अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिष्का, महाराज बहुदा मी ४/५ वर्षांची असताना वारले, त्यामुळे वाक्य अनलोड.

माझी आजी माझ्या ४थ्या वाढदिवसाआधी वारली. त्यानंतरच्या दिवाळीत आम्ही गावी आत्त्येकडे गेलो होतो. आत्ये देवाचं खूप करायची, लोकांना बाधा वै. असेल तर उपाय सांगायची (ह्या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकते) तिच्याकडे कोणी तरी बेळगावहून आलेलं, त्यांच्याबरोबर एक १० वर्षांची कोणी मुलगी पण होती. आम्ही कोणीच त्यांना ओळखणारे नव्हतो. असं कोणी आलं की आम्ही अंगणात नाही तर स्वयंपाक घरात नाय तर डायरेक्ट माडीवर. ह्यादिवशी आम्ही अंगणात खेळत होतो, ती मुलगी पण खेळत होती. एवढ्यात राऊळ महाराज आले नि बाहेर ओसरीवरच बसले. माझ्या मोठ्या बहिणी पाणी आणायला गेल्या आणि बाबा वै. बाहेर आले.

पाणी घेऊन ते म्हणाले ," लोकांक भले करणार्‍याक आपल्या मनशाची खबर नी" (लोकांच भलं करणार्‍यांना आपल्या माणसाची माहिती नाही.) आत्त्या बाहेर येतच होती पाया पडायला, तिने असं का म्हणता असं विचारलं. त्यांनी त्या मुलीला बोलावलं आणि हसत हसत तिला पाटी पेन्सिल द्यायला सांगितलं.

तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला विचारलं तु कोण ते लिहि. तिने लिहिलं 'साजू' (माझ्या आजीला सरस्वतीला साजू म्हणतं) सगळे रडायला लागले. मग अजुन खूप काही विचारलं. आजीने त्या मुलीमार्फत रडू नका, मी जायची तेंव्हाच जाणार आहे, पण रडत राहिलात तर लवकर मोकळी व्हायची नाही. मी काही भूत बनून कोणामागे नाही, काही इच्छा नाही बाकी, फक्त वाट बघतेयं. असं काही तरी लिहिलं. ते मला आठवत नाही पूर्णपणे.

मग आम्हा मुलांना मागच्या दारी पिटाळून मोठे पुढे काय ते बोलत बसले होते. आम्ही मुलं हे विसरलोच होतो पण नंतर जेंव्हा कधी महाराजांचा विषय आला तेंव्हा कोणी ना कोणी परत ह्याबद्दल बोलत. त्यामुळे अंधुक आठवण आहे ह्या अनुभवाची.

माझा एक चुलत काका accident मध्ये वारला.. बाईक वरून जाताना. त्याचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच सेम ठिकाणी माझ्या आजोबांचा ही बाईक अपघात झाला. दोघे ही ऑन द स्पॉट गेले होते.
तर झालं काय की मामा जेव्हा वारला ना तेव्ह तो त्याच्या क्लोज मित्राच्या च्या अंगात यायचा म्हणे ( जो गावातला च होता )
ही घटना माझ्या सख्या मामाने पाहिलीय म्हणून माझा विश्वास आहे.
तर व्हायचं काय की त्याच्या अंगात यायची वेळ झाली की तो शांत बसायचा , कुठल्यातरी ट्रॉमा मध्ये गेल्यासारखा भासायचा. आणि मग खूप रडायचा . आई वडिलांची माफी मागायचा . " मी काही करू शकलो नहो तुमच्यासाठी ," आणि त्याचा अपघात झाला तेव्हा नक्की काय झालं हे कोणाला माहीत नव्हतं. त्याने च सांगितलं नक्की काय झालं ते.
तो गेला तेव्हा 23 वर्षाचा होता. आता अंगात येत वगैरे नाही तो.

पण खरंच असं अंगात येणं खरं असावं का

मला न हे अंगात येणे प्रकरण खूप गमतीदार वाटते

याबद्दल एक किस्सा मी कदाचित आधीच्या धाग्यावर लिहिलाय.

मी सगळ्यात आधी पाहिले होते तेव्हा जिच्या अंगात आले होते ती आपल्याच नवऱ्याला बाळा बालका बोलत होती, मी तेव्हा लहान होते त्यामुळे हसू आवरणे खूप कठीण होवून फसकन हसले होते, अन त्यामुळे सगळ्यांचा ओरडा ही खाल्ला होता

***हे फक्त माझे मत आहे, याबद्दल कुणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाहीये☺️

मला ही हे तोटके सुचवणे, अंगात येणे जरा पचायला कठीण जाते. कदाचित त्यामुळेच मी श्रद्धेच्या बाबतीत थोडी कन्फ्युज आहे.

राऊळ महाराजांचा हा अनुभव मी स्वतः तिथे असल्याने नाकारता आला नाहीये. बाबांकडे त्यांचा अजुन एक अनुभव आहे तो पण लिहिते इथे. पण भुताचा नाहिये चालेल का?

Lihi na

माझ्या आजोबांना बहुदा प्रोस्टेटचा त्रास होता. ही घटना झाली तेंव्हा आम्हाला कोणाला असा त्रास असतो आणि इतर परिणाम वै. माहीत नव्हते. आजोबांना खूप त्रास होत असे. माझे बाबा गावी गेले होते तेंव्ह असच एकादा दुखायला लागलं. तर त्यांना कोल्हापूरला नाही तर मुम्बैला नेऊ या असं ठरलं. आजोबा यायला तयारच नाहीत, मी आता वाचत नाही, मला हॉस्पिटल नको, असा घोष.

त्यातल्या त्यात मुम्बैला बा कीची मुलं-मुली आहेत मदतीला तिथे जाऊ या असं सांगून त्यांना तयार केलं. चारच्या एस्टीने कुडाळ आणि मग तिथुन मुम्बैची एस्टी असं ठरलं. त्यादिवशी राऊळ महाराज स्वतःहून आले घरी. आजोबांना बंगल्यावरून हळू खुर्चीवर बसवून रस्त्यावर आणलेले, तिथेच बस थांबायची, तिथे खुर्ची नेऊन ठेवली. त्यांच्या चपला राहिल्या तर कुत्रा घेऊन आला. तर महाराज ओरडले , "मर मेल्या, बस इथेच" आजोबा म्हणाले, का ओरडताय बिचार्‍याला? ते आजोबांना म्हणाले, हॉस्पिटलात जायला घाबरतोस आणि मला शिकवतोस? कोणी त्यांच्यापुढे काही बोललं नाही मग. आजोबा चप्पल न घालताच बसले बसमध्ये.

सगळा दुरचा प्रवास करून आजोबा आले मुम्बैला. डॉ. सामंत म्हणाले ३ दिवसाचे डोस देतो, बर वाटलं तर ठिक नाही तर अ‍ॅडमिट करावे लागेल. डॉ. सामंतांच्या उपचाराने त्यांना हॉस्पिटलला न जाताच बरं वाटलं. डॉक्टरां नी बरीच पथ्य सांगितली पण आजोबा हॉस्पिटलला जायचं नाही ह्या विचारानेच बरे झाले. तेंव्हा फोन नव्हते घरोघरी त्यामुळे बसच्या ड्रायवरकडून निरोप पाठवला की सगळ ठिक, बाकी खुशाली पत्रोपत्री कळवू. गावाकडूनच पत्र आलं की बाकी सगळे ठिक आहेत पण तो कुत्रा तिथेच बसला तीन दिवस आणि मग मेला.

>> अनिष्का, मला पर्स उशाशी लागते झोपताना , तस खास कारण अस नाही पण लागते.
नवर्‍याने ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला असावा. आता कबुल करत नाही.

बिचारा कुत्रा...तो चप्पल घेऊन आला तर महाराज त्याच्यावर का ओरडले? हे राऊळ महाराज कोण आहेत .. यांच्या बद्दल फारसा ऐकलं-वाचलं नाही

नुकत्याच झालेल्या आंबेनळी घाट, पोलादपूर महाड येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल आताच वाचनात आलेली हि बातमी ..

आज एक दुर्घटना झाली आंबेनळी घाट, पोलादपूर महाड, वेळ पौर्णिमा आणि ग्रहण योग, इथे पसरणी घाट आणि आंबेनळी घाट, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ह्यांना जोडणारा मार्ग, मी ह्या ठिकाणी दोनदा अनुभव घेतला आहे चतुर्थीच्या वेळेला, काळ आणि वेळ एकत्र येणे आणि न येणे ह्याला किती महत्व आहे. हा अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी नुकतेच कॉलेज पूर्ण करून जॉब ला लागलो होतो IT मध्ये जॉब असल्याकारणाने आमचे काही ऑडिटर सहकार्यानं बरोबर वाई कुडाळ मार्गे आणि शेवटी घाटमाट्यावरून कोंकणात रतनागिरीत चाललो होतो मला हि लोक फक्त टेकनिकल एक्सपेर्टीस्ट of सिस्टिम म्हणून घेऊन चालले होते. रात्री 10:30 11 च्या दरम्यान गाडी मेढा घाटातून महाबळेश्वरमध्ये आली, थोडावेळ थांबून जेवण केले 11:40 ला निघालो आणि बरोबर 12:30 नंतर आंबेनळी घाट लागला. सह्याद्रीच गारठा चारी बाजूला काळोख त्याच वेळी आमच्या ड्राइवर नि गाडी थांबवली आणि म्हणाला साहेब पुढे बघा मी पहिले माझी पाचावर धारण कमीत कमी 20 ते 25 फूट उंचीची बाई रस्ता क्रॉस करत होती, आमच्या मागे बसलेल्या ऑडिटर्स पण हा अनुभव आला त्यातले काहीजणांना पॅन्ट मध्ये लघवी झाली, चार दिवस आजारी पडले झोपून होते., मी आमच्या म्हाताऱ्या ड्रायव्हरला ज्यांचे वय 64 क्रॉस आहे त्यांना विचारलं नक्की हा काय प्रकार होता तेव्हा ते म्हणाले हि पिशाच योनी असते परमेश्वरानी जेवढे आयुष्य एखाद्या जीवालादिलेले असते त्याच्या आधी त्याचा मृत्यू झाला तर ते असेच फिरते आणि स्वतःला जगता नाही आले म्हणून बरेचदा घातपात घडवून आणते.

हा अनुभव माझा नाही परंतु नुकताच वाचनात आला याची नोंद घ्यावी ... लेखकाचे नाव विसरलो

बापरे 20 फूट उंच बाई...
मी असं ऐकलं आहे की मुंजा म्हणून जो प्रकार असतो ना तो खूप म्हणजे असाच 25 ते 30 फूट वगैरे उंच असतो.
पण तो पुरुष असतो.
ही मुंजी असेल

माझ्या दोन्ही आत्या आत्ता अनुक्रमे 66 आणि 49 वयाच्या....
त्या लहान असताना गावी राहत.
त्या काळी घरात टॉयलेट्स वगैरे नव्हते. आणि परसाकडे जायचं असेल तर घरामागे असलेल्या डोंगरावर जावं लागे.
त्या दोघी अश्याच एकदा 7 - साडेसात ला डोंगरावर गेलेल्या. तिथून परत येताना त्यांना विचित्र असा आवाज आला ओरडण्याचा. आणि लांबून एक माणूस येताना दिसला.
आता साडेसात म्हणजे तसा अंधार च . पण त्या दिवशी फुल मुन होता म्हणून यांना तो माणूस दिसू शकला.
But something was not right !
लहान आत्या म्हणाली ," ए माई तो बघ, उंच माणूस "
आत्या बोलली ," जरा गप्प बस, आपण या दगडा मागे लपून राहू. तो इथून जाईपर्यंत आणि दिसेनासा होई पर्यंत तू श्वास थांबवून ठेव."
दोघींनि तसं केलं. तो माणूस जसजसा जवळ येत गेला तसतसा तो अधिक उंच उंच म्हणजे माडाच्या झाडाईतका होत गेला. पण या दोघी जरा दूर असल्याने आणि श्वास रोखून धरून बसलेल्या असल्याने त्याला कदाचित हालचाल जाणवली नाही. तो त्याच्या रस्त्याने निघून गेला.
मग त्या दोघी घरी आल्या. तेव्हा आजोबांनी तो मुंजा असल्याचं सांगितलं.
खरं खोटं देव जाणे. आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचारून पहिली ही गोष्ट पण दोघी पण तेच सांगतात. न चुकता. काय माहीत दिसलं ही असेल त्यांना " तसलं " काही !

अजून एक किस्सा.
आमच्या गावातले एक गृहस्थ, जे 7 वर्षांपूर्वी 94 वर्षाचे होऊन वारले. त्यांच्या तरुणपणी चा हा किस्सा आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील.
ते आजोबा मुंबई ला जात होते. तिकडे त्यांना नोकरी मिळाली म्हणून. St आतासारखी आमच्या गावाच्या जवळ येत नसे. दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या बाजाराच्या गावी म्हणजे एक अंदाजे 3 ते 4 किमी लाम्ब चालत जावे लागे. त्या दिवशी त्यांना काही कारणाने एकट्याने निघावे लागले.
तर ते अगदी रात्री निघून चालत चाललेले. पहाटे ची st होती. तेव्हा st एक गेली तर परत st येत नसे.......
तर एक माणूस त्यांच्या मागोमाग येत होता. त्याने आजोबांशी बोलायला चालू केलं. त्या माणसाची भाषा जरा वेगळी वाटत होती. म्हणजे आपण बोलतो तशी नाही जरा वेगळी, न ऐकल्यासारखी पण मराठी च.
त्या माणसाने आजोबांकडे विडी मागितली. पण आजोबांना त्या माणसाचा संशय आला. आणि आजोबांनी ती दिली नाही. त्यांची एक विडी संपायच्या आत आजोबा दुसरी विडी पेटवत . पण त्यांनी विडी विझू दिली नाही.
चालता चालता ते दोघे बस स्टॅण्ड पर्यंत आले. तो माणूस अजून ही विडी दे , विडी दे बोलत होता. पण आजोबांनी ती दिली नाही। .
St आल्यावर आजोबा बसले st मध्ये. त्या माणसाने विचारलं ," st मधून तरी विडी टाक खाली"
पण आजोबांनी नाही ऐकलं.
St चालू झाल्यावर तो माणूस st सोबत धावू लागला. St मध्ये पेंगुळलेल्या कंडक्तर आणि ड्राइवर शिवाय कोणी नव्हतं.
धावता धावता अचानक तो माणूस थांबला ,बोलला, " पुढच्या येलेला ( वेळेला ) तुला कोन वाचविल रं??" आणि गायब झाला. आजोबा इतके घाबरले की त्यांना तिकडे गाडीतच ताप भरला. कसेबसे मुंबईत आले ते.
परत त्यांनी असं ऍडव्हेंचर केलं नाही .

माझ्याकडे खूप गोष्टी आहेत गावातल्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या. वेळ मिळेल तश्या टाकत जाईन...
बाकीच्यांकडून पण येउदे मस्त मस्त गोष्टी .

जाईजुई कोणास ठाऊक.... मे बी त्या भुताने मारलं असतं आजोबांना... पण भूत घाबरतं ना आगीला?? अर्थात हे ही ऐकीव आहे.... Lol

कालपरवा फेबू वर एक मीम आली होती
सगळ्या भागांमधे असा एकतरी म्हातारा असतो ज्याच्याकडे भुताने विडी किंवा तंबाखु मागितलेली असते. Lol

कालपरवा फेबू वर एक मीम आली होती
सगळ्या भागांमधे असा एकतरी म्हातारा असतो ज्याच्याकडे भुताने विडी किंवा तंबाखु मागितलेली असते. Lol>>>> आत्ता ! अगं सस्मित, म्हातारवयात माणुस आणखीन काय करणार गं? Proud आता बाई असती तर तिने खायला प्यायला किंवा कपडे मागीतले असते.

Pages