तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

कसलं विमान उडतंय त्यात, एक ग्लास पिलो कसातरी. चव मुळीच आवडली नाही (किंगफिशर strong). दर्दी माणसाने भावाच्या माघारी व्यवस्थित समजावलं, "पाटील, पेग मध्ये घेतात ती व्हिस्की, बिअर मध्ये काहीही टाकत नाहीत"
बरं झालं त्यांनी समजावलं, नाहीतर मी मस्त पाणी वगैरे घालून पेग बनवायच्या विचारात होतो!

सिंह पर्णी चूर्ण (पाण्यात उगाळून), भूईआवळा, कार्ल्याचा रस, एरंडेल तेल, त्रिफळाचूर्ण यांचे मिश्रण दारूच्या बाटलीत टाका. ती ढवळा. एकजीव झाल्यावर मग कितीही प्या. लिव्हर खराब होणार नाही.
https://www.youtube.com/watch?v=QTXiWT7jGjI

जेलो शॉटस हे वरिष्ठांनी नाही तर बिगारीतील(दारूच्या) लोकांनी करायचे प्रकार आहेत. Proud
रेसिपी टाकते आणि इथे रिक्षा देते.

आमची अंगकाठी लहानपणापासूनच काठी या प्रकारातली. लहानपणी बरेच जणांनी जरा मांस मच्छी खा, तब्येत बनव वगैरे सल्ले दिले. ते काही अमलात आणले नाहीत. कॉलेजात गेल्यावर जीम, अंडी, पनीर वगैरे सरळ सोप्या उपायांचा काही परिणाम न दिसल्याने मग कायदेशीर १८+ झाल्यावर तब्येत सुधारण्यासाठी आता बीयर तरी प्यावी असे सल्ले मिळू लागले. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची अशी ४-५ वेळा बीयर प्यालो. ब्रँड-फॉस्टर्सची छोटी बाटली ! तो सोनेरी रंग आणि ग्लासाबाहेर येऊ पाहणारा फेस जितका भुरळ पाडणारा होता, तितकीच त्याची चव कडू आणि अजिबातच न आवडणारी अशी वाटली.. बस्स त्यापुढे आज पर्यंत परत काही ट्राय केले नाही. मित्रांबरोबर 'बसून' त्यांच्यातला चखणा संपवणे त्याबद्द्ल शिव्या खाणे, बाहेरुन सिगरेट घेऊन ये रे अशी ऑर्डर झाली की न चुकता, चुकीचीच सिग्रेट घेऊन येणे आणि गरज पडल्यास एखाद्याला व्यवस्थित पणे त्याच्याच घरी सोडून येणे हे उद्योग मात्र चालू आहेत.
हा आणि तो कॉकटेल चा धागा वाचून 'हाय कंबख्त तुने पी ही नहीं' असं आता वाटायला लागलंय राव Wink

इथली वर्णने वाचून दारू चाखून पाहावी असे वाटू लागले आहे Wink
तर केजीत असण्याऱ्या लोकांनि काय करावे याचे मार्गदर्शन करावे.

दारूचा अप्रत्यक्ष अनुभव बेनेडीरील कफसीरपचा आहे फक्त . गोड लागल्याने चुकून जास्त प्यायले गेले आणि दोन तास डोकं जड होऊन बसलेले Sad

नवख्या लोकांनी (म्हणजे ज्यांना एकदा तरी प्यायचीच आहे पण कशी पिऊ हे कळत नाहीये असे) मॉक्टेल पासून सुरवात करावी.
कोणीही कितीही संगतीले तरी बिअर, व्हिस्की किंवा डायरेक्त स्कॉच च्या मोहात पडू नये.

पशुपत जबरी अनुभव, सगळा माहोल डोळ्यासमोर उभा राहिला, तो पाऊस आणि कुंद वातावरण
वाह जिओ

आरारा - मस्त डिटेलवार माहिती

इथली वर्णने वाचून चाखण्याची इच्छा होत असलेल्यांसाठी:
१. इथली वर्णने अनुभवातून आली असावीत, माझे स्वतःचे तरी मी हेच सांगेन, की आधी खूप चुकीच्या पद्धतींनी पिऊन मग पिण्याची खरी मजा काय असते ते कळले आहे.
२. पहिल्यांदा घेताना थोडी जास्तच घेतल्या जाते बऱ्याच लोकांकडून, कारण चढत नाही. पण चढण्यासाठी म्हणून दारू घेणार असाल तर नका घेऊ. एक पेग अर्धा तास अश्याच हिशोबाने घ्याल तर खरी मजा आहे.
३. पितांना आणि पिल्यावर माणूस शिवीगाळ करतो, वाकडा चालतो वगैरे अंधश्रद्धा आहेत. बऱ्याच लोकांना फक्त placebu इफेक्ट असतो. प्रमाणाबाहेर घेतल्याशिवाय असले प्रकार होऊच शकत नाहीत. लोक म्हणतात दारू पिल्यावर माणूस विचित्र वागतो म्हणून गरज नसताना इमानेइतबारे विचित्र वागून दारूवर दोष ढकलू नये!
४. वारुणी घेताना चांगल्या ब्रॅंडचीच घ्या, आणि पिताना पैज लावून पिऊ नका! पिणे हा खूप आनंददायी प्रकार आहे, पिताना फक्त आणि फक्त पिण्यासाठीच पिल्या जाते, आनंद किंवा दु:ख साजरे करण्यासाठी पितो म्हणणाऱ्यांना फक्त निमित्त हवे असते. आनंदात पिलो तर चालेल एकवेळ पण हाय वो मुझे छोड गयी म्हणत पिणाऱ्यांजवळ फिरकू देखील नये. (अनलेस यु आर समदुःखी)!

चिअर्स!

सिम्बा & नी
चिल्ड आणायला लावली अन मग फ्लॅट करून केसाला लावली असे होत नाही.
त्याची आचमने होतातच.

लांब केसांचे चोचले पुरवणं, स्वतःला पॅम्पर करणं याची नशा दारूच्या पेक्षा जास्त असते हो. अर्धा ग्लास कमी प्यायला मिळाली तरी चालेल पण केसांना बियर मिळालीच पाहिजे असं होतं आमचं. Happy

ओ,
दारू पिण्याबद्दल धागा आहे.
दारूत आंघोळ करण्याबद्दल नाही! Rofl
21.gif21.gif21.gif

पहिला अनुभव
बीयर - आमच्या घरी तसे फ्री वातावरण असल्याने वडील आणि त्यांचे मित्र घेत असल्याचे पाहिले होते त्यामुळे जेव्हा माझी घ्यायची वेळ येईल तेव्हा वडिलांसोबत घेऊ किंवा तेच विचारतील असे वाटलेलं पण तसे काही झालेच नाही आणि कॉलेज मध्ये असूनही कोरडाच होतो. शेवटी एक मित्राला ही व्यथा सांगितल्यावर त्याने व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
त्यापप्रमाणे सुमुहूर्त काढण्यात आला तो भर दुपारी आणि बार मध्ये कोणी पहिले तर काय म्हणून आमच्या मागची टेकडी ही जागा ठरली.
तोवर अजून एक नवशिका येऊन मिळाला आणि दोघांनी कॉन्ट्री काढून जाणकार मित्राला दिले त्याप्रमाणे तो एक बॅगेत एक बाटली, दोन प्लास्टिक ग्लास आणि शेव चिवडा असला जिन्नस घेऊन आला.
त्याचा गुरुवार का शनिवार काहीतरी होता त्यामुळे तो घेणार नाही असे जाहीर केले, म्हणलं ठीक आहे संपवू दोघात इतके काय.
पण एक तर टळटळीत उन्हात, ती कधी तरी घेऊन ठेवलेली बीयर उबदार झाली आणि किंगफिशर होती बहुदा आणि ती तसली फेसाळती ग्लासात ओतली. बघून एकदम छान वगैरे वाटले आणि चिअर्स करून ओठाला लावल्यावर फसवणूक झल्याचे फिलींग आले.
ज्या साठी इतका अट्टाहास केला तो प्रकार इतका भिकार कडवट लागतो हे कोणी सांगितलंच नव्हतं.

बाटली संपवण्याचे सोडा भरलेला ग्लास देखील संपेल असे वाटेना, हे असलं पिण्यासाठी लोक पैसे खरच खर्च करतात?

होय नाही करत एक दोन घोट अजून घेतले पण प्रत्येक घोटाबरोबर ईच्छा मावळत चालली आणि उरलेली बाटली ओतून देत परत असले स्टंट करणार नाही असा निश्चय करून परत आलो.
दुसरा नवशिका त्या मानाने अजून पॉझिटिव्ह होता, त्याने चांगल्या क्वालिटीची नसेल आणली म्हणून भिकार लागली, आपण अजून चांगली कुठली असते ते शोधू आणि पिऊ.
पण माझा बीयर वरचा विश्वास उडाला तो उडालाच आणि कित्येक वर्षांनी नंतर जेव्हा पहिल्यांदा कर्ल्सबर्ग, हनिकेन, ट्युबोर्ग सारखे ब्रँड मुखी पडले तेव्हा खऱ्या अर्थाने बीयर ची मजा आली.
जर्मन drougt बीयर पण अप्रतिम.
कोरेगाव पार्कल एक इव्हेंटला त्यांनी लाकडी पिंपात लाकडी मग मध्येच सर्व्ह केलेली तो पिणे हा सर्वोत्तम अनुभव.

Pages