धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अमा on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे इतकी चर्चा झाली की स्वप्नात मी हा सिनेमा पूर्ण पाहिला. सिनेमाहॉलच्या बाहेर येताना अजित पवार समोर आले आणि म्हणाले "कसं काय वाटलं माझं काम ?"
मला कळेचना. मग (स्वप्नातच) विचार केला की आपल्याला झोप लागली असेल बहुतेक, त्या वेळी यांचा रोल असेल.

प्रोमो पाहिले. शाहीद कपूरचा भाऊ त्याच्यासारखा अजिबात वाटत नाही. मामे की आते भाऊ आहे बहुतेक.>>>>>> Lol
अहो तो हाफ ब्रदर आहे शाहिदचा. त्याची आणि शाहिदची आई एकच. वडिल वेगळे.

सिम्बा Happy

मी ओपन माईंड ठेवून बघणार आहे कारण सैराट तर मी कित्येक महिने बघितलाच नव्ह्ता ट्रेलर बघून नुसता. I owe this movie that much at least. Happy
ट्रेलर मध्ये तरी जान्हवी फिक्की वाटत आहे आर्चिच्या तुलनेत. इशान खट्टर जास्त भारी वाटला परशा पेक्षा. बघू आता.

अहो तो हाफ ब्रदर आहे शाहिदचा. त्याची आणि शाहिदची आई एकच. वडिल वेगळे. >>>> दोन आया आणि एक वडील अशा भावांना सावत्र भाऊ म्हणतात हे माहीत होतं . यांना त्रावस भाऊ म्हणावे का ?

ईशान खट्टर चे एक्सप्रेशन / acting मला शाहिद ची च कॉपी वाटली.... ते गाणं इंग्लिश मध्ये बोलताना चे ईशान चे फेशियल एक्सप्रेशन्स सेम शाहिद सारखे

ट्रेलर पाहिले.मुलगा चाम्गला आहे.जान्हवी कोणत्यातरी फॅन्सी ड्रेस मध्ये राजस्थानी मुलीचा गेटअप आणि डायलॉग बोलून दाखवणाऱ्या स्टॅयलिश शहरी मुलीसारखी दिसते.दिसते बोलते गोंडस पण कथेचे गांभीर्य कोणत्याही सिन मध्ये तिच्या मनापर्यंत पोहचलेले नाही.तिच्या साठी हा फक्त पहिला ब्रेक, एका गाजलेल्या पिक्चर चा हिंदी रिमेक आहे.
याला सैराट रिमेक म्हणून प्रसिद्धी न देता एक वेगळा रोमँटिक पिक्चर म्हणून द्यावी.नॅनो जास्त हिट न होण्यामागे 'एक लाखाची कार' प्रसिद्धी, य्यानंतर ममता मुळे झालेला प्रॉडक्शन डिले, युनिट सानंद ला शिफ्ट करून किंमत वाढणे आणि लोकांनी एक चांगली छोटी सिटी कार गरिबांची कार म्हणून झालेल्या प्रसिद्धी पायी उगीच नाकारणे हे सर्व झाले.
हे सैराट चा रिमेक अशी प्रसिद्धी होऊन या पिक्चर चे होऊ नये.

सैराट एक पवित्र धर्मग्रंथ आहे असं वाटू लागले आहे. त्यामुळे भावना न दुखावता आपण सगळे मिळून आपल्याला हवा तसा रिमेक बनवूयात.
गाण्यांचं काय करावं पण ?

बाई माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलाय लळा हे गाणं कित्येक पिढ्यात हिट होतं. त्याचा हिंदी रिमेक येउ घातला तेव्हां खेडोपाडी गाण्याचा पण रिमेक (अंदाजे ) व्हायरल झाला होता.

बाई मेरे बकरीका समद्या को लग गया लळ्या

नाय हो.
कोणी मराठीत रंग दे बसंती चा बेकार रिमेक त्यात अनरिलेटेड पात्रे टाकून बनवला तरी मि हेच म्हणेन.
कथा कोणाची ही असो, सैराट असो किंवा नसो.ती एका गंभीर इश्यू वर असते तेव्हा रिमेक मध्ये त्याची अगदीच बद्री की दुल्हानिया होऊ नये असे वाटते.

तुम कितनी भी कोशिशें करलो
धागा बहकाने की हम डटें रहेंगे
क्युंकी इतना प्यार तो आर्ची पर्श्याने एक दूसरेसे नहीं किया
जितना हम उन दोनोंसे करते हैं

वो सच्चा प्यारही क्या जो
दुनियासे टकरा कर खतम हो जाये

बनाने वाले बेच कर चले गये
पर हम उसी खुश्बू के दीवाने
बन के रह गये.

अमा Happy
मस्त लिहिले आहे. खास अमा ट्च

ती जानवी कि जान्हवी कि जानव्ही कधीही काही बोलताना इतक्या भूवया का उडवते? मला तिचं तोंड अन भाव न दिसता नुसत्या भुवयाच दिसतात..

सैराट आर्ची/परशाबरोबरच लहान रोल मध्ये असणाऱ्या सगळ्यांचा होता. मित्राची मैत्रीण त्याच्याकडे वळून बघतेय याने स्वतःच लाजणारा लंगड्या, पाटलाच्या लेकीबरोबर काय बोलावं हे न कळल्याने बावरून गेलेली आई, भावाचं गुपित माहीत असल्याने गालातल्या गालात हसणारी बहीण, आर्चीची मैत्रीण, तिचे बाबा, त्याचे बाबा आणि इतरही सगळ्यांचाच. >>> व्यत्यय, हे परफेक्ट लिहीले आहे!

बनाने वाले बेच कर चले गये
पर हम उसी खुश्बू के दीवाने
बन के रह गये. >>> अमा, तुमच्या उपमेत अत्तराचा वास येतोय Wink

च्यायला पिक्चरचा रिमेक म्हणजे काय कुराणाची प्रत आहे काय, की अगदी मूळ प्रतिकृतीबरहुकुम झालीच पाहिजे.
स्टोरी एकच असली तरी प्रॉडक्शन हाऊस, टारगेट ऑडियन्स, चित्रपटाचा मूड याप्रमाणे बदल होणारच.
खरं सांगायचं तर सैराट हाच पिटातल्या प्रेक्षकासाठी काढलेला फँड्रीचा रिमेक म्हणता येईल.
ट्रेलर ठीकै. Haters gonna hate.

सॉरी,
हे धडक बद्दल नाही
आकाश ठोसर बद्दल आहे,
सैराट पाहून लोकांनी त्याला प्रचंड ओव्हर हाईप केले आहे असे मत झाले आहे.
नुकताच नेटफ्लिक्स वर लस्ट डायरी म्हणून विडिओ पहिला.
त्यात हा तेजस भावे चा रोल करतो आहे, बरोबर राधिका आपटे आहे.
त्याच्या बोलण्यातला ग्राम्यपणा अजिबात लपत नाही.
चेहऱ्यावर एक निबरपणा दिसू लागला आहे, बहुदा ट्रेनर आणि डायटीशन हायर न करता केलेल्या फिटनेस प्रोग्रॅम चा परिणाम असावा.

शब्दोच्चार आणि शरीरयष्टी कडे त्याने जास्त लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

च्यायला पिक्चरचा रिमेक म्हणजे काय कुराणाची प्रत आहे काय, की अगदी मूळ प्रतिकृतीबरहुकुम झालीच पाहिजे.

नाय हो, फक्त चांगली झाली पाहिजे, पात्रांनी (म्हणजे झानवी ने, हो मी असेच लिहिणार नाव, फॅशन पोलीस वाले असेच लिहितात) केसांचे लेयर्स,लिपस्टिक आणि स्ट्रेटनिंग सांभाळताना थोडेफार एक्सप्रेशन सुद्धा दाखवावे इतकी माफक अपेक्षा.
हा जरा खोबरं कोथिंबीर घालून डिश मध्ये वाढलेला बद्री की दुल्हनिया आहे.

अनु, तुम्ही बद्री की दुल्हनियावर एकदमच खार खाऊन आहात दिसतंय. बेकारपणाची परिसीमाला समानार्थी ब कि दु Biggrin

>> बेकारपणाची परिसीमाला समानार्थी ब कि दु
मला वाटलं की बद्रिनाथ की दुल्हनिया रीमेक ला समानार्थी म्हणून वापरलं आहे ?

सैराट बघितल्यावर ह्या चित्रपटाची जेव्हा घोषणा झाली तेव्हाच ठरवलं होता कि ट्रेलर पण नाही बघायचा एकंदरीत केलेला विचार अत्यंत बरोबर होता तर.

Pages