धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अमा on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका सामान्य गल्लाभरु सिनेमाचा रिमेक आणि यावर एवढी चर्चा?>> +१
सैराटची किर्ती ऐकल्यावर वर्षभराने तो पाहण्याचा योग आला. खरंच ओव्हरहाईप्ड वाटला. आता या रिमेकची पण अतीच हवा करुन ठेवलीये, ती चित्रपटाचा खर्च १, २ आठवड्यात वसूल नक्की करेल.

फ्रेम टू फ्रेम तुलना चुकीचीच आहे. पण मला अभिनयाच्या दृष्टीने तुलना करणे योग्य वाटते.
आणि तशी केली तरी धडक धडकन आपटतो.

जराही तो ठसका नाहीये जान्हवीत. इतके लोकं शिकवणारे असून सुद्धा. चकचकीत वाटते, राजस्थानी बोलीत पुर्ण मार खाल्लाय.

आर्चीचा तो सीन्स आणि डायलॉग्स परत पाहिले तरी मजा वाटते,
“ए मंग्या, सोड त्याला...”
“तू त्याला हातं तं लावून बग“
“ निग बाहिर“
——-
हे बरोबर, जान्हवी फक्त भुवयाच ज्यास्त हलवते...

एका सामान्य गल्लाभरु सिनेमाचा रिमेक आणि यावर एवढी चर्चा?
>>>>

सैराट गल्लाभरू होता पण त्यावेळी तरी सामान्य नव्हता. त्याची एक लाट आली होती. ज्यात मी स्वत:ही वाहून गेलो होतो. मी सुद्धा तो पिक्चर पाहून प्रभावित झालो होतो. पण वर्षभराने त्याचे मूल्यमापन करायला गेले तेव्हा तो साधारण भासला. अर्थात झिंगाट गाण्याची झिंग मात्र आजही आहे आणि उद्याही राहील. त्यासाठी अ अ ना सलाम !

धडकबद्दल तुर्तास नो कॉमेंट. ट्रेलर अजून पाहिला नाही. सैराटची क्रेझ सध्या माझ्या डोक्यावर नसल्याने त्याच्या रिमेकचा ट्रेलर पटकन बघावे असे वाटत नाहीये.

हो पण श्रीदेवीची मुलगी कशी दिसते याची उत्सुकता आहे.
कोणीतरी जमल्यास फोटो टाका ना तिचा..

.प्रिया वॉरीअर प्रभाव ?
>>>
ती सध्या पुन्हा फॉर्मात आली आहे. सध्या मोदींसोबत फोटो विडिओ फिरत आहेत तिचे.
तिचाही एक धागा होता ना मायबोलीवर

सैराटच्या यशाचं श्रेय संपूर्णपणे मंजुळें आणि अजय-अतुल यांचं आहे. कथेची मांडणी (स्टोरी टेलिंग), फ्लो आणि लास्ट बट नॉट द लिस्ट - चित्रपटाचा दु:खद शेवट. टिनेज लवर्सच्या कथेचा शेवट हॅपी एंडिंग न करता दु:खद केला तर सिनेमा हमखास हिट होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे (बॉबी, इक दुजे के लिये इ.). मंजुळेंना कास्टिंगचे हि गुण द्यायला हवेत. आर्ची-पर्शा दोघांनाहि अभिनय करण्याचा काहिहि गंध नसताना त्यांच्या कडुन हवं ते काढुन घेणं आणि ते सगळ्यांच्या गळी उतरवणं, हे सोपं नाहि. माझ्या मते आर्ची-पर्शा वन-हिट वंडर्स आहेत. त्यांचा कुवतीपेक्षा जास्त उदो-उदो झालेला आहे. मला तर सैराटमध्ये दोघंहि अवघडल्यासारखे वाटलेले आहेत, जे चालुन गेलं कथेच्या ग्रामीण पार्श्वभुमीवर, सहज अभिनयाच्या नांवाखाली. सैराट नंतर आर्चीचा अभिनय अजुन बघायला मिळालेला नाहि पण पर्शाला मांजरेकरांच्या एका सिनेमात पाहिलं होत; ज्याला मिडियोकर हि म्हणु शकत नाहि...

आता, धडक बाबत. सिनेमा हिट होणार. ह्या जोहर-चोप्रा-कपूर इ. कंपनींना प्रेक्षकांची नस चांगलीच ठाउक आहे. आणि धडकच्या टिझरवरुन ते दिसतंच आहे. इशान-जाह्नवी सुद्धा फ्रेश चेहेरे असल्याने हिट होणार. पुढे जाह्नवीची विजयेता पंडित होणार कि डिंपल्/रती अग्नीहोत्री होणार हा प्रश्न आहे... Happy

>>>>>>>>>आर्ची-पर्शा दोघांनाहि अभिनय करण्याचा काहिहि गंध नसताना त्यांच्या कडुन हवं ते काढुन घेणं आणि ते सगळ्यांच्या गळी उतरवणं, हे सोपं नाहि. माझ्या मते आर्ची-पर्शा वन-हिट वंडर्स आहेत. ..........…....................... मांजरेकरांच्या एका सिनेमात पाहिलं होत; ज्याला मिडियोकर हि म्हणु शकत नाहि >>>>>>>>>>

अनुमोदन

रिंकु मुळात फार एक्स्प्रेसिव्ह चेहऱ्याची मुलगी आहे. डोळे अत्यंत बोलके, पाणीदार आणि संवाद बोलताना स्पष्ट उच्चार ही तिची वैशिष्ट्ये होती. आकाश ठोसर मात्र तसा कच्चा अभिनेता होता आणि आजही आहे असे मावैम.
श्रीदेवीची मुलगी तर अक्षरशः ढ आहे.

त्यांचा कुवतीपेक्षा जास्त उदो-उदो झालेला आहे>>
.. असे अनेक आहेत मराठी चित्रपट सृष्टीत.... म्हागृ, स्वप्निल जोशी, प्रिया बापट, सई ताम्हणकर, कोठारेंची सून, अवधुत गुप्ते, ....................... लिस्ट खूप मोठी आहे.

म्हागृ>>>> Lol
एकंदर सगळ्यांनाच म्हाग्रुंचा राग येतो काय?

र्ची-पर्शा दोघांनाहि अभिनय करण्याचा काहिहि गंध नसताना त्यांच्या कडुन हवं ते काढुन घेणं आणि ते सगळ्यांच्या गळी उतरवणं, हे सोपं नाहि. माझ्या मते आर्ची-पर्शा वन-हिट वंडर्स आहेत. त्यांचा कुवतीपेक्षा जास्त उदो-उदो झालेला आहे. मला तर सैराटमध्ये दोघंहि अवघडल्यासारखे वाटलेले आहेत, जे चालुन गेलं कथेच्या ग्रामीण पार्श्वभुमीवर, सहज अभिनयाच्या नांवाखाली. सैराट नंतर आर्चीचा अभिनय अजुन बघायला मिळालेला नाहि पण पर्शाला मांजरेकरांच्या एका सिनेमात पाहिलं होत; ज्याला मिडियोकर हि म्हणु शकत नाहि...
>>>>>>

मला एक्झॅक्टली हेच म्हणायच आहे. स्पष्टपणे सांगायच तर या दोघांचाही अभिनय अत्यंत सुमार दर्जाचाच झाला होता. केवळ गाणी आणि सोशल क्लास डिफरन्स असलेली लव्ह स्टोरी या वर्षानुवर्षे घासून गुळगुळीत झालेल्या फॉर्म्युल्यावर आणि त्याला कास्टीझम आणि ऑनर किलींगची फोडणी दिल्यामुळे तो तरुन गेला. परत-परत पाहवा, अगदी अ‍ॅडव्हान्स बुकींग वगैरे करुन एवढ तर त्यात काहीही नव्हत. एक टिपीकल स्टिरीओटाईप आणि अत्यंत ओव्हरहाईप्ड सिनेमा होता. वी हॅव सीन बेटर इव्हन इन इन्डीयन सिनेमा अ‍ॅन्ड फॉर दॅट मॅटर इव्हन इन मराठी सिनेमा.

महागुरू सचिन पिळगावकर हे ओवरहाईप आहेत??
उलट त्यांच्या प्रतिभेची मराठी लोकांकडूनच टिंगल उडवली जाते हे क्लेशकारक आहे.
अन्यथा ईतका चतुरस्त्र आणि गुणी कलाकार मराठीत दुसरा दाखवा आणि हजार रुपये मिळवा.

आर्ची परश्या त्यांच्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्यातील एक्स फॅक्टरमुळे चमकले जो भुमिकेला साजेसा होता. स्पेशली आर्ची. कमाल अदा होत्या.
त्या दोघांची निवड करणे आणि त्या एक्स फॅक्टरचा वापर करणे, याचे श्रेय मंजुळेंना जाते. त्यांनी निवड करतानाही त्यांचा अभिनय नाही तर तो एक्स फॅक्टर बघूनच त्यांना निवडले असणार.

अन्यथा ईतका चतुरस्त्र आणि गुणी कलाकार मराठीत दुसरा दाखवा आणि हजार रुपये मिळवा.>> मागे एका लावणीवर नाच केलेला बघा तुम्ही त्या चतुरस्त्र अभिनेत्याचा.. Lol

हेला.. Biggrin
बाकि आता हेलापन अवतरल्या माबोच्या प्लॅटफॉर्मवर..धन्य जाहले.. मलापन आता माझं नाव कॅप्टन मार्वल ठेवावसं वाटत्य..

मागे एका लावणीवर नाच केलेला बघा तुम्ही त्या चतुरस्त्र अभिनेत्याचा..
>>>>
मूळ प्रश्न आहे की त्याच्यासारखा कलाकार दुसरा दाखवा
असो, लिंक द्या. बघायला आवडेल.

सैराट फक्त आणि फक्त मंजूळेचा आहे. डायरेक्टर्स मूव्ही.
>>>>
चित्रपट असो वा क्रिकेटची मॅच. ते टीमवर्क असते. फक्त आणि फक्त नाही बोलू शकत. पण येस्स, पहिला तो मंजुळेंचाच पिक्चर आहे. सोबत अजय अतुल यांचे श्रेय. म्युजिक प्रेमपटांचा आत्मा असते. आज मला सैराट बोअर वाटतोय. पण ती धून आजही ओढ लावते.

एका लावणीवर नाच केलेला बघा तुम्ही त्या चतुरस्त्र अभिनेत्याचा.> >>> टीना Lol मला पण आठवलेला तो नाच.
पण सचिन पिळगावकर चतुरस्त्र आहे हे मान्य.

वी हॅव सीन बेटर इव्हन इन इन्डीयन सिनेमा अ‍ॅन्ड फॉर दॅट मॅटर इव्हन इन मराठी सिनेमा.>>>>>

बेटर सिनेमे येऊन गेले असतीलही पण प्रत्येकाची बेटर डेफिनिशन वेगळी आहे. तुम्ही कोर्टला बेटर म्हणाल, तो बेटर असेलही पण लोक बोअर म्हणतात.

बाकी अर्चि, परश्या, लंगड्या, सल्या आणि इतर सगळ्यांनी सुमार अभिनय केला म्हटलात त्याला ___/\____.

एखादे पात्र साकारताना बघणार्याला तो अमुक्तमुक हा ऍक्टर हे पात्र साकारतोय असे न वाटता जे दिसतेय तेच त्याचे खरे आयुष्य आहे असे वाटणे हा माझ्या मते अभिनय.

परश्या आर्चीला आपण आधी पाहिले नसल्याचा त्यांना फायदा झाला. पण त्यांनी पडद्यावर जे केले ते कुठेही खटकले नाही. जान्हवीला तरी कुठे पाहिलंय? पण ट्रेलरमध्येसुद्धा ती का खटकतेय? सोनम कपूरला इतक्यांदा पाहिलेय तरी ती कायम सोनमच का वाटते? डिअर जिंदगी हा त्यामानाणे हल्लीचा चित्रपट. त्यात शाहरुख, शाहरुख न वाटता एक प्रौढ व्यक्ती जो डॉक्टरही असू शकतो असे का वाटते? स्टुडन्ट ऑफ द इअर मधली आलिया आणि उडता पंजाब मधली आलिया, प्रचंड फरक दिसतोच ना? ह्या सगळ्या अभिनयाचे श्रेय त्यांना का नाकारावे?

बाकी कुणाला काय डोक्यावर घ्यावेसे वाटणे व काय पायदळी तुडवण्यासारखे वाटणे हा व्यक्तिगत प्रश्न. पण अभिनेत्यांची मेहनत नाकारू नये असे मला वाटते.

मी काल बघितला लस्ट स्टोरीज. आकाश आवडला. त्याचा रोल परफेक्ट केलाय त्याने. चित्रपटासाठी त्याचा लूक तसाच बनवलाय. सिनियर कॉलेजात शिकणाऱ्या आजच्या मुलांसारखा.

बाकी उच्चार व भाषा यआवर मेहनत हवी याबाबत सहमत. त्याच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचा फक्त ट्रेलर बघितलेला, त्यातही भाषेचा लहेजा ग्रामीण होता व तो सांभाळण्यासाठी त्यात मी गावातून आलोय असे वाक्य होते. लस्ट स्टोरीज मध्येही तो मराठी दाखवलाय व त्या अर्थाचा संवाद घातलाय. पण प्रत्येक चित्रपटात त्याला असा आधार मिळू शकणार नाही ना..

राधिका आपटेने हिंदीतुन बोलताना एक शब्द मराठी वापरला. Happy ते वाक्य हिंदी शब्द वापरून ती परत लगेच बोलली पण एडिटिंग मध्ये कट करणे बहुतेक राहून गेले.

चतुरस्र तर आमचे मोदीपण आहेत. व्यायाम करतात, तोंड वाजवतात, ड्र्मडबडी वाजवतात, देशाची अर्थव्यवस्थाही वाजवतात. त्यांच्यासारखाही दुसरा कोणी नाही.
चतुरस्र असला म्हणजे बेस्ट असतो का?

एखादे पात्र साकारताना बघणार्याला तो अमुक्तमुक हा ऍक्टर हे पात्र साकारतोय असे न वाटता जे दिसतेय तेच त्याचे खरे आयुष्य आहे असे वाटणे हा माझ्या मते अभिनय.
>>>>
अभिनयाची ही व्याख्या बरोबर आहे.
फक्त हे विविध भुमिका केल्यावर सिद्ध होते.
आर्ची परश्याला ते सिद्ध करायचे आहे. तरी वाटते असेच की बरोबर कम्फर्ट झोनमध्ये असलेले कलाकार निवडलेत.

चतुरस्र असला म्हणजे बेस्ट असतो का?
>>>>>
असं मी अजून म्हटले नाही. पुढे जाऊन कदाचित म्हणूही शकतो.
पण तुर्तास आपल्या या स्टॅंडचा अर्थ असा समजू शकतो का की सचिन हे चतुरस्त्र कलाकार आहेत हे तरी आपण मान्य केले.
मग त्यानंतर आपण त्यांच्या विविध पैलूंचे मूल्यमापन करूनमग ते ओवरऑल बेस्ट आहेत की नाही हे ठरवूया.

मुद्दा म्हागृच्या चतुरस्रपणाचा नाहीये भौ. ओव्हरहाइप केलेल्या मराठी कलाकारांचा आहे.... चला पुढे. रुन्म्याइफेक्ट सुरु झाला का?

मुद्दा म्हागृच्या चतुरस्रपणाचा नाहीये भौ. ओव्हरहाइप केलेल्या मराठी कलाकारांचा आहे..
>>>>
अहो तेच तर. ओव्हरहाईप केलेल्या कलाकारांत आपण सचिनजींचे नाव घेतले तेच खटकले. ते मुळातच चतुरस्त्र आणि महान कलाकार आहेत तर ओवरहाईप कसे झाले?

Pages