मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनोदाचा भाग सोडला तर हे ईथलं सगळं वाचून खरेच भविष्यातले भयंकर चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागलेय. एखाद्या मोठ्या मंत्र्याच्या वा उद्योगपतीच्या पोराचे लग्न आहे. जेवणातला मेनू आपला हाच माणूसमुंडी आहे. त्यासाठी बकरी ईदला कसे बकरे ट्रकमधून नेताना दिसतात तसे ट्रकभरून माणसे नेली जात आहेत. बिचारी कोकलत आहेत, विव्हळत आहेत, पण ताजे ताजे मटण हवे म्हणून त्यांना न मारता तसेच जिवंत तेलाच्या कढईत सोडले जाणार आहे. तर काहींना नुसते बेशुद्ध करून तंदूरमध्ये भाजले जाणार आहे. आईग्ग, मला फारशी कल्पनाही करवत नाही. वेळीच काळजी घेतली नाही तर हा विषाचा वेल फोफवायला वेळ लागणार नाही.

जर जगातील १ टक्के माणसे उठता बसता माणूस खाऊ लागली. आणि एका माणसाला एक माणूस खाऊन संपवायला साधारण दहा बारा दिवस लागले. तर त्या १ टक्के लोकांना उरलेली ९९ टक्के माणसे खाऊन संपवायला किती वेळ लागेल? कोणी गणित वगैरे करू शकेल का ईथे?

झाले ४००!
फक्त ४०० पूर्ण करायला आलो...

भन्नाट भास्कर, आर यु सिरीयस??? >>> हो, पण चिंता नसावी. हे अगदी सहज आणि लवकर घडणार नाही हे. माणसाला माणसाची गोडी लागायला तश्या टेस्टबडस डेवलप व्हाव्या लागतील. काही पिढ्या वा काही शतके जातील यात.

त्या पोस्टवर शाकाहार मांसाहार याबद्दल शास्त्रीय माहितीच्या लिंक्स दिल्या आहेत, बहुधा त्यामुळे तिथली चर्चा संपली असावी आणि ही नवी पोस्ट बनवली गेली आहे. हे योग्य नाही असे मला वाटते.

<< त्या पोस्टवर शाकाहार मांसाहार याबद्दल शास्त्रीय माहितीच्या लिंक्स दिल्या आहेत, बहुधा त्यामुळे तिथली चर्चा संपली असावी आणि ही नवी पोस्ट बनवली गेली आहे. हे योग्य नाही असे मला वाटते. >>
----- हा बातमी फलक (बाफ म्हणतात... बिफ नाही) जुना आहे.... तो गडाचा बाफ तुलनेने ताजा आहे.

मी त्या चारही लिन्क वर-वर बघितल्या... माहिती/ मते आहे पण त्याला शास्त्रिय माहिती नाही म्हणता येत. मान्साहारामुळे बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू यान्ची बाधा होण्याची शक्यता आहे तसेच पालक, रोमन लेट्युस या हिरव्या भाज्यान्मुळे पण लोक दगावतात. ताजी घटना आहे... लिन्क देतो
https://www.usatoday.com/story/money/2018/06/01/e-coli-tainted-romaine-l...

साध्ययाभोळ्या.दुधीमुळे तर बांदेकर भावजी सीरियस झाले होते.
आहात कुठे?
उदय, तुम्हाला वीणा सुरू आणि सपना हरिनामे आठवतात का?

विनोदाचा भाग सोडला तर हे ईथलं सगळं वाचून खरेच भविष्यातले भयंकर चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागलेय. >> हो ना.. मग असे सारे माणसं संपून गेल्यावर प्राणी त्यांच्या पोरांना शिकवतील, "There was a time..". Biggrin

अरे, मा़झ्या प्रत्येक दीड पोस्टनंतर एखादा शहाणा मनुष्य वीणावादन वगैरे लिहीत असे. आता वीणा सुरू म्हणजे पुन्हा वीणा. आणि अजून एक नाव आले आहे. अजून किती नावे येतील कोण जाणे. पण ही नावे "स्त्री" ची असावीत असे वाटतेय. जनरली दखल घेऊन उत्तर दिले की संशय पक्का समजतात आणि नाही दिले की निरुत्तर समजतात.

हो ना.. मग असे सारे माणसं संपून गेल्यावर
>>>
याची शक्यता कमी आहे. न्यूटनच्या उत्क्रांतीच्या लॉ नुसार सर्व्हाईवल ऑफ द फिटेस्ट होईल. म्हणजे आधी मांसाहारी लोकं शाकाहारी लोकांना खाऊन संपवतील. मग जे ठराविक वारालाच मांसाहार करतात अश्यांना खाल्ले जाईल. मग जे ठराविक वारी मांसाहार करत नाही अश्यांचा नंबर येईल. अश्यात जे सदासर्वदाकाळ हाडामांसात डोके खुपसून बुडाले असतील ते बदलत्या जनुकांशी जुळवून घेतील आणि माणूस खाऊन सहज पचवायला शिकतील आणि तेच अखेरपर्यंत टिकतील.

मॉरल ऑफ द धागा - तुम्ही शाकाहारी असा वा निममांसाहारी, जर आपला वंश टिकवायचा असेल तर आपल्या पोरांना दाबून मांसाहार करायला शिकवा. उद्या जेव्हा माणसाने माणसाला खायची जोमाने सुरुवात होईल तेव्हा ते या स्पर्धेत कुठे मागे पडायला नकोत.

आणि हो .....
धिस टाईम आय अ‍ॅम डॅम सिरीअस !

Survival of the fittest" is a phrase that originated from Darwinian evolutionary theory as a way of describing the mechanism of natural selection.
__________________________________

न्यूटनच्या उत्क्रांतीच्या लॉ नुसार सर्व्हाईवल ऑफ द फिटेस्ट होईल.>>> आणि हो .....
धिस टाईम आय अॅम डॅम सिरीअस Rofl

हां तर न्यूटन नाही पण यु टर्न झाला की Light 1 ह.घ्या.

उत्क्रांतीचा लॉ आईनस्टाईनचा आहे ना ?
स्पेशल लॉ ऑफ रेव्होल्युशन असं काही तरी वाचल्यासारखं झालंय. न्यूटन म्हणजे ते सफरचंद वाले ना ? धडक बेधडक सिद्धांत ? धडक मारली कि मागे येतं ?

ह्युमनचं हुमायून तसंच डार्विनचा पिकासो. हाकानाका. तेवढेच आपल्यामुळे ४ प्रतिसाद जास्त.
त्यातला माझाही एक. पण पुन्हा पुन्हा असं होऊ लागलं तर मिळणार नाही हं.

आधीच्या ब्रँडची व्हॅल्यू कमी झाली, म्हणून नवा ब्रँड काढला. थोडे दिवस चांगला माल दिला. पण आता जुनाच माल नव्या ब्रँड खाली विकायला काढला, तर हाच काय , येणारा कोणताही ब्रँड खपणार नाही.
फक्त काही लॉयल कस्टमर असतील, मानदुबाच्या प्रेक्षकांसारखे.

Pages