अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या सातार्यात सुद्धा अशी एक विहीर आहे. तिला पारशी विहीर म्हणतात. अजूनतरी किस्से ऐकायला मिळाले नाही. पण त्या विहीरीच्या परिसरात गेल्यावर उदास वाटते.

हीच विषण्णता हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या ग्रँड पराडीच्या रहिवाशांना आत्महत्येकडे घेऊन जाते का?
अरे हो, एक नमूद करायचं राहिलं. मलाबर टेकडीच्या दाट रानात शांत पहुडलेला हा टॉवर ऑफ सायलेन्स असा कुणाच्या नजरेत पडत नाही... फक्त एकाच जागेवरून तो दिसू शकतो.>>> पारसी बाया/बाप्यांचं सरासरी mortality rate खूप जास्तं आहे थोडक्यात कडक असतात आणि जास्त वर्षे जगतात त्यामुळे आयुष्याच्या शेवटी तब्येत बरी असली तरी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असू शकतात.
त्यांची मृत्यू, अंतिम संस्कार आणि आफ्टर लाईफ ची फिलॉसॉफी वेगळी आहे. अशी विहिर ज्या ज्या शहरात बर्‍यापैकी पारसी कॉलोनी आहेत तिथे असते. ह्या जागेला आणि पद्ध्तीला ऊगीचच डीमनाईझ करणे थांबवले पाहिजे.
ह्या अश्या क्षणिक मनोरंजनात्मक कारणासाठी का होईना... काही वदंता आणि पारसी अंतिमसंस्कार ह्यांची सांगड घालणे बरोबर नाही.

अरे व्वा... धाग्याचा तिसरा भाग आला ...मी खूप दिवस वाचत आहे ..खूप भारी अनुभव आहेत...पण बंद का पडलाय चार दिवस झाले..येवुदेत अनुभव

हाब, mortality rate म्हणजे मृत्यूचे प्रमाण ना? मग mortality rate खूप जास्त म्हणजे लोकं कमी जगणार ना...

मुंबईत अंधेरी पश्चिमेला जय प्रकाश मार्गावर G7 Mall आहे. (वर्सोवा मेट्रो स्थानकाच्या अगदी शेजारीच) पूर्वी तेथे 'बेस्ट' चे सात बंगला बस स्थानक होते. १३-१४ वर्षांपूर्वी तेथे mall बांधण्यात येऊन mall च्या मागील बाजूस तळमजल्यावर 'बेस्ट' चे बस स्थानक बनविण्यात आले आहे. या mall चे उद्घाटन होऊन नुकतीच १० वर्षे झाली आहेत. मात्र या पूर्ण १० वर्षात तो mall पूर्ण क्षमतेने कधीच सुरु असलेला पाहिला नाही. नावाला ३-४ शॉप्स सुरु होतात आणि अल्पावधीतच बंद पडतात. मागे एक Restaurant सुरु होणार म्हणून बोर्ड लागला परंतु ते काही सुरु झालेच नाही. Mango नावाच्या आंतरराष्ट्रीय कपड्याच्या brand चे शोरूम सुरु झाले होते, नंतर काही काळाने ते बंद पडले. सामान्यतः कोणतेही दुकान बंद करताना आतील माल घेऊन जातात परंतु या Mango शोरूम मधील कपडे आजही hanger वर धूळ खात पडलेले दिसतात. मी त्या mall पासून अगदी चालत ५-७ मिनिटांच्या अंतरावर राहत असलो तरीही गेल्या १० वर्षात एकदाही त्या mall मध्ये गेलो नाही. किंबहुना जावेसे वाटलेच नाही. तळमजल्यावर असणाऱ्या 'बेस्ट' बस स्थानकात मात्र वरचेवर जाणे होते. आता नुकतीच त्या mall मध्ये gym सुरु झाली आहे, आता ती किती काळ टिकते हे पाहायचे आहे. तो संपूर्ण mall अमानवीय शक्तीने भारीत असेल का?
https://goo.gl/maps/Fy8ofehQ4A62

पुण्यात अशीच एक बिल्डिन्ग आहे मयुर कॉलनीत. ऐन मोक्याच्या स्थ ळी असूनही काही चाल त नाही म्हणून मोकळी पडलेली.

आमच्या सातार्यात सुद्धा अशी एक विहीर आहे. तिला पारशी विहीर म्हणतात. अजूनतरी किस्से ऐकायला मिळाले नाही. पण त्या विहीरीच्या परिसरात गेल्यावर उदास वाटते.>> कुठल्या एरियात आहे?

साताऱ्यात कोयना वसाहत माहिती आहे का...तिच्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे. तिथे ती विहीर आहे. किंवा शिवराज पेट्रोल पंपा जवळ कोणत्याही स्थानिक लोकांना विचारले तर ते सांगतील.

म्हात्रे पुलाच्या शेवटी एक इमारत अपूर्ण अवस्थेत आहे. ती काही केल्या पूर्ण होत नाही. एका वास्तुशास्त्राच्या जाणकाराने सांगितले की ती कधीच पूर्ण होणार नाही.

>> म्हात्रे पुलाच्या शेवटी कोणतीही इमारत अपूर्ण नाही. वाटेल त्या थापा मारू नका.
मग येथे काय लिहायाचे ?

परवा एक बाई आली , आमच्या घरी. माझा नवरा जस्ट बेडरूम मध्ये जाऊन बसलेला आणि मी बाहेर टीव्ही बघत बसलेले. इतक्यात दरवाजा वाजला म्हणून उघडून बघते तर एक म्हातारी बाई. मी कोण हवंय म्हणून विचारलं तर म्हणे " तुमच्या आधी इकडे जे राहत होते ना कदम त्यांची मी आई."

मी त्यांना सांगितलं की इकडे आधी कोणी राहायचं नाही, तुम्हाला कुठल्या बिल्डिंग मध्ये जायचंय?? तर बोलली, " मला पाणी हवंय, मी 11 माळे चढून आले मला लिफ्ट ची भीती वाटते"
मी नवऱ्याला बाहेर ये म्हणून हाक मारली , तो बाहेर येत असताना मी फक्त मान वळवून पाहिलं आणि पुन्हा दारात बघितलं तर ती नव्हती.
मी नवऱ्याला आता काय घडलं ते सांगितलं तर म्हणे मला तुझा फक्त हाक मारला तो आवाज आला त्या आधी फक्त टीव्ही चा च आवाज येत होता.
मी पटकन धावत उतरले 4 ते 5 माळे पण कोणी नव्हतं.लिफ्ट सुद्धा 11 व्या माळ्यावर च होत्या दोन्ही पण.
इतकी म्हातारी बाई इतक्या कमी वेळात खाली पळून जाणे शक्य नाही.
आणि आमच्या आधी आमच्या घरात कोणी राहत नव्हते कारण बिल्डिंग बनल्यावर पहिले रहिवासी आम्ही च आहोत. आधी कोणी राहत नव्हतं....
ती समजा खाली न जाता वर गेली असेल तरी थोडा वेळ मला एकदम क्रिपी फिलिंग आलं

काल ही मज्जा झाली....,मी जिथे राहते ती सोसायटी एकदम डोंगराळ भागात आहे ठाण्यात. आणि माझं घर डोंगराच्या समोर आहे एकदम. खूप जोरात पाऊस असेल तर खूप जोरात हवा येते आणि सर्व दरवाजे धडधड अपटतात.
काल रात्री बिग बॉस बघताना अचानक मला कोणीतरी हसल्याचा आवाज यायला लागला. 3 ते 4 वेळ आणि थांबून थांबून येत होता आवाज......माझी अशी तंतरलेली सांगू.... चोर असतील तर असे हसतील कसे आणि मुळात चोरांना यायला जागा कुठून असणार??? मी नवऱ्याला फोन लावला , तो येत च होता घरी...मला बोलला बाथरूम चा दरवाजा बंद करा...
काल रात्री चुकून बाथरूम चा दरवाजा उघडा राहिलेला, त्यातून वारा येत होता आणि पाऊस पण खूप जोरात असल्याने तसा आवाज निर्माण होत होता आणि त्यामुळे कोणीतरी हसतंय असं वाटत होतं.... आणि ते हसू चेटकीण कशी हस्ते तसं होतं म्हणून मी थोडीशी घाबरले ... Lol

वरील चित्रातील इमारत म्हात्रे पुलावरून मंगेशकर हॉस्पिटलकडे जाण्यासाठी जी लेन आहे त्या लेनच्या सुरूवातीलाच आहे. या इमारतीच्या मागे भला मोठा कॉम्प्लेक्स उभा आहे. त्यातच रिलायन्स फ्रेश सारखे मॉल्स देखील आहेत. पण ही एक इमारत सुमारे वीस वर्षांपेक्षा अधिक काळ अपूर्णावस्थेत आहे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हां पाहिले तेव्हां भिंती देखील नव्हत्या. या अलिकडेच उभ्या राहीलेल्या दिसतात. त्यापूर्वी फक्त सांगाडा होता. मात्र ही इमारत पूर्ण अजूनही झालेली नाही.

कुणाला शंका असेल, खोटं वाटत असेल त्यांनी कृपया या इमारतीचा पूर्णावस्थेतला फोटो अपलोड करावा. हा आज घेतलेला फोटो आहे . जो मनुष्य एका आदरणिय व्यक्तिमत्वाचे नाव तोडून मोडून त्यांचा अपमान करून आयडी बनवतो त्याला महत्व देण्याची गरज नव्हती. पण अनेकांचा त्यावर विश्वास बसला हे धक्कादायक आहे.

अशा अपूर्ण असलेल्या बहुतांश इमारतीत मालकीची भांडणे , भाडेकरूंचे इश्यू असतात कधी बांधणार्‍याच्या कॅश फ्लो चे प्रश्न , कायद्याच्या अडचणी असतात म्हणून इमारती रखडतात. म्हात्रे ब्रिजच्या तिथल्या या इमारतीच्या बाबतीत तिथे असंख्य छोटे भाडेकरू आणि दोन दोन खोल्यांचे मालक रहात होते. त्याना पैसे देउन जागा ताब्यात घेण्याचे बिल्डरचे प्रश्न होते. ही संधी हेरून त्यात तिथल्या एका मोठे उपद्रव मूल्य असणार्‍या एका धटिंगण राजकीय संघटनेच्या नेत्याने ' लक्ष' घातले आहे आणि तोडपाणी पूर्ण होइपर्यन्त भाडेकरू /मालक आणि बिल्डर यांची तडजोड होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ती इमारत अपूर्ण आहे. खात्री करायची असेल तर त्या नेत्याच्या दाढीला हात लावून खात्री करा.
सिम्बायॉसिस हायस्कूल प्रभात रोड गल्ली न. १५ शेजारी मनोहर जोशी या बदमाष माणसाच्या जावयाने मोठ्ठी अनधिकृत इमारत बाण्धली आहे १५ वर्षापूर्वी . सुप्रीम कोर्टाने ती अनधिकृत जाहीर करून पाडण्याचे आदेश दिले आहेत पण ही भयाण खंडहर्नुमा इमारत पाडायची मनपाची हिम्मत होत नाही कारण तिथे मधुर आंबे खाणारी अर्धनारी भुते वावरत असतात.

हा धागा अमानवीय म्हणजे भुतांच्या अनुभवांचा किंवा गोष्टींचा आहे.... कोण काय सांगतंय आणि तुम्हाला पटत नसेल तर वाचा आणि सोडून द्या.... इतकं कोणाशी पर्सनल व्हायची गरज नाहीय इकडे.... ज्यांचे जे वाद असतील ते तुम्ही पर्सनल मेसेज करून बोललेत तर जास्त बरं होईल....
दक्षिणा प्लिज इकडे लक्ष देशील का???

पोलिटिक्स तर इकडे मुळीच अनु नका आणि कोणाची नावं घेऊन इकडे बढाया किंवा हुशाऱ्या मारू नका...पटलं तर घ्या नाहीतर चालू द्या तुमचं तेच तेच....

मी कुणालाही वैयक्तिक काही लिहीलेले नाही. प्रत्येक ठिकाणी ठराविक आयडी माझ्या प्रतिसादावर ट्रोलिंग करत आहेत. हा माझा दोष आहे का ??

मधुर मी तुम्हाला काही म्हणत नाहीय ज्याला म्हणतेय त्याला हे कळेल आणि ते समंजसपणे उपद्रव देणं बंद करतील अशी आशा आहे

Pages