मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवड्यातून दोनदा मटण खाणाऱ्या आणि श्रावणात बंद केल्याने पुण्यसंचय होईल व स्वर्गात जागा मिळेल अशी भाबडी आशा लावून बसलेल्या सर्व भाविकांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशक्य हसलीये, तुफान आहात तुम्ही सगळे.
आशुचँप,हर्पेन, सोन्याबापु, साती, आणी सगळे सगळे.
खरतर माझ्या डिपार्टमेंट मध्ये मी व अजुन एक असे दोघेच शाकाहारी व कायम मस्करीचा विषय की " तुम लोग क्या घासफुस खाने वाले लोग, नॉनव्हेज नही खाया तो कुछ नही खाया , वगैरे वगैरे" . हा धागा बघितला तर वाटल की आपल्याला बोलायला काही पॉईंट मिळतीलपण फक्त अशक्य हसलेय. कुठे कुठे फिरून आला हा धागा चा कँ पासुन लैंगिक मासांहार पर्यंत...... मज्जा आली.....

आपण स्वत: कधीच ठरवत नाही का आपल्याला मांसाहार करायचा आहे का नाही. आपण ज्या घरी जन्माला येतो तिथलेच नियम आपण पाळतो. सरळ सांगायचं झालं तर काही कळण्याच्या आतच मांसाहाराबद्दलचे विचार/नियम आपल्यावर लादले जातात आणि आपणही स्वत: काही कळायला लागेपर्यंत त्या नियमांचे समर्थन करत राहतो.

त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.>>> किंबहुना ती त्यांची स्वत:ची तत्वे नसतातच. फक्त वरवर Copy + paste केलेली असतात.

आजच्या तारखेला मी लैंगिक असमाधानाचे उसासे सोडत आहे, एक दिवस येथील लोकांच्या मार्गदर्शनामुळेच लैंगिक समाधानाचे सुस्कारे सोडत असेल.
>>> लोल... अरे लेख काय, प्रतिसाद काय... हा हा

सरळ सांगायचं झालं तर काही कळण्याच्या आतच मांसाहाराबद्दलचे विचार/नियम आपल्यावर लादले जातात आणि आपणही स्वत: काही कळायला लागेपर्यंत त्या नियमांचे समर्थन करत राहतो.
<<
सरळ सांगायचं झालं तर काही कळण्याच्या आतच शाकाहाराबद्दलचे विचार/नियम आपल्यावर लादले जातात आणि आपणही स्वत: काही कळायला लागेपर्यंत त्या नियमांचे समर्थन करत राहतो.

Wink

प्रत्येकाला आपली अक्कल येतेच. शाकाहारी कुटुंबातील मुलेही एकदा चटक लागली की बाहेर मांसाहार करतातच.
किंबहुना जास्त करतात आणि अश्यांमुळे बार मधील मांसाहाराचे भाव वाढतात असे माझे काही पिणारे मित्र म्हणतात.

याला वायसे वर्साही आहे. खाटीकाच्या घरीही सलाडप्रेमी जन्माला येऊ शकतो. दाबून मांसाहार करणारे कुटुंबच्या कुटुंब अचानक शाकाहारी होताना पाहिले आहेत.

थोडक्यात अक्कल नसताना अन्नसवयी लागल्या आणि आयुष्यभर नाईलाजाने तेच चरत राहावे लागले असे जनावरांचेही होत नसेल. आपण तर माणसे आहोत.

ज्याला जे खायचेय ते त्याने खावे. फक्त माणसाने माणुस खाऊ नये. माणुसकी तेवढी जपावी.

ज्याला जे खायचेय ते त्याने खावे. फक्त माणसाने माणुस खाऊ नये. माणुसकी तेवढी जपावी.
नवीन Submitted by भन्नाट भास्कर on 3 June, 2018 - 04:59
>>
इतर प्राण्यांना खाणे हे माणुसकी जपणे आहे का? माणुसकी म्हणजे काय?

@पद्म..cannibalism psychological disorder ahe... कोणी काय ग्रहण करावं हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो,,,but tyala limit असावे,,,cannibalism मुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात येतय,,, fittest survives नियमानुसार consuming other species and consuming our own species मध्ये खूप फरक आहे,,,

cannibalism मुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात येतय,,,
<<
अरे बापरे!
हे ठाऊकच नव्हतं. असं कापून खाल्ल्याने कधी संपणारेत म्हणे माणसं ?

हो हल्ली कॅनिबॅलिझम फारच फॅशनमधे आलाय. Only Canni नावाची चेन रेस्टॉरंटस निघालीयेत. इथलं कोणी गेलंय की नाही अजून तिथे? रिव्हू लिहा प्लीज.

बादवे, तिथे जायचं तर खिशात भरपूर पैसे घेऊन जा. बिल भरताना पैसे कमी पडले तर भांडी घासायला लावत नाहीत तर तुमचाच थेट भांड्यात प्रवेश होतो.

<< बिल भरताना पैसे कमी पडले तर भांडी घासायला लावत नाहीत तर तुमचाच थेट भांड्यात प्रवेश होतो. >>
------- मामी.... Happy

असं कापून खाल्ल्याने कधी संपणारेत म्हणे माणसं ?> >> Lol

बिल भरताना पैसे कमी पडले तर भांडी घासायला लावत नाहीत तर तुमचाच थेट भांड्यात प्रवेश होतो.>>> Lol

अरे हा धागा परत वर आला?
मी परत काही प्रतिसाद देत नाहीये, प्रत्येकाला स्वतःचंच मत योग्य वाटतं. मलाही! Happy

Pages