धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अमा on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेटर सिनेमे येऊन गेले असतीलही पण प्रत्येकाची बेटर डेफिनिशन वेगळी आहे. तुम्ही कोर्टला बेटर म्हणाल, तो बेटर असेलही पण लोक बोअर म्हणतात.
>>>>>>>>>
आँ? मी कोर्टचा किंवा कोणत्याच सिनेमाचा उल्लेख केलेला नसताना कोर्ट कुठून आला मध्येच? मराठीतल्या सिनेमांच्या चांगल्या किंवा वाईट असण्याचा कोर्ट हा बॅरोमीटर आहे?

बाकी अर्चि, परश्या, लंगड्या, सल्या आणि इतर सगळ्यांनी सुमार अभिनय केला म्हटलात त्याला ___/\____.
एखादे पात्र साकारताना बघणार्याला तो अमुक्तमुक हा ऍक्टर हे पात्र साकारतोय असे न वाटता जे दिसतेय तेच त्याचे खरे आयुष्य आहे असे वाटणे हा माझ्या मते अभिनय.
परश्या आर्चीला आपण आधी पाहिले नसल्याचा त्यांना फायदा झाला. पण त्यांनी पडद्यावर जे केले ते कुठेही खटकले नाही. जान्हवीला तरी कुठे पाहिलंय? पण ट्रेलरमध्येसुद्धा ती का खटकतेय? सोनम कपूरला इतक्यांदा पाहिलेय तरी ती कायम सोनमच का वाटते? डिअर जिंदगी हा त्यामानाणे हल्लीचा चित्रपट. त्यात शाहरुख, शाहरुख न वाटता एक प्रौढ व्यक्ती जो डॉक्टरही असू शकतो असे का वाटते? स्टुडन्ट ऑफ द इअर मधली आलिया आणि उडता पंजाब मधली आलिया, प्रचंड फरक दिसतोच ना? ह्या सगळ्या अभिनयाचे श्रेय त्यांना का नाकारावे?
>>>>>

आय बेग टू डिफर. प्रत्येकाच्या अभिनयाच्या व्याख्या वेगळ्या असतात, पण सैराटमधल्या कलाकारांनी केला तो अभिनय असेल तर त्यांना अजून बरीच मेहनत घ्यावी लागेल. खासकरुन प्रमुख दोन कलाकार कोणत्याही अँगलने ती कॅरेक्टर्स न वाटता केवळ नवखे कलाकार आहेत हे सिनेमाभर सतत दिसत राहतं. सोनम कपूर, शाहरुख खान वगैरे अनेक सिनेमे आल्यानंतरही अद्यापही ते आपल्या प्रतिमेतून बाहेर पडू शकत नसतील तर या त्यांच्या अभिनयाच्या मर्यादा आहेत, त्याबद्दल त्यांचं श्रेय काय? नुसत्या मेहनतीचा उपयोग काय? मेहनत तर भारत भूषणपासून इमरान हाश्मीपर्यंत वर्षानुवर्ष लोक करत आहेत. आलिया भट्ट्ने व्हेरीएशन्स दिली हा मुद्दा एकदम मान्य.

मला एका गोष्टीचं कायम कोडं पडलेलं आहे. एखादा धो धो चाललेला सिनेमा प्रत्येकाला आवडलाच पाहिजे, त्या सिनेमातल्या कलाकारांचा अभिनय प्रत्येकाने नावाजलाच पाहिजे हा आग्रह का? सरळसरळ नाही तर आडवळणाने.

अहो काय धडक धडक करताय सगळे जण??
दोन अडीच मिनिटांचे ट्रेलर, त्यावर 100 एक पोस्ट मध्ये सगळे चर्वितचर्वण करून झाले की राव,

100 पोस्ट नंतर त्या अडीच मिनिटांवर अजून नवीन काय बोलायचे?

मला एका गोष्टीचं कायम कोडं पडलेलं आहे. एखादा धो धो चाललेला सिनेमा प्रत्येकाला आवडलाच पाहिजे, त्या सिनेमातल्या कलाकारांचा अभिनय प्रत्येकाने नावाजलाच पाहिजे हा आग्रह का? सरळसरळ नाही तर आडवळणाने.>>>>

नशीब धो धो चाललात म्हटलेत. नाहीतर हिंदीत 500 करोडचा गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांपुढे 100 करोड म्हणजे जीर्ण पाचोळाच.... असे म्हटले नाही.

ज्यांना आवडला त्यांनी धागा काढून मजा करून घेतली, एकेक प्रसंगाची चिकित्सा करून पुनप्रत्ययाचा आनंद घेतला. तुम्ही एक धागा काढा व तो प्रत्येक प्रसंग व त्यातील अभिनय किती रद्दी होता याची चिकित्सा करा.. आम्हाला काय, वाचण्याशी मतलब....

आर्ची परश्याने अभिनय केला नाही असं इथे पब्लिक का म्हणतंय? पिक्चर टिपिकल कथा फॉर्म्युला चा होता, अजय अतुल च्या म्युझिक ची मदत झाली सगळं मान्य.पण म्हणून आर्ची, परश्या, सल्या, लंगड्या,अक्का,मंग्या, प्रिन्स यांनी अभिनय केलाच नाही असा होतो का?
अंदाजे सगळे चांगल्या दर्जाचे ताजे पदार्थ घालून मध्ये मध्ये चव घेत बनलेली बिर्याणी चांगली बनली.त्या तांदळाचे नंतर बनलेले पुलाव आणि मसालेभात त्या तोडीचे झालेच नाहीत. इट वॉज वन टाईम वंडर.
मोजून मापून रेसिपी बुक पाहून किंचित सांबर मसाला किंचित छोले मसाला टाकून आणि सुंदर प्रतीचे तांदूळ वापरून बनवलेला भात तसा चवीला ठीक लागला, खाल्ला जाऊ शकतो.पण त्याला बिर्याणी म्हणणे काही जमले नाही.तोही वन टाईम ब्लन्डर.पुढे नंतर काही मसाले वगळून बनवलेले याच तांदळाचे पुलाव चांगले बनातीलही.

आर्ची परश्याने अभिनय केला नाही असं इथे पब्लिक का म्हणतंय?>>>>>
त्यांच्या रिअल आणि रील लाईफ मधले अंतर खूप कमी होते म्हणून,(भाषा, लोकेशन इत्यादी मध्ये)
जे आपण नाही ते convincingly दिसण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, जे त्यांना करावे लागले नाहीत.

सोनम कपूर, शाहरुख खान वगैरे अनेक सिनेमे आल्यानंतरही अद्यापही ते आपल्या प्रतिमेतून बाहेर पडू शकत नसतील तर या त्यांच्या अभिनयाच्या मर्यादा आहेत,
>>>>>

सोनम कपूर आणि शाहरूख खान यांना एका पोस्टीत बघून सोनम कपूरचेही डोळे पाणावले असतील आणि अनिल कपूरची केसाळ छाती अभिमानाने फुलून आली असेल.

बाकी ज्या कलाकाराने सुरुवातीलाच निगेटीव्ह भुमिका साकारण्याचे धाडस दाखवले आणि त्या हिट गेल्यावर सुद्धा त्यातून बाहेरही पडून दाखवले, आणि नुसता बाहेरच नाही पडला तर तिथेही सोने केले. तो तर प्रतिमेतून बाहेर पडायचा एक बेंचमार्क ठरला पाहिजे. ईथे उलटच लिहिलेय. जरा घाईगडबडीत झालेय का हे चेक कराल का?

आर्ची आणि परशा वन टाइम वंडर असतील पण सैराट मध्ये त्यांच्या भूमिकांमध्ये ते एकदम चपखल बसले होते. आता हा चपखल पणा त्यांच्या रील आणि रियल आयुष्यामध्ये फारसा फरक नसल्यामुळे आलेला असू शकतो पण तरीही सैराटचा दर्जा कमी होत नाही. मुळात सैराटबद्दल बोलताना त्यातल्या कलाकारांना नंतर काही करता आलं नाही या मुद्द्याचा काय संबंध?

>>एखादे पात्र साकारताना बघणार्याला तो अमुक्तमुक हा ऍक्टर हे पात्र साकारतोय असे न वाटता जे दिसतेय तेच त्याचे खरे आयुष्य आहे असे वाटणे हा माझ्या मते अभिनय.<<
या मताला अनुसरुन आर्ची-पर्शाच्या अभिनय कौशल्याची वाहवा होत असेल तर विषयंच संपला. Happy

वर बर्याच जणांनी म्हटल्याप्रमाणे आर्ची-पर्शा त्यांचा स्विट स्पाॅट असल्याने तरुन गेले, कॅमेरासमोर अवघडलेले वाटुनहि. स्वत:च्या जीवनशैलीशी अजिबात निगडीत नसलेली भूमीका ताकदिने साकारणे, यालाच मी तरी अभिनय म्हणतो. उदा. संपन्न कुटुंबात आयुष्य गेलेलं असुनहि एका भिकारी सद्रुश्य माणसाची भूमिका “जागते रहो” त साकारणे, याला म्हणतात अभिनय...

बाकी ज्या कलाकाराने सुरुवातीलाच निगेटीव्ह भुमिका साकारण्याचे धाडस दाखवले आणि त्या हिट गेल्यावर सुद्धा त्यातून बाहेरही पडून दाखवले, आणि नुसता बाहेरच नाही पडला तर तिथेही सोने केले. तो तर प्रतिमेतून बाहेर पडायचा एक बेंचमार्क ठरला पाहिजे. ईथे उलटच लिहिलेय. जरा घाईगडबडीत झालेय का हे चेक कराल का?
>>>>>>>>>>>>
व्हिलन किंवा लव्हरबॉय या दोन गोष्टी सोडल्या आणि स्वदेस हा अपवाद सोडला तर जन्मभर त्याने काय केल आहे हे सांगू शकाल काय?

आर्ची आणि परशा वन टाइम वंडर असतील पण सैराट मध्ये त्यांच्या भूमिकांमध्ये ते एकदम चपखल बसले होते. आता हा चपखल पणा त्यांच्या रील आणि रियल आयुष्यामध्ये फारसा फरक नसल्यामुळे आलेला असू शकतो पण तरीही सैराटचा दर्जा कमी होत नाही. मुळात सैराटबद्दल बोलताना त्यातल्या कलाकारांना नंतर काही करता आलं नाही या मुद्द्याचा काय संबंध?
>>>>>>>>>>>>

सॉरी, पण त्या संपूर्ण सिनेमात आणि भूमिकांत दोघंही अत्यंत मिसफिट होते आणि त्यांचा अभिनय अत्यंत मर्यादीत आणि जागोजागी नवखेपणा दाखवून देणारा होता.

रिव्हर्स स्वीप यांचे टिकिटाचे पैचे नागराज मंजुळे आणि झी टीवी कडून मागवून घेऊन परत देऊन टाकावे. ग्राहक दुखावलाय, त्याचे पैसे तरी परत करायला हवे.

, पण त्या संपूर्ण सिनेमात आणि भूमिकांत दोघंही अत्यंत मिसफिट होते आणि त्यांचा अभिनय अत्यंत मर्यादीत आणि जागोजागी नवखेपणा दाखवून देणारा होता.>>>>>>

याच्याशी असहमत,
ते त्यांच्या लिमिटेशन सकट( किंवा लिमिटेशन मुळे म्हणू??) त्या भूमिकेत फिट बसले होते, याचे श्रेय मंजुळें कडे जाते

व्हिलन किंवा लव्हरबॉय या दोन गोष्टी सोडल्या आणि स्वदेस हा अपवाद सोडला तर जन्मभर त्याने काय केल आहे हे सांगू शकाल काय?
>>>>
अवांतर टाळायचे असेल आणि खरेच या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल तर खालील धाग्यावर या
https://www.maayboli.com/node/66449

नुकताच धडकचा ट्रेलर पाहिला.
चांगला आहे की ..
सैराटप्रेमी लोकं ईथे भावना दुखावल्यासारखे करत आहेत ईतकेच. अर्थात यात काही चूक बरोबर करायचे नाहीये. मागेही दुनियादारी चित्रपटाच्यावेळी पुस्तकप्रेमी असेच करत होते. पण चित्रपट चांगलाच होता आणि हिटच गेला.

Let's agree to disagree on this point
>>>>>>

Fair enough.
Everyone is entitled to have his / her opinion and freedom of expressing that opinion.

ऋ धागा धडक बद्दल आहे... तुझ्या हृदयात धडकणार्या स्टार बद्दल नाही....
Rofl

बाकी ट्रेलर बघितला...
एवढा नाही आवडला कदाचित रीमेक असल्याने आपोआपच तुलना झाली.
(जान्हवी कोणत्या तरी साऊथ हिरोईन सारखी वाटली ट्रेलर मध्ये)

अवांतर टाळायचे असेल आणि खरेच या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल तर खालील धाग्यावर या
>>>>>>>>>>.

सॉरी. फालतू सिनेमे मी पाहत नाही आणि अतिसामान्य कलाकाराबद्द्ल चर्चा करण्यात तर अजिबात इंट्रेस्ट नाही.

जान्हवी कोणत्या तरी साऊथ हिरोईन सारखी वाटली ट्रेलर मध्ये>>>>>> साउथ मधे एक श्रीदेवी म्हणून हिरोईन होती तिच्यासारखी सारखी वाटली का? Lol

साउथ मधे एक श्रीदेवी म्हणून हिरोईन होती तिच्यासारखी सारखी वाटली का? <<< Lol पण जान्हवी श्री सारखी दिसत नाही..
मंजूळेना जान्हवीला आर्ची बनवता आल असत का?

सैराटचा ट्रेलर पाहिल्यावर एक अबोव अ‍ॅवरेज चित्रपट असेल वाटलेले, साधारण तसाच होता. मंजुळेच्या दिग्दर्शनामुळे आणि पटकथेमुळे त्या लेवलला तरी गेला नाहीतर तशी ठीकठाक/टीपिकल कथा होती.
धडकचा ट्रेलर पाहीला, मिडिओकर लेवलच्या वर जाईल असे वाटत नाही.

युट्यूबर एक धडकच्या ट्रेलर चा रीव्ह्यू पाहीलेला, त्यांनी छान अ‍ॅनालिसीस केले आहे या ट्रेलरचे आणि मूळ सैराटचे...
https://www.youtube.com/watch?v=eE15VUPk38A

सैराट मला खूपच बोअर झाला होता.
संगीत उत्कृष्ट आहे ही एकच जमेची बाजू वाटली होती .
हा धागा वाचून धडक चा ट्रेलर पहिला आणि सैराट पेक्षा सुद्धा तो बोअर झाला.
मराठी गाणी हिंदी मध्ये सुरुवातीला विचित्र वाटतात नंतर सवय होते. त्यामुळे संगीत उत्कृष्ट असणार असा अंदाज आहे
बघू काय होते ! Happy

सैराटचा सेकंड हाल्फ, ते हैदराबादेला गेल्यावर अगदीच पकाव आहे. या धडकला तिथे सैराटवर मातही करता येईल.

एक गोष्ट धडकच्या फेवरमध्ये आहे. जी सैराटच्याही फेवरमध्ये होती.
ते म्हणजे दोन्हीत नवीन चेहरे आहेत.
त्यामुळे त्यांचा हेट क्लब तयार झाला नाही.
त्यामुळे ट्रेलर वा पिक्चर बघायच्या आधीच त्यावर कोणी फुली मारायची हे डोक्यात ठेवून बघणार नाही.

सोबोतल्या लाडावलेल्या एं टायटल्ड लोकांना कसे कळेल जगण्याचा संघर्ष. बोअरच होईल. पण तो आपला विषय नाही. आज नवे रोम्यांटिक गाणे रिलीज होते आहे. पाहिलेत ऐकलेत का?

ज्याची त्याची चॉईस असते अमा..दुसऱ्यांच्या मताचा आदर करायला शिकलं पाहिजे तुम्ही ...
मी चित्रपट मनोरंजसाठी पाहते .. डोक्याला ताप करून घेण्यासाठी नाही. संघर्ष रिअल वर्ल्ड मध्ये भरपूर आहे तो पुरेसा आहे. पैसे देऊन कशाला विकतची दुखणी .. बर्याचशा मालिका पण आवडत नाहीत मला .. त्यात ही असाच दाखवतात दुसऱ्यांच्या घरातली भांडणं आणि काय काय !
दुखी होण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. खूप काही बाकी आहे आयुष्यात अजून सो.. move on अँड chill ..

Pages