अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिम्प्रीत वाय सी एम ला पण एका मजल्यावर काही अमानविय आहे म्हणे. तो बन्द करुन ठेवलाय. आणि त्या मजल्यावर लिफ्ट सुद्धा थाम्बत नाही/ थाम्बवत नाही असे ऐकिवात आहे.

औन्धचे मेडीपॉईन्ट हॉस्पिटल. बेसमेन्टला लॅब वै आहेत. दिवसा ढवळ्यासुद्धा सुनसान असाय्चे.. आणि अनामिक भिती वाटायची. लाम्ब कॉरीडोअर आणि सर्वात शेवटी एक टॉयलेट.. बाहेरच्या लोकान्साठी/पेशन्टच्या नातेवाकासाठी वै. आमच्या बाबान्ना त्या हॉस्पिटलमधे ठेवले होते. नन्तर कोणी तरी म्हणाले तिथे अमानविय काहितरी आहे.

मी पलावा सिटी मध्ये राहते . डोंबिवली एरिया मध्ये ,माझ्या विंग मध्ये १२ नंतर १४ फ्लोर मेंशन आहे म्हणजे १३ च १४ केलं आहे म्हणून ....

Oh

एक विचारायचं होत कुठेतरी ऐकलं (वाचलं ) होत मायबोलीवर . १३ व मजला इमारतीत नसतो . आज घरी जात होते लिफ्ट मध्ये पाहिलं तर खरंच माझ्या लिफ्ट मध्ये कुठेच १३ फ्लोर च बट्टण नाही , मी शॉकच झाले >>>>>>>
आमची बिल्डिंग ग्राउंड प्लस १६ मजल्यांची आहे ..आणि १३ वा मजला पण आहे आणि घराना नंबर पण आहेत १३०१-१३०४ आणि लोक सुखाने राहतात पण Happy

१३ तारीख वाईट आणि अपशकूनी असेल तर ३१ तारीख शुभदायक असायला हवी ना. ? कारण उलटसुलट तारखा आहेत ह्या. मला पामराला असले प्रश्न पडतात नेहमी यावर काय उतारा आहे?

उपाय - आपण ख्रिस्ती नाही म्हणजे १३ च शुभाशुभ आपल्याला लागू नाही असे मानावे.

घाबरून घ्यायची खाज असेल तर १३बी नावाचा चित्रपट १३व्या मजल्यावरील घरात बसून पहाणे Wink

@अनिष्का, नित्यनेमाने पोथी /स्त्रोत्रं वाचावी अश्या टोनमध्ये तुम्ही हा धागा वाचावा असे सांगत आहात असे चित्र डोळ्यासमोर आले. Biggrin

हा माझा मायबोली वर पहिला अमानवीय अनुभव, ९ वर्षांपूर्वी चा, हा मी भोसरी जवळच्या एका कॉलेजला असताना स्वतः अनुभवलेला आहे आणि नुसता अमानवीय नाही तर थरारक पण आहे.

आम्ही दोन मुली आणि एक मुलगा असे रोज तिघे बस क्रमांक ३५७ पकडून कॉलेज ला जात असू, त्या वेळी नवरात्र सुरु होते आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी माझी मैत्रीण तिच्या मामाच्या गावी गेली होती मग कॉलेज ला आम्ही दोघे गेलो होतो. कॉलेज साधारण दुपारी १२:३० ला सुटले नंतर क्लास पण होता C language आणि VB .net चा कि जो भोसरीत होता, क्लास संपेपर्यंत ३:३० झाले डबा कॉलेज मधेच संपला होता म्हणून वडा पाव खायचं ठरलं तर भोसरीत जिकडे आळंदीला जाण्यासाठी बस वळायची त्या कॉर्नर ला एक गाडी असायची तिथे वडापाव खात होतो, माझा शेवटचा घास संपला आणि रस्त्याचा पलीकडे बस येताना दिसली, वडापाव गरम असल्यामुळे माझ्या मित्राचा काही तो संपला नव्हता तो तसाच घेऊन आम्ही रास्ता क्रॉस करून बस मध्ये बसलो.
दुपारची वेळ असल्यामुळे बस मध्ये खूप जास्त गर्दी नव्हती आम्ही बसलो, वाहकाला पास दाखवले आणि रस्त्यावरही गर्दी कमी असल्यामुळे बस १० मिनिट मध्ये मोशी क्रॉस करून गेली , आणि माझ्या लक्षात आलं कि याने तो वडापाव खाल्लाच नाही हातात धरून होता फक्त आणि चक्क तो खूप घाबरला होता, मी त्याला का खात नाहीस विचारलं आणि काय होतंय, नसेल खायचा तर नको खाऊ असं विचारलं तर हा हू नाही कि चू नाही, आणि १ मिनिट शांत राहून बोलला "ती बग ती गाडी बरोबर पळत आहे" (आम्ही दरवाज्याचा एक्साक्टली समोरच्या सीट वर बसलो होतो) मला वाटलं मस्करी करत आहे पण हा जाम घाबरलेला होता आणि आता मोशी टोल क्रॉस करून गाडी इंद्रायणी नदी च्या पुलावर होती, तर हा किंचाळतच उठला आणि बोट करून ती बग अजनू पण आहे म्हणे, बस मधले लोक विचारायला लागले काय झालं,मी तर खूप घाबरले पण मी पहिला त्याच्या हातातला वडापाव टाकून दिला आणि त्याला खिडकीच्या side ला बसवून दरवाज्याच्या बाजूला बसले, त्याला मी खूप विचारलं पण त्याला काही सांगता येईना त त प प करत होता, मी बरेच विषय बदलून पहिले त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयन्त केला कारण मला हे काहीतरी वेगळं प्रकरण वाटत होत.
बस मध्ये कोणाला काही सांगावं तर विश्वास कोणी ठेवला असता माहित नाही आणि आता गाडी भामा नदीच्या पुलावर होती तर हा उतरायलाच लागला बस मधून आणि सारखा ती मला बोलावते आहे, अजून पण ती आपल्या गाडी सोबत आहे असं काहीस बोलत होता मी तसाच जोर देऊन खिडकीत कोंबला त्याला आणि त्याचा हात घट्ट पकडून ठेवला , पुढच्या पाच मिनिटात आमचा बस स्टॉप आला मी त्याला जवळपास ओढतच खाली आणलं व लगेच ऑटो ला हात केला , ऑटो वाल्याला सांगितलं कुठं जायचंय ते आणि ऑटो आमच्या घरच्या दिशेने निघाली तर हा ऑटो मधून पण उडी मारायला बघत होता पण लोखंडी बार जो एका बाजूला असतो त्यामुळे त्याला ते शक्य झाला नाही, ऑटो वाल्याने मला प्रश्न विचारायला सुरवात केली. त्याला मी बोलले तू फक्त मला याला याच्या स्वतःच्या घरी घेऊन जायला मदत कर मी सांगते सगळं उतरल्यावर, घर तर पायी चालत जाण्याइतकाच अंतर होत पण याच्या मुळे ऑटो केली होती. घर आल्यावर उतरल्या उतरल्या हा लागला उलट्या दिशेने पळायला तिथे ओळखीचे दोन लोक रोडवर गप्पा मारत होते त्यांना म्हटलं पकडा याला (आम्ही जवळच राहत असल्यामुळे ते आम्हा दोघांनाही ओळखत होते) त्या दोघांनी त्याला ओढत ओढतच त्याचा घरी नेले.
त्यांच्या घरी परडी, देवी असे प्रकार होते. त्याला बघताच त्याच्या आजीला काय कळायचं ते कळलं. तिने जवळपास धावत जाऊन देव्हाऱ्यातून कवड्यांच्या माळा आणल्या आणि एक स्वतः घालून काहीतरी पुटपुटून दुसरी त्याच्या गळ्यात घातली तर तो आहे त्या जागेवर कोसळला. हे सगळं अंगणात सुरु होत.
मग त्याला दोघांनी आत नेलं. मग सगळे माझ्याकडे काय झालं ते विचारतं होते मग मी सगळं सांगितलं ,त्याची आजी तर पायाच पडली माझ्या म्हणे त्याच्या वडीलांसोबत पण असच काहीस झालं होत आज तू होती आणि तुळजाभवानी म्हनुन तो घरी तरी आला त्याचे वडील १ दिवस आडरानात बेशुद्ध पडून होते, हे सगळं संपेपर्यंत ऑटो वाला पण तिकडेच होता, पण नंतर पैसे न घेता तो गेला.
आणि height म्हणजे या साहेबाना दुसऱ्या दिवशी विचारलं तर काही आठवत नव्हतं हे पण माझ्यासाठी
अमानवीय होत.

माझी मामी नाशिकला पंचवटी भागात tuition घेते.. तिने सांगितलेला किस्सा
एक मुलगा ओळखीने क्लासला आला.चौथीमध्ये शिकणारा मुलगा तो.गोड होता पण त्याचे मन काही अभ्यासात लागेना.तो सारखा रडत असे.म्हणून त्याच्या आईला बोलवलं की हा खूप रडत असतो पण त्याची आई न येता आज्जी अली भेटायला. त्यांनी सांगितलं की याची आई एक महिन्यापूर्वी वारली. त्या पुढे सांगू लागल्या अहो घरीही सारखा रडतो आईची आठवण काढतो म्हणून तर त्याला आम्ही बाहेर पाठवतो.पण तो मुलगा काही केल्या राहिचना म्हणून मामीने त्यांना थोड्या दिवसांनी पाठवा त्याला थोडा वेळ द्या असं सांगितलं तर त्या टेंशन मध्ये तिथेच बसून राहिल्या. काय झालं विचारलं तर त्या म्हणाल्या अहो ती याला भेटायला रोज रात्री येते ती मला सुद्धा दिसते काही करत नाही पण मग मी सर्व घरात सांगितलं व त्यांनी एका गुरुजीं ना बोलवून पूजा केली तेव्हा ती बंद झाली यायची, पण एक दिवस मी रात्रीची उठले असता मला ती दारात उभी असलेली दिसली ती मला विचारू लागली की तुम्ही अस का केलं?मी तुम्हाला काही त्रास दिला का? मी माझ्या लेकराला पाहायला येत होते पण तुम्ही मला ती पुजा करून बंदी घालीत तेव्हा मी खूप घाबरले पण मन घट्ट करून बोलले की अस चांगलं नसत तुला पुढच्या प्रवासात त्रास होईल तू येऊ नको मी तुझ्या मुलाला नीट पाहिलं.
हे सगळं ऐकून अस वाटलं की कदाचित त्यांना भास होत असावेत आणि एकच महिना झाला आहे त्यामुळे बहुतेक त्या सवरल्या नाही त्यामुळे अस होतंय पण त्या काकुळतीला येऊन सांगत होत्या की हे सर्व खरे आहे पण कोणीच विश्वास ठेवत नाही. आता खरं खोटं आज्जीनाच माहीत.

त्या आईची दया आली..>>>>... हो ना अगदी..बिचारी आई मुलगा आणि आज्जी... भुत्यभाऊ तुमचे लिखाण भारी असते

भोसरी जवळच्या एका कॉलेजला असताना स्वतः अनुभवलेला आहे आणि नुसता अमानवीय नाही तर थरारक पण आहे.
>>>
कोणतं ते कॉलेज म्हणे?

C language आणि VB .net चा कि जो भोसरीत होता
>>> कोणता क्लास? मैत्रिणीच्या बहिणीला हवा आहे.. मला कधीच भोसरीतले क्लास आवडले नाहीत, मी आपली निगडीत जायचे

भोसरीत जिकडे आळंदीला जाण्यासाठी बस वळायची त्या कॉर्नर ला एक गाडी असायची तिथे वडापाव खात होतो
>>> माई वडेवाले का/ आता पुर्वीसारखी कॉलिटी नाही राहिली पण Proud

पण मी पहिला त्याच्या हातातला वडापाव टाकून दिला >> त्याला वडापाव आवडला नसेल म्हणून उगाच घाबरवत असेल तुम्हाला Proud

>>तो वडापाव वाया गेला याचे दु:ख आहे Happy
नवीन Submitted by maitreyee>> Lol हो ना. असा वडापाव वाया घालवायचा म्हणजे काय? त्यावर दुसर्‍या दिवशी दोन वडापाव खाऊन उतारा केला का?

छ्या पण तो वडापाव वाया गेला याचे दु:ख आहे Happy
नवीन Submitted by maitreyee on 25 July, 2018 - 17:30 >>>
अर्धाच वाया गेला, अर्धा खाल्ला होता त्याने.

भोसरी जवळच्या एका कॉलेजला असताना स्वतः अनुभवलेला आहे आणि नुसता अमानवीय नाही तर थरारक पण आहे.
>>>
कोणतं ते कॉलेज म्हणे?>>>
भोसरी जवळ लांडेवाडी येथे MCA, MCS, MGMT, आणि pharmacy असणार आमदार साहेबांचं एकमेव कॉलेज आहे

C language आणि VB .net चा कि जो भोसरीत होता
>>> कोणता क्लास? मैत्रिणीच्या बहिणीला हवा आहे.. मला कधीच भोसरीतले क्लास आवडले नाहीत, मी आपली निगडीत जायचे>>>>
यश कॉम्प्युटर्स आळंदिला जाणाऱ्या रस्त्यावर आहे.

भोसरीत जिकडे आळंदीला जाण्यासाठी बस वळायची त्या कॉर्नर ला एक गाडी असायची तिथे वडापाव खात होतो
>>> माई वडेवाले का/ आता पुर्वीसारखी कॉलिटी नाही राहिली पण Proud
>>> नाही गाडा होता हातगाडी

पण मी पहिला त्याच्या हातातला वडापाव टाकून दिला >> त्याला वडापाव आवडला नसेल म्हणून उगाच घाबरवत असेल तुम्हाला Proud
हाहाहा

>>तो वडापाव वाया गेला याचे दु:ख आहे Happy
नवीन Submitted by maitreyee>> Lol हो ना. असा वडापाव वाया घालवायचा म्हणजे काय? त्यावर दुसर्‍या दिवशी दोन वडापाव खाऊन उतारा केला का?
Submitted by सायो on 26 July, 2018 - 02:05
>>> नाही ओ सायो त्या नंतर मी जवळपास १ महिनाभर त्याचा सोबत कॉलेज पण नाही गेली, सतत
ती घटना आठवून भिती वाटायची आणि हो त्या नंतर बरेच महिने वडापाव पण नाही खाल्ला.;(

अनिष्का, नित्यनेमाने पोथी /स्त्रोत्रं वाचावी अश्या टोनमध्ये तुम्ही हा धागा वाचावा असे सांगत आहात असे चित्र डोळ्यासमोर आले. Biggrin ---------–-------------- केशव तुलसी Lol

>> मी तसाच जोर देऊन खिडकीत कोंबला त्याला आणि त्याचा हात घट्ट पकडून ठेवला
>> दुसऱ्या दिवशी विचारलं तर काही आठवत नव्हतं

शरीरात असामान्य ताकत आली होती का त्याच्या तेंव्हा? "अंगात येणे"शी साधर्म्य दाखवणारा प्रकार वाटतो हा.
(मला सुरवातीला वाटले मामाच्या गावी गेलेली मैत्रीण बसबरोबर पळताना दिसली वगैरे कि काय. असो. पण थरारक आहे नक्कीच. शेअर केल्याबद्दल धन्यवाद)

<<<१ मिनिट शांत राहून बोलला "ती बग ती गाडी बरोबर पळत आहे" (आम्ही दरवाज्याचा एक्साक्टली समोरच्या सीट वर बसलो होतो) मला वाटलं मस्करी करत आहे पण हा जाम घाबरलेला होता आणि आता मोशी टोल क्रॉस करून गाडी इंद्रायणी नदी च्या पुलावर होती, तर हा किंचाळतच उठला<<<
बाबौ... खतरनाक किस्सा आहे हा! Uhoh

मला आधी वाटले की वडापावमुळे ती त्याच्या मागे आली कारण आम्ही लहान असताना आई आम्हाला रस्त्याने चालताना तळलेले पदार्थ खायला मनाई करायची. तळलेल्या गोष्टी रस्त्यावर खाल्या तर भूतबाधा होते अशी तिची अंधश्रद्धा होती/आहे. मला मात्र मैत्रीणींसोबत रस्त्याने चालताना वडापाव खायला खुप आवडायचा त्यामुळे शाळा कॉलेजातुन येताना, फिरायला जाताना आम्ही नेहमीच वडापाव खायचो. मग आम्ही वडापाव खाण्याआधी एक छोटासा तुकडा तोडून भुताच्या नावाने फेकत असू Lol

Pages