मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.
आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.
साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....
२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.
आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.
मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......
कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....
हे बोबडं बोलणं पाहिलं, की मला
हे बोबडं बोलणं पाहिलं, की मला फक्त
थेल अतेला तलता है।
इतकंच आठवतं
१. ते प्रतिसाद न देण्याची
१. ते प्रतिसाद न देण्याची धमकी देतात त्यामुळे जेवण जात नाही. देश ठप्प झाला आहे. वारा वहायचा थांबला आहे. अमेरिका आणि रशियात युद्ध होण्याची शक्यता आहे.
एव्हढी जीवितहानी टाळण्यासाठी तरी प्रतिसाद द्या ना प्लीज. मानवजात खतरे मे है !
२. हे कोण नवीनच पात्र झबलं घालून आलेलं ? देखेंगे इनके येडे चाळे.
{{{ फक्त काही लॉयल कस्टमर
{{{ फक्त काही लॉयल कस्टमर असतील, मानदुबाच्या प्रेक्षकांसारखे.
Submitted by भरत. on 10 June, 2018 - 08:35 }}}
मानदुबा म्हणजे काय?
माझ्या नवर्याची दुसरी बायको ?
ही कुठली सिरीयल?
लहानपणी रस्त्याच्या कडेला
लहानपणी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मटणाच्या दुकानात , दुकानाच्या बाजूला त्या माणसाने बोकड कापला. त्याचे ते जिवाच्या आकांताने ओरडणे मनावर कायमचे कोरले गेले. आजही त्याचे ते आवाज कानात वाजतात. त्यामुळं मला मांसाहार करणे शक्यच नाही. इतक्या क्रूर पद्धतीने प्राण्याचा जीव जातो, ते ही फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता.. हे मला भयानक वाटते.
कालचीच गोष्ट. मी माझ्या घरच्यांवर ही सक्ती कधीही केलेली नाही. पण काल माझ्या मुलीने कोंबडा कापलेला पाहिला आणि ती घाबरली. तिच्यासमोर पहिल्यांदाच हत्या झाली. तिने काल रात्रीच पुन्हा मांसाहार करणार नाही असे जाहीर केले. ती माझ्यावरच गेली असल्याने ती हा पण पाळणार याची मला खात्री आहे.
मला तर मित्रमैत्रिणींनी किती टोकले, पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
पाण्याबाहेर काढलेल्या माशाची तडफड पाहून एखाद्याला कधीही मासे खावेसे वाटणार नाही.
बुद्धी असलेल्या माणसांना दुस-या जिवाच्या वेदना कळत असतील. असे झाले तर मांसाहार की शाकाहार या चर्चेला पूर्ण विराम मिळेल.
महात्मा गांधी पूर्ण शाकाहारी होते. अर्नोल्ड श्वार्त्झेनेगर संपूर्ण शाकाहारी आहे. भगवान बुद्ध शाकाहारी होते. शाकाहारामुळे कामगिरीवर किंवा पराक्रमावर काहीही परिणाम होत नाही. त्यासाठी मांसाहारच गरजेचा आहे असं अजिबात नाही.
कुठलातरी एक युरोपिअन शास्त्रज्ञ शाकाहारी होता. नेपोलियन शाकाहारी होता. गाडगे बाबा शाकाहारी होते.
बहुतेक प्रसिद्ध व्यक्ती, सेलेब्रिटीज शाकाहारी होत्या, आहेत हे यावरून लक्षात येईल. फक्त भाज्यांची माहिती पाहीजे.
( कृपया वैयक्तिक कमेंट करू नयेत ही विनंती).
प्रश्न १. तुमच्यासमोर कापलेला
प्रश्न १. तुमच्यासमोर कापलेला तो बोकड खटका पद्धतीने कापला की हलाल?
प्रश्न २. उंदीर, डास, झुरळ, साप, पाल वगैरे प्राणिमात्र कधीच मारलेले नाहीत का?
प्रश्न ३. माननीय नामदार न्यूटनभाऊ, आइन्स्टाइनदादा आणि डार्विनकाका मांसाहारी होते की शाकाहारी?
प्रश्न ४. दैनिक सनातन सध्या किती रुपयांना मिळतो? की काही स्पेशल सदस्यांना फुकट मिळतो?
हे काय सतत सनातन सनातन लावले
हे काय सतत सनातन सनातन लावले आहे ? इथे कुणी अधिकारी व्यक्ती आहे का ? कृपया या प्रकारांकडे लक्ष द्यावे.
हे लोक मला सनातनी ठरवू पाहत आहेत.
कुठला तरी एक युरोपियन
कुठला तरी एक युरोपियन शास्त्रज्ञ शाकाहारी होता हे वाक्य अफाट आहे
बाकीच्या तीन प्रश्नांची
बाकीच्या तीन प्रश्नांची अनुल्लेखाने हत्या केलीत तुम्ही.. आणि जनरल नॉलेज म्हणून विचारली सनातन ची किंमत. वाईट वाटले असेल तर तसं सांगा, प्रायश्चित्त म्हणून पुढल्या निवडणुकीत nota दाबीन.
कुठला तरी एक युरोपियन
कुठला तरी एक युरोपियन शास्त्रज्ञ शाकाहारी होता हे वाक्य अफाट आहे Happy
Submitted by आशुचँप on 11 June, 2018 - 02:09
हसण्यावारी का नेतात? चुकीचे
हसण्यावारी का नेतात? चुकीचे नाव लिहून आयते कोलीत देण्यापेक्षा नंतर आठवले की सांगता येईल की. एव्हढे काय!
शाळेत असताना पाठ केलेलं अजून लक्षात राहते का?
बुद्धी असलेल्या माणसांना दुस
बुद्धी असलेल्या माणसांना दुस-या जिवाच्या वेदना कळत असतील
--------- हिटलर शाकाहारी होता...
हे जर खरे असेल तर पराक्रम
हे जर खरे असेल तर पराक्रम गाजवण्यासाठी मांसाहारी असण्याची गरज नाही हे लक्षात येते.
हिटलर च्या पराक्रमाचे काही
हिटलर च्या पराक्रमाचे काही दाखले आहेत का?
मलाही असे अनेक नामवंत शास्त्रज्ञ, राजकीय नेते, थोर सेनानी, विचारवंत, लेखक, अभिनेते माहिती आहेत जे मांसाहारी आहेत.
त्यांची नावे आठवली की सांगतोच
हे जर खरे असेल तर पराक्रम
हे जर खरे असेल तर पराक्रम गाजवण्यासाठी मांसाहारी असण्याची गरज नाही हे लक्षात येते.
<<
पराक्रम गाजविण्यासाठी??????
देवा!
मुलाचे नाव वैफल्यवाचक ठेवणार्
मुलाचे नाव वैफल्यवाचक ठेवणार्या पालकांच्या दूरदृष्टीचे नवल वाटले..
कुठला तरी एक युरोपियन
कुठला तरी एक युरोपियन शास्त्रज्ञ शाकाहारी होता
>>> लोल.. कुठलातरी ... हा हा हा हा.
आणि अरनॉल्ड शाकाहारी ☺️ आयुष्यभर मांसाहार करून आता शाकाहारी होत असेल तर त्याच उदाहरण काय कामाचं.. जेंव्हा प्रसिद्ध होता तेंव्हा मांसहरीच होता की.
http://www.bbc.co.uk/newsbeat
http://www.bbc.co.uk/newsbeat/article/35038053/arnold-schwarzenegger-sto...
https://www.riseofthevegan
https://www.riseofthevegan.com/blog/schwarzenegger-im-slowly-getting-off...
Arnold Schwarzenegger, former Governor of California and widely regarded as one of the best bodybuilders of all time, recommends people work on cutting down and eliminating meat from their diet just as he is doing. His doctors recommend he eliminates meat for health reasons
माझा पण एक आ बैल मुझे मारः
माझा पण एक आ बैल मुझे मारः
माझ्या वाचनात तरी गौतम बुद्धाचा मांसाहाराला विरोध नव्हता (तो स्वतः क्षत्रिय होता), फक्त स्वतः हिंसा करायला विरोध होता. बौद्ध धर्मिय शाकाहारी (धार्मिक कारणांसाठी) असलेले मी तरी कधी पहिले नाहीत. किंबहूना बौद्धधर्म-बहूल देशांतल्या जेवणातला मांसाहार प्रसिद्ध आहे (जपान - सुशी, श्रीलंका - सी-फूड).
महात्मा गांधी, अर्नोल्ड
महात्मा गांधी, अर्नोल्ड श्वार्त्झेनेगर, भगवान बुद्ध, कुठलातरी एक युरोपिअन शास्त्रज्ञ, नेपोलयन, गाडगे बाबा यांना एका वाक्यात सामावण्याची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
याहुन दुसरा कॉमन डिनॉमिनेटर नाही काहो मिळाला??
फेफ, टोटली. बुद्धाने माँक्स ना जे मिळेत ते मांस खायला सांगितले आहे, ते फक्त त्यांच्यासाठी कापून बनवलेले नसावे. अर्थात ते इतर कुठल्याही जेवणासाठी ही लागू आहेच.
विर्यपास करत अर्थाचे अनर्थ
विर्यपास करत अर्थाचे अनर्थ करायचे आणि चांगल्या प्रतिसादांना हास्यास्पद बनवायचे याला इथे कुणीच अपवाद नाहीत का ? दुर्दैवी आहे हे.
विर्यपास करत अर्थाचे अनर्थ
विर्यपास करत अर्थाचे अनर्थ करायचे >>>
यू आर टू गूड.
. बुद्धानंही यज्ञातील
. बुद्धानंही यज्ञातील प्राण्यांच्या आहुतीला कडाडून विरोध केला, मात्र त्यानं मांसाहाराला विरोध केला नाही. बुद्ध हा शककुळातला क्षत्रिय होता, हे त्यामागचं एक कारण असू शकेल. शिवाय मनाची शुद्धता व अन्न यांचा संबंध असतो, हे बुद्धाला मान्य नव्हतं. विनयपिटकात मांस आणि मासे खाण्यास परवानगी दिली आहे. मात्र भोजनासाठी मुद्दाम प्राणिहत्या करू नये, असं त्याचं ठाम मत होतं. भिक्षेत मांस दिलं तर ते स्वीकारण्यास, खाण्यास बुद्धाची ना नव्हती. भिक्षूंसाठी मुद्दाम प्राणी मारण्यास मात्र त्याची परवानगी नव्हती. कारण प्राणिहत्या करणं हे पाप, त्या प्राण्याचं मांस खाणं हे पाप नाही, असं त्याचं मत होतं. आजारी भिक्षूंसाठी क्वचित प्रसंगी बौद्धसंघात मांस शिजवल्याचे काही दाखले विनयपिटकात मिळतात.
संदर्भ
अनै व प्राणा
चिनूक्स
>>>> मुलाचे नाव वैफल्यवाचक
>>>> मुलाचे नाव वैफल्यवाचक ठेवणार्या पालकांच्या दूरदृष्टीचे नवल वाटले..
बाकी चालुद्यात
अहो तुमचेच पोस्ट नीट वाचून
विर्यपास करत अर्थाचे अनर्थ करायचे > चुकून की मुद्दाम ते माहित नाही पण मोठ्ठा अनर्थ तुम्हीच केलाय
(No subject)
"विर्यपास" -
"विर्यपास" -
कहर चाललाय
कहर चाललाय
शाकाहार हेच जीवन
शाकाहार हेच जीवन
विर्यपास हाच मृत्यू
विर्यपास
विर्यपास
आता विर्यपास झालेच आहे तर.. आय मीन विषय निघालाच आहे तर थोडे शंकानिरसन करून घेतो...
मांसाहाराने प्रजननक्षमता कमी होते, स्पेशली स्टॅमिना गंडतो वगैरे अश्या पुड्या आमच्या शालेय जीवनात सर्रास सोडल्या जायच्या. हे पटावे म्हणून घोडा रेडा वगैरे शाकाहारी जनावरांची उदाहरणे दिली जायची. आता मी पुड्या म्हटले तरी वय वर्षे सोळाचे असताना या भितीने काही महिने मी मांसाहार थांबवला होता. पुढेही मला काही खरेखोटे करता आले नाही. पण मांसाहाराच्या आवडीने या भितीवर मात केली आणि पुन्हा खायला लागलो. पण आज जाणून घ्यायची ईच्छा आहे की यात कितपत तथ्य आहे.
Pages