्रोवर्सी झाली असेल तरच. अन्यथा रसप यांचे परीक्षण आल्यावर मला कळते असा चित्रपट आलाय.
बाकी श्रीदेवी गेल्यावर तिच्या कुत्र्यामांजरींच्याही मुलाखती घेतल्या असतील. मला ती माहिती घेणे गरजेचे वाटले नाही. श्रीदेवीच कश्याला, मला शाहरूखबद्दलही तुमच्यापेक्षा चार गोष्टी कमी माहीत असण्याची शक्यता आहे.
अर्थात असेही असेल की मी बातम्यात हे ऐकलेही असेल पण आपला मेंदू अश्या बरयाच बिनमहत्वाच्या गोष्टी नोंद न करता या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो. अन्यथा रस्त्याने येताजाता दिसणारया प्रत्येक चेहरयाची प्रतिमा मेंदूत स्टोर होऊ लागली असती तर तो फुटला असता.

आता मात्र ती सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये काम करतेय तर ही न्यूज मला दखल घेण्याजोगी वाटतेय. आता ही पोरगी लक्षात राहील. तरी कशी दिसते हे अजून बघायचेय Happy

@ ड्यूआयडी बद्दल माझ्या मनोगत धाग्यावर बोलूया. ईतर चर्चेचे धागे नासवूया नको. बिल नंतर माझ्यावरच फाटते.

स्क्रीप्ट का कबाडा किया के नै किया ये ट्रेलर के उपर से कैसे पता चलैला ?
>>>>
बंबई की पब्लिक बॉस! पोस्टर देख के सिनेमा ताड लेती है. यहा तो पुरा ट्रेलर निकला है Happy

स्क्रीप्ट का कबाडा किया के नै किया ये ट्रेलर के उपर से कैसे पता चलैला ?
>>>>
बंबई की पब्लिक बॉस! पोस्टर देख के सिनेमा ताड लेती है. यहा तो पुरा ट्रेलर निकला है Happy

एखाद्यावर बाजू मांडू न देताच टीका होऊ लागली की मला त्याचा कैवार घ्यावासा वाटतो. का कसला सिंड्रोम आहे ठाऊक नाही. पण या कारणासाठीच (सैराटशी अनाठायी तुलना केल्याने) आता धडक पाहण्याचे मनात नक्की होतंय. जाऊ देत ३०० रूपये. अन्यायाची बोच कमी करण्याची फी समजेन हवं तर.

मधुरांबे तुमचा दृ ष्टीकोण समजतो. तुमी सिनेमा बघून परीक्षण नक्की लिहा. मला पहिले तर लेखाचे शीर्शक सात्विक संताप असेच ठेवायचे होते. तुम्ही आमची पण पार्श्वभूमी समजून घ्या. बुवांच्या सैराट बाफ वर आम्ही सिनेमावरचे प्रेम व ते का आहे ते नीट व्यक्त केले आहे. प्लीज डू युअर होमवर्क तुम्हाला आमचा तळत ळाट समजेल. जानू माझ्या मुलीच्याच वयाची आहे. मी उगीच फालतू लिहीणार नाही. चांगला ब्रेक मिळून आईपेक्षा कीर्तिवान होउदे. पहिल्या सिनेमात अ‍ॅक्टिंग ऑकवर्डच असणारे.

संताप त्या चांगल्या स्क्रिप्ट व संकल्पनेचे मशी बॉलिवुडी करण करणायाच्या सवयीचा व त्याला इतके रिसोर्स मिळ तात त्याचा आहे. पिक्चर मे वर्क ऑल्सो इन इट्स ओन वे. एक उत्तर भारतीय इंटरप्रिटेशन म्हणून आणि आपल्या देशात पहिले प्रेम फॅमिलीसा ठी कुर्बान करून अ‍ॅरेंज मॅरेज करणा री मुले मुली अजूनही खूप आहेत. त्यामुळे बेसिक प्रिमाइस विल वर्क. इतर गाणी पण छान असतील कदाचित. समजेल काही दिवसात.

गैस नको प्लीज.
ट्रेलर वरून सिनेमा कसा आहे हे इतक्या ठामपणे नाही ठरवता येत. कदाचित त्यांनी केलेले बदल सिनेमा पाहताना सुखावह वाटू शकतील कदाचित मनःस्ताप होईल. पण हे सिनेमा पाहील्यावरच समजेल असं मला वाटतं.

सैराट आवडला नाही असं मुळीच नाही. पण फेसबुक वर झी ने पेरून ठेवलेल्या आक्रमक समर्थकांमुळे जरा काही सैराटविरोधी लिहीणारे लोक आपोआप पलिकडच्या कंपूत ढकलले गेले. हे कसलं मार्केटिंग ? पण यशस्वी झालं हे खरं. पण त्याचा परिणाम सैराट नावडता होण्यात झालेला नाही. त्यामुळे त्या पूर्वग्रहातून मी इथे प्रतिसाद नाही दिलेले.

मी इथले जरी वाचले नसले तरी फेसबुकवर इतके लिखाण झाले होते की शेवटी अजीर्ण झाले. कंपलश्न असल्याप्रमाणे जवळपास प्रत्येकाने रिव्ह्यू लिहीला होता.

एखाद्यावर बाजू मांडू न देताच टीका होऊ लागली की मला त्याचा कैवार घ्यावासा वाटतो. का कसला सिंड्रोम आहे ठाऊक नाही.>>>>>>
अय्यो, अगदी असाच सिंड्रोम इकडच्या एका प्रतिथयश लेखकाला पण आहे,

मधुराताई,
फेसबुक वर लिखाण हा खूप वेगळा प्रकार आहे. तिथे कितीही व्यक्तीगत स्वरुपाचे आणि काहीही प्रतीसाद (अगदी झी ने समर्थक पेरले नसले तरी स्वयंघोषित चक्रम लोकांमुळे) येऊ शकतात.
मायबोलीवर सैराट चा धागा वाचा.

धडक सैराट सारखाच असावा, फ्रेम टू फ्रेम गरिबी व्यक्त व्हावी वगैरे अपेक्षा नसावी. लोकं व्हेरिएशन शी ओके आहेत.
पण टिपीकल कभी खुशी कभी गम किंवा इतर कजो पटांचा कॉपी पेस्ट बनणार असेल तर सैराट चा रिमेक म्हणून आयते पुण्य लाटू तरी नये.

Submitted by mi_anu on 13 June, 2018 - 02:27 १०००००००००००००००००+

Mi_Anu पूर्ण सहमत.

मधुराआंबे, सैराटसाठी झी ने समर्थक पेरले असतील, कल्पना नाही. पण मी सैराटच्या प्रेमात पडले ते रिव्ह्यू वाचून नाही तर चित्रपट अनेकदा पाहून. त्याची प्रत्येक फ्रेम फ्रेश आहे. आणि त्या फ्रेममधली मुले ही चित्रपटात अभिनय करताहेत हे वाटत नाही तर तेच आयुष्य जगताहेत असे वाटत राहते. अभिनयाची काहीही पार्श्वभूमी नसताना ती मुले इतके प्रोफेशनल काम करून गेली आणि इथे जान्हवीवर करोडो रुपये खर्चून सुद्धा चेहऱ्यावरची माशी न हलावी.... धडक चा ट्रेलर व सैराटचा ट्रेलर... दोघातही तोच प्रवास दाखवलाय... दोन्ही ट्रेलर पूर्णपणे सारखे आहेत... पण सैराटमध्ये बाप बघितल्यावर त्याच्या विचारांची कल्पना येते, धडक मध्ये नुसता बोलीवूडी धमाका... सैराट ट्रेलरमध्ये आर्चीचा नुसता संवाद कानावर पडतो, उगाच आले तुझ्याबरोबर हा.. नुसत्या आवाजातून तिचा संताप त्रागा दिसतो.. धडक मध्ये जान्हवी हा संवाद प्रत्यक्ष बोलताना दिसते.. पण ती फक्त बोलतेच.. तिचा चेहरा कोरडा आहे त्या प्रसंगी.. नुसत्या 3 मिनिटांच्या दोन ट्रेलरमधून इतका फरक दिसतो.. सैराट तर अडीज तासांचा आहे...

एवढ सगळ वाचुन ट्रेलर पाहिला.बाकी असो.झिंगाट गाण वाया गेलय पुर्ण.सैराट तल्या झिंगाटचा अजिबातच फिल नाही.येणार पण नाही म्हणा.
इशान तिच्यासाठी इंग्रजी मधे जे गाण गातो ते आवडल.जानुबाळ पेक्षा इशान बराच बरा वाटतोय.

पटले.
फक्त माझे नाव तेव्हढे करेक्ट लिहावे ही विनंती.
ते मधुर असे आहे.

ओह, यु आर बॉय?
मला वाटले मधुरा तांबे चे चुकून मधुरा आंबे झालेय.

पाहिला ट्रेलर. हा जास्त शहरी वाटतोय सैराट पेक्षा. करीना ची "पू" तिच्या मैत्रिणींबरोबर उभी आहे असाच भास होतो सीन पाहून. मग समोरून हृतिक रोशन चे पेक्स आणि पॅक्स आधी येतील, मग तो येइल, आणि काही कारण नसताना नाचेल असेच वाटले Happy

आवर्जून पाहीन का नाही माहीत नाही, तेवढी उत्सुकता वाटली नाही निदान ट्रेलर वरून. त्यात हुबेहूब सैराट जरी असेल तरी त्यापेक्षा मूळ सैराटच परत न पाहता हा का पाहायचा याचे उत्तर ट्रेलर मधून मिळावे इतके काही इण्टरेस्टिंग दिसले नाही.

सैराट भारतभर पोहोचेल असा रिमेक जरूर व्हावा. पण तो अक्षरशः reinventing the wheel पद्धतीने. राजस्थान मधली सत्ताधारी आणि सो कॉल्ड उच्च जमात, त्यांची गावातली वट, तेथील इतर जनता, त्यांच्यातले डायनॅमिक वगैरे मुळापासून पुन्हा उभे करावे लागतील. सैराट मधले सीन तसेच्या तसे फिट्ट बसतील का नाही हे बघावे लागेल. तसे करून पुन्हा चित्रपटाची कथा उभी केली असेल तर आवडेल हे राजस्थानी व्हेरिएशन. नाहीतर त्यापेक्षा मूळ सैराटच परत बघेन.

अरेच्या म्हणजे "जानव्ही नव्हे जान्हवी" या प्रतिसादात चुकीची दुरुस्ती करून सांगितलेला उच्चार पण चुकीचाच होता तर...
>>> लोल. आता अस्ताद ला बोलावयाचे का- तोच सांगेल बरोबर उच्चार ☺️

फार लांब कशाला , काल माझ्या तमिळ मित्राला धडकचा ट्रेलर दाखवला..त्याने पण धडकला शिव्या घातल्या..

सैराट ची फक्त गाणी पाहिलीयेत त्याने, शब्द / भाषा कळत नसुन पण सगळं एक्स्प्रेशन मधुन पोहचतंय म्हणाला आणि हे म्हणजे बघुनच वैताग आला असं त्याचं मत...
पुढे हे पण म्हणाला की हे ट्रेलर बघुन मला इतका त्रास होतोय तर तुला किती होत असेल...

मग उतारा म्हणून आम्ही सैराटची गाणी पाहिली

ट्रेलर बघितले आणि निराशा झाली. सैराट ची जादू हरवली आहे.
<ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली> अगदी अगदी.
जान्हवी कपूरचे फारच मख्ख हावभाव आहेत. २ र्‍या भागात अडचणीच्या काळातही तिचा मेकअप, केस एकदम टापटीप आहे ! हिरो आवडला.
<सैराट भारतभर पोहोचेल असा रिमेक जरूर व्हावा. पण तो अक्षरशः reinventing the wheel पद्धतीने.,> +१
करण जोहरने 'स्टेपमॉम' पूर्ण कॉपी करून अतिशय भयाण रिमेक केला होता.

मी पण आजच पाहीला. पण आर्ची मधला अ पण त्या पोरीत नाही. बाहुली आहे फक्त. फिल्म मोबाईल वरच बघण्याचे निश्चित केले आहे.

Pages