अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच सगळी भुतं Scared Ghost संसदेतला अविश्वास ठराव पास नापास बघायला गेली होती कारण त्यांना आपापसात असे उद्योग करायचे आहेत. मग संसदेपेक्षा चांगले ठिकाण कुठले असेल म्हणून ते पहायला ती गेली आहेत. पण जोडुन शनी रवी सुट्टी आल्याने ती सोमवारी हजर होतील असा हडळीने संदेश पाठवलाय.TV Ghost

हडळीचा निरोप Happy

( हडळीचा मुका)

गेल्या आठवड्यातील किस्सा, अमानवीय नाहीये, पण तरी सांगते

मी अन माझी एक कलीग , आम्ही दोघी एका प्रोजेक्ट मिटिंगसाठी चेन्नईला गेलो होतो. तिथे ऑफिसच्या गेस्ट हाउस मध्ये उतरलो. हे गेस्ट हाउस शहरापासून जरा लांब आहे, पण का माहीत ती जागा दोघींनाही इतकी आवडली नाही, म्हणजे कसलेतरी दडपण आल्यासारखे वाटत होते तिथे, पण दोघीही शांत होतो , काहीच बोललो नाही एकमेकींना. पहिल्या दिवसाचे सगळे काम संपवून, रात्रीचे जेवण खाऊन , रूमवर परत यायला बऱ्यापैकी उशीर म्हणजे जवळपास रात्रीचे ११वाजले होते. खरेतर दोघी दमलो होतो पण एकतर अजूनही तिथे कसेतरी होत होते, अन रात्र असल्यामुळे अजूनच रुखरुख लागली होती मनाला. त्यात ते गेस्ट हाऊस खूप मोठे म्हणजे दुमजली होते, वर ६ खोल्या, तर खाली मोठा हॉल, किचन अन ३ खोल्या. आम्ही मुद्दाम खालच्याच खोल्या घेतल्या होत्या. माहीत नाही का पण दोघींनाही झोप येत नव्हती. माझा आजवरचा अनुभव पाहता, मी दमली की अगदी डाराडूर झोपते, अगदी नवख्या जागिसुद्दा, पण तरी इकडे असे का होत होते कळेना. १२ वाजता दोघी बाहेर हॉलमध्ये आलो, अन दोघी अचंबित, कारण दोघी एकमेकींशी काही बोललो नव्हतो, तरी दोघी सेम फील करत होतो. मग ठरवून दोघी तिथेच सोफ्यावर बसून गप्पा मारायला सुरुवात केली, म्हटले बोलता बोलता जेव्हा झोप येईल तेव्हा बघू पण आता एकत्र राहू. अन गप्पा मारता मारता कधीतरी झोपलो दोघी. नंतर थोड्या वेळाने कसल्याशा आवाजाने जाग आली, जणू काहीतरी छुन छुन वाजत होते. आवाजाचा कानोसा घेतल्यावर कळले की आवाज किचनमधून येतोय, पण तरी नक्की कळत नव्हते. सगळे खिडकी दरवाजे नीट बंद होते. वरवर सगळे ठीक वाटत होते पण कळेना की नक्की काय प्रकार आहे, अस्वस्थता खुप वाढली होती, त्यात अचानक अगदी फिल्मी स्टाईल मध्ये किचनची खिडकी धाडकन उघडली जोराच्या वाऱ्यापावसामुळे. अश्या घाबरलो दोघी की नाईट सुटमध्ये हातात फक्त मोबाईल घेऊन सरळ धावत सुटलो बाहेर गेटकडे, जिथे वाचमन होता. त्याने खूप समजूत काढायचा प्रयत्न केला पण म्हटले नाही, काही झाले तरी आता परत आत जाणार नाही, कुठलेही हॉटेलमध्ये रूम बुक करा, पण इकडे नाही राहणार. शेवटी, तिथला मॅनेजर त्याच्या बायकोला सोबत घेऊन आला अन आम्हा दोघींना स्वतःच्या घरी घेऊन गेला, अगदी दुसर्या दिवशी सुद्धा त्याने आम्हाला त्याच्या घरीच ठेवून घेतले. आमचे सामान सुद्धा घ्यायला आम्ही गेलो नाही, त्यांनीच आणून दिले.
तो प्रकार नक्की काय आहे कळले नाही पण खूप घाबरलो दोघी

माझ्या एका मैत्रिणीला तिच्या कलीग ने सांगितलेला किस्सा ...
ऑफिस च्या मीटिंग साठी एकदा रश्मी साताऱ्याला तिच्या अजून २ कलीग सोबत गेली, तिथे त्यांना २ दिवस मुक्काम करायचा होता, त्यामुळे त्यांनी एक हॉटेल हाय वे लागत शोधले आणि तिथेच मुक्काम ठरवलं. हॉटेल अगदी साधंसं होत. अगदी छोटं दुमजली घर जणू .. रश्मी अरुण आणि विद्या असे तिघे मिळून त्यांनी २ रूम घेतल्या दोघीसाठी एक आणि अरुण ला एक दोन्ही रूम च्या बाल्कनी एकच होती .म्हणजे दोन्ही रूम चे दरवाजे एकाच ओपन पॅसेज मध्ये उघडत होते. पहिल्या दिवशी पूर्ण वेळ ते शहरात कामासाठी फिरत असल्यामुळे सामान रूम वर दिवसभर पडलेले आणि संध्याकाळी जेव्हा तिघेही दमून आले तेव्हा रूम वर न जाता आधी जेवणावर ताव मारला आणि नंतर आराम करू फ्रेश होऊन असे ठरवून जरा खालीच रेंगाळले. बाहेर अंगणात तिघेही फिरत होते विद्या ला कॉल आल्यामुळे ती बोलण्यासाठी ह्या दोघांपासून थोडी दूर झाली आणि चालत चालत थोडं घराच्या डाव्या बाजूला आली तिथे ओपन मोकळं मोठं मैदान होत. आणि त्यापलीकडे मोकळं उजाड रान विद्याला तिथेच मैदानात अंधारात ओळखीचं काहीतरी दिसलं ,म्हणून तिने थोडं पुढे जाऊन नीट पाहिलं आणि तिला धक्काच बसला तिथे त्यांच्या बॅगा अगदी जीर्ण स्वरूपात आणि कपडे अर्धे बाहेर कुजलेले जणू खूप वर्षांपासून तिथे ते खितपत पडलेलं असेल अश्या दिसल्या. तिने आधी फोन कट केला आणि धावत रश्मी आणि अरुण ला सांगितलं आणि त्यांना ओढत रूम वर आधी बॅगा
चेक करायला सांगितलं. रूम वर मात्र त्यांचा सामान जसेच्या तसं होत .रश्मी तिला म्हणाली आग आपल्या नसतील असतील कुणाच्या तरी वेडी आहेस का असे घाबरायला. विद्याला हे पटलं असावं बहुतेक ती थोडी शांत झाली आणि सर्व झोपी गेले मध्यरात्री अचानक रश्मीला जाग आली. का आली? हे तिलाच कळलं नाही, पण तिला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून ती दरवाजा उघडून बाल्कनी मध्ये आली. तिथे अरुण आधीच उभा होता. त्याच्याजवळ जाऊन तीही उभी राहिली. अरुण ला ती आल्याची चाहूल सुद्धा नाही लागली, तो एक टक त्या उजाड रानाकडे पाहत होता. रश्मीने विचारलं अजून झोपला नाहीस अरुणच काहीच उत्तर नाही कि त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. इतक्यात तिला हाक दिल्याचा भास झाला जस कि तो आवाज अरुण चा असावा पण अरुण तर समोरच होता, इतक्यात तिला विद्याने आवाज दिला ती धावत रूम मध्ये गेली तर विद्या डाराडूर झोपलेली. तिला वाटलं मुद्दाम ती असे करत असावी म्हणून ती तिच्याजवळ गेली आणि खरंच विद्या छान झोपलेली. रश्मीने तिला आवाज दिला पण ती झोपलेली. तिला वाटलं भास झाला असेल म्हणून ती पुन्हा बाहेर आली तर अरुण तिथे नव्हता, तिला वाटलं तोही गेला वाटत झोपायला, म्हणून हि पुन्हा झोपी गेली. सकाळी नाश्ता करताना तिने अरुण ला विचारलं असता त्याने साफ नकार दिला कि तो रात्री बाहेर उभा होता आणि रश्मीला भेटला. त्याच म्हणणं होत कि तो पडल्यापडल्याच झोपला ते थेट सकाळीच उठला. आता रश्मीचं विचार करून डोकं फिरलं तर यावर विद्याचा म्हणणं होत इथे काहीतरी प्रॉब्लेम असावा, किंवा त्या बाल्कनी मध्ये बाधा असावी पण अरुण चा विश्वास नव्हता तो म्हणाला आजची रात्र तर काढायचीय कशाला टेन्शन घेता. आणि इथे अजून पण लोक आहेत काही प्रॉब्लेम नाही नंतर काम आटोपून पुन्हा संध्याकाळी ते जेवायला जमले तेव्हा त्यांना जाणवला तिथला स्टाफ त्यांना सारखा आश्चर्यकारक नजरेने पाहतोय, तेव्हा अरुण ने एका पोऱ्याला धरलं आणि विचारलंच त्यावर त्याच असे म्हणणं होत कि दुपारी अरुण च्या रूम मधून मोठ्याने भांडण्याचा आवाज आणि एकसारखा रडण्याचा आवाज येत होता, म्हणून आमच्या मालकाने तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही त्यांच्या वर खूप चिडला आणि अंगावर धावूंन आला .. आता मात्र अरुण ला आश्चर्य वाटलं तो दिवसभर कामात होता तर इथे असे कास घडलं आणि कोण होत ते... हे सर्व ऐकून रश्मी आणि विद्या त्याच रात्रीच्या गाडीने पुण्यात आल्या आणि तिथून मुंबई . अरुण त्याच्या गावी गेला कारण त्याला गावावरून आईने फोन करून अर्जंट बोलवले ..पण नंतर अरुण पुन्हा कामावर आला नाही त्याने जॉब सोडल्याचे समजले आणि कायमचा गावी म्हणजे कोकणात स्थायिक झाला ... त्यांनतर त्याने रश्मी किंवा इतरांसोबत सर्व कॉन्टॅक्ट तोडले .. रश्मीला थोडा थोडा नंतर बाहेरून कानावर येत राहिलं अरुण च्या घरी काहीतरी कोणीतरी त्याच्या वर काळं केलं असे आईला समजलं कारण सर्व घरात शिकून चांगला जॉब असलेला तो एकच होता. आणि याच मूळे त्याच्यासोबत काहींना काही घडत असायचा ज्याचे प्रमाण नंतर नंतर वाढत गेले आज तो काय करतो कुठे असतो हे काही समजलं नाही किंवा त्या हॉटेलात तसे अनुभव का आले कदाचित रश्मी आणि विद्या प्रथमच त्याच्यासोबत बाहेर आल्यामुळे त्यांना हे जाणवलं ..काहीच माहित नाही ...

भित्या पाठी ब्रह्म राक्षस Lol
बाकी काही नाही ह्या अनुभवात>>>> अगदी खरंय तुमचे कलपेशकुमारी, अन म्हणून मी वर लिहिलेय की यात अमानवीय असे काही नाही, तसेही इथले किस्से लोकं एक विरंगुळा म्हणून वाचतात, बरेच जण तर खोटे ही काहीबाही सांगतात त्या पेक्षा मी जे लिहिलेय तो माझा अनुभव आहे अन खरा आहे हे नक्की.

अगं, खरतर आम्ही स्वतः खूप हसतोय आता, पण तो क्षण कसा गेला हे न आम्हाला शब्दात वर्णता येईल न तुम्ही कोणी समजू शकता, कारण तो तुम्ही अनुभवला नाही☺️

@VB अमानवी नसला तरी थरारक आहे अनुभव>>>> हो अतुलजी

मी वर म्हटले की अमानवीय नाही कारण तसे काही दिसले नाही, तरी त्या जागी आलेले मानसिक दडपण, अगदी पहिल्यांदा जाणविलेली निगेटिव्हीटी किमान मला तरी तिथे खूप उदासीनता जाणविले जी अस्वस्थ करणारी होती. अन जसे मी वर लिहिलेय मी लगेच कुठेही ऍडजस्ट होणार्यापैकी आहे, अन ही काही पहिली खेप नव्हती की मी एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलेली. या वेळी किमान माझी कलीग होती सोबत, पण या आधीही मी अगदी एकटी सुद्धा अशी राहिलेली आहे

सो आहेत खरे काही अनुत्तरित प्रश्न जे खुप भीतीदायक आहेत

समजा, एखाद्या भूतबाधा असलेल्या वाड्यात आपण रहायला गेलो,
तर कायमचाच नाही का जायचा तुमचा हा कमी रक्तदाबाचा त्रास !!
hospital.jpg

@vb भयानक अनुभव...तशा परिस्थितीत असेच घाबरायला होईल
@ प्रिय ...भयंकरच अनुभव प्रिया ऐवले

शाली यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही लहानपणी असंच एक प्रकार केला होता.
आमच्या घराशेजारी राहण्याऱ्या लहान मित्राला घाबरवण्याचा प्लॅन केला होता. एका कार्डबोर्डवर YES आणी NO लिहून एक २५ पैशाचे नाणे ठेवून, मध्यभागी मेणबत्ती लावली. एक खोलीत अंधार करून प्लँचेट ची तयारी केली आणी आत्म्याला यायचे आवाहन केले. हळूहळू नाणे YES वर आले आणि दुसऱ्या एका मित्राने एकदम "भूत आले ! भूत आले" असा गोंधळ केला, त्या क्षणी गेलेली लाईट अचानक आली आणि ट्यूबलाईटने चमत्कार केला. लहान मित्र घाबरून सुसाट पळत घरी गेला आणि दोन दिवस तापला.
आता ते नाणे नवीनच बाजारात आलेले निकेलचे होते आणि माझ्या हातात कार्डबोर्डखाली चुंबक होते.

हा किस्सा माझे वडील लहान असताना सांगत असत आता वडील ह्यात नाहीत पण किस्सा माझ्या डोक्यात फिट्ट बसलेला आहे . माझे वडील हे सिविल कॉन्ट्रॅक्टर होते एकदा म्हणजे माझ्या जन्माआधीची गोष्ट आहे त्यांचं काम चालू होत एका ५ मजली इमारतीचं . त्यांचे १०-१२ मजूर कामाला होते जे दिवस आणि रात्री पाळीनें काम करत काम पूर्ण करायचं असल्याकारणाने काम जोरात चालू होते . वडिलांची धावपळ चालू होती इमारतीचा मालक एक गुजराती माणूस होता . जो वेळचा फार पक्का होता इमारतीचे काम प्लास्टर पर्यंत आले होते . आजूबाजूने रहदारी कमी होती . एके दिवशी काम जवळजवळ पूर्ण होत आल्याने पप्पानी मजुरांना आजची रात्र काम बंद ठेवा आणि आराम करा असे सांगितले आणि घरी गेले . मजूर मुक्कामाला तिथेच थांबले. रात्री मस्त मच्छी आणि भात खाऊन त्यांनी दारूची सोय करून ,पिण्यासाठी ग्लास घेऊन सज्ज झाले . ते चौघे होते . त्यात हणम्या म्हणून एकजण होता . बाकीच्यांची नावे लक्षात नाही. थोडी पिऊन झाल्यावर त्यांना आठवले कि सर्व खिडक्या बंद केलेल्या नाहीत . आणि जर त्या उघड्या राहिल्या तर मालाची चोरी होऊ शकते असे पप्पानी बजावून ठेवले होते. म्हणून ते एकमेकांना विनवण्या करू लागले . तू जा मी नाही तू जा ! शेवटी हणम्या तयार झाला लढत पडत कसातरी चालत तो जाऊ लागला इतक्यात एकाने पिन मारली नीट जा... हणम्या घाबरु लागला त्याला आठवले . गेल्या २ महिन्यात ३ वॉचमन पळून गेले होते कारण ५ व्या मजल्यावर त्याला काही गूढ अनुभव आले होते . जस कि तिथे कोणी तरी आहे . आणि ते मागे मागे चालत राहते . रडण्याचे कण्हण्याचे आवाज येत राहतात दिवसां काही नाही पण रात्री हे घडत .बरं याबद्दल कोणाला विचारावं तर आम्हाला असा अनुभव तर नाही आला . शिवाय ज्यांना अनुभव आले तेच पळून गेले तर बोलणार कोण . पण मजुरांमध्ये हि चर्चा असायची . शेवटी हणम्या सोबत अजून एक जण तयार झाला . दोघेजण सोबत निघाले . प्रकाश म्हणजे ते जुनाट पिवळे बल्प होते प्रत्येक मजल्यावर त्याचा उजेड तो किती! घाबरत चाचरत ते एक एक मजला चढत खिडक्या लावून घेत होते पण त्यांना कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा काही विचित्र जाणवलं नाही . ३ मजले गेल्यावर अचानक त्यांना दडपण जाणवू लागले श्वास घ्यायला त्रास होऊ लागला ते दोघे धापा टाकू लागले .४ मजले चढल्यावर त्यांना कोणातरी सोबत असल्याचे जाणवले . आता मात्र जास्तच घाबरायला लागले . धड खालीही जात येईना आणि वर तर भीती ... शेवटी कसबस आलोच आहे तर ५ व्या मजल्याची खिडकी बंद करू नि धावत खाली जाऊ . हातात हात घेऊन ते चालत होते अचानक खूप वारा सुटला जणू वादळ इतका कि त्यांना तो हळू हळू बाल्कनीच्या दिशेने नेऊ लागला यांची ताकत कमी पडू लागली आणि हणम्या गॅलरीतून ५ व्या मजल्यावरून खाली पडला हे पाहून दुसरा तिथेच बेशुद्ध पडला . जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा त्याने हे सर्व सांगितलं . तो दवाखान्यात होता . हणम्या जागीच मरण पावला . आधीच किरकोळ शरीरयष्टी त्यात रोजची दारू त्यामुळे शरीराने साथ दिली नाही आणि तो मरण पावला . पोलिसांनी कसून चौकशी केली पण तो तेच तेच सांगत राहिला . बरे बाकीच्या खालच्या दोघांना काहीच जाणवले नाही . फक्त त्यांनी हणम्याला ५ मिनिटे गॅलरीमध्ये निर्विकार शांत उभे पहिले आणि त्याने स्वतःहून हात टायटॅनिक पोझ मध्ये फैलावून उडी मारली . .. त्याच्या घरीही चौकशी केली तिथेही काही सापडलं नाही . पण या सर्वात एक आश्चर्य असे होते कि हणम्या पडला ५ व्या मजल्यावरून आणि दुसरा मजूर २ ऱ्या मजल्यावर बेशुद्ध सापडला होता . त्यानं काही काळंबेरं केलं असेल असे म्हणावे तर १० दिवसाच्या आत त्यानेही आत्महत्या केली. का केली ? काहीच माहित नाही . त्या गुजराती मालकाचं म्हणणं होत दारू पिऊन भांडून त्याने हणम्याला फेकलं आणि नंतर पच्छातापने स्वतः आत्महत्या केली ....

एक विचारायचं होत कुठेतरी ऐकलं (वाचलं ) होत मायबोलीवर . १३ व मजला इमारतीत नसतो . आज घरी जात होते लिफ्ट मध्ये पाहिलं तर खरंच माझ्या लिफ्ट मध्ये कुठेच १३ फ्लोर च बट्टण नाही , मी शॉकच झाले नवऱ्यालाही दाखवले .काही माहिती आहे का कोणाला बरं आमचं घर हे खूप मोठं प्रोजेक्ट आहे. म्हणजे १८ मजल्याच्या जवळ जवळ ५० इमारतीचं प्रोजेक्ट आहे आणि तरी असे का?

इंग्रजांच्या म्हणजेच ख्रिश्चन लोकांच्या दंत कथेनुसार 13 आकडा अपशकुनी असतो, दंतकथा नीट आठवत नाही पण एका राजाने त्याच्या समारंभात 12 देवदूताना आमंत्रण दिलं होतं चुकून एका देवदूताला आमंत्रण द्यायला विसरला, मग त्या तेराव्या देवदूतान येऊन शाप वैगरे दिला अशी काहीतरी कथा आहे. भारत सोडून जाताना इंग्रज त्यांचा पगडा आपल्यावर सोडून गेले, चंदिगढ शहर पण इंग्रजांनी बांधलाय आणि त्यात सुद्धा 13 सेक्टर तुम्हाला कुठेही दिसणार नाही

प्रिया येवले,
पाचव्या मजल्याच्या खिडकीतून Uhoh काय चोरीला जाणार होते/ गेले असते?

येशुच्या लास्ट सपर (अंतिम जेवणाच्या) वेळी येशु टेबलवर १३वा होता आणि तो वारला म्हणऊन १३ अशुभ मानतात.

मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे १३ वा मजला नंबर जरी नसेल, तरी प्रत्यक्षात तर असणार ना, मग खऱ्या तेराव्या मजल्याला १४ नंबर देतात की नक्की काय करतात.

कदाचित बाळबोध प्रश्न वाटेल, तरी मला उत्सुकता आहे
कृपया कोणीतरी सांगा

>> आज घरी जात होते लिफ्ट मध्ये पाहिलं तर खरंच माझ्या लिफ्ट मध्ये कुठेच १३ फ्लोर च बट्टण नाही

हे युरोप अमेरिकेत ऐकलं होतं. भारतात पण सुरु झालंय का आता असं?

12 नंतर 14 असं असतं काही लिफ्टस मध्ये...म्हणजे मजला 13 वा च पण नाव 14 वा मजला>>>> तेच तर, जरी नंबर दिला नाही तरी आस्तित्वात आहे न मग फक्त नंबर न दिल्याने काय फरक पडतो Uhoh

हे १३ १३ वाचुन वाटतय कि जो बंदा/बंदी तिकडे १३ तारखेला जन्मदिन घेऊन भूतलावर उतरला असेल त्याला लोक्स काय म्हणत असतील..

@हाझेनबर्ग.. आहो माल वैगरे जस जसे की रेती सिमेंट लाद्या . >> पाचव्या मजल्यावरच्या खिडकीतून रेती सिमेंट लाद्या चोरणार? Uhoh तुम्हीच कल्पना करून पहा.

Pages