मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.
आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.
साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....
२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.
आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.
मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......
कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....
मुंग्यांची प्रेग्नन्सी __/\_
मुंग्यांची प्रेग्नन्सी
__/\__
रुंम्याला विचारा, त्याच्या
रुंम्याला विचारा, त्याच्या काका का कोणीतरी शिकारी आहेत त्यांच्या सोबत त्याने रानडुक्कर, गेंडा असे काय काय खाल्लेय, डब्यात पण भरून न्यायचा म्हणे तो, मुंग्यांची चटणी म्हणजे अगदीच
डब्यात पण भरून न्यायचा म्हणे
डब्यात पण भरून न्यायचा म्हणे तो, >>>> काय ? गेंडा ? तो पण अख्खा ?


मुंग्यांची प्रेगन्नसी टेस्ट
@फेरफटक,
@फेरफटका,
मला असे सतत आपलं म्हणणं रेटणारे धागे आयडी वगैरे दिसले की अकादमी मधला एक किस्सा नेहमी आठवतो आमच्या, आमचा सरदारजी बॅचमेट होता अंगदसिंह गिल, त्याचं टकुरं (पगडी सहित) लै अरभाट चाले, मस्ती करायला माझ्यासोबत असे तो, एकदा आम्ही दुसऱ्या एका मित्राला पिडायचे ठरवले अन एक शक्कल केली, मित्रासोबत आम्ही ठरवून नॉर्मल गप्पा मारत होतो पण मित्राने एखादा प्रश्न विचारला रे विचारला की आम्ही दोघे एकसुरात कोरस मध्ये एकच वाक्य म्हणत असू,
'ओ नही नही जी, हम तो घर से ही पकोडे खा के आए है'
अक्षरशः मित्राने विचारले
'भाई फ्युचर का क्या प्लॅन है? शादी वगैरे कब?'
'ओ नही नही जी हम तो घर से ही पकोडे खा के आए है' (कोरस)
आबे कल उस्ताद रगडा लगायेगा
ओ नही नही जी......
यार ग्वालियर मार्केट मे वढीया कुडी देखी
ओ नही नही जी.....
मित्र शेवटी कंटाळून पिसाळून जाऊस्तोवर हाच कार्यक्रम चालत असे.
तेव्हा आता मी सविनय म्हणू इच्छितो, ओ नही नही जी हम तो घर से ही पकोडे खा के आये है...
=)) =))
सोन्याबापू, अफाट किस्सा
सोन्याबापू,
अफाट किस्सा आहे.
रावसाहेब मोड ऑनः आमचं येक शिंपल रिक्वेष्ट बघा. तुम्ही ते अॅकेडमी चं ट्रेनिंग चं किस्से लिहून सोडले, त्ये एक ब्येष्ट केलं. आता त्या अॅकेडमी च्या असल्या बाकीच्या किस्स्यांना पण येकदा लिहून सोडा म्हंटो की ओ मी. तुमचं लिखाण म्हंजे येक नंबर अस्तं बघा.
मानवजी, चिकन बिर्याणीचेही
मानवजी, चिकन बिर्याणीचेही डोहाळे लावले असते मी मुंगीला. पण माझ्या क्नॉलेजनुसार मुंगी ही शुद्ध शाकाहारी असते. तिला मांसाहाराचे डोहाळे कसे लागू शकतात? की लागू शकतात?
ऑन ए व्हेरी व्हेरी, व्हेरी सिरीअस नोट. एका शुद्ध शाकाहारी गरोदर व्यक्तीला मांसाहाराचे डोहाळे लागू शकतात का? म्हणजे मी बिडी पिण्याचे डोहाळे लागतात असे एका चित्रपटात पाहिले होते. तसे चिकन तंदूरीच हवी अशी एखादी शाकाहारी व्यक्ती डोहाळेकाळात अडून बसू शकते का?
मुंग्यांची प्रेगन्नसी टेस्ट >
मुंग्यांची प्रेगन्नसी टेस्ट >>
ऋन्मेऽऽष काही महिन्यांपूर्वी लग्न, पत्रिका असे धागे उघडत होता आता प्रेगन्सी, डोहाळे वर आलायस
मुंग्यांची चटणी माहीत नाही,
मुंग्यांची चटणी माहीत नाही, पण मुंग्यांची खीर माझी आज्जी करायची. तेव्हा आमची परीस्थिती बेताचीच होती. दूध, साखर, तूप या चैनीच्या वस्तू होत्या. त्यांची नासाडी होणे परवडायचे नाही/ त्यामुळे जेव्हा एखादी मुंगी साखरेचा दाणा चोरून पळताना दिसली की आजी तिला बोटाच्या चिमटीने मारायची. मग तो मुंगीचे प्रेत चिकटलेला साखरेचा दाणा टाकून न देता जपून ठेवायची. जसे शंभर दाणे व्हायचे तशी त्यात दूध टाकून खीर बनवायची. लहानपणी बरीच मिटक्या मारत खाल्लीय. चव तर चव, त्यावर पौष्टीकही असायची. कारण आज्जी म्हणायची मुंग्या खाल्याने दृष्टी चांगली होते.
असामी मी भविष्याचा विचार करतो
असामी मी भविष्याचा विचार करतो. लोकं पेन्शन पिलॅन काय हे जॉबला लागून चार वर्षे न झाले ठरवून मोकळे होतात. मी निदान ईथवर विचार तरी करू शकतोच ना.
चला भुर्जीपाव खाऊन येतो,
चला भुर्जीपाव खाऊन येतो, जायच्या आधी एक अजून फालतू विनोद..
जर दोन काळ्या मुंग्यांच्या पोटी लाल मुंगीने जन्म घेतला तर डॉकटर त्यांना काय बोलेन??
सोचो सोचो..
सोप्पय
मुबारक हो, आपके घर मुंगेरीलाल पैदा हुआ है
मी बिडी पिण्याचे डोहाळे
मी बिडी पिण्याचे डोहाळे लागतात असे एका चित्रपटात पाहिले होते. >>>
बाळा तो लक्ष्मीकांत बेर्डे होता
ते १०० साखर दाणे आजीच्या
ते १०० साखर दाणे आजीच्या डब्यातल्या साखरेचे होते का शेजारच्यांच्या?
ते १०० साखर दाणे आजीच्या
ते १०० साखर दाणे आजीच्या डब्यातल्या साखरेचे होते का शेजारच्यांच्या?
>>>>>>
हा प्रश्न पडलाच कसा???
आपण पुणेकर का?
एखादी मुंगी चिरडताना ती गरोदर
एखादी मुंगी चिरडताना ती गरोदर असू शकते>>> गुड पॉइंट...!!!!
झुरळं आणि मुंग्या आपल्यावर
झुरळं आणि मुंग्या आपल्यावर जोवघेणे हल्ले करतात, असे एका झडपेत मानेत दात रोवून डायरेक्त खलास, त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांना मारणे क्षम्य आहे. असे हिंसक पशु आपल्या घरात वावरू देणे धोक्याचे आहे, कधी झोपेत काम तमाम करतील कळणार पण नाही.
मी पूर्णपणे क्षितिज यांच्याशी सहमत आहे.
Submitted by आशुचँप >>>>>>>>
अरे आवरा...आशुचँप हासुन हासुन खुर्चीतुन पडलो... शेजारनिने विचारल काय होतय...
तिल तुटक मुटक स्वीडिश मध्ये हा किस्सा समजावला....!!!
मुंगीच्या अंड्यांची बुर्जी
मुंगीच्या अंड्यांची बुर्जी मिळते, बरी लागते. मी खाल्ली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Escamol
अरे किती तो आटापीटा
अरे किती तो आटापीटा मांसाहाराचे समर्थन करायचा
मांसाहार करण्यात काही गैर नाही. पण सात्विक आहार, शुद्ध आहार, शाकाहार. त्याला पर्याय नाही. शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध करणे अवघड नाही पण आपल्या पूर्वजांनी हे केव्हाच ओळखले आहे. म्हणूनच त्यांनी त्यानुसार नियम बनवलेत. तसा विचार करता मांसाहारात काहीतरी वाईट असेलच ना जे आपण सणासुदीला वा मंदिरासारख्या एखाद्या पवित्र स्थळी मांसाहार करत नाही.
अट्टल मांसाहारी लोकांना कोंबड्या बकरे गायीबैल कसे कापले जातात हे आठवडाभर रोजच्या रोज प्रत्यक्ष समोर दाखवले गेले तर ते कितपत खाऊ शकतील हा देखील एक प्रश्न आहे.
माझ्यामते प्रत्येकाने हि टेस्ट स्वत:वर घेतली पाहिजे. यानंतरही जो खाऊ शकतो त्यानेच आपल्याला मांसाहार करायचा हक्क आहे असे समजावे. ज्याला ती द्रुश्ये विचलित करतील त्याने आपण मांसाहाराच्या लायक नाही असे समजून स्वत:हून मांसाहाराचा त्याग करावा.
चला मग कोण कोण तयार आहे ..
ज्याला ती द्रुश्ये विचलित
ज्याला ती द्रुश्ये विचलित करतील त्याने आपण मांसाहाराच्या लायक नाही असे समजून स्वत:हून मांसाहाराचा त्याग करावा.>> त्याग 'करायची' गरजच नाही पडणार, ते बघूनच खाण्याची ईच्छा होणार नाही.
मांसाहारात काहीतरी वाईट असेलच
मांसाहारात काहीतरी वाईट असेलच ना जे आपण सणासुदीला वा मंदिरासारख्या एखाद्या पवित्र स्थळी मांसाहार करत नाही. >> हा मोठ्ठा गैरसमज आहे. मायबोलीवरच अजून एक शाकाहार कि मांसाहार वर अजून धागा आहे त्यात देव दवस्कीमधे मांसाहारचा वापर असल्याची असंख्य उदाहरणे दिली आहेत लोकांनी.
अट्टल मांसाहारी लोकांना
अट्टल मांसाहारी लोकांना कोंबड्या बकरे गायीबैल कसे कापले जातात हे आठवडाभर रोजच्या रोज प्रत्यक्ष समोर दाखवले गेले तर ते कितपत खाऊ शकतील हा देखील एक प्रश्न आहे.>>>
म्हणूनच सर्व खाटीक शुद्ध शाकाहारी असतात
परंतु आपले पूर्वज मास खात
परंतु आपले पूर्वज मास खात असावेत कारण तोवर शेतीचा शोध नव्हता लागला
अरे किती तो आटापीटा
अरे किती तो आटापीटा मांसाहाराला वाईट ठरवायचा
आपले पूर्वज म्हणजे कोण...इथे पुण्या-मुंबई पुरत बोलणं सुरुये का
कित्येक ठिकाणी पिढ्यान पिढ्या मांसाहार केला जातो, देवीला बोकड, रेडकू अजूनही पडतात, कधी गावाच्या जत्रेला गेला नाहीत का
का या जागा पवित्र नाहीत का
जर कधी वेळ मिळाला तर मायबोलीवरच अनै व प्राणा म्हणून एक लेखमाला अाहे, अतिशय अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहीत. उगाच हवेत गोळ्या नाही मारलेल्या. त्या वाचा आणि ठरवा आपले पूर्वज काय करत होते ते
आणि हो कधी वेळ झालांच ना पुण्या मुंबईत असताना तर वेळ काढून दुध डेअर्या बघून या बर का...तिथल्या गाईंना काय अवस्थेत ठेवलं जातं, त्यांच्या वासरांचे काय करतात, खालबच्चा म्हणजे काय याचीही जमल्यास माहीती घ्या
ज्याला ती द्रुश्ये विचलित करतील त्याने आपण दुध पिण्याच्या लायक नाही असे समजून स्वत:हून दुधाचा आणि दुध उत्पादनांचा त्याग करावा.
चला मग कोण कोण तयार आहे ..
म्हणूनच सर्व खाटीक शुद्ध
म्हणूनच सर्व खाटीक शुद्ध शाकाहारी असतात

हो म्हणूनच सगळ्या सदाशिव पेठेत नॉन व्हेज हॉटेल्स आहेत आणि सगळ्या खाटीक खान्यांभोवती शुद्ध शाकाहारी राईस प्लेट मिळते
आशुभाऊ तुम्ही सदाशिव पेठेत
आशुभाऊ तुम्ही सदाशिव पेठेत नॉनव्हेज हॉटेल म्हणालात न एकदम डोळ्यासमोर आवारे अन मिलन खानावळी दिसल्या, मराठा दरबार हॉटेल दिसले, आज एखादी कोंबडी सोलावी म्हणतो.
आता ऑफिसला जाताना रस्त्याने
आता ऑफिसला जाताना रस्त्याने गपगुमान चाललो होतो. एक बोकड उगाचच मला खुन्नस देऊन गेला..
मायबोलीवर लिहिताना जरा जपून .........
अर्चना सरकार,
अर्चना सरकार,
माझे आजोबा दारात कोंबडी कापायचे. भल्या पहाटे. आणि ते बघायला मी रविवारच्या दिवशी साखरझोप मोडत उठायचो. बालपणीच मनावर ठसली गेलेली द्रुश्ये. जसे भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तसेच हे, कोंबड्या बकरया हे आपले खाद्य असते, हे मनावर तसेच ठसले गेले आहे. आता मी ठरवले तरी मांसाहाराचा त्याग करू शकत नाही. माझ्यासाठी तो अन्नद्रोह होईल!
आठवड्याचे सर्व दिवस जो किमान
रोजच्या रोज किमान २५० ग्राम मांस भक्षण करतो ती व्यक्ति शास्त्रीय दृष्टया मांसाहारी कॅटेग्रीमध्ये मोड़ते बाकी सर्व पानी कम
फक्त 250 ग्राम....
फक्त 250 ग्राम....
मांसाहार बघूनच पाव लीटर लाळ सुटते माझ्या तोंडाला.. मग कोण मोजून मापून खातोय.. हे त्या डायटींग प्लान सारखे झाले.. मूठभर कडधान्य खा आणि ग्लासभर लिंबूपाणी प्या.. मांसाहाराला अश्या मर्यादेत नाही बांधता येत
मुंग्यांना शाकाहारी समजणाऱ्या
मुंग्यांना शाकाहारी समजणाऱ्या डार्विन पेक्षा हुशार ऋ शास्त्रज्ञाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे
डिस्कव्हरी चॅनेल कधी पाहिले किंवा बायोलॉजी झूलॉजी विषयी काही पुस्तके चाळली तर अफ्रिकेतल्या मांसभक्षक मुंग्या कसे झोपलेल्या माणसांना फस्त करतात ते समजले असते
मुंग्यांना शाकाहारी समजणाऱ्या
मुंग्यांना शाकाहारी समजणाऱ्या डार्विन पेक्षा हुशार ऋ शास्त्रज्ञाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे >>> लवकर लक्षात आले तुम्हास.
Pages