धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अमा on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली,
प्रतीसाद बहुधा भभा यांच्याकडे डायरेक्टेड असावा. ते सेकंड हाफ पकाव म्हणाले.

प्रतीसाद बहुधा भभा यांच्याकडे डायरेक्टेड असावा>>>>>>
तसं असेल तर मी माझे शब्द मागे घेते .. कारण अमा कडून अशी अपेक्षा खरंच नव्हती

धडक चे टायटल काल की आज रिलीज झाले. आवडले मला, अजय अतुल डिड अ गुड जॉब. हे सैराट च्या गाण्यांव्बरून घेतलेलं नाही स्वतंत्र आहे.
https://www.youtube.com/watch?v=qWnzMwT6SKo

श्रीदेवीची मुलगी अजिबातच शोभत नाही. त्यामानाने हिरो जरा बरा वाटतोय. पिक्चर बघायची इच्छा नाही.
सैराट फक्त पहिल्यांदाच पूर्ण बघितला. नंतर पुन्हा एकदा बघितला तो फर्स्ट हाफच पाहिला. आता पुन्हा मुद्दाम बघावासा काही वाटत नाही.

सोबोतल्या लाडावलेल्या एं टायटल्ड लोकांना कसे कळेल जगण्याचा संघर्ष. बोअरच होईल
>>>>

अमा, आपली पोस्ट म्हणजे
ज्याला बॉर्डर चित्रपट आवडला नाही तो देशद्रोही ! Happy

असो,
जगण्याचा संघर्ष तर मी सेकंड हाफ मध्ये करत होतो. कसाबसा पिक्चर बघून संपवला. त्या बोअर सेकंड हाफमुळेच पहिल्या हाफला रिपीट वॅल्यू असूनही पुन्हा बघावासा वाटत नाही सैराट.

पण पहिला भाग आवडला. म्हणजे निदान मला जगण्यातली मजा कळलीय असे म्हणू शकतो Happy

धडकच्या ट्रेलरमधे २.११ मि ला जी मैत्रीण आहे, ती दंगलमधली जिचं लग्न ठरलेलं असतं ती मैत्रीण आहे का? ( जी म्हणते की तुम्ही नशीबवान आहात कारण तुमचा बाप तुमचा विचार तरी करतो)

ज्याची त्याची चॉईस असते अमा..दुसऱ्यांच्या मताचा आदर करायला शिकलं पाहिजे तुम्ही ...
मी चित्रपट मनोरंजसाठी पाहते .. डोक्याला ताप करून घेण्यासाठी नाही. संघर्ष रिअल वर्ल्ड मध्ये भरपूर आहे तो पुरेसा आहे. पैसे देऊन कशाला विकतची दुखणी .. बर्याचशा मालिका पण आवडत नाहीत मला .. त्यात ही असाच दाखवतात दुसऱ्यांच्या घरातली भांडणं आणि काय काय !
दुखी होण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. खूप काही बाकी आहे आयुष्यात अजून सो.. move on अँड chill ..>>>>>>>+१२३४५६७८९१०

दिलकी बात कही लबपें न आ जाए, हंसते हंसते आंख कही न भर आए, याद रहे, याद रहे, क्या ? टु ड्डु याचकरता थेट्रात जाणे सोडले, एकवेळ सैराट तरी आपल्या मातीतला होता. हे नकोय आता. त्या टिव्हीने वैताग आणलाय, वर हे सिनेमे.

बाकी इथे अमांच्या लेखनाकरता येते, त्यांचे लिखाण वास्तव असते. बाकी सिनेमे, नाटकं आवडेनाशीच झालीत.

धडक सुपरहिट होणारे.
.
.
.
आणि तेव्हा मी या धाग्यावर येऊन 'पाताळविजयम' मधल्या राक्षसासारखा गडगडाटी हसणार आहे!...

धडक चे टायटल काल की आज रिलीज झाले. आवडले मला, अजय अतुल डिड अ गुड जॉब. हे सैराट च्या गाण्यांव्बरून घेतलेलं नाही स्वतंत्र आहे.>>
धडक चा टायटल ट्रॅक खरच मस्त आहे...खुप आवडलंय....कालपासुन खुपदा ऐकलं..
फक्त अजय ने गायला नको होतं असं माझं वैयक्तीक मत..( माझंच म्युजिक..मग मीच गाणार नको ना प्रत्येकवेळी...)
सैराट च्या वेळी पण परश्या गावरान आहे म्हणुन त्याचा आवाज चालुन गेला..पण मला अजय चा आवाज ऐकला की नेहेमी उपेन्द्र लिमये गात आहे असचं वाटतं..
ईशान साठी एखादा नाजुक तलम आवाजाचा गायक घेतला असता तर गाणं अजुन उठावदार वाटलं असतं

अशक्य....
सैराट च्या गाण्यावरचे प्रिवेडिंग शूट वाटते.

टायटल साँग - शीर्षक गीत
खतरनाक आहे !
सिनेमात भावनिक दृश्यांसोबत ते भारी जाणार..

कायच्या तारीफ ऐकुन धडकची गाणी ऐकली.
आजिबात आवडली नाहीयेत.
याड लागलं टोतल फ्लॉप.
ज्या धडक है ना - टायटल सॉन्ग्चची एवढी तारीफ होतेय ते गाणं ऐकल्यापासुन सारखं ही धुन कुठेतरी ऐकलीये असं वाटत होतं.
मग आठवलं की अजय अतुलनेच संगीत दिलेल्या ब्रदर सिनेम्यात अशाच म्युझिकचं गाणं आहे.
मग पुन्हा सैराटची गाणी ऐकली.

>> याड लागलय चे हिंदी वर्जन एकले... https://youtu.be/_RZkNUPoIcM

@2:50 ते 3:25 ... तिच्या पूर्ण चुकीच्या एक्स्प्रेशन्स. रागाने तोऱ्यात नाक वर करून त्याच्याकडे पाहत असलेली तरीही डोळ्यात अर्थपूर्ण चमक, असे अपेक्षित होते (जर सैराट ची स्टोरी जशीच्या तशी असेल तर) अर्थात जान्हवी नव्हे दिग्दर्शक कमी पडला.

अमा+10000
ट्रेलर बघूनच इतकी धडकी भरली कि सिनेमा पाहण्याची हिंमतच झाली नाही.
लव धिस ट्रेलर कल्चर Wink

धडक मधल झिंगाट पाहिल. अगदीच फेल आहे. उत्तर भारतात चालून जाईल कदाचित. पण पाहायला गेलं तर राजस्थानी मातीतले लोक वेग वेगळ्या आर्थिक स्तरातले असले तरी असे नाच णा र नाहीत. राजस्थानात मूळ गाण्यांची किती सुरेख परंपरा आहे . कालबेलिया नाच करणार्‍या मुली, मांगनियार गायक असे घेउन राजस्थानी मातीत ले गाणे बनवले असते तर पण त्यात खूप मेहनत आहे. हे कटपेस्ट कल्चरल अ‍ॅप्रोप्रिएशन वाटते. खेडवल मराठी मातीतले लोक जसे नाचतील त्या स्टेप ओरिजिनल झिंगाट मध्ये घेतले ल्या आहेत. हिंदी मधली सिग्नेचर स्टेप अगदीच अरे हा काय प्रॉब्लेम झालाय अशी वाट्ते.

जा हनवी जी काय असेल ते परत परत पाहिली तर खूपच ऑर्डिनरी आहे दिसायला. लांबोळका चेहरा. वगैरे. तिच्यात्त आर्चीचे रॉ एनर्जी व स्पिरिट दिसून येत नाही. दुसर्‍या गाण्यात बाबुल की गलियां छो डके आउं असे शब्द आहेत. धिस वॉज नेव्हर आर्चीज प्रॉब्लेम. ती फक्त तिच्या त्या वेळीच्या गरजा पूर्ण करू बघते. तिची स्वतःची व्हॅल्यू सिस्टिम आहे.

सर्व पिक्चर व्हिजुअली ग्रँड करायच्या करन जोहरी कंपल्शन मुळे तो शॅलो झाला आहे. आम्ही ह्यात डिटेलिंग काय शोधणार

याड लागलं तर एकदमच फिकट करून टाकलयां मिस माय आर्ची बेब्स. मला नेमार सारखे जमिनीवर पडून रडू वाट्ते आहे.......

मागे एकदा लिहिल्याप्रमाने अमराठी लोकांना हा सिनेमा आवडेल अशीच चिन्हं दिसताहेत. हिंदी झिंगाट मधे सुद्धा मराठीतल्या दाढी-परफ्यूम, टेक्नो वरात प्रकारातले काही शब्द वापरले आहेत. संगीत कॅची आहेच त्यामुळे गाजेल असं वाटतंय.
'पहली बार है जी' हे 'याड लागलं' चं हिंदी वर्जन बरंच सुसह्य वाटलं.
कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, नावीन्य नसलेल्या स्टोरीचं उत्तम सादरीकरण आणि संगीत ह्या मुळे सैराट गाजला असं म्हणायला हरकत नाही.
अमराठी लोकांमधे इशान, जान्हवी हे नवे चेहरे, अजय-अतुलचंच संगीत आणि केजो चं मार्केटिंग यामुळे धडक पण जोरदार चालेल असं वाटतं.
आपल्या मराठी लोकांना कितीही नाही म्हटलं तरी सैराट मधले बारीक बारीक तपशील, कलाकार, सादरीकरण आठवून हळहळ मात्र होत राहणार Happy

झिंगाटची पार वाट लावली रे ,कुठे फेडाल हे पाप Sad
आर्ची आणि जान्हवीची अजिबात म्हणजे अजिबात तुलना होऊ शकत नाही.

मानव , धडक बॉक्स ऑफिसवर सैराट पेक्षा जास्त गल्ला जमवेलही पण सैराटची आणि आर्चीची ( खरंतर तर पुर्ण सैराट टीमची) सर नाही येणार .

Pages