अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आजोबा लहान होते ना म्हणजे काहीतरी 10 वगैरे वर्षाचे.... तेव्हा रामदास बोट बुडालेली अरबी समुद्रात. त्यावेळेस ते मेंढ्या चरायला घेऊन गेलेले आणि त्यांना तो बोट बुडताना मोडली वगैरे त्याचा आवाज आला होता.....

एक दिवस परत आजोबा मेंढ्या चरायला घेऊन गेले होते दुपारी. तेव्हा त्यांना एक कोळी माणूस म्हणजे त्रिकोणी रुमाल बांधलेला दिसला उभा असलेला.... त्यांना थोडं ते नवल वाटलं कारण ज्या काश्याच्या खडका जवळ ती बोट बुडाली तिथून मांडवा बऱ्यापैकी जवळ होता. तो माणूस रडत उभा होता. आजोबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. थोडं पुढे गेल्यावर एक फॉरेनर मुलगी , जी गरोदर होती ती पण उभी दिसली. ती फक्त उभी होती रडत वगैरे नव्हती...

आजोबा तिच्याजवळून पास झाले तेव्हा त्यांना त्या फॉरेनर मुलीकडे पाहून काहीतरी आठवलं....इतक्यात त्यांना तिकडे आलेल्या कोणीतरी हाक मारली...आजोबा तिकडे गेले आणि त्या माणसाबरोबर घरी निघाले...मागे वळून पाहिलं तर ती मुलगी आणि तो कोळी माणूस दोघे ही नव्हते...

त्यांना त्या मुलीकडे पाहून जे काहीतरी आठवलं ते घरी आल्यावर पूर्ण आठवलं आणि ते असं होतं, रामदास बोट बुडाली तेव्हा त्यात मांडवा गव्हर्नर ची गरोदर मुलगी प्रवास करत होती. ती पट्टी ची पोहणारी होती त्यामुळे बोट बुडल्याची वार्ता अली तेव्हा गव्हर्नर निश्चिन्त होता की माझ्या मुलीला काही होणार नाही. प्रत्यक्षात त्या वेळी ती मुलगी खरंच नीट पोहत काश्याच्या खडकजवळ गेली पण तेव्हाच आलेल्या जोरदार लाटेने तिचं डोकं खडकावर आदळून तिचा मृत्यू ओढवला. आणि तिचं प्रेत ही नाही सापडलं.

माझ्या पणजोबा आणि त्या गव्हर्नर चं जवळीकीच नातं होतं म्हणून आजोबांनी बऱ्याचदा त्यांच्याकडे गेले असताना त्या मुलीला पाहिलं होतं.
तो दुसरा माणूस मात्र कोण होता ते कळलं नाही....
गव्हर्नर च्या मुलीचा किस्सा मी आधी दुसऱ्या धाग्यावर म्हणजे रामदास बोटीच्या धाग्यावर लिहिलेला.

गव्हर्नर च्या मुलीचा किस्सा मी आधी दुसऱ्या धाग्यावर म्हणजे रामदास बोटीच्या धाग्यावर लिहिलेला.
Submitted by अनिश्का. on 13 July, 2018 - 23:51>>>>

कृपया लिंक द्या ना!

कुणी वाचतच नाहीये. Lol>>>> अहो अस नका म्हणू, आम्ही नियमित वाचतो पण किस्से माहित नसल्याने इकडे काही लिहित नाही.

विक्षिप्त मुलगा ती लिंक कुठून शोधू मी???
रामदास बोटी बद्दल कोणी लिहिलेलं ते ही आठवत नाहीय खरं तर... खूप दिवस झाले... प्लिज कोणाला तो धागा सापडला तर द्या इकडे लिंक....

लहानपणी भूतांच्या किश्श्यांचे फड रंगायचे रात्र रात्र भर. त्यातलं काहीच कसं लक्षात नाही याचं नवल वाटतं. आजी सांगायची त्या गोष्टी पण लक्षात नाहीत. मुलांना सांगता आल्या असत्या Sad

आजोबांचा जो किस्सा दिलाय तो ऐकायला अर्धा तास किमान लागायचा. इथे मी खूप थोडक्यात लिहीला आहे.

माझ्या गावी माझ्या बाबांचं घर आहे. आई वडील नसल्याने काकांनी मोठं केलं त्यांना आणि काका गेल्यावर जावयाच्या सांगण्यावरून माझ्या बाबांना पद्धतशीर पणे लाथ मारून घराबाहेर काढण्यात आलं. म्हणजे काका गेल्याच्या 19 वर्षांनंतर. तोपर्यंत काकी तिच्या 3 मुलींची लग्न वगैरे माझ्या बाबांनी करून दिली. असो...
आमचं नवीन घर बांधले तेव्हा मी 12 वित होते. वास्तुशांत मोठी केली आम्ही. खूप लोक आले. खूप सारे कझिन वगैरे पण होते. आम्ही अंगणात च बाजलं टाकून आणि अगदी 12 - 15 जण त्या वर बसायचो भुतांच्या गोष्टी सांगायला ऐकायला. यात माझ्या भावाचे गावातले मित्र पण असायचे. 5 वि 6 वितले. गोष्टी ऐकून वगैरे झाल्या की त्या पोरांना घरी जायला भीती वाटायची. आम्ही त्यांच्या डबल फट्टू ! त्यामुळे त्यांना घरी बिरी सोडायचा प्रश्न च यायचा नाही.
मग त्या पोरांचे आई बाप येईपर्यंत वाट पाहत बसायचो.
माझ्या अंगणातून बाहेर यायला एक लहान पायवाट होती आणि बाजूला विहीर होती ती अंधारात जास्त भयानक दिसायची.
एकदा त्या बाजल्यावर इतकं पब्लिक बसलेलं की मला बसायला जागा उरली नव्हती म्हणून मी खाली त्यांच्या पायाशी बसले. बाजल्याच्या मागे बरोबर 5 पावलं मागे 2 नारळाची झाडं. पडवी मधली लाईट बंद आणि बाहेर लाईट नव्हतीच. आम्ही अंधारात बसलेलो. आणि माझी ताई जी वासरात लंगडी गाय शहाणी त्या प्रमाणे होती, ती आम्हाला गोष्टी सांगत होती.
इतक्यात मला नारळाचं झाड हालल्याचा भास झाला. म्हणून मी पटकन वर बघून बाजल्याला दोन्ही हातानी पकडलं. आणि सर्वांनी माझी ही कृती पहिली आणि ते लोक घाबरून ओरडायला लागले...... नंतर सर्व झाल्यावर ताई बोलली," ह्या, काय घाबरताय... मी आहे ना ! "
इतक्यात भावाच्या मित्राची आई अली आणि तिने बाहेरून आवाज दिला..... तसा राज निघाला.... आई बाहेर उभी होती म्हणजे त्याला ती लहान पायवाट, विहिरीच्या बाजूने जावं लागणार होतं. आमच्या पैकी त्याला सोडायला कुणी तयार नव्हतं.... माझी ताई बोलली ," ए चल, काय घाबरतोस... जा एकटा ! मला बघ मी घाबरते का???" तर तो शांतपणे बोलला " हो ! "
हे ऐकून आम्ही तमाम पब्लिक वेड्यासारखं हसायला लागलो.
इतक्यात राज च्या आई ने अधिक चिडून आवाज दिला. तोपर्यंत हसून वातावरण हलकं झालेलं.
राज उठला आणि अंगणातून , त्या पायवाटेवरून विहिरीच्या बाजूने जोरात धावत गेला आणि तो पूर्ण वेळ , " मs s s s s sम्मीssssssssssssssssssssss" असं ओरडत गेला.... आम्ही परत हसून हसून मॅड....

अनिष्का, बहुतेक या कथेवरच आधारीत आचार्य अत्रेंची समुद्राचं देणं नावाची गोष्ट आहे.रुबेन अ‍ॅरॉन चेरीकर असे त्यातल्या पात्राचे नाव आणि गेलेल्या मुलीचे नाव सॅरा आहे.

अनु हो का??? काय माहीत असेल। पण... मला मात्र खूप च वाईट वाटलेलं ऐकून.....
आमच्या गावातले एक गृहस्थ जे आमच्या गावातले एकटेच होते ते मात्र वाचून आलेले पण दुसऱ्या दिवशी पहाटे 4 किंवा 5 च्या सुमारास...
माझ्या आजोबांच्या मोठ्या भावाच पण तिकीट होतं त्यात पण ते चहा प्यायला गेले आणि बोट सुटली म्हणून ते आणि त्यांचे मित्र वाचले. ,त्यांच समान मात्र बोटीसोबत बुडाले. माझे ते आजोबा आज 89 वर्षाचे आहेत. 2019 ला 90 वर्षे पूर्ण करतील...

सुहास शिरवळकरांनी सांगितलेला किस्सा आहे. (नंतर बहुतेक पुस्तकरूपाने आला असे वाटतेय). त्यांना एका गावी भयकथा लेखक म्हणून बोलावलेले असते. त्या गावात भुताटकीचे किस्से प्रसिद्ध असतात वगैरे.. कुणी वाचलेय का ?

नाही वाचलं मी... वाचायला आवडेल... रत्नाकर मतकरींच्या कथांचा एक च पॅटर्न आहे पण जेव्हा मी सुरुवातीला वाचायला चालू केल्या ना, तेव्हा फाशी बखळ वाचलेलं आणि माझ्या मम्मी ने ही वाचलं ते बुक...
घरी ती बेडरूम मध्ये आणि मी हॉल मध्ये झोपायचो.... मला तर त्या पुस्तकातील वर्णन आठवत होतं आणि मम्मी अली बाहेर झोपायला," मला भीती वाटते , परत आणू नको हा असली पुस्तकं "

ते सुशि पुस्तक गढूळ आहे.
त्यात बहुधा लेखकाला नंतर त्याची सर्व पात्रं भेटत जातात.

अनिष्का, पुस्तकाचं नाव आठवत नाही. आणि सध्या ते मिळतही नाही.इथे कोणाकडे असेल तर नाव आठवेल.त्यात एक गुत्त्यात पोहचलेल्या नारदमुनींची कथा होती.एक ही समुद्राचे देणे.आणि अजून १-२ चांगल्या कथा होत्या.

रत्नाकर मतकरी यांचं पुस्तक आहे...यात कथासंग्रह आहेत.
फाशी बखळ
रंगांधळा
निजधाम
खेकडा
गहिरे पाणी
ही पुस्तकांची नावं आहेत. अजूनही आहेत खूप सारी पण आता इतकीच आठवतायत.
यात लहान लहान 10 ते 12 कथा आहेत प्रत्येक पुस्तकात. ,सर्व भयकथा !
इथे अशी दुसऱ्या लेखकांच्या पुस्तकातील गोष्ट सांगायला परवानगी आहे का नाही ते ठाऊक नाही मला. असेल तर लिहेन....

विक्षिप्त मुलगा ती लिंक कुठून शोधू मी???
रामदास बोटी बद्दल कोणी लिहिलेलं ते ही आठवत नाहीय खरं तर... खूप दिवस झाले... प्लिज कोणाला तो धागा सापडला तर द्या इकडे लिंक....>>>> https://www.maayboli.com/node/63117

<<< गव्हर्नर च्या मुलीचा किस्सा मी आधी दुसऱ्या धाग्यावर म्हणजे रामदास बोटीच्या धाग्यावर लिहिलेला.
Submitted by अनिश्का. on 13 July, 2018 - 23:51 >>>

आणि https://www.maayboli.com/node/63117 हा धागा तर कल्पतरू यांनी लिहिलाय. म्हणजे अनिश्का व कल्पतरू एकच व्यक्ती आहे का?

धागा नैजी, त्यातील प्रतिक्रिया अनिश्का यांची आहे.
क्षणभर मला वाटल अनिश्का ड्युआय है काय Proud

काही प्रश्न:
१. आधीचे सर्व अनुभव वाचून साधारणपणे असे दिसते की भुते फक्त इतरांना घाबरवतात पण स्वत: काहीच करत नाहीत/करु शकत नाहीत. मग ते स्वत:ला establish करण्याचे कष्ट का घेतात?
२. जर ते काही करु शकतात तर ते माणसांना का त्रास देतात?
I mean, if you have extraordinary powers then why would you even bother to mess up with humans? Why not to do something extraordinary?

आसा लॉल....

आणि हो 1940 की 50 च्या दशकात बुडलीय ना रामदास.... तेव्हा ती 3 माळ्यांची बोट होती असं म्हणतात...इतक्या मोठ्या बोटीचे अगडबंब बॉयलर ही फुटून लोकांच्या अंगावर पडलेले.... फार वाईट घटना....

१२वीच्या सुट्टीत माझ्या मावशीच्या सासरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या शेजारी घर होतं त्या घरातील आजोबा या अपघातातील वाचलेल्यांपैकी एक होते. तेव्हा ते लहान होते आणि आपल्या बाबांबरोबर घरी यायला निघाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी फक्त पाऊस पडत होता वादळ वगैरे न्हवतं. निघाल्यावर थोड्याच वेळात वादळी वारे वाहू लागले. काशाच्या खडकाजवळ बोट आली आणि चित्रच पलटलं. एका बाजूने लाटा बोटीवर आदळायला सुरवात झाली त्यांचा तडाखा एव्हडा होता कि बोटीतली माणसं जी घाबरलेली होती त्यांचा धीर सुटला आणि बायका मुलांची रडारड सुरु झाली. ज्या बाजूने लाटा बोटीवर आदळत होत्या त्याच्या विरुद्ध दिशेला सगळे जमा झाले आणि कलंडलेली बोट एका लाटेने पलटी झाली. आजोबांचे बाबा या अपघातातून वाचले नाहीत पण आजोबाना एका फळकुटाचा आधार मिळाला, त्या फळकुटाला पकडून ते किनाऱ्याला लागले.अनेक लहान मोठया माशांनी त्यांच्या हातापायाला चावे घेतले, त्याच्या खुणा पण त्यांनी दाखवल्या, नंतरचे बरेच दिवस त्यांची परिस्थिती वाईट होती, म्हणजे झोपल्यावर या अपघाताची स्वप्न पडायची, कधी रामदास बोट बुडालेली दिसायची तर कधी त्या वादळातून रामदास वाचली आणि बोटीवरचे सगळे जल्लोष करताना दिसायचे तर कधी फळकुटाचा आधार त्यांनी घेतलाय आणि बाजूला बाबाही आहेत असं स्वप्न पडायचं.

Aai ga....

हाहाहा.....कल्पतरू आणि माझं कोणतंही नातं नाही आणि मी त्यांना एक माबो आयडी या पलीकडे ओळखत ही नाही... योगायोग दुसरं काय... Happy

पुण्याला मित्राचे वर्कशॉप होते, तेंव्हाचा हा किस्सा. अमानविय नाही पण अमानुष नक्कीच आहे. खाली लेथ मशिन्स होती आणि वर पुर्ण टेरेस. दिवसभर कामे करुन आम्ही मित्र त्याच्या वर्कशॉपवर जमायचो. नाईटला फक्त दोनच मशिन सुरु असायच्या. फारसे काम नसायचे. त्यातला एक ऑपरेटर दिवसा रिक्षा चालवायचा आणि रात्री नाईटला लेथवर असायचा. त्यादिवशी बिचारा दमला असेल जास्त त्यामुळे टेरेसवर जाऊन झोपला. आमच्या काही वेळाने लक्षात आले की संतोष दिसत नाही. मग समजले की काम सोडून हा वर जावून झोपलाय. त्याची गम्मत करायची म्हणून आम्ही टेरेसवर गेलो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या खांद्यावर बसला. तोंडाला ऑईल चोळले. डोक्यावरुन-अंगाभोवती ब्लँकेट लपेटून घेतले. एका पाईपवर कॉटन गुंडाळून त्यावर ऑईल टाकून पेटवले. तो प्रकार एकून साडेआठ नवू फुट ऊंच आणि भयानक दिसत होता. त्याने जावून झोपलेल्या संतोषला जोरात लाथ घातली आणि ओरडला "ऊठ पहिला!" संत्या गडबडून ऊठला. समोर चमकदार चेहरा, हातात मशाल, झोपून पाहील्यामुळे दहा फुट तरी दिसले असेल त्याला. तो जोरात ओरडला आणि बेशूध्द पडला. आम्ही घाबरलो. रात्री दिड वाजता त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरांना खरं काय ते सांगीतलं. यातुन त्याला सारवरायला महीना लागला. सगळा खर्च, सेवा आम्हीच करत होतो. पण निट झाल्यावर संतोषने पुणे सोडले. परत तो आम्हाला आजवर भेटला नाहीए. आजही ही गोष्ट आम्हा सगळ्यांच्या मनाला खाते.

इयत्ता दहावी, क्लास सुरू होते. आषाढी एकादशीला ग्रामदैवत विठ्ठलाचा रथ असतो दर वर्षी.. क्लास असल्याने रथाला जाता येणार नव्हतं म्हणून मी सकाळपासून थोडासा नाराजच होतो. दुपारपासून ते रात्रीपर्यंत असायचा क्लास, घरून दप्तर घेऊन निघालो खरा, पण पावले रथाकडे वळली. मी पाठीवरच्या दप्तरासहित रथ ओढू लागलो. संध्याकाळी ५ ला रथ मुख्य चौकात पोचला. गर्दीत मला त्यावेळची माझी एक क्रश दिसली म्हणून माझं लक्ष थोडं रथापासून विचलित झालं, आणि काय सांगू महाराजा, खाssडकन कानाखाली आवाजच.. कानपाट गरम आणि लाल झालेलं, मेंदूला मुंग्या आल्या.. मला काही कळायच्या आत रथ पुढं सरकू लागला.. मग डोकं थोडं जागेवर आलं तसा पुन्हा जोर लावून रथ ओढू लागलो... थोड्या वेळाने गर्दीत लक्ष गेलं तर आमच्या आईसाहेब दुरून माझ्याकडं डोळे वटारून बघत मला बोलावत होत्या. माझ्या मनात वाईट विचार आले म्हणून कानाखाली बसली, पुन्हा क्लास बुडवण्याचं बिंग पण फुटलं. विठोबाला हात जोडून मी रथाचा दोर सोडला आणि वेगळाच रस्ता धरून घरी पोचलो. घरी आमचे आबासाहेब खूप थकून भागून बसलेले.. नंतर मला समजलं, रथाच्या गर्दीत माझ्यापर्यंत पोचताना त्यांच्या नाकी नऊ आले होते, त्यांनी माझ्या कानात एक शिलगावली खरी पण पुढची हाणण्याआधी रथ हलल्याने त्यांना मनस्ताप झाला होता. हा माझा अमानवीय अनुभव!

Pages