मांसाहार: एक विरोधाभास

Submitted by पद्म on 14 December, 2016 - 10:14

मांसाहार योग्य किंवा अयोग्य याबद्दल मला काही म्हणायचे नाहीये, पण काही लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे माझाच गोंधळ होतो. काल माबोवरच एका चित्र्या नावाच्या कुत्र्याची कथा वाचली. त्यामुळे या विषयावर लिहावेसे वाटले.

आपण जगात पाहतो की, काही लोकांना मुक्या प्राण्यांबद्दल खूप सहानुभूती असते, मलाही आहे. पण मी काही असे माणसं पाहिलेत, जे त्यांच्या पाळीव प्राण्यांचा स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळ करतात, आणि त्याच वेळी दुसऱ्या प्राण्याची हत्या करतात.
त्यात काही हुशार असे पण असतात जे म्हणतात, माझ्या मांसाहार न करण्याने त्यांची हत्या थांबत असेल तर मी मांसाहार बंद करायला तयार आहे. एखाद्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या समोर त्याच्या मुलाची हत्या केली, तर तो मी सुटू शकत नाही हे माहिती असूनही सुटण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. तो असे कधीच म्हणत नाही की, मी प्रयत्न करूनही मुलगा मरणारच आहे तर धडपड करून काय फायदा? मला त्यामुळे अश्या सोंगांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप राग येतो.
इथे मला काही किस्से सांगायची इच्छा आहे, ज्यामुळे माझा मुद्दा स्पष्ट होईल.

साल २००६, न्यू यॉर्क, अमेरिका..
माझ्या एका मित्राने काहीतरी कारणाने त्याच्या कुत्र्याला मारले आणि ही क्रूरता त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सात्त्विक स्त्रीला सहन न झाल्याने, तिने माझ्या मित्रावर केस केली. आणि काही दिवसानंतर कळले की त्या सात्विक स्त्रीचा स्वतःचा pork slaughtering चा व्यवसाय आहे.
हा माझ्यासाठी प्रथम विरोधाभास होता.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकर्मचार्याचा whats app चा dp पाहिला, त्यामध्ये तो आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये जन्मलेल्या एका कुत्र्याच्या पिलाला बाटलीने दूध पाजत होता. कोणीही म्हणेल, "किती दयाळू माणूस आहे हा!". पण मला माहिती आहे, तो दर आठवड्याला कमीत कमी २-३ कोंबड्यांना मुक्ती देऊन वेगळीच दया दाखवतो. अरे, किती हा दिखावा....

२ वर्षांपूर्वीची गोष्ट......
मी विमानातून दिल्लीला येत असताना, माझ्याशेजारी एक जैन युवक बसलेला होता. मी जेवण ऑर्डर करताना व्हेज ला प्राधान्य दिलं. तो युवक म्हणाला....
"आर यू व्हेजिटेरियन?"
"येस!"
"बट, वी आर बेटर व्हेजिटेरियन दॅन यू.."
"हाऊ?"
"वी आर जैन & वी डोन्ट टेक एनीथिंग फ्रॉम अंडर ग्राउंड.."
मी गप्प बसलो आणि विचार केला की, "या मुर्खाला कोण सांगणार, या विमानासाठी लागणारे इंधन कितीतरी मीटर जमिनीतच ड्रिल करून काढण्यात आले आहे."
आजकाल लोकांची विचारसरणी खूप उथळ झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचाही खोलात विचार करत नाहीत.

आणि रोज दिसणारे चित्र...
काही तरुण मुली चिकन/मटण खरेदी करतांना दिसतात. त्यांना पाहून विचार येतो की, या भविष्याच्या माता आहेत, या भविष्यात एका जीवाला जन्म देणार आहेत, त्याच्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करणार आहेत, या दुसऱ्या जीवाला मारतांना आणि कापताना कसे पाहू शकतात, आणि त्यावर त्याला खाऊ कसे शकतात? जर त्या असे सहज करू शकतात, तर त्यांच्यात किती ममता आहे, याबद्दल शंका निर्माण होते.
अश्या मुली पाहून, भारतात पण लवकरच child cannibalism सुरु होईल अशी भीती वाटते.

मी शाकाहाराची वकिली करत नाहीये, पण लोकांच्या अश्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाद्वारे खरच माझा गोंधळ होतो. हे लोक त्यांच्या स्वतःच्याच तत्त्वांवर नीट चालत नाहीत, हीच खंत आहे......

कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा. विपर्यास म्हणायचं होतं. दोन्ही हातांनी टाईप करताना बोटे इकडची तिकडे झाली असावीत.

एडिट का होत नाही कमेण्ट ?

मला एक गोष्ट कबूल करायची आहे. काल माझ्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स मिळाले.
बी १२ डिफिशिअन्सी आहे. ही अमांसाहारी व्यक्तींमधे उद्भवते असे डॉक्तरांनी सांगितले. अवघड आहे.
फिजिओ म्हणतो अंडी तरी खा.

बी १२ डिफिशिअन्सी साठी व्हेज उपाय आहे का ?

मा़ह्या एकाही कमेण्ट मधे चुकीचे किंवा हास्यास्पद काहीही नाही. तुम्ही उगीचच टोळी बनवून तसे करत आहात.

हे असं काही काही पास होत राहिलं तर धागा १ हजारी होणार, मायबोलीवरील धमाल धाग्यात समाविष्ट होण्याचं (करण्याचं) सामर्थ्य आहे या धाग्यात (प्रतिसादात)

बी १२ डिफिशिअन्सी साठी व्हेज उपाय आहे का ?

>>> तुमच्या दुर्दैवाने नाही. प्राणिजन्य पदार्थांतूनच बी१२ मिळतं. अर्थात दूध व दुधाचे पदार्थ हे 'बुद्धी असलेल्या माणसाने दुसर्‍या जीवाला त्रास न देता' मिळवलेले असतात असा तुमचा भाबडा विश्वास असेल तर दूधाचा पर्याय आहे.

सिंबा,
पेडगांवच्या येड्याला, अन त्याची झील तोडत इथे येउन हसणार्‍या शेळपट रेड्याला, कशाला समजावता आहात?
माझे इथले नांव असे कसे, ही मंदशी पोटदुखी माझ्या मूळ आयडीपासून आहे त्यांची. जरा जुनी माबो वाचा.
*
भंभ्या/उर्फ रुन्म्या,
"अभक्ष्य" भक्षणाने जर शैथिल्य आले असते, तर तमाम यवन आपोआपच निर्वंश झाले असते की रे! चैला, कैपन पांचटपना करायलाय लेका तू Lol

मी तर कुणाचं नाव पण नाही घेतलं. फक्त वैफल्यवाचक म्हटलेलं.....
शाही लोक का घायाळ झाले असतील ?

अभक्ष्य" भक्षणाने जर शैथिल्य आले असते, तर तमाम यवन आपोआपच निर्वंश झाले असते की रे!

-- हे खतरनाक आहे . म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी तर गोमांस व्यंजने घरी करुन यवनांना प्रेमाने घास भरवून भरवून चारले पाहिजे. पण ते विरोध करतात. नेमके हे हिंदुत्ववादी हिंदूंचे हितचिंतक आहेत की मुसलमानांचे?

<< "अभक्ष्य" भक्षणाने जर शैथिल्य आले असते, तर तमाम यवन आपोआपच निर्वंश झाले असते की रे! चैला, कैपन पांचटपना करायलाय लेका तू Lol >>

------- जगात सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे... मान्साहार खाणे हे मानवासाठी नैसर्गिक आहे. ज्याला आवडत असेल, झेपत असेल तर त्याने आपापल्या आवाक्यात खाणे. सर्वच लोक शाकाहारी बनले तर ७.५ अब्ज लोकान्न्ना अन्न आणायचे कुठून? अन्नासाठी किती मारामारी होणार.

त्या बिहारच्या आरोग्य मन्त्र्यान्नी उन्दीर खाण्याचा सल्ला दिला होता... चिकनपेक्षाही चवदार आणि रिच इन प्रोटिन्स, जोडीला शेतीची नासाडी कमे. रेसिपी टाका रे.

आरारा मी कुठे विश्वास ठेवला त्यावर. मी तर मांसाहारात यवनांनाही मात देतो. मित्र म्हणतात चुकून भारतात पैदा झालास. योगायोग बघा. उद्याच संध्याकाळी 7 वाजता ऑफिसमधील यवनांकडून मला इफ्तार पार्टीचे आमंत्रण आहे Happy

वर कोणीतरी नॉनवेज जोकचा उल्लेख केला आहे. अश्लील विनोदांना नॉनवेज जोक संबोधणे हा खोडसाळपणा काही शाकाहारी लोकांनी केला आहे. कृपया तो शब्द वापरून त्याला समर्थन देऊ नका. मांसाहाराला अश्लीलतेच्या पंक्तीत बसवायचा डाव आहे हा..

मांसाहार = चटकदार,
म्हणून त्या जोक्स ना ते नॉनव्हेज जोक्स म्हणत असतील रे,

माफ करा. काल रात्री झोप लागल्याने प्रतिसाद देता आले नाहीत.
भन्नाट भास्कर यांचे स्वागत या धाग्यावर.

मग काय तर. नॉन व्हेज म्हणजे भारी व्हेज जोक्स आणि फूड म्हणजे सपक!
हे भास्कर काका नॉन व्हेज जेवणाने नपुंसक बनतो, नॉन व्हेज जेवण आणि जोक वाईट अशा पुड्या का सोडतात? वर मी कुठे असं म्हणालोची लोणकढी.

Pages