धडक ट्रेलरः काय खटकले काय आवडले?

Submitted by अश्विनीमामी on 12 June, 2018 - 03:27

नेमाड्यांच्या एका पुस्तकात एक सारंग नावाचे पात्र आहे. अतिशय चळवळे , उत्साही, सर्जन शील, आग्रही असे नवतरूण व्यक्तिमत्व. ह्याच्याकडे एक जबरदस्त कादंबरीची रूप रेषा तयार असते व अर्धा कच्चा खर्डा लिहूनही तयार असतो. एक पुणेरी प्रकाशक त्याच्या कथेतील वेगळेपण हेरतात व त्याला लिखाण पक्के करायला आपल्या घरीच घेउन जातात. तिथे त्याची संपूर्ण बड दास्त राखतात, लिहायला एकांत व सर्व सुखसोई पुरवतात. लागेल तितका वेळ घे असे सुचवतात. पुस्तक विक्रीची हमी घेतात. त्याला कसलेसे बक्षिसही मिळू शकेल हे सुचवतात. जसा काळ जातो तस तसे बंडखोर लेखक त्या सुखासीन व आश्वस्त जीवनास इतका सरावतो की आपले बंडखोर पणच हरवून बसतो.

काल धडकचे ट्रेलर पाहिले व त्या सारंगची आठवण झाली. आता कोण धडक काय धडक विचारू नका?! सैराट सिनेमाचे हक्क करण जोहरने घेउन त्याचा हिंदी सिनेमा बनवला आहे त्यात श्रीदेवीची सुपुत्री रुपेरी दुनियेत पदार्पण करत आहे वगैरे माहीती तुम्हाला असेलच. का चंद्रावर मंगळावर राहताय?! गेले सहा महिने वर्ष भर जानव्ही कपूरला सोनम कपूरच्या खालोखाल मीडिआ कव्हरेज मिळाले आहे व तिचा हा पहिला चित्रपट जुलै २० ला रिलीज होतो आहे. इतपर्यंत ठीक आहे. पण ट्रेलर बघितल्यावर " घात... घात .... म्हणून छातीत आलेली कळ दाबून खाली बसावे से वाटले. ( संदर्भ एका रविवारची कहाणी मधील गोवेकर... पापलेटाची पिशवी कडवेकरणीला दिली गेली हे कळल्यावर ओरड तात तो स्वर.)

सैराट आयकॉनीक चित्रपट. आर्ची परश्या बद्दल भर भरून लिहीले गेले आहे. बुवाच्या बाफ वर पन्नास पोस्टी माझ्याच आहेत. द्विरुक्तीची गरज नाहीच्च. कथेचे बॉलिवूडी करण करताना त्यातले मूळ मराठी साधेपण गावंढळ प ण, सच्चे पणा, संवादांची गंमत हरवून गेली आहे । हे लगेच लक्षात येते. कथानक राजस्थानात शिफ्ट झाले आहे. बहुतेक ओबेराय राजविलास मध्ये. ही मोठी हवेली नक्कीच हिरोइनचे घर असावे किंवा कॉलेज तत्सम. थारे म्हारे करत हे मुंबईचे जुहुकुलोत्पन्न बालक खेडवळ असल्याचा आव आणते पण आर्चीचा स्वॅग हिच्यात मुळातच नाहीए. ( मै. हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है) तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. डोळ्यात खो डकर पणा व मिस्किली नाही. कदाचित ट्रेलर असल्याने दिसले नसेल.

इशान खटटर म्हणजे मुंबईत कार्पेंट रचे असिस्टंट म्हणून जी पोरे लिफ्ट मधून हत्यारे कडीपाट घेउन जाताना दिसतात तसे व्यक्तिमत्व आहे. अतिसामान्य त्याच्यात परश्याचा आत्म विश्वास व अनाघ्रात काटक सौंदर्य नाही.
केसांचा कोंबडा नामक हेअ स्टाइल केली आहे. आजकाल त्याच्या वयाची मुले बोल कट करतात. ते बरोबरचे लंगड्या आणि अजून एक मित्र ते ही कॉमनच आहेत. ओरि जिनल सैराट मधले एकेक पात्र घेउन त्याला स्टिरिओटाईप मध्ये बसवून टा कले असे फील आले. वडिलांची व भावाची भूमिका कोण करेल बरे? कदाचित अमिताभबच्च ण देखील असेल. म्हणजे परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा" ह्याची सोय झालीच समजा.

करण जोहरला दोन तृतियांश चित्रपट नीट बनवता येतो. रोमान्स, हसीं मजाक गाणी, हे त्याला परफेक्ट येते विथिन हिज ओन लिमिटेशन्स व ह्यूज बजेट हेल्पिंग. पण जसेच कथेत क्रायसिस येतो त्याचे दिग्दर्शन गळपटते इथे हार्ट अ‍ॅटिक यायला अमित अंकल नाही की कॅन्सर ने मरायला शारुक्क नाही. अओ आता काय करायचं?! चित्रप टाचा
झिंगाट परेन्त चा भाग त्याला कदाचित जमेलही. व्हिजुअलस तर लार्ज स्वीपींग क्लीन पिक्चर परफेक्ट दिसताहेत.
इशक जादे ची आठवण जालावर बर्‍याच जणांनी काढली आहे. तसे पाहिले तर क्लास डिफरन्स व घरातून पळून जा णे हे विषय पार बॉबीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले आहेत. सैराट मधील मध्यवर्ती
कॉन्फ्लिक्ट जे जातीव्यवस्थेतून आले आहे ते इथे कसे हाताळले आहे ते बघायला आव्डेल व शेवट सुद्धा काय केला असेल ते बघायची उत्सुकता आहे. फार गरीबीत देखील जानव्ही करवा चौथ व्रत करते, भाउ राखी बांधायला येतो व मनो मीलन होते असे काही असेल का? " झल्ली अंजली" एपिसोड इथे जेंडर रिव्हर्स करून होइल का? चित्रपट रिलीज झाल्या वर कळेल.

सर्वात दर्दनाक म्हणजे झिंगाट गाण्याचे केलेले असेंब्ली लाइन कडबोळे/ जलेबी. गाणे सपशेल फसले आहे.
कारण ते सैराट मध्ये कसे गावाच्या मातीतून येते तसे इथे आलेले नाही फराखानची कोरिओ ग्राफी केलेले लग्नी गाणे असते तसलेच आहे. स्टेप्स कॉपी केल्या तरीही मूळचा अर्दी फ्लेवर व लिरिक्स मधील मराठी ठसका लुप्त होउन " साजन जी घर आये" टाइप गाणे झाले आहे. याड लागले ला हात लावायच्या फंदात बहुदा दिग्दर्शक पडला नसावा काही दिवसांत अजू न गाणी प्रदर्शित होतील तेव्हा समजेल. अनेक स्वप्ने कमर्शिअल कंपल्शनच्या भिंतीवर
आपटून फुटतात तसे न होवो.

जानव्ही कपूरला श्रीदेवीची मुलगी म्हणून सहानुभूती आहे पण झुकते माप देणार नाही. मी प्रतीक बब्बर पासून धडा घेतला आहे. ते रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर बघून खिन्नता आली , कुठे गेली माझी सोलापुरी दाण्याची चटणी, करमाळ्याचा सूर्यास्त, कॅरम बोर्डचा झोपाळा, क्रिकेटची मॅच कमेंट्री, हैद्राबाद मध्ये स्ट्रगल.... अन असे
हजारो क्षण.... इससे अच्छा ख्रिस्तोफर नोलन को राइट्स दे देते. ओरिजिनल रील गायब कर देते. ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्णतः सहमत, एकेक ओळीशी सहमत.... आर्चि i love you 2 म्हणते तेव्हा आ वासून तिच्याकडे पाहणारा परश्या कुठे आणि हा स्मार्ट परश्या कुठे...

मुळात ती आर्चीच कुठेय? सुरवातीलाच खटकली पण म्हटले जाऊ देत... पण शेवटी आणीबाणीच्या प्रसंगी देखील ही बया चेहऱ्याची इस्त्री न मोडता, तोंडचे डाईलाग डोळ्यापर्यंत न पोचवता जे काही करते ते बघून साफ निराशा...

उतारा म्हणन मी परत दोनदा मूळ ट्रेलर पाहिला... परत शेवटचे दोघांचे... मी कामार जाईन, मी तुझी वाट बगीन... हे संवाद डोळे ओलावून गेले। Sad Sad

तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. >>>
अगदीच... तिच्या मानाने पोरगा बराच बरा आहे

झिंगाट गाण्याचेही तेच.... कुठे ते ओरिजिनल जोशात येऊन परशाने केलेला नाच व वरून बघत नाचणारी आर्ची आणि कुठे हे सगळे एका लयीत एरोबिक्स करणारे लोक्स...

काहीच आवडले नाही... सैराटचा आत्मा यांच्या हाती लागला नाही, हाती लागली फक्त फ्रेम... ती कॉपी करताना तरी नीट करावी... अभिनयाची काहीच पार्श्वभूमी नसलेले परश्या, आर्ची, लंगड्या कुठं आणि मी किती सुंदर दिसते बघा भाव चेहऱ्यावर घेऊन वावरणारे हे लोक कुठे..

माझी टीका जरा जास्तच होतेय, पण सैराट खूपच जवळचा आहे..

धर्मा प्रोडक्शनने पैसा ओतलाय म्हणून सिनेमा थोडा लार्जर कॅनव्हासवर पाहिल्याचा फील येऊ शकतो अन्यथा सैराट तो सैराटच!

सिनेमाला नागराजने दिलेली ट्रीटमेंट शशांक खेतानला रेप्लीकेट करता येईल ह्याची सुतराम शक्यता नाही.

अमा....+१११११११११११११११११११
प्रत्येक वाक्याशी सहमत.
अज्जीबातच नाही आवडला ट्रेलर..
एका फ्रेम मद्धे जान्हवी आर्ची सारखे डोळे फिरवायचा प्रयत्न करतेय तो सपशेल फसलाय..
अरे कुठे नेउन ठेवलाय सैराट माझा...असं म्हणावसं वाटलं..
जान्हवीचा आवाज अगदीच खटकला मला...खुप जास्त प्रौढ आहे असं वाटलं ऐकताना..म्हणजे नेमकं सांगता नाही येणार काय खटकलं पण तिच्या चेहेर्याला तो आवाज शोभत नाही...
आर्ची च्या दिसण्यातला, डोळ्यातला बिन्धास्त भाव जान्हवी ला नाही दाखवता येत आहे....असं मला वाटलं..
तिला एखाद्या गोड गोड करन जोहर छाप चित्रपटात का बर नाही लॉन्च केलं...?
या चित्रपटाला ती नाही होत सुट...
मंजुळेंनी बेंचमार्क फारच वर सेट केलाय..तिथे पोचणं जमेल की नाही माहिती नाही धडक ला..
पण समस्त सैराट प्रेमी "बघु तरी आपल्या आवडत्या चित्रपटाचा रीमेक कसा झालाय" असं करुन चित्रपट बघायला जातीलच त्यामुळे चित्रपट १०० करोड गाठणार हे नक्की Happy

अमा, साधना +10000

मुळात सैराट ला शॉक व्हॅल्यू होती ती ऑनर किलिंग मराठो पडद्यावर दाखवल्यामुळे, उत्तरेत जिकडे ही कॉमन प्रॅक्टिस आहे तिकडे हे दाखवून काय साधणार आहेत देव जाणे

बाकी पूर्ण स्टारकास्ट चा निरागस अभिनय या हिंदी व्हर्जन मध्ये टोटल मिसिंग आहे,
धडक म्हणजे कोल्हापूरच्या परख चे कोंबडी ताट, jw marriot च्या मेनू मध्ये accomodate केल्यासारखे वाटते.
पदार्थांची नावे आणि संख्या तीच पण चवीत जमीन अस्मानाचा फरक.

समस्त सैराट प्रेमी "बघु तरी आपल्या आवडत्या चित्रपटाचा रीमेक कसा झालाय" असं करुन चित्रपट बघायला जातीलच त्यामुळे चित्रपट १०० करोड गाठणार हे नक्की >>>>>
Kjo शहाणा असेल तर अजून ट्रेलर लाँच करणार नाही Happy
अजून 1 2 ट्रेलर अशी आली तर महाराष्ट्रात तरी हा पिक्चर पडेल

प्रोमो पाहिले. शाहीद कपूरचा भाऊ त्याच्यासारखा अजिबात वाटत नाही. मामे की आते भाऊ आहे बहुतेक.
सैराटशी तुलना नको. आपण मराठी म्हणून पूर्वग्रहदूषित या सिनेमाकडे पाहणार असू तर तो अन्याय होईल सिनेमावर. महाराष्टृआतलं वातावरण कुठून आणणार हिंदी भाषिकांसाठी ? सरळ सैराटच डब करायचा होता मग. पण मग भाषा बदलली की आर्ची परशा चे नैसर्गिक उच्चार ढेपाळले असते. ही रिस्क आहेच. सैराट मधे नागराज मंजुळेचं अनुभवविश्व ५०% तरी असेल. तओ सिनेमा तेव्हांच हिंदीत बनला असता तर कदाचित अस्सल वाटला असता (उच्चारदोषांसहीत)
रिमेक म्हणजे फ्रेम टू फ्रेमज्की थोडेफार स्वातंत्र्य द्यायचे दिग्दर्शकाला ?
राजस्थानात कथा नेली आणि राजपूत मुलगी आणि निम्नजातीचा मुलगा असेल तर मग करणी सेना वगैरे सोय करून चार पाच राज्यात जाळपोळ वगैरे ठरलेली आहे. पब्लिसिटी वर खर्च करण्यापेक्षा हा खर्च परवडतो म्हणतात. त्यानंतर रिलीज झाला की सिनेमा धो धो चालेल.

साधनाजी +1111

सैराटचं बाॅलीवूडकरण केलं तर केलं, पण ते तरी ओरिजनलप्रमाणे करायला हवं होतं! झिंगाटची तर
वाट लावलीये. झिंगाटच्या चालीवर टीपीकल बाॅलीवूड साॅन्ग वाटतं. सैराटचा आत्माच काढून घेतल्यासारखं वाटतं!

बादवे, तो हिरो शाहिद कपूरचा भाऊ आहे ना?

हा धागा वाचुन ट्रेलर पाहिला.काहीच भाव नाहीत जान्हवीच्या चेहेर्यावर. आवाज पण असा का खोल गेल्यासार्खा, आवाजत दमच नाही आर्चीचा.

मला खरे तर सैराट मधला झिंगाटवरचा डान्स नव्हता आवडला. अगदी कोरिओग्राफरच पाहीजे असं नाही. पण गणपतीत नाचल्यासारखे काहीच होमवर्क नसल्यासारखे आहे जे काही आहे ते. हिंदीत वेल कोरिओग्राफ्ड आहे, पण गाण्याची लय नाही पकडली असे वाटत राहते.

बाय द वे,
पप्पी मतलब कुत्ते का पिल्ला आणि आई लव्ह यु, या दोन संवादांच्यावेळी कोणाला प्रियांका चोप्रा चा भास झाला का?

<<तो हिरो शाहिद कपूरचा भाऊ आहे ना?<< सावत्र भाउ आहे. शाहिदची आई,निलिमा अझिमने दुसरे लग्न केले. .. राजेश खट्टर सोबत. त्याच्यापासुनचा हा मुलगा.

आणि त्या वेळी सैराट बद्दल ब्र काढायची सोय नव्हती. झी ने आक्रमक माणसं पेरून ठेवली होती सर्वत्र.>>>

कुठे? मायबोलीवर का? तसे असेल तर सहमत.. मायबोली सैराटलेली तेव्हा Happy Happy

अगदी अगदी झाले वाचून.

तो गावरान बेरडपणा नाही की हावभाव नाही. अगदीच गुळगुळीत शहरी वाटलीय जान्हवी. बरं राजस्थानी सुद्धा नाही वाटत.
आपला परश्या किती क्युट वाटलेला लाजताना..

मराठी झिंगाट गाण्यात मेन कलाकारांना मोजक्या स्टेप शिकवून सुद्धा नॅचरल वाटलेल्या कारण बाकीचा गोळा केलेला गाव पाहिजे तसा नाचत होता. स्वःत खुद्द मंजूळे गाण्यात दारू पिताना दाखवोइन गमतीशीर पद्धतीने इथोइन तिथून येरझारा मारतना दाखवेला जशी काही दारु चढलीय. ते सुद्धा बघायला मजा होती.

पण , हिंदी मध्ये सगळे कवायतच करताहेत.... हॉरीबल.

तो गावरान बेरडपणा नाही की हावभाव नाही. अगदीच गुळगुळीत शहरी वाटलीय जान्हवी. बरं राजस्थानी सुद्धा नाही वाटत.>> हम साथ साथ है सिनेमात तोच तो काळवीट वाला म्हारे हिवडामे नाचे मोर वाला, त्यात करिश्मा कपूर चे पात्र बघितलेत तर लक्षात येइल की जान्ह् वीचे पात्र ह्यावर मॉडेल्ड आहे. त्यात पण ती थारे म्हणून फिदि फिदी हसते.

हा पिक्चर मला फ्रेम बाय फ्रेम पाठ आहे. फार त्रास दिलात तर लिहीन हां त्या बद्दल. फिदी फिदी.

त्रिवार भंगार...

एक खूप मोठ्या चित्रपटाचं शाळेच्या गॅदरिंगमधलं नाटुकलं करुन ठेवलं आहे धर्माप्रोडक्शनने....

लार्जर कॅनव्हास नागराजनेच आधी वापरला आहे.. फक्त धर्मा प्रोडक्शन आहे म्हणून कॅनव्हास लार्ज होत नसतो. प्रोडक्शन कंपनीच्या नावाने, पैशाने कॅनव्हास लार्ज होत नसतात. ते डायरेक्टरच्या व्हिजनमुळे होतात.

मला खरे तर सैराट मधला झिंगाटवरचा डान्स नव्हता आवडला. अगदी कोरिओग्राफरच पाहीजे असं नाही. पण गणपतीत नाचल्यासारखे काहीच होमवर्क नसल्यासारखे आहे जे काही आहे ते. हिंदीत वेल कोरिओग्राफ्ड आहे.....
Submitted by मधुरांबे on 12 June, 2018 - 14:21

अहो गावातल्या पाटलाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या पार्टीतील डान्स. तो 'वेल कोरिओग्राफ्ड' असण्याची अपेक्षा कशाला???

रंगीबेरंगी, व्हॅनिला टुटी फ्रुटी टाइप ट्रेलर >>> Rofl
मला पण नाही आवडले ट्रेलर पण चित्रपट चालेल असे वाटते आहे.

तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. >>> +१

तिला एखाद्या गोड गोड करन जोहर छाप चित्रपटात का बर नाही लॉन्च केलं...? या चित्रपटाला ती नाही होत सुट... >>> +१

नुसत्या ट्रेलर वर एवढी चर्चा...!
चित्रपट आल्यावर काय होईल..!
मलाही नाही आवडला ट्रेलर .. सैराटच्या तुलनेने कमीच वाटतोय..

>>>बाय द वे,
पप्पी मतलब कुत्ते का पिल्ला आणि आई लव्ह यु, या दोन संवादांच्यावेळी कोणाला प्रियांका चोप्रा चा भास झाला का?
>>>हो अहो...मला तर बऱ्याच जणांचे भास झाले हो...प्रियांका सोबत मालिका शेरावत ,कंगना राणावत वगैरे ....आणि मला असा संशय येतोय की या बाई ने पण लिप enhancement टूल वापरलं की काय त्या डोनाल्ड डक (अनुष्का शर्मा ) सारखं... कुठे कुठे अगदी ओठ वेगळे वाटतात.. तसंही हल्ली मला हा डाउट बऱ्याच जणांवर यायला लागलाय...कंगना, कॅटरिना, श्रुती हसन,सहझन पद्मसी, वाणी कपूर,नर्गिस फक्री,आयेशा टाकिया.. असो ट्रेलर अर्थातच आवडला नाही...पण ज्यांनी ओरिजिनल पहिला आहे त्यांना बहुदा रिमेक नाही 'बघवणार'... कायम जुन्याशी तुलना होणारच.. ज्यांनी सैराट बघितलाच नाहीये अशा लोकांना कसा वाटेल हा सिनेमा ते बघावं लागेल... माझं मत तर मंजुळेंच्या सैराटलाच बाबा..

लीप enhancement टूल>> लिप ग काकी. मी लीप्स कुठे आहेत ते विचार करायला लागले. ही ही. जान्हवी त्याही पेक्षा खुशी वर खूप मेहनत घेण्यात आली आहे. प्लास्टिक सर्जरी वाइज लहान पणचे फोटो बघा. त्या दोघी व श्रीदेवी स्वतः अतिशय हाय मेंटेन नस लेडीज होत्या आहेत. नो जजमेंट. त्यांच्या पैशाने काही का करेना पण सततच फॉरिन ब्रांडेड कपडॅ महाग साड्या पर्सां महाग हॉलिडेज ब्युटी ट्रीटमेंट हे महाग प्रकरण आहे. माझे तेव्ढे बजेट असते तर मी मिस एल बी एस रोड तरी झाले असते की वो. दिवे घ्या. हे माझे दिवा+स्वप्न आहे.

तिचे हाव भाव घेतलेत पण चेहर्‍यावर काहीच उमटत नाही. >>>
अगदीच... तिच्या मानाने पोरगा बराच बरा आहे >>> + १०००

मला तोच जास्त आवडला. निदान त्याचा चेहरा जास्त हलतो .
जानूची संवादफेक जाम वैतागवाणी वाटली. राजस्थानी स्वॅग अजिबात जमला नाही .

हा सिनेमा सैराट चा ऑफिशियल रिमेक म्हणून येत असल्याने, तुलना होणे स्वाभाविक आहे. अमराठी लोकांमध्ये श्रीदेवीच्या अकाळी एक्झिट मुळे नकळत सहानुभुती मिळून सिनेमा सुपर हिट जाण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठी लोकांमधे ठायी ठायी तुलना होत राहिल्याने, पसंतीस पडायची शक्यता कमी असली तरी एकदा बघूया तरी कसा बनवलाय, म्हणत का होईना बर्‍यापैकी गल्ला जमवेल असं वाटतं. या बाबतीत मधुरांबेंच्या प्रतिक्रियेला +१
पहिल्या ट्रेलर ला लोकांनी भरभरुन सर्च केल्याची बातमी खाली दिसत आहे.
https://www.loksatta.com/manoranjan-news/google-trends-sairat-hindi-rema...
सैराटची जादू अजूनही न उतरल्याने ट्रेलर मात्र आवडला नाही. इशान बराच बरा वाटतोय, परशा च्या तुलनेत नव्हे तर जान्हवीच्या तुलनेत !

आधी श्रीदेवीच्या मुलीचा पहिला सिनेमा म्हणून सिनेमाची हवा केलेलीच होती. आता श्रीदेवी गेल्यावर तर इमोशनल कारणांकरता सिनेमा चालणारच/ चालवला जाणारच आहे, कसाही असला तरी!
सैराटशी तुलना सोडा, नुसता एक ट्रेलर म्हणूनही प्रभाव पडला का? नाही.
आशुतोष राणाची एन्ट्री होते, त्या आधी रोमान्स peak ला असा काही जायला हवा की व्हिलनच्या एन्ट्रीला अंगावर काटा येईल! असं काही झालं का? नाही.
जान्हवीने काहीच इम्प्रेस नाही केलं. इशानने केलं. तो बिलिव्हेबल तरी वाटतो.
श्रीदेवीची मुलगी आहे म्हणून उगाच भावनिक होऊन डोक्यावर घ्यायचं कारण नाही. टॅलेन्ट असेल तर पुढे ती चमकेलच.
त्या प्रतीक बब्बरची उगंच हवा करून ठेवली होती जाने तू या जाने ना मध्ये. काही लोकांना उगंच 'स्मिताचा मुलगा' म्हणून रडाबिडायलाही आलं होतं. तेव्हाही तो मख्खच होता आणि थँकफुली नंतरही तसाच राहिल्यामुळे त्याची सो कॉल्ड हवा तिथेच विरली!

सैराट पर्फेक्ट इन ऑल सेन्सेस होता. त्याला उगाच हात घातलाय. धडक पाहण्यापेक्षा परत एकदा सैराटच पहावा, निदान मराठी माणसाने तरी Happy

हरयाणवीमे समझ नाही आवे है क्या? अंग्रेज्जी मे बतावे क्या? असा ड्वायलाग आहे का पिच्चरमधे?
मी बघणार नाही. धडक हे नाव न आवडण्यापासुनच माझी सुरुवात झालीये Happy
आणि सैराट अजुनही डोक्यातुन गेलेला नाहीच.

तेव्हाही तो मख्खच होता आणि थँकफुली नंतरही तसाच राहिल्यामुळे त्याची सो कॉल्ड हवा तिथेच विरली!>>>>>> काय करणार तो स्मिता बरोबर राज बब्बर चा पण मुलगा आहे ना !!!

Pages