अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग आम्ही वडापाव खाण्याआधी एक छोटासा तुकडा तोडून भुताच्या नावाने फेकत असू Lol >>
हा हा हा...भुतांना कोंबडं , बकरं वगैरे असे बळी लागतात ना..हा वडापाव कुठुन आला मद्धे Happy

पण वडापाव खावून भुताला कटिंग चहा हवा झाला तर काय करणार !
वडापाव टुकड़ा सोबत चहा पण ओतणार का रस्त्यात ?
______________
किस्सा छान मांडलाय Happy
फक्त ते नक्की कोण पळत होते बस सोबत ते नहीं कळले

शाळेत असताना माझी एक खास मैत्रीण होती माझ्या मैत्रिणीचा लहान भाऊ हा खूप मस्तीखोर होता आम्ही मैत्रिणी तिच्याकडे गेलो तर तो आमचे केस ओढायचा आम्हाला मारायचा आणि इतर खोड्या काढायचा अचानक तो आजारी पडला आणि त्याचे कमरेखालचे शरीर लुळ्यासारखे झाले, बोलणेही बंद झाले त्याचे. मत्रिणीचीं आई अक्षरशः खचली ती त्याची सेवा करायची. आमची मैत्री जसे मोठे होत गेलो तशी वाढत गेली. १२ वी नंतर सुट्टीत मी जॉब केला होता दोन महिन्यासाठी तेव्हा एकदा मी ऑफिसला जाण्याआधी म्हटले एकदा तिच्याकडे जावे आणि तिच्या भावाला पाहावे. तिच्याकडे गेले तर तिची आई त्याला मांडीवर घेऊन काहीतरी भरवायचा प्रयत्न करत होती मला पाहून म्हणाली, "अग बघ ना हा काहीच खायला मागत नाही आहे गेले दोन दिवस, आता बोल त्याला काही" मी सुद्धा तिचे ऐकून ती जे काही भरवत होती ते चमच्यात घेऊन त्याला भरवण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्याने थोडेफार तोंडसुद्धा उघडले. मला उशीर होत होता म्हणून मी संध्याकाळी भेटूया असे म्हणून तिथून निघाले. दुपारी लंचनंतर मी ऑफिस चे डोअर बंद करून माझ्या टेबलवर डोके ठवून बसले, बहुदा पेंग येत असावी. पण अचानक माझ्या स्वप्नात मैत्रिणीचा भाऊ दिसला आणि मी दचकून उठले. अगदी घाबरी-घुबरी झाले,AC चालू असून सुद्धा मला घाम फुटला होता. मी म्हटले चाल संध्याकाळी पुन्हा त्याला बघायला जाऊयात. आणि मी गेलेही आणि अक्षरशः मला हादरच बसला. माझ्या मत्रिणीचा भाऊ हा मी सकाळी त्याला भेटून गेल्यावर वारला होता. मला रडू फुटले. पण त्या दिवसानंतर मी त्यांच्याकडे जाणे टाकले.

तो नि रोप घ्याय ला आलेला अ से वा टते
अस कुणी आले की ग्लानी येते म्हणे.

वडापाव च्या कि श्याचा कि ती किस. लिहिणार्‍याना डिस्क रेज करु नका. Happy

खाण्यातुन बाधा होते त्यामुळे वडापाव आधी हातातून काढून फेकुन द्यायचा विचार आला असावा तिच्या मनात..
मस्त किस्से चाललेय.. येऊद्या..

नाय वो, किस्सा अमानवीय हे.. महाराजांचा माझा एकदाच संबंध आला आणि त्या अनुभवाच्या भोवती अमानवीय पणा होता

महाराजांचा माझा एकदाच संबंध आला आणि त्या अनुभवाच्या भोवती अमानवीय पणा होता ------------ हे फार लोडेड वाक्य आहे ! ( हलके घ्या )

हा किस्सा माझ्यासोबत घडला असून तो १०० टक्के खरा आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. तर झालं असं कि तीन एक वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत कोकण फिरायला त्याच्या गावी गेलो होतो. मुक्काम मित्राच्या घरीच होता. गोवा मुंबई महामार्गापासून त्याचं गाव पाच ते सहा किलोमीटर आतमध्ये आहे. पहिल्याच दिवशी पोहचायला संध्याकाळचे ६ वाजले. नंतरचे दोन तीन दिवस आजूबाजूची प्रसिद्ध ठिकाणं फिरून झाली. पुन्हा मुंबईला यायच्या आदल्या दिवशी त्यांच्या गावात देवाचा सण होता.मित्रांसोबत फेरफटका मारायला बाहेर पडलो. गाव लहान पण टुमदार होतं. चालता चालता गावापासून लांब एका मोकळ्या जागी आलो, समोर भली मोठी विस्तीर्ण जागा होती आणि वेगवेगळी फळांची झाडं त्या जागेत लावली होती. त्या जागेचा मालक पुण्यात राहतो आणि राखणीसाठी एक माणूस ठेवला होता. त्या माणसाने मित्राला हाक मारली मग मित्र आणि तो माणूस इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. यांच्या गप्पा होताहेत तोपर्यंत मी कंपाऊंडमध्ये शिरलो. थोडं पुढे गेलो तर मला घुंगरांचा आवाज आला. दचकून पाठीमागे पाहिलं तर कोणीच नाही, भास असेल असं समजून पुढे गेलो आणि अचानक कोणीतरी लहान दगड माझ्या पाठीत मारला. आता मला या जागेत काहीतरी अमानवीय असल्याची खात्री पटली मी मागे वळून बाहेर जायला निघालो तर दातखिळीच बसली मी ज्या कंपाउंड दरवाज्यातून आत आलो तिथे भली मोठी भिंत होती. पाठीमागे आंब्याच्या झाडावर सळसळ जाणवली म्हणून वर पाहिलं तर एक पिशाच उलटं टांगलेला होता, मी सैरावैरा पळू लागलो, तसा तो पिशाच बोलला किती पलशील पलुन पलुन तू आता माझ्या हद्दीत हायस.इतक्यात मला मित्र आणि गावकरी दिसले, सगळे गावकरी मुंबईहून मस्त नैवद्य आणलास म्हणून मित्राची पाठ थोपटत होते.

बर्र मग गावाचं नाव काय ?

नवीन Submitted by कल्पेशकुमार on 28 July, 2018 - 18:53>>>> Rofl

कलपेशकुमार तुमचा प्रश्न खूपच विनोदी आहे

<<<सगळे गावकरी मुंबईहून मस्त नैवद्य आणलास म्हणून मित्राची पाठ थोपटत होते.>>>
बोकलत, जितके मला कळले तुम्हीच त्यांचा नैवद्य होता, मग इथे काय तुमचे भूत लिहितेय का???

जर असे नसेल तर कृपया जरा विस्कटून सांगा.

@ बोकलत. कोकणातली भुतं पण मालवणी बोलणार मग हे तुम्हाला भेटलेले भूत वेगळ्या भाषेत का बोलले??
आणि गावाचं नाव पण सांगा जरा.

मी कधी ह्या धाग्यावर लिहीन माझा अनुभव अस मला स्वप्नात ही वाटलं नव्हतं. पण हा माझा अनुभव अगदी खरा आहे.

माझी बऱ्यापैकी मोठी पर्स मी रोज माझ्या जवळ घेऊन झोपते. त्यादिवशी ही झोपताना " चला आता पर्स घेऊ या आणि झोपू या " अस म्हणून मी पर्स घ्यायला नेहमीच्या जागी हात घातला पण पर्स तिथे नव्हती. मी खूप शोधलं पण मिळाली नाही . पैशाच पाकीट नव्हतं पर्स मध्ये पण क्रेडिट कार्ड होत म्हणून पर्स निकराने शोधत राहिले पण मिळालीच नाही. यजमानाना ही उठवून पर्स बघितली आहे का ते विचारलं ..ते नाही म्हणाले. मी परत शोधाशोध केली घरात पण व्यर्थ. नाहीच मिळाली. मी हताश, निराश होऊन आडवी झाले गादीवर. झोप येत नव्हती पर्स च्या विचाराने पण तेवढ्यात माझ्या पाठीवर कोणीतरी अक्षरशः पर्स फेकली असं मला जाणवलं. मी हात लावून खात्री करून घेतली ती माझीच पर्स होती. मी उठून दिवा लावला , यजमानांना जाग करून विचारलं की तुम्ही टाकलीत का पर्स तर ते नाही म्हटले. तेव्हा भीती वैगेरे काही अजिबात वाटली नाही मला. पण खूप वेळाने कधीतरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही आमचा तोच विषय होता आणि यजमान ठाम होते त्यानी टाकली नाही माझ्याकडे ह्यावर.

त्यामुळे ती पर्स कशी आली माझ्या गादीवर, कोणी टाकली, एवढी मोठी पर्स मी शोधाशोध करून ही मला कशी मिळाली नाही झोपायच्या आधी ही सगळी अजून ही न सुटलेली कोडी आहेत माझ्यासाठी.

ममो..
झोपण्यापूर्वी असे धागे वाचले अन खुटक्कन झालं तरी धस्स होते माझ्या काळजात.. एक अख्खी पर्स अंगावर/बेडवर अचानक पडली तरी तू शांत झोपून गेली म्हणजे काय..

अनिश्का ++
कार्ड्स बदलून घ्या.

गानूआज्जीला इसरत जाऊ नका रे!
मधनंअधनं चिखलभाताचा नैवेद्य दाखव्त जा हं तिला नायतर गानू वाड्या सारखा हा धागाही सुस्त पडून राहील.

अनिष्का, मला पर्स उशाशी लागते झोपताना , तस खास कारण अस नाही पण लागते.

एकच छोटसं debit कार्ड होत त्यात आणि ते व्यवस्थित होतं .
दार खिडक्या सगळ्या बंद होत्या खोलीच्या. त्यामुळे पर्स बाहेरून कोणी फेकण्याची शक्यता नाहो.

घरात यजमानांशिवाय दुसरं माणूस नाहो आणि ते तर म्हणतायत मी तुझी पर्स टाकलीच काय बघितली पण नाही. मला पर्स पडली अंगावर तेव्हा जरा ही भीती बिती वाटली नाही फक्त झोप उशिरा लागली. त्यामुळे कोडं च आहे सगळं.

Pages