धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अश्विनीमामी on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराट आर्ची/परशाबरोबरच लहान रोल मध्ये असणाऱ्या सगळ्यांचा होता. मित्राची मैत्रीण त्याच्याकडे वळून बघतेय याने स्वतःच लाजणारा लंगड्या, पाटलाच्या लेकीबरोबर काय बोलावं हे न कळल्याने बावरून गेलेली आई, भावाचं गुपित माहीत असल्याने गालातल्या गालात हसणारी बहीण, आर्चीची मैत्रीण, तिचे बाबा, त्याचे बाबा आणि इतरही सगळ्यांचाच. इथे हिरोचे मित्र म्हणजे अगदीच काहीतरी दाखवलेत.
वर काहीजणांनी शाहिद कपूरच्या भावाची तारीफ केली असली तरी परशाच्या पायाच्या नखाची सर नाही त्याला.

कुठून झक मारली आणि हा धडक चा ट्रेलर पहिला असं झालंय. उतारा म्हणून सैराटची सगळी गाणी पहिली पुन्हा.

जानव्ही नव्हे जान्हवी. गंगा नदी पृथ्वीवर आली तेव्हा तिने जन्हु ऋषींचा आश्रम वाहून टाकला. चिडून जन्हुंनी तिला पिऊन टाकले. मग भागीरथाने प्रार्थना केली म्हणून तिला जन्हुंनी कानातून सोडले. जन्हुंची ती कन्या झाली म्हणून जान्हवी.
बाकी ट्रेलर जाऊ द्या, झालं गेलं गंगेला मिळालं Wink

जानव्ही नव्हे जान्हवी. गंगा नदी पृथ्वीवर आली तेव्हा तिने जन्हु ऋषींचा आश्रम वाहून टाकला. चिडून जन्हुंनी तिला पिऊन टाकले. मग भागीरथाने प्रार्थना केली म्हणून तिला जन्हुंनी कानातून सोडले. जन्हुंची ती कन्या झाली म्हणून जान्हवी.>>>>>

अहो ते तुमच्या आमच्यासाठी... कपूरांची जानव्ही आहे, त्यांच्यात तसाच उच्चार करतात. जसं ऋषी चे रिशी, हृतिकचे रितीक तसेच हे... Happy Happy

सैराटच्या अदभुत यशाला कॅश करण्याचा करणचा धन्दवाइक प्रयत्न आहे हा त्याची सैराट शी तुलनाच करता येत नाही.. सैराट टु धडक इतक पॉलिश्ड व्हर्जन झालय की चकचकाटात मुळ आत्माच हरवलाय मुव्हिचा...जान्हवी काहिच छाप सोडत नाही अगदीच ढ वाटतेय अ‍ॅक्तिन्ग मधे, इशान इज मच बेटर दॅन हर

तिच्या आई वडिलांनी जे काय नाव ठेवलं असेल तेच खरं स्पेलिंग. झान्वी तर झान्वी... उगाच मराठी माणसांचा जान्हवी तोयं वरुन वाद!
बाकी ट्रेलर बकवास! काल सैराटची गाणी बघितली, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकली... भुक्क्ड ट्रेलर आलं म्हणून हे परत बघायची संधी मिळाली Proud

तिच्या आई वडिलांनी जे काय नाव ठेवलं असेल तेच खरं स्पेलिंग. >> आईवडिलांनी काय ठेवलं ते माहिती नाही. सिनेमात व्यवस्थित Janhvi जान्हवी असे आहे. पण कपूरांसारखे उच्चार करायची हौस असेल तर त्याला मोल नाही Happy राडा ऑन दि डान्स फ्लोअर पचवलं तिथे जानव्ही भी झेल लेंगे.

माणसांचा जान्हवी तोयं वरुन वाद!> अरे जान्हवी माहीत आहे मला जान्हवी पुण्य तोयः चा रेफरन्स शोधत होते. पण जालावर सापडेना. ( पासाडेना शहरातले लोक रस्ता चुकले की पासाडे ना पासाडेना पत्ता सापडेना म्हणत असतील का?) ते जानव्ही हे लेख टायपायच्या गडबडीत झाले आहे.

शरीरे जर्जरीभूते व्यIधिग्रस्ते कलेवरे
औषधं जाह्नवीतोयं वैद्यो नारायणो हरिः

ह ला न जाह्नवी

Janhavi la othana dilelya injection mule nit bolta aani oth halvata yet nahiyet!

नुसत्या ट्रेलरवरून इतकी हवा झाली? मला सैराट काही इथे अनेकांना आवडला तसा भयानक नव्हता आवडला. म्हणजे चांगलाय की सिनेमा एकदा पाहायला अशा टाइप.
असो..एंजॉय!

अजून पाहिला नाही हा ट्रेलर, असा सिनेमा येऊ घातलाय हे देखील आताच समजले..
किंबहुना श्रीदेवीला मुलगी आहे हे सुद्धा आताच कळले Happy

येनीवेज, करण जोहरने दिग्दर्शन केले आहे का?

तसे असेल तर त्याला कसा झेपणार.. तो एक सामान्य दिग्दर्शक आहे.. आयुष्यात त्याने जे काही ईज्जत शौहरत मान मरातब कमावले आहे ते निव्वळ आणि निव्वळ किंग ऑफ रोमान्स शाहरूखच्या कुबड्या वापरून. शाहरूखचे वय झाले, त्याचे रोमान्सपट थांबले, तसे करण जोहर दिग्दर्शक म्हणून आटोपला.
हे झाले करण जोहर बद्दल.. बाकी ट्रेलर बघणे नशीबात असेल तर नंतर त्यावर बोलू. सध्या मोबाईलमधील यूट्यूब गंडलेय.

बाकी श्रीदेवीची मुलगी पदार्पण करतेय पण ती नाहीये, ते सुद्धा नुकतीच गेलीय. पोरीसाठी वाईट वाटतेय. चित्रपटाला शुभेच्छा !

>> ह ला न जाह्नवी

अरेच्या म्हणजे "जानव्ही नव्हे जान्हवी" या प्रतिसादात चुकीची दुरुस्ती करून सांगितलेला उच्चार पण चुकीचाच होता तर...

अजून पाहिला नाही हा ट्रेलर, असा सिनेमा येऊ घातलाय हे देखील आताच समजले..
किंबहुना श्रीदेवीला मुलगी आहे हे सुद्धा आताच कळले >>>

आता आपल्या दोन तीन ड्यु आय आहेत हे मान्य केल्यावर प्रत्येक आयडी वेगळी आहे हे इथे सतत ठसवत राहायचा ताण नाहीसा झाला असणार. त्यामुळे जरा मायबोलीबाहेर जगात बघत जा.

श्रीदेवी गेल्यावर तिला मुलगी आहे व तिचा चित्रपट येतोय हे भारतात नुकत्याच जन्मलेल्या मुलालाही कळेल इतका प्रचार झालेला आहे. त्या जोरावर चित्रपट सुरवातीला 400- 500 करोडचा धंदा करेल... नंतर आपटला तरी कुणाचे नुकसान होणार नाही. भारतीय खूप श्रीमंत आहेत. दर महिन्यात कुणा न कुणाला 100 करोडच्या पुढे दान करतातच...

श्रीदेवी साठी का होईना तिच्या मुलीचा चित्रपट कदाचित थिए टर मधे बघितला असता पण सैराटची वाट लाउन चित्रपट बनवल्यामुळे मुळीच बघणार नाहीए.
ऑनलाईन कधी वाटल तर बघेन पण सध्या बिग नो..

अहो ह्या आयडीला नाही माहीत दुसऱ्या आयडीला असेल माहिती. >>>> हा ओरिजिनल आहे.
दुसरा आयडी गंभीर आजारी आहे. एक ड्युसकी म्हणून तरी त्याला बघायला जायला पाहीजे.

आज टाइम्स मध्ये इंग्रजीत जे ए ए एन व्ही आय असे स्पेलिंग आले आहे. सर्वानुमते आपण तिला लाडाने जानु म्हणूयात ना. विषय संपला. ह्नवी का नव्ही हू केअर्स. स्क्रिप्ट का कबाडा किया उसके बारेमे बोलो ना.

Pages