मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाच तर नव्हे हीच तर बिंदू

ती बाई होती, अभिनेत्री

नॉनव्हेज का व्हेज माहिती नाही पण बाई होती हे नक्की

अशक्य धागा आहे. आठवड्याचा स्ट्रेस घालवला. रच्याकने, जपानमध्ये खरेच ओयाकोदोन नावाचा भाताचा प्रकार मिळतो ज्यात ओया (पालक - चिकन / मासे) आणि को (मुल - चिकन किंवा माश्याची अंडी) असा ऐवज असतो. फारच भारी लागतो पण जपानी आया अजुनही मुलांना शिजवत नाहीत.

नॉनव्हेज का व्हेज माहिती नाही पण बाई होती हे नक्की
>>>>>

बाई असो वा पुरुष, मला वाटते दोन्ही नॉनवेजच असतात. निदान आमच्याकडे तरी तसे समजतात आणि सोमवारी माणसं खात नाहीत.

पण महत्वाचे कारण हेच, की कोणताही प्राणी काही एक खाताना तितकासा "सुंदर/चांगला" भासत नाही हे वैश्विक सत्य आहे असे माझे मत.

नाय हो ...... हॅरी पॉटरमध्ये ऑफिसात बसुन चहा पिणारी डोलोरिस अंब्रीज बाई फार रुबाबदार वाटते.. तिचा चहा, तो कप आणि चमच्याचा आवाज ... काही विसरणे अगदी अशक्य आहे.
https://www.youtube.com/watch?v=slf08hY6pR8

फेरफटका, प्रत्येकाचे पाळायचे वार वेगळे असतात. मी काही मानत नाही. मला कुठल्याही वाराला चालतात. पण माणुसकी दाखवत मी कुणालाही त्याच्या मर्जीविरुद्ध खात नाही. जर ईथे कोणी मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान करणार असेल तर उरलेसुरले मला अन्नदान करू शकता Happy

हॅरी पॉटरमध्ये ऑफिसात बसुन चहा पिणारी डोलोरिस अंब्रीज बाई फार रुबाबदार वाटते.
>>>
मी हे हरीपुत्तर वगैरे फारसे बघत नाही, पण चहा पिताना माणसे रुबाबदार दिसतात हे मात्र कबूल. तसेच हातात उंची विदेशी मद्याचा गिलास किंवा विलायती सिगार वगैरे खाद्यप्रकार देखील मनुष्याला रुबाबदार बनवतात. किंबहुना कित्येक व्यसने तर याच समजातून सुरू होतात.

असो, बाकी मूळ मुद्दा ""कोणताही प्राणी काही एक खाताना तितकासा "सुंदर/चांगला" भासत नाही "" मला हेच मान्य नाही. मला तर मेकूड खाणारी मुलेही गोंडस वाटतात Happy

नाही चॅम्प, एमेनसी मध्ये कामाला लागलो तेव्हाच मी ती सवय सोडली. पण मला तशी मुले आजही गोण्डस वाटतात.
या ऊलट जे नाकातले काढून ईथे तिथे सोफा खुर्चीला लावतात त्या मुलांचा आणि त्यांच्या आईबापांचा खूप राग येतो.

अरे काय फाल्तुगिरि आहे, ३००+ प्रतिसाद.
पद्म- मस्त नाव, असे विचारवंत लोक मला लय भारी आवडतात. जगबुडी कुठल्याही क्षणी येऊ शकते यावर त्यांचा विश्वास असतो.. ह्याना मायबोली पद्मविभुषण पुरस्कार का नाही जाहीर करत?

खुप दिवसान्नि इथे आलो की टायपिंगची पार बोंब होते...

फेरफटका, वर लिहिलेय की. मला कुठल्याही वारी चालतात. एकदा का माझ्या पोटात कावळे ओरडू लागले की मी वार बिर न बघता समोरच्याला चटकन मोक्ष देत कावळा बनवून टाकतो.

अफलातुन धागा आणि अशी त्यावर धगधगती चर्चा पाहून खरे तर तन्दूर भट्टीची फक्त आठवण येवू शकते

तरी ह्या नॉनवेज बद्दल अजुन एक शंका
शुद्ध शाकाहारी असणारी मंडळी जेव्हा प्रोटीन सप्लीमेंट खातात तेव्हा ती कुठल्या झाडापासून बनलेली असतात
Lol
औषध म्हणून खा की जिम साठी आवश्यक म्हणून अश्या प्रोडक्ट चा मुख्य आधार फिश प्रोटीन बहुुतांशी असावा असा कयास आहे
जाणकरांनी अधिक मार्गदर्शन करावे

तरी ह्या नॉनवेज बद्दल अजुन एक शंका
शुद्ध शाकाहारी असणारी मंडळी जेव्हा प्रोटीन सप्लीमेंट खातात तेव्हा ती कुठल्या झाडापासून बनलेली असतात

Whey protein... Milk pasun bante.

त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.>>>> +१११११११११११११ १००% सहमत!!!!
शाकाहार हाच मनुष्यासाठी आहार आहे. मांसाहार हा मनुष्यासाठी अन्न असू शकत नाही/ नये या मताची मी आहे.

वाह रे इन्सान 'तेरी फितरत
लाश को हाथ लगाता है तो नहाता है
पर बेजुबाँ जीव को मार के खाता है

छोड़ देते है भोजन जिसमे एक बाल है
फिर क्यों खाते हो अंडा
जिसमे एक माँ का लाल है

( internet वरून साभार. source माहित नाही )

छोड़ देते है भोजन जिसमे एक बाल है
फिर क्यों खाते हो अंडा
जिसमे एक माँ का लाल है>>>> अगागा! आताच ब्रेफाला ऑम्लेट खातानाच वाचलं मी हे Sad

लाश को हाथ लगाता है तो नहाता है
पर बेजुबाँ जीव को मार के खाता है

छोड़ देते है भोजन जिसमे एक बाल है
फिर क्यों खाते हो अंडा
जिसमे एक माँ का लाल है

>>>>>>

कन्सेप्ट बरेच चुकलेत वरच्या कवितेत.
प्रेताला हात लावल्यावर आंघोळ इन्फेक्शन होऊ नये म्हणून केली जाते.
कोणताही जीव मुका नसतो, ते बोलतात. फक्त त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. एखादा फ्रान्सचा माणूस फ्रेंच मध्ये बोलत असेल आणि आपल्याला ते कळत नसेल तर त्याला मुका म्हणून हिणवणे कितपत योग्य.
तसेच हे भुंकणारे, खिंकाळणारे, गुरगुरणारे अन फुत्कार टाकणारे तथाकथित मुके जीव सुद्धा एकमेकांना खाऊनच जगतात ना.
जर मोठा मासा छोट्या माश्याला खाऊन जगत असेल आणि मी मोठ्या माश्याला खात असेल तर मला खाऊ नको असे सांगायचा काय नैतिक अधिकार आहे त्याच्याकडे?

कवितेचे दुसरे कडवे गोंधळात टाकणारे आहे. बाल म्हणजेच केस हे मांसाहारात येते की शाकाहारात? जर मांसाहारात येत असेल तर आपण सारेच आपले वा एकमेकांचे केस कचाकचा कापतो ते बरे चालते.
बाकी अंड्यामध्ये लाल नाही तर पिवळे असते ना? की कवी कोंबडीच्या नाही तर दुसरयाच पशूच्या अंड्याबद्दल बोलत आहे.

जेव्हा तुम्ही निर्दयीपणे ओरपत असता , तांबडा पांढरा रस्सा
रडत असतात तेव्हा त्या बकर्‍यांचे, मम्मी पप्पा ढस्सा ढस्सा
( internet वरून वगैरे अजिबात नाहीये, source माझा मीच ) (इकडे व्हॉट्स अप वरचा काळा गॉगल वाला इमोजी ! )

बाकी अंड्यामध्ये लाल नाही तर पिवळे असते ना? >>> अरे अय, ते हिंदीमधील लाल आहे. मां का लाल म्हणजे मुलगा आहे रे ते. प्रतिक्रीया द्यायची किती ती घाई. Lol

मा का लाल म्हणजे मुलगाच का? मुलगी का नाही? एखाद्या गर्भात मुलगाच असावा या अपेक्षा आपण कोंबड्यांकडूनही सोडत नाही का?

एखाद्या गर्भात मुलगाच असावा या अपेक्षा आपण कोंबड्यांकडूनही सोडत नाही का?

>>>>>>>

तू भेट रे एकदा, मी शनिवरवाड्यावर तुझा सत्कार कारेन महावस्त्र आणि श्रीफळ देऊन

तसेच हे भुंकणारे, खिंकाळणारे, गुरगुरणारे अन फुत्कार टाकणारे तथाकथित मुके जीव सुद्धा एकमेकांना खाऊनच जगतात ना.
जर मोठा मासा छोट्या माश्याला खाऊन जगत असेल आणि मी मोठ्या माश्याला खात असेल तर मला खाऊ नको असे सांगायचा काय नैतिक अधिकार आहे त्याच्याकडे?>>>>> कारण आपण माणुस आहोत....पशु नाही.....

एखाद्या गर्भात मुलगाच असावा या अपेक्षा आपण कोंबड्यांकडूनही सोडत नाही का?
>>
कोंबडीच्या गर्भात मुलगा कसा असेल? कोंबडा किंवा कोंबडी असेल ना?

Pages