अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा !
त्यांची मनःस्थिती ठीक नसावी बहुधा. करूणामय दृष्टीने पाहून सोडून देऊयात.

........इमारत पाडायची मनपाची हिम्मत होत नाही कारण तिथे मधुर आंबे खाणारी अर्धनारी भुते वावरत असतात.
Submitted by बाबा कामदेव on 7 July, 2018 - 22:37

admin आणि वेमा, काही आयडींकडून अन्य आयडींवर अत्यंत हीन पद्धतीने वैयक्तिक हल्ले होत आहेत, कृपया लक्ष द्यावे!

हे अमानवीय नाहीए पण अनाकलनीय नक्कीच आहे.
गावी असताना मित्राबरोबर तालूक्याच्या गावी चित्रपट पहायला गेलो होतो. येताना एसटीने यावे लागले. गाडीत खुप गर्दी होती. कशीबशी जागा मिळाली. मध्येच एका गावात गाडी जवळ जवळ रिकामी झाली. बरेचजन उतरले. गाडीत फक्त ड्रायव्हर, कंडक्टर आणि सहा लोक होते. गाव साधारण आठ-दहा किमी असताना मला खुप अस्वस्थ झालं. मित्रालाही सांगीतलं की मला खुप अस्वस्थ वाटतय. तो म्हणाला पंधरा मिनिटांचा प्रश्न आहे. बस जरा शांत. पण अस्वस्थता इतकी वाढली की मी स्वतः उठून घंटीची दोरी ओढली. ड्रायव्हरने वैतागून गाडी थांबवली. स्टॉप नसतानाही बेल वाजवली म्हणून कंडक्टरही खुप चिडला. मी सरळ गाडीतून खाली उतरलो. नाईलाजाने मित्रालाही उरतावे लागले. अर्थात त्याने खुप शिव्या दिल्या मला. अधेमधेच उतरल्याने कुठे वस्तीही नव्हती. अर्ध्या तासाने एका जीप आली. तिला हात करुन थांबवले व निघालो. गावाच्या अलिकडे दिड किलोमिटरवर आम्ही उतरलेल्या एसटीचा आणि वाळूच्या ट्रकचा अपघात झाला होता. एसटीतील कोणीही वाचले नव्हते. आठ जण जाग्यावरच गेले होते. आमच्या भागातला सगळ्यात मोठा अपघात होता तो. मी आठ दिवसांनी घरी सांगीतले की मी त्या गाडीत होतो.

शाली, भयानक अनुभव..!!

बाकी जर समजा तुम्ही उतरला नसता तर बसचा अ‍ॅक्सिडेंट नसता झाला असे वाटून गेले. म्हणजे ती वेळ टळली असती. अर्थात तुम्हालाही असे होईल असे माहित नव्हते त्यामुळे असल्या जर-तर चा काहीच उपयोग नसतो.

शाली जे खरं असतं... माझे वडील आय सी यु मध्ये होते...15 दिवस कोमात होते, 15 व्या दिवशी मला आणि भावाला मुद्दाम घरी राहायला सांगितलं होतं. करण आम्ही पण 15 ही दिवस हॉस्पिटलमध्ये च थांबलेलो.
दुपारी 2 नंतर मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. नक्की काय होतं हे कळत नव्हतं. म्हणजे उठू, की बसू की काहीतरी खाऊ की बाहेर जाऊ असं होतं होतं विचित्र....मी मामाला फोन केला तो तिकडे च होता. तर बोलला अरे तो नीट आहे घाबरू नको.
मग 5 वाजता सर्व आले आणि सांगितलं की ते गेले.
कितीला विचारलं तर 2 वाजता........
मला फार विचित्र फिलिंग अली होती.... ( हा किस्सा कदाचित आधी लिहिला असावा असं वाटतंय )

आता दुसरं, 2010 मध्ये मी एक मीटिंग मध्ये होते. आणि क्लायंट शी डिस्कशन करताना मला माझ्या आजोबांची जोरात आठवण आली....6.30 संध्याकाळचा वेळ..... 7 ला मिट संपली... आणि भूक लागली म्हणून मी पार्कात रोल खायला गेले म्हटलं, आता आजोबांना फोन करते... खाऊन झालं आणि मी घरी निघाले, फोन चं विसरले.
रात्री 8 ला मला कझिन चा फोन आला. तिचा नंबर बघून मला उगाच टेन्शन आलं की काहीतरी झालंय का??? फोन उचलावा वाटेना...पण तिने सहज केलेला फोन मला..... घरी जाताना आत्या चा फोन आला, " तू कधी निघतेय गावी यायला?" मी का असे विचारलं....तर म्हणे ," तुला नाही कळलं?? जाऊदे घरी जा टेन्शन नको घेऊ"
मी मामाला फोन केला त्याने नाही उचलला, मग अजून एकाला गावी केला फोन तर तो बोलला त्यांचं अकॅसिडेंट झालं...पण बरे आहेत .... मनात पाल चुकचुकली.... 6.30 वाजल्यापासून जे वाटत होतं ते हेच होतं.... बाबांची आठवण आली आणि समहाऊ खात्री पटली की आजोबा नाहीयेत...... मग मी मावशीच्या नवऱ्याला फोन केला आणि खरं बोलवून घेतलं त्याच्याकडून की आजोबा ऑफ झालेत..... आणि वेळ संध्याकाळी 6.45 ...

ही फिलिंग खूप वाईट आहे आणि तेव्हापासून मी एक्सट्रीमली घाबरते . .....

नमस्कार.... मी माबो वर नवीन आहे.
भूतांच्या गोष्टी वाचायला आवडतात, त्यामुळे अमानवीय धागा अगदी पहिल्यापासून वाचतेय गेले १५ दिवस.
माझा विश्वास नाहीये, तरीही काही किस्से खरंच घाबरवणारे होते.
हे सगळं वाचताना काही अनुभव आठवले जे विश्वास नसल्याने दुर्लक्ष केले आणि नंतर विसरून गेले होते.

Submitted by अनिश्का. on 6 July, 2018 - 00:16
@अनिश्का : खुप डेंजर अनुभव, तुम्ही अजुन चौकशी नाही केली का? तुमच्या मिस्टरांची काय प्रतिक्रिया काय होती?

परवा एक बाई आली , आमच्या घरी. माझा नवरा जस्ट बेडरूम मध्ये जाऊन बसलेला आणि मी बाहेर टीव्ही बघत बसलेले. इतक्यात दरवाजा वाजला म्हणून उघडून बघते तर एक म्हातारी बाई. मी कोण हवंय म्हणून विचारलं तर म्हणे " तुमच्या आधी इकडे जे राहत होते ना कदम त्यांची मी आई."

या अनुभवाबद्दल बोलतोय Happy

मी बरेच महिने वाचत आहे....रात्री वाचताना मज्जा येते :):)
काही काही आय डी उगाचच गोंधळ घालतात त्यांना पटत नाही तर वाचू नये ... माबो वर बाकी वाचन ही भरपूर आहे तिथे जावे...आम्हाला अमानवीय पण वाचायला आवडते ..त्यामुळे काही बाही बोलून आमची मज्जा घालवू नये ही विनंती

या अनुभवाबद्दल बोलतोय Happy------------
ओके गॉट ईट.... नवरा बोलला की ती खाली गेली असेल....मी म्हटलं की अर्रे तुझ्या च समोर मी पटकन खाली उतरून गेले ना ती नाही भेटली. 11 व्या माळ्यावरून म्हातारी बाई पटकन कशी जाईल????
तर म्हणे ,"मग वरती गेली असेल "
जे मला पटलं...खरं मी वॉचमन ला पण विचारलं तर तो बोलला की अशी कुठलीही बाई नव्हती दिसली आणि cctv मध्ये पण तसं काही दिसलं नाही....
कारण अमानवीय जरी नाही असा विचार केला तर समजा ती चोर वगैरे असेल तर???? या विचाराने मी cctv बद्दल विचारणा केली....पण त्यात ती नाही दिसली

हा अनुभव अमानवीय आहे कि नाही सांगता येत नाही.

आम्ही चौघे गोव्याला चाललेलो होतो. कोल्हापुरात रात्रीचा मुक्काम करून मग सकाळी निघायचं असा बेत होता. पण त्या दिवशी कोल्हापुरात कसला तरी राजकीय कार्यक्रम असल्याने हॉटेल्स फुल्ल होती. चार पाच ठिकाणी चौकशी केली तेव्हां कुठेच रूम मिळणे शक्य नाही असे सांगितले गेले. आम्ही बाहेर पडलो. हायवेला कुठे मिळते का जागा बघू लागलो. पण रात्र काढण्यासाठीही ही हॉटेलं फॅमिलीला योग्य नव्हती. मग एका ठिकाणी थोडी वस्ती पाहून इनोव्हात झोपायचा निर्णय घेतला.

इंजिन बंद झाल्यावर एसी बंद, अस्वस्थ वाटत होते. खिडकी उघडली की मच्छर आत येत. मी मागे मुलांजवळ ताणून दिली होती. पण झोप अशी लागत नव्हती. रात्री किती वाजले होते माहीत नाही. पण समोरून एक काठी टेकत आकृती येत होती. मागून येणा-या वाहनांच्या प्रकाशात धुक्यावर त्या आकृतीची सावली मोठी होत जायची. आकृती जवळ आल्यावर मी डोळे मिटून घेतले. नजरा नजर नको असं आतून वाटत होतं.

पाच दहा मिनिटांनी (?) डोळे उघडले तर त्या आकृतीने आमच्या गाडीला तोंड लावले होते आणि ती आत बघत होती. मला प्रचंड भीती वाटली. तोंडून किंकाळी फुटली नाही हेच नशीब. पुन्हा डोळे मिटून घेतले. तेव्हढ्या वेळात पाहीलं. ती म्हातारी होती एक.
नंतर काठीचा आवाज आला. टेकत टेकत ती मागे चालत गेली. सुटकेचा नि:श्वास टाकला.

नंतर दुस-या दिवशी मनात विचार आला... एव्हढ्या रात्री एखादी म्हातारी बाई चालत कुठे जात असेल ?

एव्हढ्या रात्री एखादी म्हातारी बाई चालत कुठे जात असेल ?>>> कोणीतरी असहाय, वृद्धा असेल.
एक विडीओ काही महिन्यांपूर्वी फेबु वर पाहिला. असंच रात्रीचा प्रवास करताना एकाला (तो बहुतेक कोणी नगरसेवक की असा कोणीतरी होता) हेडलाईटच्या उजेडात एक खूप म्हातारी बाई झाडाखाली बसलेली दिसली. त्याने विचारपूस केली तेव्हा कळले की तिचा मुलगा तिला सोडून गेला होता आणी परत आलाच नाही.

शक्यता आहे. कदाचित खायला काही मिळते का यासाठीही गाडीत पाहीले असेल. पण त्या क्षणी तरी भीती मुळे सुचलं नाही काही.

मी मुद्दाम इकडे लिहायला मम्मी कडून एक किस्सा ऐकून घेतला जबरदस्तीने......हा किस्सा माझ्या आजीने सांगितलेला त्यांना....

आजी लहान होती तेव्हा म्हणजे साधारण 1954 सलची गोष्ट..आजी तेव्हा 8 की 9 वर्षाची होती. एकदा शाळेतून येत असताना तिचा पाय मुरगळला. तेव्हा शाळेचं इतकं नव्हतं , की शाळेत जायला च हवं ते ही गावी ! पण पणजोबांनी तिला घातलेली शाळेत. अनवाणी पायांनी घरी परत येत असताना तिचा पाय मुरगळला. तर पाय दुखायला लागला.
आजी रस्त्यात च बसली कारण उभं राहता येईना.
इतक्यात त्यांच्या शेजारच्या घरातली एक म्हातारी आली आणि तिला विचारलं की," लिले तू कशी पडलीस, थांब हो मी तुझा पाय बरा करून देते! " आणि त्या म्हातारीने जिला ते लोक बाय म्हणायचे तिने पाय योग्य ठिकाणी दाबून दुखणं थोडं कमी केलं. आजी उभी राहू शकली. मग बाय ने तिला दोन पेरू दिले आणि बोलली ," घे खा !घरी तुला आज काय लवकर जेवण मिळेल स वाटत नाही. मी शेतावर जाऊन येते हो, तू पुढे जा "
आजी ने 2 पेरू घेतले आणि ते खात खात लंगडत घरी पोचली.
बघते तर बाय च्या घरात गर्दी, रडण्याचे आवाज....
तिने विचारलं तर म्हणे तू शाळेला गेल्यावर बाय पाय घसरून पडली आणि तिथे च गेली.
आजीला कळे ना असं कसं? मग तिने तिच्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. सगळे लोक घाबरले. लगेच आजीची दृष्ट काढून झाली. आणि आजी ला रात्री खूप ताप आला. पण झाली बरी थोड्या दिवसात. नंतर आजीला ती बऱ्याचदा रात्री घराबाहेर उभी दिसायची.
( हे भूत दिसल्यावर ताप का येतो हे न कळलेलं कोडं आहे मला )

>> भूत दिसल्यावर ताप का येतो हे न कळलेलं कोडं आहे

चांगला प्रश्न आहे. घाबरलेल्या अवस्थेत मेंदू शरीरात रक्तामध्ये अड्रेनलिनचे प्रमाण वाढवतो. त्यामुळे रक्ताभिसरण जोरात होऊन स्नायुंना जास्त रक्त(उर्जा) मिळावे हा उद्देश. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. पण याच्या फार डीटेल्स अजून माहिती नाहीत. यावर अद्याप संशोधन सुरु आहे. इथे वाचा:

https://www.quora.com/Why-does-our-body-shivers-when-we-feel-cold-or-fear

https://www.quora.com/Why-do-we-feel-cold-and-our-body-shivers-when-we-a...

आईने दोन महिन्यांपूर्वी ३ उश्या घरी आणल्या. त्यातली एक उशी डोक्याखाली घेऊन झोपल्यावर विचित्र आणि भीतीदायक स्वप्न पडायची. हा अनुभव घरातल्या सगळ्यांना आला. बाबांनी गावाकडच्या नदीत विसर्जन केलं त्या उशीचं.

हा माझा अनेक वर्षांपुर्वीचा अनुभव आहे पण तो अमानविय आहे की विचित्र ते तुम्ही ठरवा. मी सुट्टीसाठी कोल्हापूरला गेले होते वय १७ ते १९ च्या दरम्यान होतं. मला ज्या दिवशी पुण्याला परतायचं होतं त्या दिवशी सकाळी सकाळी मला अजिबात जावंसं वाटेना. नेमका तेव्हा बाबा पेपर वाचत होते आणि पुर्ण उलगडून डोळ्यासमोर धरल्याने मला फ्रंट पेज व्यवस्थित दिसत होते. तेव्हा कोल्हापूरातली एक नामवंत व्यक्ती (नाव विसरले) त्यांची अख्खी फॅमिली पुण्याहून कोल्हापूरला परतत असताना अपघातात गेलेली होती. माझं मन अधिकच कडू झालं Sad मग बाबांना मी म्हटलं मी जात नाही आज, उद्या जाते पण बाबा ऐकायला तयार नव्हते. मग मी जबरदस्तीने आंबाबाईच्या देवळात गेले दर्शनाला. तिथे एक म्हातारी बाई जोरजोरात आक्रोश करत महाद्वारातून देवळाच्या आवारात शिरली. (त्या कुटुंबाची कुणी तरी असावी) माहित नाही. माझं मन अजून अजून कडू झालं. मी जायची टाळाटाळ करू लागले. पण बाबांनी शेवटी मला ३-४ च्या एसटी साठी तयार केलं, घरातून बाहेर पडलो तर त्या फॅमिलीची (अख्ख्या) प्रेतयात्रा आम्हाला तिथेच दिसली. ट्रकमध्ये ती ५-६ प्रेतं Sad माझं मन अजूनच खचलं. त्यातही मी बाबांना म्हटलं मी नाही जात पण दुसर्‍या दिवशी काहीतरी महत्वाचं होतं बहुधा मला काहि आठवत नाही. म्हणून मी जबरदस्तीने निघालेच. एसटीत बसले (कंडक्टर शेजारी) आणि आमची गाडी बरोब्बर कातरवेळी खंबाटकी घाटाच्या आसपास कुठेतरी बंद पडली. अख्खी एसटी रिकामी करून लोक बाहेर उतरून गेले होते. मी एकटीच मंतरल्यासारखी गाडीत बसून होते. मी तेव्हा का उतरले नाही, खिडकीबाहेर काळोख पाहण्यात मला का इतकी धन्यता वाटली. काहिहि कळत नव्हतं. केव्हातरी एसटीतला फॉल्ट दुरूस्त झाला आणि आम्ही निघालो. खाली उतरून दुसरी बस पहावी असं मला का नसेल वाटलं? एकटीच होते तेव्हा. तिथून परत निघताना एस टी ऑलमोस्ट रिकामीच होती.
पुण्यात पोहोचले तर धुवांधार पाऊस... गणपतीचे दिवस होते. रिक्षावाले स्वारगेट वरून टिळक रोड ला जायला ४० - ५० रू मागत होते. मी चिंब भिजले होते. मन थार्‍यावर नव्हतं. पण त्या दिवशी आपल्या सोबत काहितरी विचित्रं होतं आहे असं मला क्षणोक्षणी जाणवत होतं. अखेर एका मित्राला पि सि ओ वरून फोन केला तो पाऊण तासाने पोहोचला कारण गणपतीचे दिवस होते आणि ट्रॅफिक जॅम. कुडकुडत घरी पोहोचले, कपडे बदलले. आणि पुढचा दिवस काही फार उरला नव्हता. सकाळी उठले तेव्हा सणकून म्हणजे सणकून ताप होता अन्गात आणि कित्येक वर्षांनी माझ्या डोक्यात (बहुतेक शाळेनंतर) तेव्हाच प्रचंड उवा झाल्या होत्या अचानक. Uhoh

तसं मला काहि दिसलं वगैरे नाही कुणी मला काही बोललं नाही पण त्या दिवशी मला इतकं घाण का वाटत होतं हे कोडं आजतागायत उलगडलं नाहिये. असो.

Pages