मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋमेस।,

बोल्ड "न" केलेले असते ना, तिथे मूळ स्वभाव दिसतो.

आता परत वाचः

माझ्या स्त्रीसौंदर्याच्या कल्पनेत "अशा पद्धतीने मांस खाणारी स्त्री" बसत नाही (तत्काळ "रिजेक्ट" होते फिदीफिदी )

हे बेसिक आहे. कंसातलं नीट वाचा.

आता लिंब्याने रिजेक्ट केले म्हणून, लिंबी सोडून जगातल्या यच्चयावत ललना या भाउच्या मागे लागल्या आहेत, अन हा रुबाबात रिजेक्ट करायलाय असं इम्याजिन करा.

गृह्यसूत्रात लिवलंय की आपल्या बापाच्या श्राद्धाला ब्राह्मण बोलवा, त्यांना मांस खाऊ घाला. कित्येक लोक मांसासाठी गायही कापतात.

तरीही हे पुरोहित लिंबूभौ, हाडावरून मांसाचे पुंजके ओढून चावणारी, लाळ गळणारी, स्त्रीची इमेज तयार करतात, सर्वच व्हेजइटेरियन स्त्रिया "डिझायरेबल" म्हणून डिक्लेअर करतात, "पिवर" व्हेज न खाणार्‍यांचे हिडिस चित्र रंगवितात, हे जऽरा विचित्रच नव्हे काय?

मंदार जोशींचा आत्मा नाहीये...मंदार जोशी अडिचाव्या सेकंदाला ओळखु येतात आणि कितीही काहीही केलं तरी मंदार जोशी जास्त वेळ स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत >>>>>>>

Hahahaha ☺☺☺☺

>>> पिवर" व्हेज न खाणार्‍यांचे हिडिस चित्र रंगवितात, हे जऽरा विचित्रच नव्हे काय? <<<<
विचित्र काय आहे त्यात? इकडे मांसाहाराचा विषय निघाला म्हणून.
पण मला तर आमटीतील "शेवग्याची" शेंग सुर्रर्रर्र आवाज करीत चाखतमाखत चोखुन खाणारी स्त्री बघणे देखिल कष्टदायक वाटते.
बहुधा पूर्वीच्या काळच्या स्त्रीयांना याची जाण असावी, त्यामुळे तेव्हाही व बर्‍याचदा आत्ताही, स्त्रीया सर्व पुरुषांच्या पंगती उठल्यावर वेगळ्या कोंडाळे करुन एकत्र जेवायला बसतात जेव्हा पुरुष पान वगैरे खाऊन डुलक्या घेत असतात.
माझ्या माहितीप्रमाणे, आजही हुषार स्त्री कुणाही पुरुषाच्या व खास करुन पति/सासुसासर्‍यांच्या "नजरेसमोर" खायचे टाळतेच टाळते. यास अन्य कारणेही असु शकतात. पण महत्वाचे कारण हेच, की कोणताही प्राणी काही एक खाताना तितकासा "सुंदर/चांगला" भासत नाही हे वैश्विक सत्य आहे असे माझे मत. Proud

तरी बरं ,
कंजूषपणासाठी प्रसिद्ध असलेल्या काही जमातींतले /शहरांतले/काही पुरुष सोडल्यास जगातले यच्च्यावत पुरुष त्यांच्या त्यांच्या स्त्रियांना सुरूवातीस ज..रा ओळख झाली की पहिले बाहेर किंवा घरी उपाहार/लंच्/डिनरला बोलावतात.

ते बहुतेक खाताना ती कितपत घाण दिसते याचा विचार करून मग पुढे प्रोसिड करायचं की नाही ठरवायला असावेत.
Happy

>>> ते बहुतेक खाताना ती कितपत घाण दिसते याचा विचार करून मग पुढे प्रोसिड करायचं की नाही ठरवायला असावेत. स्मित <<<<
तर तर ! अन पुरुषच काय, स्त्रीया देखिल याच विचाराने जात असाव्यात, की समोरचा पुरुष किती मचा मचा आवाज करीत खातोय, किती तोंडे वेडीवाकडी करतोय, खाताना ताटात किती अस्ताव्यस्त पणे पदार्थ घेऊन कोंबडीने पायाने चिवडल्याप्रमाणे ताटातील पदार्थ चिवडतोय, खाताना त्याचे अविर्भाव कसे आहेत, खाता खाता बोलतोय का? बोलता बोलता तोंडातुन पदार्थाचे कण बाहेर उडताहेत का, घास घेताना तोंडात जायचे आधी अंगावर /टेबलवर किती सांडवतोय , वगैरे वगैरे असंख्य निरीक्षणे स्त्रीयाही नोंदवितात असे मला माझ्या गर्लफ्रेंड्स कडुन खूप पूर्वीच कळले होते Proud
दुर्दैवाने हल्लिचे माहित नाही. Wink
अन याबाबत तथाकथित कंजूषपणासाठी प्रसिद्ध असलेल्या काही जमातींतले /शहरांतल्या/काही स्त्रीयाच अपवाद करायच्या वगैरे भेद नस्तो.... Lol स्त्रीया जात्याच हुषार असतात ! आता अगदीच काही "अपवाद" असतीलही....... पण त्यास वरील शहर/जमातीचा संबंध तर अजिबात नाही. Biggrin

कोणताही प्राणी काही एक खाताना तितकासा "सुंदर/चांगला" भासत नाही हे वैश्विक सत्य आहे असे माझे मत
>>
हाॅलीवुडातुन भारतीय सिनेमात काम करु लागलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आईस्क्रीम विशेषतः चोकोबार खाताना भारी दिसते. Wink

<<काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते. >>
-------- दाद यान्चा पहिल्या पानावरचा प्रतिसाद खुप छान आहे, तो पुन्हा वाचा.

<<अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.>>
------- भीती वाटायचे कारण नाही, असे काही होणार नाही. मान्साहार मनुछ्य जमातीच्या जन्मापासुन सुरु आहे...

मला तर इमॅजिनच होत नाहीये की मी हॉटेलमध्ये वा एखाद्या पार्टीला गेलोय, आजूबाजूला बरेच सुंदर मुली आहेत. आणि त्यांच्या सौंदर्याला न न्याहाळता मी त्या काय खात आहेत आणि कसे खात आहेत याचे निरीक्षण करतोय Happy

तिला समजेल असे न्याहाळायचे नसतेच. आपल्यासमोर आणि तिच्या पाठी बसलेल्या मुली न्याहाळायच्या असतात. किंबहुना होटेलमध्ये शिरल्या शिरल्याच कुठल्या दिशेने तोंड करून बसायचे आहे हे ठरवायचे असते.

तसेच मला शून्यात बघत विचार करायची सवय आहे हे तिला माहीत आहे. बस्स या सवयीचाही अधूनमधून फायदा उचलतो. शून्याच्या बरोबर मधोमध एखादा चांगला चेहरा येईल हे बघतो Happy

Ti kachha khail ki tula>>>>

आणि पद्म ह्यांनी लेखात <<<<भारतात लवकरच (child) cannibalism सुरु होईल अशी भीती>>>>> ही भीती खरी ठरणार! Wink

कृष्णा Happy
चाईल्ड कॅनाबिलजमचा (भारतातील) पहिला बळी म्हणून माझे नाव रेकॉर्डला राहणार असेल तर मला चालेल ..
पण एकंदरीतच मुली डायेट वायेट करत असल्याने त्या फक्त डोके खाऊन थांबतात असा अनुभव Happy

पद्म ह्यांनी लेखात <<<<भारतात लवकरच (child) cannibalism सुरु होईल अशी भीती>>>>> ही भीती खरी ठरणार! डोळा मारा

>>
त्यात ऋ ला सगळे बाळ म्हणतात. देवा! Child cannibalism पासून आमच्या ऋन्मेष (बाळा) ची रक्षा कर.

पण काही म्हणा ऋ ला गेल्या काही दिवसात त्याच्या सारखेच धागे विणणारे मित्र मिळालेत हे नक्की.
त्याने ऋ ची लोकप्रियता जरा कमी होईल का ? Happy Wink

धागा काढणारे जितके जास्त तितके वेगवेगळे विषय वेगवेगळ्या दृष्टीकोणातून मांडले जातात.

ते कोणीतरी मांसाहाराचे सुपरीणाम नावाचा धागा काढणार होते त्याचे काय झाले? मी पटकन काढला तर बोलू नका मी चोरला. मी एक दोन सई मई तीन बोलणार आणि काढणार.

Form is temporary, class is permanent

likewise

Irritation is temporary, headache is permanent Happy

आशू तुझ्या रोगावर इलाज एकच.
एक गफ्रे मिळव.
मग ती तुझं डोकं खाईल
मग तुला डोकं राहणार नाही आणि आपोआपच डोकेदुखीही होणार नाही.

मी म्हणाले होते मांसाहारचे सुपरीणाम बद्दल. पण ते असंच. खरंच काही धागा काढणार नव्हते. मला नीट लिहिता येत नाही.
पण आता तु धागा काढ. मी आयड्या चोरली वैगेरे काही म्हणणार नाही.
एक दोन सई मई तीन. हो जानेदो.

सस्मित, मी आताच जरा वेगळा धागा काढलाय, लाभ घ्यावा. त्या धाग्याच्या निमित्तानेही मांसाहाराचे फायदे आपसूक पुढे येतीलच.

हर्पेन, तुम्हीच रावणाला हा उपाय सांगितलेला तर. म्हणून तो दहा गर्लफ्रेंड जमवायच्या नादात लोकांच्या बायका पळवू लागला.

ऋन्मेष सर काहीही हा.

रावणाने पळवलेली फक्त एकच...

आणि तू रावणाला त्रास दिला तेव्हा मी काही सांगायच्या आधीच तो रम्य ही स्वर्गाहून लंका सोडून तप करायला निघून गेला.

Pages