मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.
आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.
साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....
२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.
आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.
मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......
कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....
आपल्या घरातल्या छोट्या काळ्या
आपल्या घरातल्या छोट्या काळ्या मुंग्या सुद्धा मिश्राहारी असतात ऋन्मेष. कधी मुंग्यांना झुरळाचं प्रेत उचलून नेताना पाहिलं नाहीस का?
हे सगळे प्रतिसाद वाचता वाचता
हे सगळे प्रतिसाद वाचता वाचता ज्या जिभेच्या चोचल्यांवर सर्व विषयाचा डोलारा आहे त्यावर एक सहजच कविता सुचली ती नुकतीच पोस्टलीय
मानव साहेब अगदी बरोबर निरीक्षण नोंदवलेत. आणि ह्या मुंग्या अगदी कुठल्याही जातीच्या असल्या तरी ह्या सर्व मुंगी समुदायाकडून आपण शिकण्यासारखी एक सुंदर गोष्ट आहे ते म्हणजे swarm intelligence
तुम्ही लोकांनी मुंग्या
तुम्ही लोकांनी मुंग्या झुरळांचे प्रेत नेताना पाहिलेय. खाताना बहुधा पाहिले नसावे. त्या झुरळाचे मांस खात नाहीत तर त्याच्या अंगातील साखर शोषून घेतात.
आणि आफ्रिकेतील नरभक्षक मुंग्याची तुलना आपल्या गरीब भोळ्या देवाच्या मुंग्याशी नका करू.
आपल्या गरीब भोळ्या देवाच्या
आपल्या गरीब भोळ्या देवाच्या मुंग्याशी नका करू
ऋन्मेषसर
म्हणजे तुम्ही देवाला मानता?
देवाला गरीब भोळा मानता
का मुंग्यांना मानता
अस्सं होय. तसं असेल तर
अस्सं होय. तसं असेल तर चिकनच्या अंगातील साखर शोषून घेतील की. पुढल्या वेळेला लाव चिकन बिर्याणीचे डोहाळे.
बेस्ट आहे ना, शुगर वाल्याना
बेस्ट आहे ना, शुगर वाल्याना झोपवायचे मुंग्या असतील तिथे, गपगप साखर घेतील ओढून कि झालं
परत मग श्रीखंड, जिलबी खायला मोकळे ☺️
आशुचँप
आशुचँप
(No subject)
स्पा थेरपी मध्ये फिश पेडी क्युअर म्हणून एक प्रकार असतो त्यात आपल्याला जिवंत मासे ( गार रफा व्हरायटी ) असलेल्या टबात बसायला मिळते तसे आता ह्या नवीनच शोध लागलेल्या झुरळाच्या शरीरातून साखर शोषण्याच्या लॉजिक नुसार मुंगी स्पा च्या ब्रॅंचेस सर्व जगभर सुरु होतील .... शोध कर्त्याने ह्या पद्धतीचे पेटंट लवकर घेऊन ठेवावे
आफ्रिकेत नरभक्षक मुंग्या
आफ्रिकेत नरभक्षक मुंग्या असतात असे कोण म्हणाले
ओन्ली फ्लेश मॅटर्स इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ जेण्डर
त्या तर माद्यांनाही खातात कि ....
पण मुंग्यांच्या मांसाहाराची
पण मुंग्यांच्या मांसाहाराची चर्चा का चालू आहे, आपला काही कंट्रोल आहे का मुंगीहारावर
पण मुंग्यांच्या मांसाहाराची
पण मुंग्यांच्या मांसाहाराची चर्चा का चालू आहे,
>>>>
कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस बनतो.
बाकी मुंग्यां माणसांच्या शरीरातली साखर शोषून घेतातच. तुम्हाला काय वाटलं, जेव्हा त्या तुम्हाला चावतात तेव्हा काय तुमचे चुंबन घेत असतात
आणि नाही हर्पेन मी देव नावाच्या संकल्पनेला मानत नाही. मी केवळ एक उपमा म्हणून तो शब्द वापरला.
बाकी मुंग्यां माणसांच्या
बाकी मुंग्यां माणसांच्या शरीरातली साखर शोषून घेतातच. तुम्हाला काय वाटलं, जेव्हा त्या तुम्हाला चावतात तेव्हा काय तुमचे चुंबन घेत असतात>>
म्हणजे मधुमेह असणार्या लोकांना मुंग्या जास्त चावतात. असा तुमचा सिध्दांत आहे आणि तो तुम्ही आमच्या समोर मांडत आहात ?
मलातरी काळ्या मुंग्या असे
मलातरी काळ्या मुंग्या असे मायेने पाय अंगावर फिरवत देवाचा आशीर्वाद देतात असेच वाटते. पण एखादं दुसरा आशीर्वाद खूप होतो, त्यामुळे वारूळा पाशी जात नाही.
आणि मग देवळात पण जात नाही आणि लोकांना उगाच वाटतं की मी नास्तिक आहे.
लाल मुंग्या मात्र फार चावट, त्यांचे लव्ह बाईट्स जात नाहीत लवकर
काळ्या मुंग्या चावतात ?
काळ्या मुंग्या चावतात ?
युरेका युरेका . अगदी नोबल प्राईज मिळण्यासारखा महानतम शोध श्री ऋन्मेष यांनी मायबोलीवर लावला आहे.
दिपस्त तुम्ही त्याचे शोध
दिपस्त तुम्ही त्याचे शोध मनावर घेऊ नका
नायतर त्याला नोबेल सकट मॅगत्से, ऑस्कर असं सगळंच द्यावं लागेल
ऑस्कर काय फिल्मफेअर, आयफा,
ऑस्कर काय फिल्मफेअर, आयफा, मँगो, स्टारडम सगळे अवॉर्ड देउ
पण शोध लावने बन्द कर रे बाबा
माझ्या शोधांवर चर्चा नको.
माझ्या शोधांवर चर्चा नको.
धाग्याचा विषय मुंग्यांचा मांसाहार आहे.
एक आपली आठवण करून दिली.
आपला काही कंट्रोल आहे का
आपला काही कंट्रोल आहे का मुंगीहारावर
>>>
हे मुंगीआहारावर असे लिहिता येईल का?
असे वाटते मुंग्यांच्या पोटात सुईदोरा खुपसून त्यांचा हार गुंफलाय..
मुंगी + आहार = मुंग्याहार
मुंगी + आहार = मुंग्याहार
पण हे मुंगी करत असलेल्या आहारापेक्षा मुंगी खाण्याचा आहार जास्त वाटतं.
बाळ ऋ अरे धाग्याचा विषय
बाळ ऋ अरे धाग्याचा विषय काहीतरी वेगळाच आहे, तुम्हणतोयस तो विषय तू घुसडलास तो आहे
आशुचँप, सगळ्याच
आशुचँप, सगळ्याच प्रतिसादांबद्दल
>>>कारण मुंगी मुंगी जोडूनच
>>>कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस बनतो.
बरोबरे, डोक्याला मुंग्या आल्या माझ्या

कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस
कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस बनतो >> ओ असे आहे का .. मला वाटलं मुंग्यांचं प्रजनन आणि माणसांचं प्रजनन यात फरक आहे
कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस
कारण मुंगी मुंगी जोडूनच माणूस बनतो

the mummy पिक्चर सारख्या आता शरीरातुन अंतिम क्षणी मुंग्याच मुंग्या बाहेर पडणार म्हणजे
in other terms मानवी शरीर म्हणजे मुंग्याचे वारूळच की चक्क :O
दबंग चा चुलबुल पांडे कन्फ्यूज होगा की साला इसमे एंट्री कहा से है और एक्जिट कहा पर है
ती थेंबे थेंबे तळे साचे सारखी
ती थेंबे थेंबे तळे साचे सारखी म्हण आहे. तुम्हा लोकांना प्रत्येक म्हणीचा शब्दश: अर्थ काढायची चावट सवय लागली आहे. त्यामुळे मराठीत नवीन म्हणी बनायच्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे मग मराठी भाषा दिनी ईंग्रजी म्हणींपासून नवीन मराठी म्हणी बनवायचे उपक्रम आपल्याला राबवावे लागतात. एका मराठी मिडियमच्या मराठी माणसाने मराठी मध्यमवर्गीय लोकांसाठी मराठी बोलीभाषेत एक म्हण बनवली आहे तिचे कौतुक करायला शिका जरा. नाहीतर तिथेही खुसपट काढाल, म्हणे मुंगी हा शब्दच मुळात मराठी नाही. मुंग्या आपल्याकडे आफ्रिकेहून आल्या. त्रेतायुगात मुंग्यांचा उल्लेख काही आढळत नाही. वगैरे वगैरे..
आजचा हसायचा कोटा संपला बुवा
आजचा हसायचा कोटा संपला बुवा हे मुंगी पुराण वाचून
उद्या बहुतेक कॉमेंट कर्त्यांची सेल्फ़ी आता मुंग्यासोबत दिसेल कायप्पा वर
http://www.youtube.com/watch
http://www.youtube.com/watch?v=A042J0IDQK4&feature=youtube_gdata_player
जाताजाता मुंग्यांकडून काही शिकण्यासारखे
(मुंगीला मुंगी जोडून .....ह्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हां वीडियो)
>> थेंबे थेंबे तळे साचे
>> थेंबे थेंबे तळे साचे

=
मुंगी मुंगी माणूस बने
ओक्के
उशीर का केला इतका? २७ फेब, ला झाला मराठी भाषा दिन
(No subject)
छान लिहिलेले आहे...
छान लिहिलेले आहे...
Pages